दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
मोट्ठ्या आवाजाचे फटाक्यावर का
मोट्ठ्या आवाजाचे फटाक्यावर का बंदी आणली जात नाही; लग्ने, match, निवडणूक etc वेळांना जे फटाके वाजवले जातात त्यावर बंदी असावी.
त्यासाठी वेगळा धागा काढायचा का, हा दिवाळी पुरताच मर्यादित असेल ना.
माझ्या माहितीनुसार मोठ्या
माझ्या माहितीनुसार मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर वर्षाचे ३६५ दिवस बंदी आहे.
तरीही जसे दिवाळीत वाजतात, तसेच इतर वेळीही.
त्यासाठी वेगळा धागा काढायचा
त्यासाठी वेगळा धागा काढायचा का, हा दिवाळी पुरताच मर्यादित असेल ना. >>> काढायला काहीच हरकत नाही. पण याच धाग्यावरील चर्चा वाचली नसेल तर वेगळा धागा काढुन ती वाचली जाईल का अशी शंका वाटली.
जहाजाला अपघाताने बरीच भोके पडली. त्यात मोठ्या भोकापासून सुरवात केली तर काही लोक म्हणु लागले हे नाही बुजवायचं, आधी बाकी सगळी याच्या पेक्षा लहान मोठी भोकं बुजवा, याचं नंतर बघु.
असो, तरी इतर भोकं बुजवण्यासाठी वेगळ्या धाग्याला पूर्ण समर्थन. जरूर काढा.
<< जहाजाला अपघाताने बरीच भोके
<< जहाजाला अपघाताने बरीच भोके पडली. त्यात मोठ्या भोकापासून सुरवात केली तर काही लोक म्हणु लागले हे नाही बुजवायचं, आधी बाकी सगळी याच्या पेक्षा लहान मोठी भोकं बुजवा, याचं नंतर बघु.
असो, तरी इतर भोकं बुजवण्यासाठी वेगळ्या धाग्याला पूर्ण समर्थन. जरूर काढा. >>
----- जहाज एकच असणार आहे, दुसर्याची परवानगी आणि पर्यात नाहीच.
दिवाळीचे फटाके आणि लग्नातले
दिवाळीचे फटाके आणि लग्नातले फटाके यांच्या तुलनेत दिवाळीचे फटाके जहाजाचे मोठे भोक ठरेल.
पण फटाक्यांचे प्रदूषण आणि गाड्यांनी होणारे प्रदूषण यात मोठे भोक कुठले?
सिलेक्टिव्ह पर्यावरण प्रेम...
सिलेक्टिव्ह पर्यावरण प्रेम...
तुम्ही व्यवस्थित मांडा वाहन
तुम्ही व्यवस्थित मांडा वाहन प्रदूषण मुद्दा त्यावरील उपाय. (जसे इथे ध्वनी आणि वायू प्रदूषण आटोक्यात ठेवून फटाके कसे उडवता येतील व इत्यादि बरेच चांगले प्रस्ताव आलेत.)
त्यात स्वतः आता पर्यँत त्यासाठी काय काय केले हे लिहा (नसेल विशेष केले, धाग्यातून माहिती मिळवायची आहे तरीही काही हरकत नाही) पण वाहन प्रदूषण व्यतिरिक्त इतर प्रदूषण थांबण्यास काय करता हे लिहीण्याची सक्ती नाही. आणि तुम्ही स्वतः शून्य वाहन वायु प्रदूषण करत असाल तरच /लहानपणी केले नसेल तरच बोला, आधी त्यापेक्षा अजून मोठे भोक असणारे प्रदूषण पुढे करून आधी ते बंद करा मग यावर बोला वगैरे इथले कित्येकजण म्हणणार नाहीत याबाबत मला खात्री आहे.
आम्ही फटाके धागा वाचून फटाके बंद/कमी/त्यावर आलेले इतर उपाय करू, तुमचा धागा वाचून (आधीच वाहन प्रदूषण कमी करण्यात करत असलेल्या प्रयत्नात भर घालून) त्यातील विविध उपाय वापरू.
