Submitted by 'सिद्धि' on 22 November, 2021 - 02:58
घरात मोबाईल बघण्याचे भारी वेड असणारे लहान नमुने आहेत.
एक चार-पाच वर्षाची, तिला शोधायचं असेल तर तिच्या आईच्या मोबाइलला रिंग द्यायची, जिथून आवाज येईल तिथे ही सापडते. कधी टेरेस कधी बाल्कनी, तर कधी मिळेल त्या कोपऱ्यात बसून मोबाइल वर माशा अँड बेअर बघत असते, तेच भाग पुन्हा-पुन्हा.
मोबाईल शिवाय जेवत नाही.
माझी वर्षाची चिंटुकली, आई-बाबा बोलण्याआधी 'मोबी पाजे' हे बोलायला शिकली.
मुलांना मोबाइल दिला की ती शांत बसतात. व्यवस्थित जेवतातही, तेवढ्यात आपल काम देखील उरकून घेता येत. या गोष्टींमुळे लहान मुलांमधील मोबाइल बघण्याचे प्रमाण वाढत आहे.
पण याचे मुलांच्या डोळ्यांवर, शरीरावर आणि मनावर फार गंभीर दुष्परिणाम होताना पाहायला मिळत.
हे बंद करण्यासाठी काय करावे? तुम्ही तुमच्या घरी करत असलेले उपाय आणि युक्ती यांची चर्चा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हॅलो ..माझी मुलगी सुद्धा २
हॅलो ..माझी मुलगी सुद्धा २ इयर्स ची आहे..सुरवातीला जेव्हा लहान होती मीच तिला मांडीवर झोपवून गोष्टी गाणी ऐकवत भरवायची..नंतर जशी थोडी मोठी क्साली..तर बसवून भारवातनं.mobile ची सवय लागली..तीच चुकी नाही..आम्हीच मोबाइलला वर गाणी लावयाचो..नन्तर असं वाटलं कि डोळ्या वर परिणाम होईल सो...TV वर गाणी लावयला लागलो..याच फायदा असं कि TV लांब असतो तो आपणच हवा तस कंट्रोल करू शकतो ..बंद चालू आपल्या हातात असते करणं ..आत्ता असे आहे कि TV Mobile नसेल तरी तीच काही नसता..तिचे खेळणी बरोबर ती खेळात असते..कदाचित सगळं पाहून झालाय तीच मोबाइलला tv वर आणि आत्ता त्या गोष्टीच कौतुक व हौस च राहिली नाही...बट यात एकाच करायचं कि तिच्या बरोबर आपण भरपूर बोलायचं..न कंटाळता सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची...आणि आपण सुद्धा लहान होऊन खेळायचं...मुलं मोबईल tv काहीच नाही मागत
सॉरी खूप मोठा प्रतिसाद...but लहान मुलगी माझी सुद्धा आहे सो.. राहवलं नाही
घरी आल्या आल्या मोबाईल फोन
घरी आल्या आल्या मोबाईल फोन उंचावर ठेवावा. घरी असताना स्वतः कमी वापरावा.
घरी फक्त अन फक्त कॉल करण्यासाठी किंवा घेण्यासाठीच वापरावा.
मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवावी.
भरपूर फरक पडतो.
जावेद_खान >>++++११११११ हे
जावेद_खान >>++++११११११ हे चांगलं लागू पडेल असं वाटतंय. या साठी धन्यवाद.
चिट डे म्हणून काही वेळ अगदी १
चिट डे म्हणून काही वेळ अगदी १ तास सुध्दा मोबाइल हातात देऊ नका. थोडी रडारड होईल, पण तुम्ही ढळू नका आणि कोणी दे सांगत असेल किंवा देत असेल त्याला पण परावृत्त करा. हे १-२ दिवस नाही नेहेमीच करा, शाळा आणि इतर ऍक्टिव्हिटी मध्ये वेळ जाऊ लागल्यावार थोडा फरक दिसेल.
पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करा, त्या करता तुम्हाला देखील वेळ द्यावा लागेल. एखादा खेळ पण शिकवू शकता.
धन्यवाद - नरेन. , जावेद_खान ,
धन्यवाद - नरेन. , जावेद_खान , ९६क
मोबाईल शिवाय जेवत नाही. उपाशी राहू नये म्हणून द्यावा लागतो मोबाईल. पण बरोबर आहे, थोडा वेळ उपाशी राहतने, त्याने काही फरक पडत नाही. जास्त भूक लागली कि बरोबर खाणार.
शक्य असल्यास रोज बाहेर
शक्य असल्यास रोज बाहेर मित्रांसोबत उंदडायला पाठवा. शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी आपल्यासोबत फिरायला घेऊन जा. खेलेगा, कुदेगा बच्चा तभी बडेगा बच्चा. अन्यथा मुलांचे खेळणे घरातच होत असेल तर मोबाईलपासून दूर ठेवणे त्रासदायकच होते. आणि त्यांनी अनुकरण करावे म्हणून आपण न वापरणे हे आपल्यावर अन्यायकारक होते
घरात असताना वाचायला पुस्तके द्या हा सल्ला या चर्चेत पहिला येतोच, पण प्रत्येक मुलाला त्या त्या वयात वाचनाची आवड असेलच असे नाही. असल्यास छानच अन्यथा नृत्य, हस्तकला, चित्रकला ज्याची आवड असेल ती पुरवा.
