Submitted by आभा on 25 November, 2021 - 19:00
परदेशात राहणाऱ्या मुलाला मुंजीनिमित्त काय भेट देता येईल?
परदेशात राहणाऱ्या हे एव्हढ्यासाठी लिहिलं आहे कि आकाराने /वजनाने फार मोठ्या वस्तु देता येणार नाहीत.
पण इथेच भारतातील मुलांसाठी असं लिहुन सल्ले लिहिल्यास बाकीच्यांना उपयोग होऊ शकेल.
तर मंडळी कृपया मदत करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नानबा, गुरूजन आहेत. घरातले
नानबा, गुरूजन आहेत. घरातले नाहीत पण जवळचे. ठहराव आहे. संपन्न आयुष्य जगत आहेत. घरी काहीतरी करून द्यावंसं वाटतंय.
घरी काहीतरी करून द्यावंसं
घरी काहीतरी करून द्यावंसं वाटतंय.>> त्यांच्या नावाने सर्वांनी फंड्स एकत्र करून एस्टी कर्मचार्यांच्या महा संघाला देणगी द्या. पाच महिने संप चालू आहे. पगार नाहीत. एस टी कर्मचार्यां च्या कुटुंबांचे खूप हाल चालू आहेत. ह्यांचे जीवन पंचाहत्तर वर्शे संपन्न जगले आहेत मग प्लीज शेअर विथ द अन फॉर्चुनेट सफरिंग फॅमिलीज.
अमा, दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
अमा, दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
तिकडे तसंय म्हणून आपण ac बंद करतो का?
हे ही करायला हवं.
कुवतीप्रमाणे समाजासाठीही काही रक्कम असते.
मंजुताई यांनी लिहील्यासारखेच
मंजुताई यांनी लिहील्यासारखेच साधारण- त्यांचे जुने फोटोज किंवा आठवणी तुमच्याकडे असतील तर त्याचे अल्बमसारखे बनवून स्वतःच्या आठवणी त्यात लिहून द्या. सहसा लोकांना असे स्वतः बनवलेले खूप आवडते.
बाकी पुस्तके तर नेहमीच चालतील. एखाद्याला वाचायची आवड नसली तरी घरात पुस्तके समोर पडलेली दिसली तर आपोआप कधीतरी उचलली जातात.
नाहीतर "७५ प्रकारचे काहीतरी" एकत्र करून देणेही अनेकांना आवडते. त्यात अन्नपदार्थांपासून ते इतर अनेक गोष्टी येउ शकतात.
नातेवाईकांनी लिहिलेल्या,
नातेवाईकांनी लिहिलेल्या, सांगितलेल्या आठवणी. फोटो कोलाज.. अशा स्मरणरंजनात वेळ फार छान जातो आणि ते दीर्घकाळ स्मरणात रहाते.
एस्टी कर्मचाऱ्यांना किंवा कोणाला काय देणगी द्यायची त्याचा ७५ शी किंवा मुंजीशी संबंध नको असं मलाही वाटतं.
जर वेळ असेल आणि शक्य असेल तर
जर वेळ असेल आणि शक्य असेल तर ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या जवळच्या मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या शुभेच्छांचा एक व्हिडिओ तयार करता येईल. फक्त त्या व्हिडिओला चांगला एडिटर पाहिजे! मजा येते असा व्हिडिओ बघायला! साधारण १५ ते २० मिनिटांच्या वर संपूर्ण व्हिडिओ जाऊ नये. मग बोअर होतं. त्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात आणि अतिशय चतुरपणे कोणाला न दुखावता चांगला कंटेट, आठवणी गोळा करायला लागतो.
मलाही दोन मुंजींना जायचे आहे
मलाही दोन मुंजींना जायचे आहे आणि भेटवस्तू काय द्यावी हा प्रश्न आहेच. पुस्तके वगैरे नाही द्यायची आहेत कारण मुलाला वाचनाची आवड आहे का माहित नाही. दुसरे म्हणजे विज्ञानाधारित खेळणी. ती भरपूर मिळतील असे वाटते. रोख रक्कम द्यायची इच्छा नाही कारण दोन्ही कुटुंब वेल सेटल्ड आहेत.