कुणी पेस्टीसाईड्स व रासायनिक खते यामुळे होणारे प्रदूषण यावर धागा काढा. तो वाचून (आधीच जमेल तेवढे ऑर्गनिक वापरणे, घरातील चिमूटभर आणि इमारतीतील मूठभर झाडांना कम्पोस्ट करून वापरणे यात भर घालून) त्यातील अजून चांगले उपाय वापरू.
सगळं काही एकाच धाग्यात आले तर ते सगळे वाचले जाणे शक्यता कमी होईल आणि चर्चेत कुणी यावर कुणी त्यावर कोण कशावर बोलतेय न कळता खिचडी होईल.
त्यांना फक्त टिंगल करायची आहे
त्यांना फक्त टिंगल करायची आहे. आणि प्रतिसाद प्रदूषण करायचं आहे.
या़ंच्यातलं कोणी खरेखुरे फटाके फोडत असेल असं वाटत नाही.
मला एक माणूस एकदा सांगून
मला एक माणूस एकदा सांगून गेलेला - हे चर्चा करून वगैरे कुणाची मत बदलत नाहीत. जे ज्या बाजूला आहेत तीच बाजू पकडून दळण दळत बसतात. इतके मोठे संत होऊन गेले - जगाला शहाणं करण्याच्या प्रयत्नात ते संपले, पण जग शहाणं झालेलं दिसतय का? So just Chill!
मला तो माणूस द्रष्टा वाटू लागला आहे.
मला तो माणूस द्रष्टा वाटू
मला तो माणूस द्रष्टा वाटू लागला आहे.>>>> धन्यवाद, मी बघायला गेलात तर लहानपणापासूनच हुशार होतो. आपलं साधं राहणीमान उच्च विचारसरणी अवलंबतो. पगारातल्या बोनसमधील चार पैसे बाजूला काढून फटाके आणतो . आणि इतरांना पण वाजवायला सांगतो. द्रष्टा वैगरे काही नाही मी. तरीपण तुम्ही कौतुक केलंत बरं वाटलं.
पगारातल्या बोनसमधील चार पैसे
पगारातल्या बोनसमधील चार पैसे बाजूला काढून फटाके आणतो . आणि इतरांना पण वाजवायला सांगतो.>> असे दुसऱ्यांना फटाके उडवायला प्रोत्साहन देऊन आणखी प्रदुषण वाढवण्यापेक्षा एखाद्या गरीब मुलाला वह्या पुस्तके, कपडे घेऊन द्या.
वह्या पुस्तके कपडे दसऱ्याला
वह्या पुस्तके कपडे दसऱ्याला देतो. दिवाळीत वह्या पुस्तके घेऊन गेल्यावर मुलांना ते आवडत नाही असा माझा अनुभव आहे. दिवाळीत फटाके दिल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद असतो तो वह्या पुस्तके दिल्यावर नसतो. आणि हो ते फटाके दिल्यावर मुलांनी ते सुरक्षितपणे वाजवावे याची जबाबदारी पण घेतो बरं का. आतापर्यंत अपघात होणे दूरच कोणालाही साधा चटका पण बसला नाही.
टीका फक्त ठराविक सण समोर ठेऊन
टीका फक्त ठराविक सण समोर ठेऊन होत असेल तर नक्कीच ते षडयंत्र असते. प्रदुषण फक्त दिवाळीत होत? नवीन वर्ष्याच्या स्वागताला जगभरातुन एका रात्रीत जे फटाके वाजवले जातात त्यातून पर्यावरण पुरक रसायन हवेत सोडली जातात कि काय याचा शोध घ्यायला हवा. सर्व प्रकारच्या, सर्व धर्मियांच्या सार्वजनिक मिरवणुकीतील फटाके अंनिस ला दिसत नसावेत बहुतेक. आणि प्रदुषण हाच मुद्दा असेल तर मग दिवाळीच का? एका दिवसात भारत किंवा जगभरात किती गाड्या, कारखाने चालतात आणि किती प्रदूषण होत त्याचा काही लेखाजोखा आहे का कुणाकडे?
ध्वनी प्रदुषण सुद्धा अनेक गोष्टींतून होतो, त्याचे हि विवंचन वर आलेच आहे...
