मुंज मुलाला काय भेट देता येईल?

Submitted by आभा on 25 November, 2021 - 19:00

परदेशात राहणाऱ्या मुलाला मुंजीनिमित्त काय भेट देता येईल?
परदेशात राहणाऱ्या हे एव्हढ्यासाठी लिहिलं आहे कि आकाराने /वजनाने फार मोठ्या वस्तु देता येणार नाहीत.
पण इथेच भारतातील मुलांसाठी असं लिहुन सल्ले लिहिल्यास बाकीच्यांना उपयोग होऊ शकेल.
तर मंडळी कृपया मदत करा.

Group content visibility: 
Use group defaults

Play station 5 X BoX latest version. Mountaineering kit you buy on American site and they will deliver. T shirts and badges from space ex.

बजेट माहीत नाही. यातील काही गोष्टी परदेशात शिप करता येतील, की न्यायाची भानगड नाही.
माईनक्राफ्ट जावा एडिशन.
कुठलं स्पेसिफिक गेमिंग कंसोल असेल तर त्यातला कुठला गेम हवा असेल तर तो.
स्कूटर (ट्रिक्स करता येतील अशी जरा चांगली घेतली तर पोरांना फारच आवडते)
रोलर ब्लेडस्
आईसस्केटिंग चे स्केट्स
बुद्धिबळ
हॅरी पॉटर वाचलं नसेल तर त्या पुस्तकांचा सेट
गेम इ. मधलं कुठलं कॅरेक्टर आवडतं असेल तर त्याचं ब्लँकेट, पीजे इ.
आजी आजोबांकडून भारतीय भेट हवी असेल तर महाभारतातील गोष्टींचं जरा मोठं पुस्तक.

मुंज झाल्यावर मुलगा परदेशी परत जाणार असेल तर त्यांचे सामान वाढवण्यपेक्षा एकतर रोख रक्कम द्या किंवा amazon तत्सम कंपन्यांची ऑनलाइन वाऊचर द्या. म्हणजे तो त्याच्या देशात वापरु शकेल.

खूप खेळणी आली की परदेशी जाणारे बरीच खेळणी भारतात ठेवून जातात कारण बैगेत जागा नसते/ दुसरे महत्त्वाचं न्यायचे असते.

इथे भारतात अजून किती दिवस सांभाळायचे म्हणून इतर मुलांना तिच खेळणी दिली जातात (नवीन कशाला विकत घ्या./ घरात पडून आहेत आणि ज्याला मिळाली तो 2/3वर्ष तरी येणार नाही भारतात वै.)

अगदीच नात्यातील असेल तर सोने ही घेऊ शकता पण शेवटी ते बँकेच्या लॉकरमध्येच जाते कारण लहान मुले रोज घालत नाहित.

ETFs किंवा bluechip shares

परदेशातील ETFs किंवा shares द्यायचे असतील तर त्याच्या आई बाबांना रोख रक्कम देऊन खरेदी करायला सांगता येईल.

जर मुलगा, त्याचे आई बाबा पुढे मागे भारतात येणार असतील तर त्यांच्या नावे भारतातील ETFs किंवा shares मधे गुंतवणूक करता येईल.

हे भारतातल्या मुलांसाठी..
मावळा' नावाचा एक नवीन बोर्ड गेम आहे.पुण्यात मिळतोय.
2 किंवा 4 जणं लागतात हा गेम खेळायला.
आपण 'व्यापार' खेळायचो.तीच कंसेप्ट.
फक्त ईथे ईतिहासाची जोड दिली आहे.
शिवाजी महाराजांच्या काळातील पैसे 'होन' (सोंगट्या म्हणून),फासे.

फासा खेळून जो आकडा पडेल त्या आकड्यावर चांगली घटना घडली असेल(ऊदा. महाराजांचा जन्म ) तर आपल्याला पैसे मिळणार.
वाईट काही घडलं असेल (बाजीप्रभू देशपांडे, गड आला पण सिंह गेला) तर आपल्याला दंड भरावा लागतो or फासा टाकायचा एक चान्स जातो.
महाराजांचा जन्म ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत हा प्रवास आहे.
शेवटी ज्याच्याकडे जास्त 'होन' रहातील तो जिंकला.

सध्या त्यावर storytell subscription ची ऑफर पण चालू आहे.

