चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता सोलूनच द्यायचं संत्र तर - जुल्मी हे विशेषण लिंगनिरपेक्ष आहे. अख्ख्या गाण्यात माधुरी जोरा-जोरी करणार्‍या व्यक्तीचे जेंडर सांगत नाही. छोरा-छोरी गेले असतील खेतमध्ये नाय तर छोरी-छोरी नाय तर नॉनबायनरी ... .

जुल्मी गेंडा असेल.

बळी आवडला.

रामूचा नाईट्मेअर अ‍ॅट १२ ओ क्लॉक अशा नावाचा हॉरर सिनेमा प्राईम्वर आहे.

अठरा बरस की कंवारी कली थी
घूँघट में मुखड़ा छुपके चली थी
फॅन्सी गोरी, फॅन्सी गोरी चने के खेत में
हुई चोरी चने के खेत में

पहले तो जुल्मी ने पकड़ी कलाई
फिर उसने चुपके से ऊँगली दबाई
जोरा जोरी, जोरा जोरी चने के खेत में

च्रप्स यांची बाजू घ्यायची असेल तर ( ते ऋन्मेषची घेत असल्याने थर्ड पार्टी ऋन्मेषची बाजू ) शेतात चोरी झाली ही एक घटना आहे. ती बहुतेक क्राईम पॅट्रोलच्या एका एपिसोडची स्टोरी असावी. दुसरी केस वेगळी आहे.
पहिली चोरीची घटना आहे. दुसरी जुल्म आहे. यात बोट तोडण्याचा गंभीर गुन्हा झालेला आहे. दोन्हीचा तपास चालू आहे. सतर्क रहिये. जुल्म दस्तक देता है.
दोन्ही घटना चण्याच्या म्हणजे हरभर्‍याच्या शेतात झाल्या आहेत. या झाडावर चढू नये हाच संदेश यातून आपल्याला मिळतो.

दुनिया गोल है... माधुरी चांगली नटी नाही वरून तर सुरू झालं होतं. माधुरीच्या हावभावाने जर जोराजोरी करणार्‍या व्यक्तीचे जेंडर समजत असेल तर कम्मालच अ‍ॅक्ट्रेस झाली की ती... माबोकरांनो, नक्की काय ते ठरवून टाका एकदाचं- ती अ‍ॅक्ट्रेस चांगली आहे की नाही... Wink Happy

ती अ‍ॅक्ट्रेस चांगली आहे की नाही... Wink Happy>>>>>> आहे मला आवडते.
माझ्या लहाणपणी आमच्या शोकेसमधे तीचा फोटो होता.तेव्हापासून ओळखते तीला (माझ्या काकांची क्रश होती बहुतेक, त्यांनी एक मोठं पेन्सिलने चित्र पण काढलेले तीचे)

ती चांगली नटी असेलही पण तीने फारच रडके रोल्स केले .. त्यामुळे ती मला कायमच तीच्या वयापेक्षा जरा जास्तच मोठी वाटायची.. दिल तो पागल है मधे शाहरूख करिश्माला ऐवजी माधुरीकडे जातो म्हणून तो पिच्चरही फारसा आवडत नाही..
जीतके मी श्रीदेवी आणि जुही चावला ला बघून खूष व्हायचे तितका आनंद माधुरीला नाचतानाच बघून झाला असावा

मी सोनाली बेंद्रेवर लाईन मारायचो. आधी जन्माला आलो असतो तर सारीकावर लाईन मारली असती. पण या दोघींनीही गाडी पुसायला पण जवळ उभे केले नसते ही गोष्ट वेगळी.

आता ही लिंगनिरपेक्षता कुठून आली मध्येच?
जोरा जोरी हे गाणे मी छोरा छोरी असे ऐकल्याने त्याच्या लिंगनिरपेक्षतेला धक्का पोहोचला हा मुद्दा आहे का? मग आताच आणा रे तो फासाचा दोर.. मीच घेतो स्वत:च्या गळ्यात टाकून Happy

जोक्स द अपार्ट,
गीतकारांच्या भावनेचा पुर्ण आदर ठेवून म्हणावेसे वाटतेय की हे गीतही त्या "चोली के पीछे क्या है?" किंवा "चढ गया ऊपर रे अटरियापे लौटन कबूतर रे" याच कॅटेगरीतले आहे.