अजून एक म्हणजे मुलांना मोबाईल गेम खेळायला दिला तर ते तासनतास खेळतात. पण जर आपण सोबत खेळलो तर त्यांना कमी वेळात जास्त मजा येऊन त्यांचे मन भरते. मी खेळतो मुलीसोबत मोबाईल गेम्स वा टीव्हीवर विडिओ गेम्स. त्यांचे प्रमाण शून्य तर करू शकत नाही.
Submitted by जावेद_खान on 22
Submitted by जावेद_खान on 22 November, 2021 - 13:4..... +१.
सवय लागल्या वर काय करणार.
सवय लागल्या वर काय करणार.
मुलांना मोबाईल ची सवय पालक च लावतात.आई ,वडील दोघे नोकरीला त्या त्यांच्या कडे वेळ नसतो पण आर्थिक सुबत्ता असते.
मग मुलांनी त्रास देवू नये म्हणून कमी वयात किंमती मोबाईल,महागडे व्हिडिओ गेम्स पालक च कमी वयात घेवून देतात.
मुलांच्या बेड रूम मध्ये टीव्ही असू नये पण तिथे पण टीव्ही असतो .
इतकी सर्व अनुकूल स्थिती असेल तर मुलांना व्हिडिओ गेम आणि मोबाईल च व्यसन लागणारच.
आई वडील चा वेळ न मिळणे त्या मुळे संवाद कमी आणि सुविधा जास्त .
माझ्या मुलाचे ऑनलाइन क्लासेस
माझ्या मुलाचे ऑनलाइन क्लासेस असतात डेस्कटॉपवर सकाळी 9 -2 पर्यंत त्यानंतर त्याचं नेट कनेक्शन काढून टाकतो आम्ही.
मुलीला ऑनलाइन शाळा नाही.टिव्ही चे चैनल्स आम्ही घेतलेले नाहीत.बाहेर खेळायला हि मुलं जमत नाहीत. मग घरात बसून काय करणार मुलं, टिव्हीवर युट्यूब शैक्षणिक, फनी,राईम्स विडीओज पाहतात, खेळतात, भांडतात.
मोबाईल मुलांना दिल्यावर मी काय करायचं म्हणून सुरूवातीपासून च मोबाईल ची सवय लावली नाही पण इतर गैजेट्स द्यावेच लागतात थोडा वेळ तरी.
लहान असताना खायला त्रास द्यायचे तेव्हाही मोबाईल न देता तासभर पार्किंग मधे फिरवून, बाल्कनीत बसून भरवायचे.
आता लेकीला तु थोडा वेळ मोबाईल पहा म्हटलं तरी घेत नाही ती.
सवय लावावीच का?
सवय लावावीच का?
माझी मुलगी सुद्धा २ इयर्स ची
माझी मुलगी सुद्धा २ इयर्स ची आहे >> सगळेच दोन इयर्सचे असतात ना! (कानांचे).
बाकी तुमचा अनुभव उपयोगी आहे.
जावेद खान यांचा प्रतिसाद पण.
एक वर्शा पूर्वी माहीत नव्हते
एक वर्शा पूर्वी माहीत नव्हते का मोबाईलची सवय वाइट ते. इतक्या लहान वयात?! एखादा जुना फोन पाण्यात टाका व फोन खराब झाला म्हणून सांगा तिला.
तो बाफ बोल्ड मध्ये का काढला आहे? ललित लेखन का आहे?
अशा विषयांवर आदर्शवादी सिहिणे
अशा विषयांवर आदर्शवादी लिहिणे अगदी सहजशक्य आहे.
पण घरकाम, स्वयंपाक, वर्क फ्रॅाम होम, मुलांचे होमवर्क, जेवण भरवणं, सिनिअर सिटिझन्सचे पथ्य, त्यांच्या हॅास्पिटल वाऱ्या, हे सगळं करताना तुम्ही मुलांना स्क्रिन पासून लांब ठेऊ शकत असाल तर माझा साष्टांग दंडवत !
मी देतो मुलांना स्क्रिन टाईम. मी पाळत असलेल्या काही गोष्टी…
मोबाईल टाळावा, शक्य तिथे टिव्ही वर कास्ट करावे.
मोबाईल/ व्हिडिओ गेम्स बिग नो. काही झाले तरी चालेल. (मी स्वत: मोबाईलवर कोणतीही गेम खेळत नाही. )
सरासरी दिवसाला अर्धा ते पाऊण तासावर स्क्रिन टाईम जाऊ द्यायचा नाही.
शक्यतो मुलांना कार्टून्स न दाखवता नर्सरी ऱ्हाईम्स, डॅा बायनॅाक्स सारखे चॅनल दाखवायचे.
भ्रमर - काही सवयी लागतात.