प्राण्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल म्हणाल तर दररोज होणाऱ्या कोंबड्या, बकऱ्या, मासे ,गायी, म्हशी, बैल, डुक्कर आणि असे अनेक मुके प्राणी यांच्या कत्तलीबद्दल सुद्धा विचार करायला हवा..
बोकलत तुम्ही महान पुण्यात्मा
बोकलत तुम्ही महान पुण्यात्मा आहात. ख्रिसमसला सांताबाबा बनुन खेळणी वाटत असालच.
Submitted by देवभुबाबा on 12
Submitted by देवभुबाबा on 12 November, 2021 - 13:25 >> कुपया सर्व प्रदूषण समावेशक एकत्र असा लेख्याजोख्या सहित एक धागा काढा आणि षडयंत्र हाणून पाडा ही विनंती.
तो पर्यँत आम्ही एक फटाक्याच्या धागा, दुसरा वाहन प्रदूषणाचा धागा, तिसरा सांडपाण्याच्या प्रदूषणाचा धागा वगैरे जसे येतील त्यावर चर्चा करून काही बदल करू आमच्यात. सर्व समावेशक धागा येई पर्यंत तेवढीच थोडी पूर्व तयारी होईल.
मानव +१९९९९९९
मानव +१९९९९९९
मला इथे लिहायला प्रति
मला इथे लिहायला प्रति प्रतिसाद ५ रियाल आणि २ डॉलर मिळतात.
@मानव पृथ्वीकर-तुम्हाला
@मानव पृथ्वीकर-तुम्हाला कोणीही अडवलं नाही. खुशाल तुमच्या पद्धतीने साजरी करा.
@भरत-कुणाला कोठून किती पैसे मिळतात हे ज्याचे त्याचे कमाईचे स्त्रोत. आम्हाला काय त्याच सोयर सुतक.
सालाबादप्रमाणे यावर्षी
सालाबादप्रमाणे यावर्षी दिवाळीला हा धागा वर आलेला दिसतोय आणि तेच तेच मुद्दे आहेत. एखादी चुकीची अथवा समाजास नुकसान पोहोचवणारी प्रथा बंद करणे हे सरळसोट व सहजसोपे आहे.
चुकीचे आहे का? त्यातून प्रदूषण होते का? लोकानला हानीकारक आहे का? उत्तर होय असेल तर ते बंद करा. इतके ते सोपे आहे.
पण कसे आहे ना धर्म हि अफूची गोळी आहे. एकदा ह्या गोष्टीना धर्म जोडला कि मग काही जणांची मती गुंग होते आणि सोपे असलेले विनाकारण क्लिष्ट करतात हे लोक. चुकीचे आहे हे माहित असूनही मग ते अनावश्यक फालतू फाटे फोडायला सुरवात करतात. हे त्यांचे नमुनेदार आणि ठराविक प्रश्न:
१. फक्त दिवाळीवेळीच फटाकेच बंदी का?
२. फक्त फटाक्यावरच का बंदी? वातानुकूलित यंत्रणा, मांसाहार, गाड्या/वाहने यांनी सुद्धा प्रदूषण होते बंदी का नाही?
३. जे फटाक्यावर बंदी घालायचे समर्थन करतात ते मांसाहार भक्षण करणे, कार चालवणे सोडतील का?
अरे मतीगुंग बिचाऱ्यानो हे फाटे फोडायची काय आवश्यकता आहे? फक्त दिवाळीवेळीच फटाके बंद असे नाही तर ते नेहमीच बंद हवेत मान्य. पण समजा जरी दिवाळीवेळीच बंद करा असे असले तरी मी म्हणतो हरकत काय आहे? अरे वाईट ते वाईटच नं? एव्हडी कळ का येते तुम्हाला? वाईट आहे प्रथा ती मग दिवाळीवेळी असुदे नाही तर शिमग्यावेळी नाहीतर कधीपण असुदे. वाईट आहे म्हटल्यावर बंद करणे हा साधा व्यवहार नाही का?
