Submitted by Bhumika on 31 July, 2008 - 22:49
मी नुकतेच २०१२ या वर्षाबदल यु ट्युब वर विडिओ पाहिले. भन्नाट वाटले. माया, चिनी, रोमन सन्क्रुति नुसार ( नुकतेच वाचलेल्या मराठि पुस्तका प्रमाणे सुद्धा ) २०१२ या साली काहितरि खास होणार आहे हे खरे. मग ते काय असेल ? तुम्हि हि कोणि काहि माहित असेल तर नक्कि सान्गा. खालि काहि लिन्क्स आहेत.
[video:http://www.youtube.com/watch?v=XAtgPaggeTM&feature=related]
[video:http://www.youtube.com/watch?v=V5MS5Odp2qQ&feature=related]
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कृपया
कृपया खालीलप्रमाणे बदल करता येईल का?
२०१२ हे वर्ष सर्व संस्कृतींमध्ये कॅलेंडरचे शेवटचे वर्ष आहे का?
|| हरि ओम
|| हरि ओम ||
नक्किच . धन्यवाद
|| हरि ओम
|| हरि ओम ||
पहिलि शक्यता भारतिय पन्डितानि सान्गितलाय कि २०१२ पासुन विध्वन्स सुरु होइल.( कशामुळे माहित नाहि)
नोस्ट्राडेमास ने सान्गितलाय कि २०१२ पासुन ३ रे महायुद्ध जोरात सुरु होइल, काळ अश्या काहि गोष्टि बघेल ज्या ह्या आधि कधिच्च पाहिल्या गेल्या नसतिल
माया संस्कृतींमध्ये म्हटलेय कि २०१२ ला प्रुथ्वि चा अक्श ( ऐक्सिस) बदलणार आहे ज्यामुले पुर, ज्वालामु़खि , वादळे निर्माण होवुन यत्र तत्र हा:हा:कार माजेल. मानव जातिचा नाश अटल आहे ( वेळ , काळ थाम्बेल कारन मकेन च्या म्हनण्यानुसार वेळ तरन्ग ( टाइम वेव ) शुन्यावर येवुन थाम्बतेय.
नक्कि काय असेल ते कळेलच.
अरेरे.. मला
अरेरे.. मला हे माहिती असतं तर उगाच गुंतवणुक वगैरे करायच्या फंदात पडलो नसतो.. चार्वाक स्टाईल यावत् जीवेत जगायला पाहिजे होते
प्रकाश हा लहरी आणि कण रुपात असतो (wave and particle) हे अभ्यासले होते.. आणि अवकाश हे (space) आपल्याला दिसणार्या तीन मिती आणि वेळ ह्यांच्या नुसार बदलते (आठवा आइन्स्टाईन).. पण वेळ ही तरंगाच्या माध्यमातून सिद्ध करता येते हे माहिती नव्हते.. ते स्ट्रिंग थेअरीवाले स्वतःच्या थेअर्या सिद्ध करायला ९, १०, ११ ते २६,२७ मितींपर्यंतची गणिते मांडत असतात.. कोण म्हणतं त्या एकमेकांभोवती गुंडाळल्या आहेत. कोणी म्हणतात की प्रत्येक मिती ही स्वतःभोवती वर्तुळाकार गुंडाळली आहे..
ही काळाची तरंगलहरी संकल्पना जरा ह्या आजकालच्या थेरॉटिकल फिजिसिस्ट ना सांगाल काय? नाहीतरी सध्या त्या क्षेत्रात जबरदस्त मंदी आलेली आहे आणि वेगवेगळे ग्रुप एकमेकांना 'कुणी टॅकिऑन घ्या, कुणी ब्रेन्स घ्या' असे टोमणे मारत आहेत काळाच्या तरंगलहरीने तिथे थोडी हलचल तरी माजेल...
|| हरि ओम
|| हरि ओम ||
इथे ते विज्ञान खुप छान पधतिने टोरेन्स मकेन ने विशद केले आहे.
[video: http://www.youtube.com/watch?v=Bu6WFr61I-g&feature=related]
[video:http://www.youtube.com/watch?v=w-prt5d6m6s&feature=related]
अरेरे.. मला
स्वतःपुरत
स्वतःपुरते बोलायचे म्हंटले तर २०१२ साली मी ६९ वर्षाचा होईन. मला आत्ताच जगण्याची काही आवश्यकता वाटत नाहीये. तेंव्हा २०१२ मधे जग बुडले तरी मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही!