ऋन्मेष - कोरोनामुळे मुलांना खेळण्यासाठी बाहेर पाठवण्याचा पर्याय बंद झाला होता. आणि घरुन काम करताना त्यांच्यावर लक्ष ठेवणेही कठीण जात होते. त्यामुळे मोबाईलचा पर्याय तेव्हा सोयीस्कर वाटला आणि ती खुप मोठी चुक ठरली.
हेमंत - धन्यवाद, खुप छान पर्याय सुचवले.
मृणाली- मुलांना चांगली सवय लावली तुम्ही.
भ्रमर - काही सवयी लागतात. दुसरा पर्याय नसतो,व किंवा विचार करायला तेवढा नसतो.
लागली सवय त्याला काय करणार.
अमा- बोल्ड मध्ये बाफ असल्याने काही फरक पडतो का?
आणि हा धागा कोणत्या गृप मधे हलवू कृपया सुचवा.
अतरंगी - प्रतिसाद मला फार उपयोगी पडेल.
सगळं करताना तुम्ही मुलांना स्क्रिन पासून लांब ठेऊ शकत असाल तर माझा साष्टांग दंडवत ! + १११
मला तरी हे शक्य होत नाही. त्याबद्दल वाईट वाटते.
कॅरम, भातुकली, मेकॅनो,
कॅरम, भातुकली, मेकॅनो, बाहुली, गाड्या, सापशिडी, पत्ते वगैरेवर भर देण्याचा प्रयत्न करा. ऑडिओ गोष्टी ऐकवा
कृपया हा धागा "गुलमोहर
कृपया हा धागा "गुलमोहर ललितलेखन " या ग्रुपातून "मुलांचे संगोपन" या ग्रुपमध्ये हलवा.
https://www.maayboli.com/node/2600
मी सुद्धा मुलाला (वय ३.५ वर्ष
मी सुद्धा मुलाला (वय ३.५ वर्ष) जेवताना पूर्वी मोबाईल (हातात देत नाही) आणि आता फक्त टिव्ही दाखवते.. एकेठिकाणी बसून जेवावा आणि मुख्य म्हणजे जेवावा म्हणून. पण एक केले कि मी कार्टून्स बघताना भरपूर बोलते आनणि मधेमधे त्याला प्रश्न विचारते..नो व्हिडियो गेम्स..जसाजसा मोठा होतोय तसे त्याला क्रेयॉन्स , पेपर वगैरे देते.. ब्रेकफास्टच्या वेळेस आता लावत नाही, दुपारचे जेवण शाळेत आणि रात्री ३०-४० मिन्स चे लिमिट केले आहे. या व्यतिरिक्त आम्ही टिव्ही लावतच नाही तो असताना..
पण यामुळे आमचा मोबाईल वरील स्क्रीनटाईम प्रचन्ड वाढला आहे
आमच्या कडे 9-3 वर्षाची चार
आमच्या कडे 9-3 वर्षाची चार मुलं आहेत. त्यांच्या साठी फुटबॉल, बँटबॉल, सायकली आणल्या आहेत. पावसाळा सोडला तर बाकी दिवस मुलं मोबाइल टि वी काही मागत नाही...
एक वर्शाच्या मुलाला सवय लावुन
एक वर्शाच्या मुलाला सवय लावुन इथे उपाय शोधण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे. तुम्हीच जबाबदारी घ्या. ही व आधीची जनरेशन आता अल्गोरिथम सोबतच मोठी होणार आहे. हे लोक्स जे सर्फ करत आहेत त्याचे डिजिटल रेकॉर्ड बनत आहे.व गूगल फेसबुक त्यावरुन त्यांच्या अल्गोरिथम पक्का करत आहेत.
उदाहर णातील दोन्ही मुले मायनर असल्याने त्यांच्या वागण्याची जबाब्दारी पाल कांवरच आहे. काउन्सेलिन्ग घ्या.
फोन चार्जिन्ग संपले आहे असे सांगता येइल त्यातल्या त्यात व दोन तास नो स्क्रीन टाइम असे शिस्त लावता येइल.
अशी बरीच मुले असतात असा,
आजूबाजूला अशी बरीच मुले असतात, माझ्या धाग्याच्या निमित्ताने त्यांच्या पालकांना पण इथे वाचलेल्या पर्यायांचा फायदा होईल.
@ अमा - आत्मपरीक्षण करुनच मी ही जबाबदारी माझी आहे हे ओळखले आहे. माझ्या मुलीला अजून सवय लावली नाही,
पण ती तिच्या बहिणीसारख करायला बघते. 'मोबी पाजे' हा शब्द तिच्या आत्ते बहिणीकडून शिकली आहे. मोबाईल बघायला आवडतो. पण पाहिजेच असं काही नाही तिचं. नंतर हट्ट करेल. रडत बसेल. तिलाही अगदी त्याची सवय लागायला नको, म्हणून मी आधीच पर्याय शोधते आहे. आकर्षक ठिक पण आहारी जाऊ नये. म्हणून काळजी वाटते.
मेधावी, अंथेना, प्रवीण - धन्यवाद, चांगले पर्याय सुचवले.
माझ्या बहिणीची मुलगी दोनच
माझ्या बहिणीची मुलगी दोनच वर्षाची आहे.इतक्या लहान वयातच मोबाईल ची सवय लावली गेली.आता एका डोळ्याने जरा तिरकं पाहाते आणि इत्ता छोटु सा चष्मा पण लावायला सांगितले आहे डॉ.नी.
