लहान मुलांची मोबाईल बघण्याची सवय कमी करण्यासाठी काय करावे?

Submitted by 'सिद्धि' on 22 November, 2021 - 02:58

घरात मोबाईल बघण्याचे भारी वेड असणारे लहान नमुने आहेत.
एक चार-पाच वर्षाची, तिला शोधायचं असेल तर तिच्या आईच्या मोबाइलला रिंग द्यायची, जिथून आवाज येईल तिथे ही सापडते. कधी टेरेस कधी बाल्कनी, तर कधी मिळेल त्या कोपऱ्यात बसून मोबाइल वर माशा अँड बेअर बघत असते, तेच भाग पुन्हा-पुन्हा.
मोबाईल शिवाय जेवत नाही.

माझी वर्षाची चिंटुकली, आई-बाबा बोलण्याआधी 'मोबी पाजे' हे बोलायला शिकली.

मुलांना मोबाइल दिला की ती शांत बसतात. व्यवस्थित जेवतातही, तेवढ्यात आपल काम देखील उरकून घेता येत. या गोष्टींमुळे लहान मुलांमधील मोबाइल बघण्याचे प्रमाण वाढत आहे.
पण याचे मुलांच्या डोळ्यांवर, शरीरावर आणि मनावर फार गंभीर दुष्परिणाम होताना पाहायला मिळत.
हे बंद करण्यासाठी काय करावे? तुम्ही तुमच्या घरी करत असलेले उपाय आणि युक्ती यांची चर्चा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही भाड्याने राहतो त्यामुळे आजूबाजूचे आम्हाला फारसे involve करून घेत नाहीत त्यामुळे त्याला।मित्र मैत्रिणी नाहीत.
>>>>>>

हे फार दुर्दैवी आहे. भाड्याने राहणाऱ्यांना वेगळी वागणूक. याबद्दल माझेही चांगले वाईट अनुभव आहेत. वेगळा धागा निघेल. विकांताला काढतो.

आम्ही भाड्याने राहतो त्यामुळे आजूबाजूचे आम्हाला फारसे involve करून घेत नाहीत त्यामुळे त्याला।मित्र मैत्रिणी नाहीत.
>>>>>> Really. I also stay on rent but never had this experience. My rental experience is mainly in Noida /Gurgaon. पुण्यात वेगळे असु शकते Happy

पुण्यात किंवा मुंबईत वगैरे गावाचा प्रश्न नसावा हा. सोसायटी टू सोसायटी डिफर होतं हे. माझ्या आईच्या सोसायटी मध्ये नव्या बिऱ्हाडाला मनापासून वेलकम केलं जातं, हवं नाही ती मदत केली जाते. जितकी सोसायटी मोठी आणि महाग तितका attitude जास्त असं वाटतं मला.

शिवाय प्रत्येक वर्षाला भाडेकरूंचा रेंट वाढत जातो त्यामुळे लोकं वर्षा दोन वर्षात जागा खाली करतात मग यांच्याशी कशाला घरोबा वाढवावा अशी thought process असू शकते.

ही पोस्ट लिहिताना मला लक्षात आलं की मी पण लोकांशी फार बोलायला जात नाही कारण आपल्याला कुठे इथे कायम राहायचं आहे हा विचार. सो या मागे दोन्ही पार्टी जबाबदार असणार

सगळ्याच ठिकाणी, सगळ्यांना सेम अनुभव येईल असे नाही. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. आपल्या आकलनाप्रमाणे आपण प्रत्येक अनुभवाचे तर्क वितर्क लावतो.
सो या मागे दोन्ही पार्टी जबाबदार असणार. नक्कीच.

मुलांना तुंबाडचे खोत वाचायला द्यावे. मुलांना गेंडा आणि पाघोची राईड आवडते. त्यांना मनापासून राईड मारू द्यावी. जर राईड हवी असेल तर गेंडा आणि पाघो स्वच्छ धुवून पुसून वाळवून खरारा करायला लागेल असे सांगायचे. त्यात वेळ तर जातोच शिवाय व्यायाम सुद्धा होतो.
तुंबाडचे खोत संपल्यावर हिंदू एक समृद्ध अडगळ वाचायला द्या.

शहरीकरण चे फायदे तोटे हळू हळू उघड होत जातील. अभी तो सुरुवात हैं.
खेळाची मैदाने नाहीत.
लोकांना वेळ नाही .
सोशल संबंध नाहीत.
मुलांसाठी पालकांना वेळ नाही .
वृध्द पालकांसाठी मुलांना वेळ नाही.
एकाच मुल त्या मुळे आत्या,मावशी, भवजी,दिर,भावजय, आणि बाकी नातेवाईक नाहीत.
एकटा पडणार आहे प्रतेक जन.
स्पर्धा असल्या मुळे मित्र कमी प्रतिस्पर्धी जास्त असतील
हितचिंतक ,मित्र ,नातेवाईक कोणीच नसेल.
फक्त आभासी दुनिया असेल.
मोबाईल गेम,व्हॉट्स ॲप आणि नवीन काय काय हेच असेल

हे फार दुर्दैवी आहे. भाड्याने राहणाऱ्यांना वेगळी वागणूक. याबद्दल माझेही चांगले वाईट अनुभव आहेत. वेगळा धागा निघेल. विकांताला काढतो.
>>>>

काढला Happy

भाड्याच्या घरात राहतानाचे अनुभव
https://www.maayboli.com/node/80647

काय म्ह ण ते प्रगती? परवा घरचे नेट गं डले तेव्हा चिमुकलीची आठवण आली. घरी वायफाय असेल तर ते अधून मधून बंद करता येइल हळू हळू कालखंड वाढ्वा. पण तिने आपण हून मोबैल डाटा सिलेक्ट केला तर मातर प्रोग्रामिन्ग ला घाला.

आमच्याकडे सर्व प्रकारचा मुक्त अ‍ॅक्सेस आहे व होता. पण लेकीला लवकर चशमा लागला. घारे डोळे सुरेख आहेत पण चश्मा आहे. पुढे ऑपरेशन चा पण खर्च येइल लसिक सर्जरीचा.

Pages