पण गेल्या ६५ वर्षात असे अनेकदा ऐकले होते की जग बुडणार! तसे काही झाले नाही. मला नोकरी करावीच लागली. कष्ट करावेच लागले. जग चालूच राहिले, महागाई वाढतच गेली. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटर नष्ट झाले. इराक, अफगाणिस्तान बेचिराख झाले. भारतात बाँब स्फोट होतच आहेत. मी अजून हिशेब करतोच आहे की इतके पैसे आहेत नि इतकी देणि आहेत, तर कसे करावे?
हे रोजचे प्रश्न मला जास्त महत्वाचे वाटतात. जग बुडायचे तेंव्हा बुडेल. त्याची काळजी मी करून काय होणार?
|| हरि ओम
|| हरि ओम ||
पण गेल्या ६५ वर्षात असे अनेकदा ऐकले होते की जग बुडणार! तसे काही झाले नाही
भुमिका
झक्कि जगबुडि होइल हे नौस्ट्रदेमास ने सान्गितले कारण त्याने " सुनामि " पाहिले होते. आणि ते झाले.
त्याने सगळे जग नष्ट होइल असे नाहि म्हटलेय . जगातिल विध्वन्सा मधे ३/४ माणसे मरतिल. ( १ टक्क्का फक्त राहतिल )
इतकेच त्याने म्हटलेय
३/४ माणसे
३/४ माणसे मरतिल. ( १ टक्क्का फक्त राहतिल)
--- ३/४ म्हणजे ७५% मरतील ; मग राहिलेले २४% कुठे जातील?
**३/४ म्हणजे
**३/४ म्हणजे ७५% मरतील ; मग राहिलेले २४% कुठे जातील?
****
हाच प्रश्न मलाही पडलाय्.बाकी अस काही होईल यावर माझा अजिबात विश्वास नाही
तसे काही
तसे काही झाले नाही. मला नोकरी करावीच लागली. कष्ट करावेच लागले. जग चालूच राहिले, >>>>>>>>>>>>>>
मला वाटते इथे ' स्वयंपाक घरात काम करावेच लागले ' हे वाक्य राहून गेलेय.
(संदर्भः_ झक्कींच्या आत्मचरित्रातून.....)
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
|| हरि ओम
|| हरि ओम ||
**३/४ म्हणजे ७५% मरतील ; मग राहिलेले २४% कुठे जातील?
ते मलाहि माहित नाहि. पण हे २४ % नक्किच नशिब्वान असतिल . नवे जग नवे आयुश्य नवी इनिन्ग आणि जग शान्ति प्रेम आनन्द या वटेने चालु लागेल.
इथे मी फक्त ज्यानि ज्यानि हि ग्रुहितके मन्डलि आहेत त्यन्चे विचार लिहतेय. त्यात माझ्या मनाचे काहि नाहि बरे का. पण मला कुतुहल मात्र नक्कि आहे
भूमिकाताई,
भूमिकाताई, मी उत्तरपूर्व मेक्सिकोमधल्या आता नष्ट झालेल्या इंका संस्कृतीच्या पुस्तकातही जगबुडीबद्दल वाचले आहे. त्यात मात्र हे साल नाही. त्यात मोघम २, ३, ८, १ असे आकडे काढले आहेत आणि पुढे मोठे प्रश्नचिन्ह काढले आहे.
तसेच एक चित्रमालिकापण आहे. त्यात एक माणूस हरणाला मारताना दाखवून पुढे तो बुडताना दाखवला आहे. याचा अर्थ नॉन्व्हेज खाणारे सगळे बुडतील असा होतो, असे काही संशोधकांचे मत आहे. सध्या जगात व्हीगन चळवळ जोरात सुरु आहे याचे कारण हेच.
तसेच जे लोक सव्यसाची असतील म्हणजे डाव्या व उजव्या हाताचा वापर सारख्याच क्षमतेने करू शकणारे ते लोक प्रलय आल्यावर दोन्ही हाताने वल्हवतील आणि जिवंत राहतील असे पण त्या पुस्तकात आहे.
तसेच गाय हा प्राणी पवित्र असल्याने आणि शाकाहारी असल्याने टिकून राहील असेही इंकन लोक म्हणतात.
