Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असामी प्राजक्ता - +१
असामी
प्राजक्ता - +१
माधुरी प्रचंड ओव्हर रेटेड आहे
माधुरी प्रचंड ओव्हर रेटेड आहे...
+1
आपल्या कत्रीनाला चांगला नवरा
आपल्या कत्रीनाला चांगला नवरा मिळाला. अभिनंदन.
हे बकेट लिस्ट चित्रपटाचे अमा
हे बकेट लिस्ट चित्रपटाचे अमा यांचे परीक्षण
https://www.maayboli.com/node/66266
यात माधुरीच्या अभिनयक्षमतेच्या मर्यादेबद्दल कित्येकांनी भरभरून लिहिले आहे.
ज्यांना यावर आक्षेप आहे त्यांनी तो ईथे जरूर नोंदवावा
बाकी माधुरी कमालीची अभिनेत्री आहे आणि कतरीना मात्र तितकीशी सुंदर नाही. हे गजब आहे. मला कधीच पटणार नाही. तुलना करता माधुरीचा अभिनय कतरीनापेक्षा चांगला नक्कीच असेल, पण ती एकेकाळची नंबर वन अभिनेत्री सौंदर्य आणि नृत्य यावरच झाली हे मान्य करावेच लागेल. पण सोडा त्या माधुरीला, कमॉन, कतरीना सुंदर नाहीये.. मग असते काय हे सौंदर्य ?? बॉडी शॉडी डोल्ले शोल्ले बनवायचे का आता हिरोईनींनी सुद्धा सलमानसारखे सुंदर म्हणवून घ्यायला??
सूर्यवंशी मध्ये अजय च्या
सूर्यवंशी मध्ये अजय च्या एन्ट्री वर "देव गन लेके आया" असा अफाट जोक आहे >> हा हा हो, मस्त आहे. मला तेव्हा विचार पडले की हा जोक ईतके वर्षात कोणाला सुचला कसे नाही
दो लार्ज व्हिस्कॉ और एक देसी
मत उकसाओ पाजी को
शां.मा
शां.मा
तुम्ही कितिही उरस्फोड केली तरी त्याला पटणार आहे का? हे मला वाटत्,ते तुम्हाला वाटत,चला अजुन डिस्कस करायला एक नविन धागा काढुयात म्हंणुन नविन घागा काढेल लगेच, त्याच्या कुठल्याही आर्ग्युमेन्टला इग्नोर करुन ओलाडुन पुढे जायच हेच सोल्युशन मला तरी सापडलेले आहे त्याच्या अशा स्वभावामुळे अनेकदा त्याने क्वचित काही चान्गल लिहल असेल तरी त्यावरही काही प्रतिक्रिया द्याविशी वाटत नाही.>>>>+१
माधुरी च्या अंगी फक्त सौंदर्य च नाही, नृत्य, अभिनय, डायलॉग डीलेव्हरी आणि स्क्रीन प्रेझेन्स होता.. तिला ठिकठाक म्हणणार्या व्यक्ती ला नुसतं
किरकोळ हीरोईन्स च्या बाह्य बोटॉक्स ब्युटी लाच बघायचं असेल तर ते असो.
श्रीदेवी ला ही हे सर्व गुण अवगत होते पण तिने कॉस्मेटिक सर्जरी करून लूक्स वाढवले होते. जुही पण मस्त होती.
>>यात माधुरीच्या
>>यात माधुरीच्या अभिनयक्षमतेच्या मर्यादेबद्दल कित्येकांनी भरभरून लिहिले आहे.<<
ऋन्म्या, माधुरीला तु अॅप्रिशिएट करु शकत नाहि यामागचा लोचा एकंच आहे - तु वीस वर्षं आधी या जगात प्रवेश करायला हवा होतास...
कत्रिना सुरेखच आहे. तिच्या
कत्रिना सुरेखच आहे. तिच्या कडुन अभिनयाची माझी तरी अपेक्षा नाही. जिंनामि दओ मध्ये ती एक साधी नॉर्मल मुलगी म्हणून आहे तशी वावरली आहे. रूण मेश ह्यांना अनुमोदन तेरी ओर गाण्यात ती काय अफाट दिसलेली आहे. सुरेख मुलगी हिर्वीन ही बॉलिवुड चित्रपटाची डिमांड असते. कारण अॅव्हरेज मेल प्रेक्षकाला एक स्वप्न सुंदरी कायम हवी असत राहिलेली आहे. नेहमीचे जीवन फारच मेहनतीचे व बोअरिन्ग असते त्यात एक कामुक रिलीफ. पूर्वी पासून एक एक स्त्री ही गरज निभवत आहे. हेमा मालिनी. श्रीदेवी माधुरी जुही प्रत्येकी चा वेगळा गोडवा.
माधुरी एके काळी लोकांचे क्रश
माधुरी एके काळी लोकांचे क्रश असावी... अबोध,तेजाब,दिल वगैरे मध्ये बरी दिसते...