भारतात मुंज करुन मुलगा परत परदेशी जाणार असेल तरी त्यांच्या रहात्या घरी गिफ्ट शिपिंग करणे जमेल का ? भारतात मुंजीच्या वेळेस त्या गिफ्टचा फोटो प्रिंट करून + एखादे लहानसे टोकन गिफ्ट देता येईल.

रास्प्बेरी पाय / किंवा तत्सम. किट,
आयपॅड
टेलीस्कोप
लेगो माइंड स्टॉर्म
थ्री डी प्रिंटर
लेगो ताजमहाल किंवा त्या सारखे लेगो सेट
कुकिंगची आवड असेल तर चांगले चाकू, एप्रन, इतर उपकरणे
मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमीचे किट्स ( अन्कॉमन गूड्स साईटवर बरेच किट्स आहेत )
अ‍ॅनिमेची आवड असेल तर अ‍ॅनिमे शर्ट किंवा इतर अ‍ॅनिमे मर्चंडाइझ
कॅम्पिंग गिअर
एकट्याने प्रवास करण्याच्या वयाचा मुलगा असेल तर सूटकेसेस - कॅरी ऑन + चेकिन बॅग असा सेट

मुंजीच्या वयाचं पोरगं आहे म्हणजे ७-८ च्या आसपास, मराठी वाचता येत असेल/ शिकत असेल/ आईवडील शिकवणार असले तर गोट्या, चिंगी आणि खडकावरला अंकुर सेट द्या जमल्यास फास्टर फेणे द्या.

आमच्या मध्यमवर्गीय औकातीनुसार सुचवले आहेत गिफ्ट ऑप्शन, डिलिव्हरी थेट यूएसला होऊ शकतील असे वाटते.

Shyam chi aai book my ultimate favourite.

मावळा बेस्ट आहे. नक्की बघीन. अजून 2/4 मैत्रिणींना पण लिंक देऊन टाकली.
छान ऑपशन्स मिळत आहेत इथे.
त्याच्या घरी शिपिंग करण्याची आयडिया आवडली आहे.
पुस्तकांची आयडिया पण आवडली आहे.
प्लीज सजेशन येउद्यात अजून. पुढेही छान फायदा होईल.

कुणालातरी भेट वस्तू द्यायची आहे... माझे चार शब्द.

१. भेट वस्तू देतांना पर्यावरणाचा विचार केला जावा. काल पर्यंत करत नव्हतो, पण आता करतोच करतो.
२. बजेटा ठरवा. आपण आपल्या बजेट मधे बसणारेच द्यायचे. आर्थिक दृष्टीने पेलवत नसतांनाही उधार- उसनवार करून भेट-वस्तू देणारे महाभाग आहेत. लोक काय म्हणातील किंवा आपणच आपल्या कमी लेखायला नको. त्याच बरोबर कुणाला प्रभावित करणे, आपल्या अर्थिक स्थितीचा आप्त स्वकियांत छाप पाडून त्यांना प्रभावित करणे हा उद्देश नसावा. आपल्याला स्पर्धा करायची नाही आहे.
३. तुम्हाला काय आवडते यापेक्षा ज्या व्यक्तीला भेट द्यायची आहे त्या व्यक्तीला काय आवडते याचा अंदाज घ्या. स्पष्टपणे/ डिप्लोमॅटिकली विचारायचे. त्यांना आवडणारे, आणि आपल्या बजेट मधे बसणारेच द्यायचे. उगाचच कचरा वस्तू देण्यात अर्थ नाही.
कृपया आपल्या- निवडी त्यांच्यावर थोपवू नका.
अजून कुणी असेच गिफ्ट दिले तर ? एक विश लिस्ट बनवायची, एक एक वस्तू खोडायची म्हणजे श्यामची आई दोन पुस्तके मिळणार नाहीत. Happy
४. एकवेळा विकलेला माल परत घेतला जाणार नाही असे भारतात आहे, आता बदलले असेल तर माहित नाही.
पाश्चात्य जगात gift receipt मागितल्यावर देतात. भेट वस्तू विकत घेतांना आवर्जून पावती मागायची आणि वस्तूला जोडायची, तसे सांगायचे. gift receipt नसेल तर भेट वस्तू द्यायची नाही. दिलेली भेट आवडली नाही किंवा एका पेक्षा जास्त मिळाल्या तर परत करुन त्यांच्या आवडीचे काय वाट्टेल ते गिफ्ट आणायची सोय निर्माण करा.
५. भेट वस्तूला आवरण हवेच हवे (लहान मुलांना आवडते ते उघडायला). काढणार्‍याने व्यावस्थित काढले तर पुन्हा वापरता येते. किंवा कागदी बॅग उत्तम.
६. गिफ्ट कार्ड सर्वात चांगला पर्याय आहे. मुले मोठी असतील तर टिम हॉर्टन्स, स्टार बक्स, best-buy... अनेक पर्याय आहेत किंवा visa चे गिफ्ट कार्ड. चहा- कॉफी- नास्ता कधी तरी घेणारच, खूप उपयोगाचे ठरते आणि थोडीफार आर्थिक मदत होते.
मुले अगदीच लहान असतील तर toys-r-us किंवा कपड्यांच्या दुकानांने भेट कार्ड किंवा visa. toys-r-us अमेरिकेत बंद झाले आहे पण कॅनडात अजूनही आहे.
रोख रक्कम भेट देणे सर्वात सुटसुटीत. चार लोकांनी दिलेल्या एकत्र रकमेत एखादी मोठी वस्तू विकत घेता येते किंवा भावी शिक्षणासाठी बाजूला ठेवता येते.