माझ्या मैत्रिणीचा मुलगा सात वर्षे. दिड वर्षाचा असल्यापासून त्याला मोबाईल,टिव्ही ची सवय लागली होती.आता चष्मा तर आहेच पण तो तिरकं पाहतो म्हणून ऑपरेशन पण सांगितलय.
आणि एका मित्राची मुलगी तीन वर्षाची,भयंकर चिडचिडी,इतर मुलांमधे मिक्स पण होती नाही फक्त मोबाईल पाहिजे. तीला नऊ महिन्याची असताना पासून मोबाईल दाखवायला सुरुवात केली पालकांनी.
आमच्याकडे पण मुलांचा
आमच्याकडे पण मुलांचा स्क्रीनटाईम कळत न कळत खुप वाढलेला मध्येमध्ये..... आता प्रयत्नपूर्वक तो दिवसाला तासभर असा लिमिट करायचा प्रयत्न करतोय!!
आजकाल मोबाईलवरचे लहान मुलांचे व्हिडीओ किंवा छोट्याछोट्या गेम्स इतक्या टेम्टींग असतात की मुलांचा सहाजिक ओढा तिकडेच असतो!!
एक उदाहरण म्हणून सांगतो: मध्ये एकदा त्यांच्यासाठी कुणीतरी बहुतेक बर्थडे गिफ्ट म्हणून रत्नाचा चांगल्यातला जिग्सॉ पझलचा 7 वंडर्सवाला सेट आणला..... मुलांना तो खुप आवडला आणि इतर गेम्स/मॅकेनोच्या तुलनेत मुलांनी तो खुप जास्त खेळला!! पण एकदा त्यांना मोबाईलमध्ये जिग्सॉ पझल्सचे गेम मिळाल्यानंतर आता ते खऱ्या गेमकडे ढुंकूनही पहात नाहीत कारण एकच जिग्सॉ परत परत सोडवत बसण्यापेक्षा तिथे त्यांना खुप नवीनवी व्हरायटी मिळते..... खेळून झाल्यावर आवराआवरी करायला लागत नाही
स्क्रीनटाईम कमी व्हावा म्हणून मुलांना चित्रकलेची गोडी लावली तर आता ते बघून चित्रे काढायला पण समोर मोबाईल घेऊन बसतात
ज्या घरात आज्जी आजोबा दिवसभर whatsapp च्या दुनियेत किंवा youtube वर सतत काहितरी बघताना दिसतात, बाबा ऑफिसचे काम करता करता दर थोड्यावेळाने मायबोलीवर डोकावत असतो किंवा शेअर मार्केट वर डोळा ठेवून असतो किंवा Linkdin चाळत असतो आणि आईसुद्धा किचन मध्ये असताना मधुराज रेसिपी/हेब्बर किचन/रुजुताचे लाइव्ह व्हिडीओज सतत चालू असतात किंवा तिने सकाळी सकाळी योगा करताना योगा स्टुडिओजचे व्हिडीओ लावलेले सतत दिसत असतील तर अश्या घरांमधून मुलांचा ओढा जास्तीत जास्त स्क्रीनटाईम कडे वळत असेल तर त्यात कुठलेही आश्चर्य नाही!!
प्रयत्नपूर्वक lead by example करुन आपण या nextgen चा स्क्रीनटाईम कमी करु शकतो पण मला नाही वाटत तो पूर्णतः बंद करणे सहजसाध्य आहे किंवा योग्य आहे!!
मोठ्यांना मायबोलीचे व्यसन
मोठ्यांना मायबोलीचे व्यसन असेल तर मुलांच्या मोबाईल वापरावर काय परिणाम होतो?
>>मोठ्यांना मायबोलीचे व्यसन
>>मोठ्यांना मायबोलीचे व्यसन असेल तर मुलांच्या मोबाईल वापरावर काय परिणाम होतो?
मोठ्यांना मोबाईलचे व्यसन असेल तर लहान मुलांच्या हातात मोबाईल फारसा मिळत नाही
मोठ्यांना मोबाईलचे व्यसन असेल
मोठ्यांना मोबाईलचे व्यसन असेल तर लहान मुलांच्या हातात मोबाईल फारसा मिळत नाही Wink>>>>>> ट्रु
स्वरूप>>>+१
स्वरूप>>>+१
Social media, junk food, screen time वगैरे आता मुलांच्या समोर आहेत. तुम्ही मुलांना त्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करू शकता. तुम्ही अतिशय कठोर निर्णय घेऊन मुलांना ते नाकारू शकता. पण किती दिवस? मुलांना प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे शिकवणं, त्यांना कशाचाही वापर योग्य करायला हवा हे समजावून सांगणे हे महत्वाचे आहे (यात junk food नाही.)
आज मुले तुमच्यासमोर आहेत म्हणून निर्बंध घालू शकता. पण त्याने पुढे तोटा होऊ शकतो ना? त्यांना जर कोणती गोष्ट नाही करायची तर का नाही करायची आणि करावी तर कोणत्या प्रकारे किती प्रमाणात करावी याची समज येणे महत्वाचे आहे.