यामागचा लोचा एकंच आहे - तु
यामागचा लोचा एकंच आहे - तु वीस वर्षं आधी या जगात प्रवेश करायला हवा होतास...
>>>>
एक्झॅक्टली!
मी जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हा माधुरीचे नाही तर कतरीनाचे फोटो लागायचे. ढिगाने लागायचे. त्यामुळे कतरीनाच्या सौंदर्यात कोणी जरासाही दोष काढत असेल तर ते मला आश्चर्यकारक वाटतेय.
पण वर मी माधुरीच्या सौंदर्याला कुठेही कमी लेखलेले नाहीये. उलट तिचेही सौंदर्य हिच तिची मोठी स्ट्रेंथ होती म्हटलेय. ती माझ्या पिढीची नसली तरी ती सुंदरच आहे हे कळते मला. हेच मधुबालाबाबतही कळते. किंबहुना मी पौगंडावस्थेत असताना आमच्या घरी आई जुने पिक्चर फार लावायची. ते बघून बघून बिचारी आशा पारेख माझी क्रश झाली होती.
वर मी टिप्पणी केलीय ती माधुरीच्या अभिनयाबाबत. आता माधुरीने तसे स्त्रीप्रधान चित्रपटच केले नाहीत वगैरे लाख म्हटले तरी एक चुम्मा उदाहरण देतो. चित्रपट अंजाम. जो स्त्रीप्रधान होता, माधुरी एके माधुरीभोवतीच फिरणारा होता. त्यात तिने काही वाईट अभिनय नाही केला. पण काही स्पेशलही नाही केले. त्याचमुळे आजही तो चित्रपट माधुरीचा म्हणून नाही तर शाहरूखचा म्हणून ओळखला जातो. ते सुद्धा शाहरूख तेव्हा नवखा होता हे विशेष.
त्यातली माधुरी आजही आठवते ते फक्त त्यातील "छोरा छोरी चने के खेत मे" या गाण्यामुळे. तीच तिची स्ट्रेंथ होती. तिचे नृत्य आणि तिचे सौंदर्य आणि ते खुलवणाऱ्या तिच्या अदा.. त्याचमुळे लोकं हम आपके है कौन सारखी लग्नाची कॅसेटही वारंवार बघतात.
जोरा जोरी चने के खेत में...
जोरा जोरी चने के खेत में... असं आहे ते.
अच्छा.. तसेही माझे ते आवडते
अच्छा.. तसेही माझे ते आवडते गाणे नाहीये. ते तर माझ्या मोठ्या बहिणी स्वतःला माधुरी समजून त्यावर नाचायच्या त्यामुळे बालपणीच्या आठवणीत लक्षात राहिले ईतकेच. जसा क्रिकेटचा देव सचिन तसे बॉलीवूडची देवी होती आमच्या कुटुंबात माधुरी ९० टक्के जनता तिची चाहती..
माधुरी , काजोल क्रश असणारे
माधुरी , काजोल क्रश असणारे तेंव्हाचे पुरुष आता स्वतः आलोकनाथ , अमरिषपूरी झाले आहेत.
आवडतं नसलं तरी बोल नीट लिहावे
आवडतं नसलं तरी बोल नीट लिहावे रे. गीत लिहीणारे गीतकार मन लावून लिहीत असतात, त्याचा मान ठेवावा. माधुरीला/तिच्या गाण्यांना नावं ठेवायला हरकत नाही पण नीट वाचून/ऐकून नावे ठेवावी.
एक पोलिश मूव्ही पाहिला होता.
एक पोलिश मूव्ही पाहिला होता. त्यातली हिरॉईन सेम टू सेम माधुरी दीक्षित होती.
नावं लक्षात ठेवत नसल्याने पास.
अथिरन हा (हिंदी डब्ड) सायको
अथिरन हा (हिंदी डब्ड) सायको थ्रिलर चित्रपट दोन घटका करमणूक करतो. शेवट अजून परफेक्ट करता आला असता. अर्थात अशा मूव्हीजमधे ही तक्रार कायम राहते. साई पल्लवी ने छान काम केले आहे. ती केरळची कुठली मार्शल आर्ट हल्ली बर्याच सिनेम्यात दाखवतात. कमल हसनच्या इंडीयन पासून ते एक फॅड सुरू झाले आहे. त्रुटी जाणवतात. युट्यूबवर पाहिला.
मलाही सुचवलाय तो यू ट्यूबने ,
मलाही सुचवलाय तो यू ट्यूबने , अतुल कुलकर्णी आहे ना ? तेवढा एकच ओळखीचा कलाकार आहे. चित्रपट बरा आहे का शां मा ?
कल्लरीपय्यटू ....केरळची मार्शल आर्ट !
पण नीट वाचून/ऐकून नावे ठेवावी. >>>
सायको थ्रिलर सस्पेन्स आहे.
सायको थ्रिलर सस्पेन्स आहे. प्रत्येकाची आवड शेवटी.
पण दीड तास जातील आरामात.