मुंजीच्या मुलाला म. गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांच्या सारख्या भारत घडवणार्‍या कर्तृत्त्ववान व्यक्तिंबद्दल माहिती देणार्‍या ऑडिओ/व्हिडीओ सिडीज नाहीतर पुस्तके भेट द्यावीत बाकी शाळेत राजे-महाराजे तसेच थोर समाजसुधारक यांच्या बरोबर खोटे वीर वगैरे शिकवले जाईलच.

उदय, चार शब्द आवडले. मुलांना किंमतीबद्दल काही देणंघेणं नस्तं त्यांच्या आवडीची वस्तु मिळाली झालं पण पालकांना महाग वस्तु दिल्यास ओझं वाटू शकतं त्याचाही विचार करावा.

मुलाला वाचनाची आवड असल्यास त्याची वाचनाची आवड लक्षात घेऊन खालीलपैकी पुस्तके देऊ शकता.
१. राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
२. छत्रपती शिवाजी महाराज - कृष्णराव अर्जुन केळुसकर
३. श्रीमान योगी - रणजीत देसाई
४. शिवाजी, द मॅॅनेजमेंट गुरु - प्रा. नामदेवराव जाधव
५. छावा - शिवाजी सावंत
६. संभाजी - विश्वास पाटील
७. मृत्युंजय - शिवाजी सावंत
८. पावनखिंड - रणजीत देसाई
९. श्यामची आई - साने गुरुजी
१०. माझी आत्मकथा (असा मी जगलो) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
११. माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
१२. स्वामी विवेकानंद - राजीव रंजन
१३. लोकमान्य टिळक - अ.के. भागवत, ग.प्र. प्रधान
१४. अग्निपंख - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
१५. रतन टाटा - सुधीर सेवेकर
१६. मन मे है विश्वास - IPS विश्वास नांगरे पाटील
१७. कर हर मैदान फतेह - IPS विश्वास नांगरे पाटील
१८. The Indian Struggle - Netaji Subhashchandra Bose
१९. अमर शहीद भगत सिंह - महेश शर्मा

इतर कोणती भलतीसलती पुस्तके देण्यापेक्षा अशी भारत घडवणाऱ्या व्यक्तींची (व्यक्तींबाबत माहिती देणारी) पुस्तके द्या!

स्वेटर, मफलर त्यांचा आवडता खाऊ. त्यांच्या आयुष्यातील चांगल्या / उल्लेखनीय घटनांचा अल्बम किंवा पत्र .

७५ लाडू
75 selected गाण्यांचा पेन drive
पुस्तक तुला
75 किलो डाळ आणि 75 किलो तांदळाचं वाटप 100 च्या 75 नोटांचा हार

पंचाहत्तरीनिमित्त घरी बनवलेलं काय देता येईल>> मेधावी, व्यक्ती किती जवळची आहे? आणि स्वभाव कसा आहे? भरभरून जगतात का एक ठेहेराव आहे?

चांगली सायकल, गिटार किंवा इतर आवडते वाद्य
पुस्तकं नको- +१ वाचनाची आवड आहे हे नक्की माहित असेल तर देण्यात पॉईंट आहे.

Pages