मी माझ्या दोन्ही मुलांना प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे सांगतो. त्या नंतर पण त्यांना ते करायचेच असेल तर त्यांना मर्यादेत करू देतो.
शिवाय स्वरूप यांनी लिहिलेले lead by example हे आचरणात आणायचा प्रयत्न करतो.
Don’t worry that they are not listening to you, worry that they are watching you!!!
ज्या घरात आज्जी आजोबा दिवसभर
ज्या घरात आज्जी आजोबा दिवसभर whatsapp च्या दुनियेत किंवा youtube वर सतत काहितरी बघताना दिसतात, बाबा ऑफिसचे काम करता करता दर थोड्यावेळाने मायबोलीवर डोकावत असतो किंवा शेअर मार्केट वर डोळा ठेवून असतो किंवा Linkdin चाळत असतो आणि आईसुद्धा किचन मध्ये असताना मधुराज रेसिपी/हेब्बर किचन/रुजुताचे लाइव्ह व्हिडीओज सतत चालू असतात किंवा तिने सकाळी सकाळी योगा करताना योगा स्टुडिओजचे व्हिडीओ लावलेले सतत दिसत असतील तर अश्या घरांमधून मुलांचा ओढा जास्तीत जास्त स्क्रीनटाईम कडे वळत असेल तर त्यात कुठलेही आश्चर्य नाही!! स्वरुप + १११
आजूबाजूला आणि नातेवाईकांमध्ये बहुतांशी असेच चित्र पाहावयास मिळते.
मोठ्यांना मोबाईलचे व्यसन असेल तर लहान मुलांच्या हातात मोबाईल फारसा मिळत नाही.
Don’t worry that they are not listening to you, worry that they are watching you!!! - अतरंगी
विचार करण्यासारखी गोष्ट आहे, माझी मुलगी सध्या तरी माझं ऐकते, त्यामुळे आत्ताच कंट्रोल केला तर पुढे त्रास होणार नाही.
थोडक्यात,
आपण मुलांसमोर आपलाच मोबाईल वापर मर्यादित ठेवावा. तसेच पझल्स, ड्रॉइंग, भातुकली, वेळवेगळ बैठे खेळ इत्यादी मध्ये मुलांना गुंतवले पाहिजे.
जेवताना मुलांना मोबाईल
जेवताना मुलांना मोबाईल दाखवायला लागतो, ह्या गोष्टीचे अजिबात tension/ guilt घेऊ नका. माझ्या मुलीला सुद्धा साधारणपणे वय वर्ष १ ते ४ या कालावधीत जेवताना screen time द्यायला लागायचा. ४ वर्षाच्यापुढे प्रयत्न करून ती सवय सोडवली. आता आम्ही कोणीही जेवताना कोणताही स्क्रीन बघत नाही. छान गप्पा मारत रात्रीचे आणि दुपारचे जेवण होते.
सध्या दिवसाला जास्तीत जास्त ४५ मिनीट screen time तिला मिळतो. ऑनलाइन शिक्षणाचे तास ह्यात धरलेले नाहीत. ४५ मिनीटाचा screen time तिच्या करमणुकीसाठी असतो. ऑफलाइन शाळा होती तेव्हाही तिला तो मिळायचा. मात्र ती त्या screen time मधे काय बघते/ करते ह्यावर नेहमीच लक्ष ठेवले जाते. तिच्या वयाला योग्य असेच content ती बघते याची खबरदारी आम्ही घेतो.
"ऑनलाइन शिक्षणामुळे वाढलेला screen time " ह्यावर कोणाकडेच सध्या तरी काही उपाय नाही. लवकरात लवकर करोना नष्ट व्हावा, अशी प्रार्थना करणे एवढेच करू शकतो.
सर्वप्रथम बिग नो फॅार माशा
सर्वप्रथम बिग नो फॅार माशा ॲंड द बेअर.. त्यात काहीच डायलॅाग्ज नसतात ..काही नाही तर निदान इंग्रजीवर पकड मजबूत व्हावी तर तेही नाही होत
स्टेप बाय स्टेप जावं..
1. आधी माशा ॲंड द बेअर ला दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या कार्टून्सने रिप्लेस करा .. जसं की stillwater, spirit riding free etc. etc.
2. मुलांबरोबर रोज अर्धा तास तरी बाहेर फिरायला जाणे/सायकलींगला जाणे/ पार्कमधे जाणे, हे आपल्या दोघांसाठीही गरजेचं असतं
3. मुलांना स्वत:ला थोडंफार करी एंटरटेन करता आलं पाहिजे.. त्यासाठी यूट्यूब वरचे काही प्रिटेंड प्ले चे विडीओज दाखऊ शकता.. फोन/टिव्ही नसेल तेव्हाही मुलं स्वत:चा इमॅजिनेशने घरघर खेळणं, कॅंपिंग करणं, यांसारख्या बऱ्याच गोष्टींनी स्वत:ला काही वेळासाठी तरी बिझी ठेऊ शकतात.