असे भरपूर मुविज आलेत एकदमच
असे भरपूर मुविज आलेत एकदमच
प्राईमवर बळी नावाचा मराठी
प्राईमवर बळी नावाचा मराठी पिक्चर आला आहे. स्वप्निल जोशी, पूजा सावंत आहेत. हॉरर मुव्ही आहे.
इछुकांनी लाभ घ्यावा
आवडतं नसलं तरी बोल नीट लिहावे
आवडतं नसलं तरी बोल नीट लिहावे रे. गीत लिहीणारे गीतकार मन लावून लिहीत असतात, त्याचा मान ठेवावा. माधुरीला/तिच्या गाण्यांना नावं ठेवायला हरकत नाही पण नीट वाचून/ऐकून नावे ठेवावी.
>>>
किती सोयीने आणि चटकन अर्थ काढले जातात सोशलसाईटवर
तुम्हाला खरेच असे वाटले का की जोरा जोरी चणे के खेत मे चे मी छोरा छोरी चणे के खेत मे हे त्या गाण्याची गीतकाराची माधुरीची खिल्ली उडवायला लिहिले होते
मी आजवर ते गाणे छोरा छोरी चणे के खेत मे असेच आहे समजत होतो. तुमची पोस्ट ऐकल्यावर पहिले जाऊन लिरीक्स चेक केले. मला ते गाणे आवडत नाही फारसे हे एवढ्यासाठीच सांगितले की त्यामुळे लहानपणी कधी फार मन लाऊन ऐकले नव्हते.
मायबोलीवरच एक धागा आहे की चुकीचे ऐकलेले गाण्यांचे शब्द. तिथे तुम्हाला अश्या पोस्टी हजारो सापडतील ज्यांनी गीतकाराचा अपमान केला आहे
. असो, माधुरीबाबत लोकं पर्सनली घेत आहेत, तिची क्रेझच तशी होती, त्यामुळे असे चटकन तलवार ऊपसत आहेत. मी समजू शकतो. बहिणींना माधुरीवरून चिडवण्यात माझे बालपण गेलेय
बाकी मी माधुरीचे सौंदर्य, नृत्य, अदा तिची क्रेझ या सर्वांचे कौतुक केलेय. फक्त तिच्या अभिनयक्षमतेवर शंका उपस्थित करणे तिला नावे ठेवणे होत असेल तर खुशाल मला फासावर लटकवा
आधी छोरा आणि छोरी खेत मध्ये
आधी छोरा आणि छोरी खेत मध्ये जातात मगच तर जोरा जोरी होते ना....
असं काय नाय ... एकदम
असं काय नाय ... एकदम लिंगनिरपेक्ष गाणे आहे. छोरा-छोरी खेतमध्ये हे तुमचं मत झालं. नक्की काय झालं ते ती जाणे नि देव जाणे.
तलवार, फास... बापरे!!! जाऊ दे, जे म्हणायचं ते म्हणं बाबा. आता भलत्यावेळी कुठे दोर शोधू तुला फासावर लटकवायला.... .
आम्ही काल स्केलेटन की म्हणून
आम्ही काल स्केलेटन की म्हणून एक हॉरर पिक्चर पाहिला. तसा जुना आहे पण हॉरर सस्पेन्स म्हणून मस्त जमला आहे. पार्श्वभूमी ही लुईझियाना मधल्या वुडू - हुडू चेटूकाची आहे. नविन पिढी, नक्की काय सुरू आहे, भूत आहे का खरंच असे बरेच प्रश्न पडतात आणि एक धक्कादायक शेवट होतो. तसे हॉरर मधील दर्दी असाल तर शेवटाच्या आधी कल्पना येते की काय घडते आहे किंवा घडणार आहे पण तरिही मस्त धक्का बसतो.
कुठे पाहिला?
कुठे पाहिला?
तलवार, फास... बापरे!!! जाऊ दे
तलवार, फास... बापरे!!! जाऊ दे, जे म्हणायचं ते म्हणं बाबा. आता भलत्यावेळी कुठे दोर शोधू तुला फासावर लटकवायला.... .>> सीमन्तिनी मागच्या पानावर असाम्याची कॉमेन्ट वाच!
अठरा बरस की कंवारी कली थी
अठरा बरस की कंवारी कली थी
घूँघट में मुखड़ा छुपके चली थी
फँसी गोरी, फँसी गोरी चने के खेत में
हुई चोरी चने के खेत में
पहले तो जुल्मी ने पकड़ी कलाई
फिर उसने चुपके से ऊँगली दबाई
जोरा जोरी, जोरा जोरी चने के खेत में
हेच ते लिंगनिरपेक्ष गाणे...
हो, जुल्मी बाई असू शकते
हो, जुल्मी बाई किंवा ट्रांस असू शकते जुल्मी हे विशेषण लिंगनिरपेक्ष आहे.
बाई किंवा ट्रान्स
बाई किंवा ट्रान्स लिंगनिरपेक्ष कशी
Pages