दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कीर्ती शिलेदारांचं स्वरसम्राज्ञी आणि प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये घातलेलं शंकराभरणम् लक्षात आहे. >>> अगदी अगदी. श्रद्धांजली.

अनिल अवचट एक उत्तुंग व्यक्तिमत्व. साधी रहाणी, उच्च विसारसरणी असणारा माणूस. मला त्यांचं लेखन खूप आवडायचं. लहानपणापासून विविध दिवाळी अंकात लेख यायचे, पहीला मी त्यांचा वाचायचे. शाळेतही त्यांचे धडे होते.

व्यसनमुक्तीसाठी त्यांनी केलेल्या कामाला तोडच नाही. जाम वाईट वाटतंय. श्रद्धांजली.

प्रत्यक्ष कधीही न भेटता लेखनातून, टीव्ही मुलाखतीतून भेटणारे, आपलं जवळचं कोणीतरी गेलं अस वाटतंय.

एक अनमोल असं व्यक्तिमत्व !! प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही हे दुःख आता आयुष्यभर !!

त्यांचे विचार ऐकतच रहावे, जगाकडे सजगतेने बघण्याची दृष्टी ....

Sad _/\_ त्यांच्या सोबत सीमा देव यांचे नाव अगदी ठरलेले असायचे. साठ वर्षांची सोबत संपली. मागच्याच वर्षी सीमा देव यांना अल्जाइमर्स झाला असल्याची बातमी आली होती.

_/\_

धरेवर वसंत आला खरा पण कोकीळाच उडुन गेली.
_|\_
त्यांना निरामय दीर्घायुष्य मिळाले. किती मो ठी गोष्ट आहे. फार मोठी कर्तु त्ववान , मानाने श्रेष्ठ व्यक्ती हरपली.

अरे बाप रे ! थोड्या थोड्या दिवसाच्या अंतराने काय चाललंय हे ?
रमेश देव , लता मंगेशकर आणि आता राहुलकुमार बजाज !!! सगळेच उत्तुंग !
__/\__

राहुल बजाज; भावपूर्ण श्रद्धांजली...

बिझनेसमेन्स्चा उदय होत असताना, इंडस्ट्रियलिस्ट्सचा होणारा अस्त दुखावणारा आहे...

बप्पीदा _/\_

एक चटकन आठवलेली आठवण
'शीशे का घर' (1984) नावाच्या फारश्या प्रसिद्ध न झालेल्या सिनेमातील बप्पीदांनी संगीतबद्ध केलेली गाणी अतिशय सुरेख आहेत. फार फार वर्षांपूर्वी एका मैत्रीणीच्या कॅसेटवरून मी माझ्या कॅसेटवर टेप करून घेतली होती कारण या गाण्यांची कॅसेट मिळत नव्हती आणि एकदा ऐकून मी गाण्यांच्या प्रेमात पडले होते. कितीतरी वेळा ऐकली ही गाणी. बप्पीदांच्या नेहमीच्या गाण्यांपेक्षा अगदी वेगळी. गायक अनुप घोशाल आणि गायिका सलमा आगा.

आता ही सर्व गाणी ट्युबवर मिळाली नाहीत. ही दोन सापडली ती ऐकते.
तुम साथ हो जिंदगी भर के लिए : https://youtu.be/7XZih3mcrto
है मुख्तसर सी बात ये : https://www.youtube.com/watch?v=_TWFeP1b7uc

गाण्यांची लिस्ट आणि डिटेल्स इथे आहेत : http://myswar.co/album/sheeshe-ka-ghar-1984

बप्पीदांना भावपूर्ण श्रद्धांजली!

चलते चलते, शराबी ह्या चित्रपटातील गाणी अगदी भिडणारी!

चलते चलते मेरे ये गीत याद रखना
इन्तेहां हो गयी
मंजिले अपनी जगह है

Pages