त्यामुळे ती मला कायमच तीच्या वयापेक्षा जरा जास्तच मोठी वाटायची.
>>>>
हे मात्र आहे. स्पेशली हम आप के है कौन मध्ये तेव्हाचा डोल्ले शोल्ले नसलेला सलमान फारच पोरसवदा भासत होता.

दिल तो पागल है मधे शाहरूख करिश्माला ऐवजी माधुरीकडे जातो म्हणून तो पिच्चरही फारसा आवडत नाही.
>>>>
मला तर दोन्ही मुली शाहरूखच्याच प्रेमात पडतात याचसाठी तो पिक्चर आवडतो Happy

बिथोवन नावाचा एक कुत्र्याचा मूवी होता. पाहिला असेल ब-याच जणांनी. तरी काहींना नाही आवडला. काहींना खूपच आवडला. युट्यूबरून उडाला हा मूव्ही.
त्यांचाच दुसरा कुत्र्याचा मूवी आला होता. त्याचेही नाव संगीतकारावरून होते. बिथोवनप्रेमी त्या मूवीचे नाव सांगू शकतील का ?

माधुरी मला आवडायची. आताची माधुरी जराशीपण नाही आवडत. फेक वाटते.
तेव्हा मला माधुरी आवडायची तरी आता मी तिला नावं ठेवतेच. आणि कुणाला तेव्हाची ही माधुरी आवडत नसेलच की. माझ्या भावाला माधुरी फारच सोसो वाटायची. ही काय हिरोईन आहे म्हणायचा. त्याला श्रीदेवी आवडायची.

आताची माधुरी जराशीपण नाही आवडत. फेक वाटते.>> फेकच आहे ती. सौंदर्यावर इथे परेन्त आलेली आहे. जेव्हा अ‍ॅक्टिन्ग करायची वेळ येते तेव्हा मर्यादा दिसून येतात. आता तर जात चाललेले सौदर्य पकडून परत ग्लॅम दिसायची धडपड केविल वाणी वाट्ते. अनन्या पांडेच्या आईचे रोल व्गैरे करावेत.

डीडीएल जेत पण तिला प्रेमात पाडायचे प्रयत्न विचित्र वाटतात. जितके करिश्मा सहज काम करते तित केच हिचे आर्टिफिशिअल आहे. पण मुव्ही मी शा हरुख व गाण्यांसाठी बघते. एक सीन ह्यात शाहरुख ड्र म वाजवतो व ती नाचते तो फार छान आहे. ती सर्व साड्यांमध्ये छान दिसते. ढोलना गाणे फेवरिट.

एक व्यक्ती म्हणून तिच्या बद्दल माझे काहीच मत नाही त्यांचे लाइफ चांगले आहे व ते तसेच चालू राहवे. त्यावरून मला टँजंट मारू नका ही विनंती.

माधुरी, कतरीना, जॅकलिन एकच कॅटेगरी आहे...
लूक्स, डान्सिंग स्किल्स बेस्ट पण acting च्या नावाने बोम्ब ...

म्हाळसा आणि अमा + 1
मुळात करिष्मा काही चांगली अभिनेत्री नाहीय पण माधुरीसमोर तिची acting बेटर दिसलीय... डान्स मध्ये देखील खाल्ला आहे तिने...

बिथोवेन मस्त मुव्ही होता
तो उडाला का?

तसाच एक मराठीत पण आलेला
पण लैच सुमार होता बघवला नाही जास्त
नाव पण विसरलो

स्वस्ती +१
कालपासून 'जोरा जोरी माबोके खेतमें' चाललंय. माधुरी आणि माधुर्येतर(?)
माधुरी मला नेहमीच फेक वाटलीये, ग्रेट डान्सर , साधारण अभिनय. राग नाही लोभ नाही. अभिनयासाठी विद्या बालनला बघते, ओटीटी मुळे अशीही स्क्रिप्ट/कथानक हिरो असते. देवाचें आभार भारतीय सिनेमा 'त्या' तून निघाला आणि मोकळा झाला.