मी खेळाचे सामान/वाद्य वगैरे द्यायचा विचार करत होते पण घरातून विरोध आहे. मेंदूला चालना देणार्या गोष्टी द्या असा घरातून आग्रह आहे.
मला असे वाटते की मुंजीनंतर विद्याभ्यासाला सुरुवात व्हायची ती आता २.५-३ वर्षात होते. आणि पूर्वी विद्यार्थी गुरुकुलात जायचे तिथे शारिरीक
श्रमही करायचे. म्हणजे सर्वांगिण विकासात व्यायाम अंतर्भूत होताच की.
ईथे लोकांचे मत काय आहे? खेळाचे सामान/वाद्य अस्थानी वाटेल का?
मेधावि, काय दिलंस ते सांग ना
मेधावि, काय दिलंस ते सांग ना इथे व इतरांनी काही वेगळं काही दिलं असेल तर ते ही लिही
माझेमन, आजकाल इतकी सुबत्ता झालीये काय द्यावं प्रश्न च असतो... खेळाचे सामान/वाद्य gift voucher द्यावीत . अस्थानी नक्कीच नाहीत.
बॅडमिंटन रॅकेट्स, चांगल्या
बॅडमिंटन रॅकेट्स, चांगल्या प्रतीचा फुटबॉल/ बास्केट बॉल, सिंथेसायझर, तबला , टॅब, इलेक्ट्रीक गिटार...
मी खव्याचे पेढे केले घरी आणि
मी खव्याचे पेढे केले घरी आणि दिले.
माझेमन, आजकाल इतकी सुबत्ता
माझेमन, आजकाल इतकी सुबत्ता झालीये काय द्यावं प्रश्न च असतो...>> गिफ्टस ची विशलिस्ट आणी ते उपलब्ध असलेली ठिकाण्,बेवसाइट अस इकडे मॅरेज्,बेबी शॉवरला करतात तशी प्रथा सुरु करावी म्हणजे पडून राहणार्या गोष्टी मिळण्यापेक्षा हव्या त्या उपयोगी गोश्टी मिळतिल.
प्राजक्ता +१२३४५६७८९
प्राजक्ता +१२३४५६७८९
गिफ्टस ची विशलिस्ट आणी ते
गिफ्टस ची विशलिस्ट आणी ते उपलब्ध असलेली ठिकाण्,बेवसाइट अस इकडे मॅरेज्,बेबी शॉवरला करतात तशी प्रथा सुरु करावी म्हणजे पडून राहणार्या गोष्टी मिळण्यापेक्षा हव्या त्या उपयोगी गोश्टी मिळतिल. >> त्या पेक्षा सगळ्यांकडे सगळं असण्याच्या ह्या युगात गिफ्ट्स देणं घेणं बंद केलं तर काय बहार येईल. त्यातून ज्याला जे हवं ते तो स्वतः घेईल.
मलाही दोन मुंजींना जायचे आहे
मलाही दोन मुंजींना जायचे आहे आणि भेटवस्तू काय द्यावी हा प्रश्न आहेच. >> मुलांच्या आवडत्या स्पोर्ट्स टीमचे / खेळाडूचे पोस्टर फ्रेम करुन देता येईल.
त्या पेक्षा सगळ्यांकडे सगळं असण्याच्या ह्या युगात गिफ्ट्स देणं घेणं बंद केलं तर काय बहार येईल. त्यातून ज्याला जे हवं ते तो स्वतः घेईल. >> ममो प्रॅक्टिकल विचार आहे खरा. पण माझ्या मुलांना काही काही गिफ्ट्स इतक्या आवडल्या आहेत, आणि त्या इतक्या वापरल्या गेल्या आहेत की सरसकट ही प्रथाच बंद व्हावी असं वाटत नाही .
ममो, मी आचरणात आणलंय.... मी
ममो, मी आचरणात आणलंय.... मी ना देते ना घेते गेल्या वर्षांपासून पण मुलांसाठी नाही.