अजून काही महिन्यांचा प्रश्न आहे..एकदा का धाकटी मुलगी जरा मोठी झाली की त्या दोघीही एकमेकांबरोबर खेळतील,भांडतील आणि बिझी राहतील. पण भंडल्या तरी मोबाईल न देता भांडण सोडवलेलंच बरं
मला जरा वेगळा प्रश्न आहे.
मला जरा वेगळा प्रश्न आहे.
मुलांसाठी किती टाईम म्हणजे घातक टाईम याचे वयोगटानुसार काही स्टॅंडर्ड कोष्टक आहे का?
कारण आपल्यातलाच किती तरी जणांचा स्क्रीन टाईम ८ ते १० तास असेल..
मला जरा वेगळा प्रश्न आहे.
मला जरा वेगळा प्रश्न आहे.
मुलांसाठी किती टाईम म्हणजे घातक टाईम याचे वयोगटानुसार काही स्टॅंडर्ड कोष्टक आहे का?
कारण आपल्यातलाच किती तरी जणांचा स्क्रीन टाईम ८ ते १० तास असेल..
मला जरा वेगळा प्रश्न आहे.
मला जरा वेगळा प्रश्न आहे.
मुलांसाठी किती टाईम म्हणजे घातक टाईम याचे वयोगटानुसार काही स्टॅंडर्ड कोष्टक आहे का?
कारण आपल्यातलाच किती तरी जणांचा स्क्रीन टाईम ८ ते १० तास असेल..
मला जरा वेगळा प्रश्न आहे.
मला जरा वेगळा प्रश्न आहे.
मुलांसाठी किती टाईम म्हणजे घातक टाईम याचे वयोगटानुसार काही स्टॅंडर्ड कोष्टक आहे का?
कारण आपल्यातलाच किती तरी जणांचा स्क्रीन टाईम ८ ते १० तास असेल..
फक्त अभ्यास आणि शिक्षण हीच
जबरदस्ती नी त्यांना टीवी,मोबाईल पासून लांब ठेवले तरी त्यांची उस्तुक्ता आणि ओढ असतेच तिकडे.
टीव्ही ,मोबाईल का जो पर्यंत सक्षम पर्याय देत नाही तो पर्यंत प्रश्न तसाच असतो.
मुलांना खेळाची आवड निर्माण करणे,विविध कला शिकण्याची त्यांच्यात आवड निर्माण करणे.
त्याच्याच वयाच्या मुलांबरोबर गप्पा गोष्टी करणे खेळणे .
हे च पर्याय आहेत.
फक्त अभ्यास आणि शिक्षण हीच
फक्त अभ्यास आणि शिक्षण हीच मुलांची दुनिया नसते.ब्रिटन सारख्या देशात तर मुलांवर जबरदस्ती करता येत नाही अगदी अभ्यास करायला सुद्धा.
मुलांची वाढ स्टेप by स्टेप होत असते.
एकच मुल आणि स्वतःला कोशात बंद केल्या मुळे मुलांना शाळे व्यतिरिक्त समवयस्क मुलांचा सहवास मिळत नाही .त्यांची जी काही कौशल्य असतात ती समवयस्क मुलामध्येच develop होतात..त्यांचे मन रमते..खेळणे,मस्ती करणे नव नवीन शिकणे हे गुण समवयस्क मुलं मध्येच develop होतात.
पालक काय किंवा शिक्षक काय त्यांची मानसिक गरज भागवू शकत नाहीत.
आणि असे पण आज चे पालक दिवसातून किती तास मुलांना देतात.
Hardly दोन ते तीन तास.
म्हणून आज ची मुल व्हिडिओ गेम मध्ये किंवा टीव्ही कार्यक्रम मध्ये ती गरज पूर्ण करतात.
दोन वर्षाच्या आतील मुलांना तर
दोन वर्षाच्या आतील मुलांना तर आई वडील पैकी एक जवळ हवेच हवे.पाहिले grandparents असायचे आता ते पण नाहीत.
मग आहेच पाळणा घर त्या मुळे मुल हट्टी,आक्रमक, होतात
सतत मान खाली घालून बसल्याने
सतत मान खाली घालून बसल्याने सर्व्हायकल स्पाँडिलॉसिस आणि एका हातात जड मोबाइल धरून खांदा, कोपर , मनगट दुखावण्याची भीती आहे.
मुले आणि प्रौढ दोघांनाही
ही परीस्थिती आजकाल घरोघरी
ही परीस्थिती आजकाल घरोघरी झालेली आहे, बर्याच अंशी तसा नाईलाज आहे कारण घरून स्कूल मुळे सवयी बदलल्या.. त्या वर उपाय म्हणजे स्वतः हाती फोन कॉल पुरताच धरावा, अजून १ ट्रिक आहे ती म्हणजे राऊटर कन्ट्रोल सेट करायचा ज्या पालकाला त्यातल्या त्यात कडक वागता येते त्याच्या फोनवर ते सेट करावे. मग फॅमीली मेंबर सेटींग मधे जाऊन ज्या डिवाईस वर मुल खेळत असेल त्याच कनेक्शन बंद करावे. आणि कितीही रडभेक केली तरी भिक घालू नये..एकदा का ही पध्हत सेट केली तर मुलांना लिमिटेड स्क्रीन टाईम ची सवय होते. मी खूप त्रास सहन केलाय पुर्वी..कनेक्शन बंद करून मी स्वतः मुलिचा त्रास चुकवायला बाथरूम मधे लपून बसायचे..मग ती शांत झाली की बाहेर यायचे.