तसेच तेथे संस्कृत शब्दांमध्ये काही गूढ वाक्यं आहेत.
अग्नि:... ज्ञात... युद्धस्य कथा रम्या असे काही शब्द नीट ओळखू येतात पण बाकीचे अजून स्पष्ट व्हायचेत.
पण हे पुस्तक दुर्दैवाने आउट ऑफ प्रिंट आहे. आमच्या इथल्या लायब्ररीमध्ये याची एकच जुनी कॉपी आहे (ती इतकी जुनी आहे की ती मूळची इंका लोकांची कॉपी असावी, असे लोक विनोदाने म्हणतात.) त्यात मी हे वाचले. त्यात अजूनही थक्क करून सोडणार्या मजेमजेच्या गोष्टी आहेत. मी त्या इथे नक्कीच लिहिन. पण साल २०१२ नाही हे नक्की.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
माया बद्दल
माया बद्दल मीही वाचले. त्यांनी ब-याच शतकांबद्दल लिहुन ठेवलेय असे वाचले. बरीच शतके असल्यामुळे कुठेतरी लिहायची मर्यादा संपणारच ना? अगदी अगणित वर्षांचे कसे लिहु शकणार ते? म्हणजे जागा आणि मनुष्यबळ किती लागेल एवढे सगळे लिहायला? त्यामुळेच बहुतेक त्यांनी २०१२ नंतर आवरते घेतले असणार...:)
असो, काय होईल ते बघायला मला निश्चितच आवडेल. काय झालेच आणि सगळेच गेलो एकदम तर मग काय... हाय काय नी नाय काय्...
साधना.
(श्रद्धा - पुस्तकाचे नाव कळेल का?)
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
श्रद्धा,
श्रद्धा, 'पृथ्वीवर माणुस उपरा' का? शरतशंद्र नाडकर्णी बहुतेक लेखक..
साधना,
साधना, पुस्तकाची पहिली काही पाने गायब आहेत. त्यानंतर हे पुस्तक लायब्ररीबाहेर देणे बंद झाले.
टण्या, नाही. हे खूप जुने पुस्तक आहे. इंकांच्या संस्कृतीवर आहे. 'पृथ्वीवर माणूस उपराच' हे अजूनही विकत मिळतं दुकानात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
नॉन्व्हेज
नॉन्व्हेज खाणारे सगळे बुडतील असा होतो, असे काही संशोधकांचे मत आहे. सध्या जगात व्हीगन चळवळ जोरात सुरु आहे याचे कारण हेच.
खरच काय्????व्हेगन चळवळ याच्यामुळे जोरात आहे????
'पृथ्वीवर
'पृथ्वीवर माणूस उपराच' हे अजूनही विकत मिळतं दुकानात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~ >>>>>>>>>>>>>>>
हे पुस्तक मला फारच भम्पक वाटले बुवा.....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
आमच्या
आमच्या इथल्या लायब्ररीमध्ये याची एकच जुनी कॉपी आहे (ती इतकी जुनी आहे की ती मूळची इंका लोकांची कॉपी असावी, असे लोक विनोदाने म्हणतात.) त्यात मी हे वाचले. >>>>>
आता त्याची झेरॉक्स काढने अथवा स्कॅनिंग करणे अगदी अशक्य आहे का? पण नाही लोक थोडे सुद्धा डोके चालवत नाहीत....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
त्यात एक
मी पण एका
मी पण एका ईन्का संस्कृती विषयीच्या पुस्तकात वाचले होते कि मुळात इन्का लोकांची ही वस्ती परग्रहावरून आलेल्या लोकांनी स्थापन केलेली होती. त्यातही २०१२ साल होते का नाही ते आठवत नाही पण ते असे असेल कि २०१२ हा शेवट असण्याचे कारण असे की परग्रहावरील ईतर रहिवाशांकडून किती तरी हजार वर्षे हा ग्रह म्हणजे पृथ्वी त्यांनी भाडेतत्वावर घेतली व ही लिज २०१२ साली संपणार. व त्या नंतर जगबुडी होऊन एक नवी वसाहत स्थापन होणार.
End of the world in 2012'
End of the world in 2012' असा गुगल शोध केला तर खंडीभर साईट्स मिळतात.
.