त्या पेक्षा सगळ्यांकडे सगळं
त्या पेक्षा सगळ्यांकडे सगळं असण्याच्या ह्या युगात गिफ्ट्स देणं घेणं बंद केलं तर काय बहार येईल. त्यातून ज्याला जे हवं ते तो स्वतः घेईल.>>> हे तर ऑलरेडी आहेच ना? पुणे मुबई सगळीकडे आजकाल कुठल्याही प्रकारचे आहेर नको वैगरे टळटिपा असतातच की
पण ,तरी छोट्या मुलाना त्या विधीपेक्षा आपल्याला गिफ्ट काय मिळाले यातच जास्त मज्जा असणार त्यामुळे जे मिळणार ते विश लिस्ट वर असणारे असेल तर आनद द्विगुणीत नाहि का होणार?मला तरी अजुनही गिफ्ट मिळालेली आवडतात, सरप्राइझ असेल तर अजुनच.
प्राजक्ता +१ गिफ्ट रजिस्ट्री
प्राजक्ता +१ गिफ्ट रजिस्ट्री ची आयडिया फार मस्त आहे.
मात्र त्यातले आयटेम्स मुलांनाच ठरवू द्यावेत
>>त्यातले आयटेम्स मुलांनाच
>>त्यातले आयटेम्स मुलांनाच ठरवू द्यावेत >>> !!!!! आयेम स्पीचलेस!!!! नो. नो. नो. त्रिवार नाही!!!
हो नाहीतर पैठण्या, मॅन-केव्ह
हो नाहीतर पैठण्या, मॅन-केव्ह वाले आयटेम्स त्यात यायचे, आणि मुलगा यापेक्षा गुरूगृही काही इंटरेस्टिंग असेल याचा विचार करतोय असे काहीतरी होईल
(No subject)
पुस्तक नाही नाही म्हणताना एका
पुस्तक नाही नाही म्हणताना एका बटूसाठी फास्टर फेणेचा संच घेतलाच. त्याला आवड नसेल तर संच असल्यामुळे ते समवयस्क मुलांच्या मुंज/वाढदिवसाला देऊ शकतील.
गिफ्ट्स देणं घेणं बंद केलं तर
गिफ्ट्स देणं घेणं बंद केलं तर काय बहार येईल. त्यातून ज्याला जे हवं ते तो स्वतः घेईल>>> मोठ्यांच्या जगात हे सहजशक्य आहे, आणि काही ठिकाणी आहेर नको, वास्तुपुजे ला फक्त आशिर्वाद आणा अशी तळटिप असते. पण विशेष प्रसंगी गिफ्ट मिळणे हा लहान मुलांचा परमानंदाचा क्षण असतो. किंमत काहिही असो, मला कुणितरी गिफ्ट दिलंय , मी विशेष आहे अशी काहिशी ती भावना असते. ती हिराऊन नका घेऊ
त्या आनंदात मुल कित्येक तास, महिने घालवतं.
नुकताच एक मुंज मुलगा खूप
नुकताच एक मुंज मुलगा खूप पुस्तकंच भेट मिळाली म्हणून खट्टू झालेला पाहिला.
पैसे ठीक आहे
पैसे ठीक आहे
मी पैसेच दिले मध्ये एका
मी पैसेच दिले मध्ये एका मुंजीत. मला समजत नाही गिफ्ट काय घ्यायचं आणि बहुतेक सर्वांकडे सर्व असतं हल्ली, त्यात ते आहेर घेणार नव्हते पण त्याला सख्खा मामा नाही आणि माझा नवराच मामाच्या जागी म्हणून आम्ही आहेर केला. सर्वांनाच पाकिटे दिली, आई वडील, करवली, मुंज मुलगा.
पैसे देताना ही अपेक्षा असते
पैसे देताना ही अपेक्षा असते की आईवडिलांनी बटुच्या आवडीचं काहीतरी घेऊन द्यावं आणि काय घेतलं ते कळवलं तर अती उत्तम !
त्यानी 50 वर्षे नाही घेतले तर
त्यानी 50 वर्षे काही नाही घेतले तर ?
एकदम पुढच्या नोटबंदीलाच बाहेर काढले तर ?
BC हे इथे लिहायची गरज होती का
BC हे इथे लिहायची गरज होती का? आपण दिलेल्या पैशातून बटुच्या आवडीचं घेतल्याचं समाधान ...
BC हे इथे लिहायची गरज होती का
BC हे इथे लिहायची गरज होती का? >>> मम.
BC हे इथे लिहायची गरज होती का
BC हे इथे लिहायची गरज होती का???>>>
त्याशिवाय धागा 'राजकीय' वळण कसे घेईल???
Pages