मुलांसाठी किती टाईम म्हणजे
मुलांसाठी किती टाईम म्हणजे घातक टाईम याचे वयोगटानुसार काही स्टॅंडर्ड कोष्टक आहे का?
ऋन्मेऽऽष याचे उत्तर बहुतेक तज्ञ लोकाचं सांगतील. ब-याचदा मला देखील हा प्रश्न पडतो. मुलांसाठी पण मोठ्यांसाठी पण.
ससुन रुग्णालयात mobile addict child's साठी वेगळा ward काढलाय, असं मागे ऐकलं होतं. खरंखोटं माहित नाही.
तेव्हाच ठरवलं होतं, आपल्या मुलांला मोबाईल द्यायचा नाही. पण तसं झालं नाही.
सध्या मी वेगळाच पर्याय निवडा आहे. ती मोबाईल जवळ आली की मी 'बुवाsss' म्हणत मोबाईल बेडवर टाकून देते. थोडी घाबरण्याची acting केली की ती सुद्धा 'बुवा, बुवा' करतं लांब पळून जाते.
वय जास्त नसल्याने तिला पझल्स, मैदानी खेळ, किंवा पेनपेपर यातलं काहीही कळत नाही. मग एक भातुकली चा सेट, थोडे छोटे छोटे प्राणी-पक्षी असे सेट्स आणुन दिले आहेत.
चिमुटभर डाळ-तांदूळ, साखर दिली, की डाईनिंग टेबलच्या खाली जाऊन बसते खेळत. थोडा पसारा, कचरा वगैरे होतो, पण मोबाईल पेक्षा ते केव्हाही उत्तम.
नंदेची मुलगी आता ऐकण्याच्या पलिकडे गेली आहे. माझ्याकडे केव्हा आली तर नुसतं मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसलेली असते. दिला नाही तर रडून नुसता गोंधळ.
पुढच्याला ठेच मागचा शहाणा... म्हणून मी आतापासूनच उपाय सुरू केले.
वरची चर्चा वाचली. प्रत्येकजण
----
वरची चर्चा वाचली. प्रत्येकजण
-
मोठ्यांना मोबाईलचे व्यसन असेल
मोठ्यांना मोबाईलचे व्यसन असेल तर लहान मुलांच्या हातात मोबाईल फारसा मिळत नाही >> lol
मोठ्यांना मोबाईलचे व्यसन असेल
मोठ्यांना मोबाईलचे व्यसन असेल तर लहान मुलांच्या हातात मोबाईल फारसा मिळत नाही
>>>>
बरेच घरात ऑनलाईन क्लासेसमुळे पोरांकडे स्वत:चा टॅब असतो.
आम्ही घेतलाय मुलीला. आणि मग बायजूच्या कृपेने आणखी दोन आले. म्हणजे दोन मुलांमध्ये त्यांचे तीन टॅब झाले. पण मुलगी दिवसाचे पाच सहा तास आणि सुट्टीच्या दिवशी दहा बारा तास बाहेर खेळायला जाते त्यामुळे तितकाही वापर होत नाही.
मुलगी दिवसाचे पाच सहा तास आणि
मुलगी दिवसाचे पाच सहा तास आणि सुट्टीच्या दिवशी दहा बारा तास बाहेर खेळायला जाते>> बाहेर खेळायला जाते म्हण्जे खरचं मोकळ्या हवेत/ मैदानात/ बागेत खेळते? का कोणाच्या दुसर्याच्या (मैत्रीणीच्या) घरी जाऊन मोबाईल मधे डोकं खुपसून बसते? हे एकदा चेक करा. स्वानुभवाचे बोल आहेत.
मुलांना स्वत:ला थोडंफार करी
मुलांना स्वत:ला थोडंफार तरी एंटरटेन करता आलं पाहिजे>> +१ म्हाळसा!
दोन वर्ष पासून स्कूल ,कॉलेज
दोन वर्ष पासून स्कूल ,कॉलेज,ऑफिस बंद आहेत.
Work for home,online क्लासेस हे आता दोन वर्ष पासून चालू आहेत
मुलांना मोबाईल चे वेड,तरुणांना मोबाईल चे वेड,ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल चे वेड.
ही समस्या आताची नाही खूप जुनी आहे.
अनेक कारणं आहेत त्या पाठी.
जशी ठेस लागेल तसे एक एक कारण पटत जाईल.
सांगून फायदा नाही
त्यांच्या हातातला मोबाईल
त्यांच्या हातातला मोबाईल काढून आपल्या हातात घ्यावा.
का कोणाच्या दुसर्याच्या
का कोणाच्या दुसर्याच्या (मैत्रीणीच्या) घरी जाऊन मोबाईल मधे डोकं खुपसून बसते?
>>>>
योग्य मुद्दा आहे.
पण सध्या तसेही मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता त्यांना कोणाच्या घरी पाठवताना पालक जास्त सजग असतात.