२०१२ पर्यंत जगले वाचले तर मी बाई भरपूर खाऊन पिऊन घेणार. (आठवा स्कायलॅब भारतावर कोसळणार अशी बातमी होती तेव्हा कश्या लोकांनी पुरणापोळ्या आणि वडे करून खाल्ले!)
|| हरि ओम
|| हरि ओम ||
हे हे हे ! सहि आहे.
मज्जाच मजा. ममी पण माझे आवडते श्रिखन्ड खाणार
मी पण वाचतेय एक पुस्तक त्या प्रमाणे २०१२ पासुन ३ रे महायुद्ध जोरात सुरु होवुन महासन्ग्राम होइल असे म्हटलेय. त्यामुळे मला वाटतेय सर्वकष निकश हा असु शकतो कि प्रचन्ड मानवी सन्हार होइल आणि जे सात्विक / सदाचारि ( पापि नसलेले ) सद्गुनि सत शील लोके जगतिल ( बाकी आमच्यासारख्या पाप्यन्चे काहि खरे नाहि : ))
श्रद्धा व
श्रद्धा व हवाहवाई,
आपल्या प्रतिक्रीया वाचल्या. त्यातल्या बर्याच मला चुकीच्या वाटल्या.
१. <<पण ते असे असेल कि २०१२ हा शेवट असण्याचे कारण असे की परग्रहावरील ईतर रहिवाशांकडून किती तरी हजार वर्षे हा ग्रह म्हणजे पृथ्वी त्यांनी भाडेतत्वावर घेतली व ही लिज २०१२ साली संपणार>>
माझ्या माहितीनुसार इंकांव्यतिरीक्त इतर कुठली जमात भाडेकरू नव्हती. कदाचित पोटभाडेकरू असतील. मग इतर लोकांचे काय?मूठभर भाडेकरूंसाठी त्यांनीही नष्ट व्हायचे का? तसंच या लीजचं नुतनीकरणही करता येऊ शकतंच. शिवाय पुनर्वसनाचं काय?म्हणजे उरलेले १/४ किंवा १% यांपैकी जे कुणी उरतील त्यांना परत या वसाहतीत राहता येईल का?
२. <<त्यात एक माणूस हरणाला मारताना दाखवून पुढे तो बुडताना दाखवला आहे. याचा अर्थ नॉन्व्हेज खाणारे सगळे बुडतील असा होतो, असे काही संशोधकांचे मत आह<<>
अमेझॉनच्या जंगलात राहून डॉ. लिझा मार्शमेलो यांनी सुमारे २० वर्षं संशोधन केलं आहे. त्यांच्या मते या जंगलात राहणार्या लोकांसाठी हरण, तरस हे प्राणी खाणारी लोकं शाकाहारी असतात. आपल्याकडे नाही का बंगाली लोक समुद्रभाजी म्हणून मासे खात, त्यातलाच हा प्रकार. थोडक्यात इंका जमात व अमेझॉनच्या लोकांच्या विचारसरणीत खूप फरक आहे. त्याबद्दल आपले काय मत आहे?
आपण मांसाहारी लोकांबद्दल थेट विधान केले, पण हरीण वगैरे प्राणी खाल्ले की मांसाहाराचे पाप बोडखी बसते याची कल्पना नसलेल्या त्या अजाण अमेझॉनवासीयांना पण बुडावे लागेल का?
३. <<अग्नि:... ज्ञात... युद्धस्य कथा रम्या असे काही शब्द नीट ओळखू येतात पण बाकीचे अजून स्पष्ट व्हायचेत.>>
इंका जमात ही बरीचशी शांतताप्रिय होती. गुलाबपुष्पाला तर त्यांच्या संस्कृतीत प्रचंड महत्त्व होतं. ही लोकं युद्धकथा आवडून घेतील असं वाटत नाही.
४. <<गाय हा प्राणी पवित्र असल्याने आणि शाकाहारी असल्याने टिकून राहील असेही इंकन लोक म्हणतात.>>
हे चूक. गाय हा प्राणी आपल्यासाठी पवित्र आहे. त्यांच्यासाठी हरीण हा प्राणी पवित्र होता. त्यांच्या एका सणाला हरणाची पूजा व्हायची. शिवाय ' e um engana' या पुस्तकाच्या अनुवादात मी वाचलं आहे की हरणीचं दूध हे या लोकांत अतिशय पवित्र व पौष्टीक असल्याचा समज आहे.