बिथोवेन मस्त मुव्ही होता.+१
मार्ली अँड मी सुद्धा मस्त होता.
कॉल ऑफ द वाईल्ड पण छान आहे.

डीडीएल जेत पण तिला प्रेमात पाडायचे प्रयत्न विचित्र वाटतात. जितके करिश्मा सहज काम करते तित केच हिचे आर्टिफिशिअल आहे. >>> 200w.gif200w.gif200w.gif

डीडीएल जे नाही हो के३जी असेल. विनोद खन्नाची सून असते बहुतेक. जॉन अब्राहम हेलिकॉप्टरने एण्ट्री घेतो तो चित्रपट.

माधुरी आवडली फक्त तेजाब मध्ये
भावुक गुंड मुन्ना आणि त्यावर मनापासून प्रेम करणारी मोहिनी

नंतर मग अनेक ठिकाणी तिचा अभिनय लाऊडच वाटत गेला

त्यापेक्षा मग मनीषा कोईराला छान होती
अर्थात तिचे फक्त तीनच चित्रपट बघावेत
बॉंबे, 1942 आणि तिसरा खामोशी
बस यापलीकडे जायची गरजच नाही
बोंबे मध्ये अल्लड नवथर तरुणी ते प्रेमात आकंठ बुडालेली ते मुलांची आई आणि संसाराला वाहून घेतलेली
हे जे काही स्थिततयार आहे ते अफलातून आहे

मल्लिका शेरावत, पूनम पांडे या नट्या खूप प्रामाणिक. त्यांनी आपण अभिनयासाठी आलो आहोत असा दावा कधीही केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाला असे कधीच कुणीही म्हणत नाही.

कम ऑन गायज - त्यांना दिल तोपागल म्हणायचे आहे.. टायपो आहे तो...
माधुरी एक सुमार अभिनेत्री असा धागा काढा..

अ सेपरेशन कुणी पाहिला असेल तर कळवा. गेल्या खेपेला पंधरा मिनिटे पाहून सोडून दिला होता. आज पैसे पडताहेत.

कम ऑन गायज - त्यांना दिल तोपागल म्हणायचे आहे.. टायपो आहे तो...
>>>>

हो, क्षुल्लक चूक आहे. पण मूळ पोस्ट माधुरी विरोधात असल्याने तो आता फाशीचा गुन्हा झाला आहे Wink

जोक्स द अपार्ट, आज वीस वर्षांनी त्या लांबलचक नावाच्या चोप्रा-जोहर-शाहरूखपटांच्या नावात कोणीही गल्लत करू शकतो. मी शाहरूखचा प्रचंड एक्सवायझेड चाहता असूनही बरेचदा कभी अलविदा ना केहना चित्रपटाला चटकन कभी हा कभी ना बोलून जातो.

या चित्रपटांवर एक वेगळा धागा व्हायला हवा...

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
कुच कुच होता है
दिल तो पागल है
कल हो ना हो
मै हू ना
कभी खुशी कभी गम
कभी अलविदा ना केहना
....
..
या चित्रपटांमध्ये ज्यांना शाहरूखसोबत काम करायला मिळाले त्या सर्वच अभिनेत्र्या नशीबवान समजाव्यात

पण मूळ पोस्ट माधुरी विरोधात असल्याने तो आता फाशीचा गुन्हा झाला आहे
>>> मला वाटत नाही इथे माधुरी कोणाला खरेच आवडते... पण ऋन्मेष तुम्ही तो मुद्दा घेतला म्हणून उगाच माधुरीची बाजू घेतायत लोक... आणि ते कळून येतेय...

आशु + 1.
मनीषा कोईराला खूप वरची लेव्हल आहे... माधुरी,जॅकलिन,कतरीना,सोनम वगैरेंना शक्यच नाही अग्निसाक्षी किंवा बॉंबे लेव्हल अभिनय...

Pages