आमच्याकडेही दुसऱ्याच्या घरी न सांगता जाणे अलाऊड नाही. तिथे जास्त वेळ राहणे अलाऊड नाही.
या तासातील एखादा तास मित्रमैत्रीणींच्या घरात असते वा ते आमच्या घरात असतात.
आमच्या घरात असतात तेव्हा मोबाईलवर गेम्स खेळणे अलाऊड नाही. टीव्ही बघणे ओके. पण मित्रांसोबत टीव्ही बघण्यात तिला ईंटरेस्ट नाही. डान्स दंगा बैठे खेळ हस्तकला चित्रकला असेच चालू असते. मित्रांच्या घरातही हेच होत असेल त्या तासाभरात असे वाटते. परत आल्यावर गप्पांमधून तरी हेच समजते. महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी खाऊन येते जे आमच्याकडे आयुष्यात खाल्ले नसते आणि याच कारणासाठी जाऊ देतो
सोशल मीडिया म्हणलं की 100
सोशल मीडिया म्हणलं की 100 प्रकारचे लोकं येणार आणि त्यांचे 100 जजमेंट्स असणार हे झालं तरी कोणाला स्वतःहून मुलाला "ओ ले ओ ले हा घे मोबाईल, बस डोकं खुपसून, मोठा चष्मा लागायला हवा की नाही? डोळ्यात तिरळेपणा नको का बाळाला? " असं करावं वाटत नसणार, प्रत्येकाला त्याची कारणं आहेत. का लागली सवय, अशी कशी लागली वगैरे सूर म्हणजे गमतीशीर प्रकार आहे तर ते असो!
आमच्या घरी जे नणंदेने तिच्या मुलींसाठी केलं तेच आपण मुलासाठी करायचं हा नवऱ्याचा हट्ट होता त्यामुळे त्याने जेवताना मुलाला मोबाइल वर गाणं बघायची सवय वयाच्या 5 व्या महिन्यात लावली. ती सवय 2 वर्षांनी सुटली आहे. पण आता त्याला सांभाळायला घरात कोणी नसतं आणि मला ऑफीसचं काम असतं यामुळे दिवसभरात 4 ते 5 तास तो tv किंवा मोबाईल वर गाणी बघतो. मी याबद्दल फार गिल्टी फील करते पण उपाय नाही आहे. वीकएंड ला आणि संध्याकाळी 8 नंतर मात्र आम्ही दोघेही मोबाईलवर काहीही बघत नाही. TV तर आमच्याकडे नव्हताच , त्याला गाणी बघायला मिळावी म्हणून borrow केलाय आता एकांकडून. तो अजून लहान आहे त्यामुळे ऑनलाईन शाळेची कटकट नाही त्याला हे बरं झालं.
आमच्याकडे सांताला आणि देवबापाला लाडीगोडी लावायची असते त्यामुळे tab हातात घेताना विचारून घेतो की कितीवर काटा गेला की बंद करायला सांगितलं आहे सांता ने? बरोबर काटा त्या आकड्यावर गेला की बंद करून खेळायला जातो. पण शेवटी मुल आई मीटिंग मध्ये , कम्प्युटरसमोर, किती एकटा खेळणार. आम्ही भाड्याने राहतो त्यामुळे आजूबाजूचे आम्हाला फारसे involve करून घेत नाहीत त्यामुळे त्याला।मित्र मैत्रिणी नाहीत. एक तास क्राफ्ट, एक तास गोष्ट ऐकणे, एक तास खेळणी खेळणे एक तास पाण्यात खेळणे , एक तास रंगकाम एवढं झाल्यावर मोबाईल देण्यावाचून पर्याय नाही.
माझ्यापुरता मी शोधलेला त्यातल्या त्यात बरा मार्ग म्हणजे सलग अर्धा तासापेक्षा मोबाईल बघू न देणे, त्यामुळे त्याला पण दिवसभरात 8 ते 10 वेळा TV ब्रेक मिळतो आणि मला पण सलग तव न बघितल्या बद्दल जरा त्यातल्या त्यात रिलीफ.माझ्या मुलाची झोप फार कमी आहे, तो फार तर फार 6 ते 7 तास झोपतो. उरलेल्या 17 तासांचं नियोजन फार अवघड आहे.
तुम्ही पण वेगळे वेगळे उपाय करत असाल याची खात्री आहे पण कोविड काळात गोष्टी अवघड बसल्या आहेत. थोडा अघोरी उपाय सांगते एकदा कधी तरी मोबाईलवर भयानक व्हिडीओ दाखवा मुलांना आणि सांगा ते गाण्याचं अँप्लिकेशन उघडलं की भूत येतंय त्यामुळे बघता येणार नाही. पण मुलांनी TV बघणं बंद केलं ली त्यांना व्यग्र कसं ठेवायचं हा प्रश्नच आहे.
जशी ठेस लागेल तसे एक एक कारण
जशी ठेस लागेल तसे एक एक कारण पटत जाईल. - Hemant 33 - अगदी बरोबर
मोबाईलवर भयानक व्हिडीओ दाखवा. - रीया उपाय चांगला आहे.
Pages