आपण २, ३, ८,१ या आकड्यांबद्दल बोललात ते बरोबर आहे, हे आकडे जुळवून १८३१, १३८१, २३८१, २८३१ अशी विविध सालं तयार करता येतात.
नॅनोटेक्नॉलॉजी वापरून 'भविष्यात नेणारी यंत्रं' तयार करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. तेव्हा २३८१, २८३१ या सालांबद्दल आपल्याला माहिती मिळू शकेल.
चिन्मय ते
चिन्मय ते पुस्तक e um engana नसून e om engana आहे. आपल्या ओम चा मूळ उगम सुर्यपूजक इन्का लोकांपासून झाला हे त्या वरचे भाष्य तू प्रस्तावनेत वाचले नाहिस का?
HH, मला नाही
HH, मला नाही वाटत लीजचे काही प्रकरण असेल. कारण जर जगबुडी होणार म्हणतात तर त्यांच्यासाठी मनुष्यप्राणी इतका हीन आहे का की मनुष्यजात नष्ट केल्यावर ते पृथ्वी पाण्याने धुवून घेतील?
.
गुलाबपुष्पाला तर त्यांच्या संस्कृतीत प्रचंड महत्त्व होतं.>>>>>>>
चिनूक्स, शांततेचा संदेश हे पांढर्या लिलीचे फूल देते. गुलाबपुष्प हे प्रेमाचे प्रतीक आहे. मुळात गुलाबपुष्प प्रेमाचे प्रतीक ही गोष्ट जुन्या ऍझटेक संस्कृतीतली. आणि तेव्हा या संस्कृती बर्याचशा एकमेकांशी संपर्क राखून होत्या. त्यामुळे प्रत्येक संस्कृतीत थोड्याफार फरकाने तेच तेच संकेत सापडतात.
'Everything is fair in love and war' असे जिथे प्रेमाबद्दल म्हटले जाते आणि त्याची तुलना युद्धाशी केली जाते, याचा अर्थ स्पष्ट आहे. इंकन लोक हे सगळ्याच बाबतीत लढाई करायला सदैव तयार होते; असे दिसून येते.
.
२,३,८,१... चा अर्थ थोडा गूढ आहे. काही संशोधकांच्या मते हा एक क्लू असावा. २ मार्च १९८१ ला जगात काहीतरी महत्त्वाचे घडले आहे ज्यातून भविष्याचे संकेत मिळतील. पण ते काय आहे हे दुर्दैवाने अज्ञात आहे. अजूनतरी!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
>>>> २,३,८,१...
>>>> २,३,८,१... चा अर्थ थोडा गूढ आहे. काही संशोधकांच्या मते हा एक क्लू असावा. २ मार्च १९८१ ला जगात काहीतरी महत्त्वाचे घडले आहे ज्यातून भविष्याचे संकेत मिळतील. पण ते काय आहे हे दुर्दैवाने अज्ञात आहे. अजूनतरी!
>>>>>
काही अमेरिकन शास्त्रज्ञांच्या मते ते २ मार्च नसुन ३ फेब्रुवारी आहे
टण्या,
टण्या, त्याकाळात तारखांची एकच पद्धत अस्तित्त्वात होती असे 'e um engana' या चिन्मयने नमूद केलेल्या पुस्तकात लिहिलेले आहे. त्यामुळे तो दिवस २ मार्चच.
या पुस्तकातले 'Bonding with other civilizations' नावाचे प्रकरण वाच. त्यात त्या वेळची कालगणना, इंकांचे कॅलेंडर आणि तारखा लिहिण्याची पद्धत सगळे तपशीलवार लिहिले आहे.
.
चिन्मय, हरणाचा मुद्दा बरोबर आहे. पण गायीलाही पवित्र मानले आहे. हरणांना मारूनही खात असत.
हरीण हा मुळात नाजूक प्राणी आहे. तो प्रलयात टिकून राहील, असे इंकांना मुळीच वाटत नव्हते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
२०१२ असे
२०१२ असे तर्कवितर्क करेपर्यन्त येईलसुद्धा.
ही सगळी
ही सगळी पुस्तके कुठे मिळतात ते प्लीज सांगा. उत्सुकता खुप वाढली...
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
Pages