फटाके वाजवण्यावर कुणाचे रोजचे जीवन किंवा दिनचर्या अवलंबून नाही. वातानुकूलित यंत्रणा, मांसाहार, गाड्या/वाहने यांच्यावर आहे. ते बंद केले तर कित्येक आयुष्ये अनंत गैरसोयींचा सामना करतील. जीवांची तडफड होईल इतके ते आयुष्याचा भाग बनून राहिले आहेत. ते बंद करण्या न करण्यावर दिवाळीचे फटाके बंद करणे का अवलंबून आहे? फटाके वाजवायचे बंद केले तर तुमचे हातपाय थरथर होणार आहे का, दारू अचानक सोडल्यावर होते तशी? कि तुमच्या घरचे तडफड तडफड करायला लागतील? नक्की काय समस्या आहे?
फटाक्यावर बंदी घालायचे समर्थन करणाऱ्यांनी मांसाहार भक्षण करणे बंद करावे हा तरी हट्ट कशासाठी? म्हणे मांसाहार मुळे सुद्धा प्रदूषण होते. अरे असेल किंवा नसेल होत. इतरही अनेक गोष्टींमुळे होते प्रदूषण. ते सगळे बंद केल्यावर मगच फटाके बंद करायचे हि मागणी कशासाठी?
दिवाळीला फटाके हि काही धार्मिक प्रथा नाही. दिवाळीला दिवे पणत्या लावणे घरचा आजूबाजूचा परिसर उजळून टाकणे हि खरी प्रथा. पण काही ठराविक जणांच्या म्हणण्यानुसार "ती आपल्या संस्कृतीची थोर परंपरा आहे". केवळ धार्मिक प्रथा आहे म्हणून बंद करायचे नाही अशी भूमिका असेल तर ह्या समस्त ठराविक मंडळीना माझा एकच प्रश्न आहे:
सतीची प्रथा आज अस्तित्वात असती तरी तुम्ही हेच मुद्दे उपस्थित करून ती बंद करण्याला विरोध केला असता का? कारण ती सुद्धा एक "आपल्या थोर संस्कृतीची परंपरा" होती. आज ती प्रथा असती तर हे प्रश्न तुम्ही विचारले असते का?
१. फक्त सती जाण्याच्या वेळीच बंदीची मागणी का केली जाते? इतर धर्माच्या वाईट प्रथा दिसत नाहीत का?
२. सती वरच बंदी का? समाजात इतरही अनेक वाईट प्रथा आहेत त्या का नाही आधी बंद करायच्या?
३. जे सती प्रथा बंद करा म्हणतात ते त्यांच्या इतर वाईट सवयी आधी सोडतील का?
असे प्रश्न विचारून घरातल्या स्त्रियांना त्यांच्या पतीच्या माघारी जिवंत जाळण्याचे तुम्ही समर्थन केले असते का? ह्या प्रश्नाचे फक्त उत्तर द्या.
उत्तर "हो" असेल तर मुद्दाच मिटला.
उत्तर "नाही" असेल तर मग सतीची प्रथा वाईट म्हणून बंद केली तशी फटाक्यांची सुद्धा तितकी वाईट नसली तरी अखेर वाईटच प्रथा आहे ना --- प्रदूषण निर्माण करणारी? मग तिचे का इतके समर्थन.
देवभूबाबा, फक्त दिवाळीच नाही,
देवभूबाबा, फक्त दिवाळीच नाही, नववर्षाच्या फटाक्यांनाही जगभरात विरोध वाढतो आहे. सिडनीत पर्यावरणवादी दरवर्षी विरोध करत असतात. त्यामुळे आजकाल त्यांचा 'कार्बन न्यूट्रल' फटाके उडवण्याकडे भर असतो. ३१ डिसेंबर आणि प्रदूषण ह्या विषयावर अनेक शोधनिबंध लिहिले गेले आहेत आणि अतिशय अभ्यासू पद्धतीने त्याचा विचार करण्याची मागणी होते आहे.
ह्या सर्व बातम्या आपण वाचत नाही, आपण फक्त दिवाळीच्या बातम्या वाचतो आणि आपल्याला वाटतं की हे लोक आपल्या सणांनाच फक्त विरोध करतात. वस्तुस्थिती तशी नाही.
देवभूबाबा, फक्त दिवाळीच नाही,
दु प्र का टा
देवभूबाबा, फक्त दिवाळीच नाही,
ति प्र का टा
देवभूबाबा, फक्त दिवाळीच नाही,
च प्र का टा
फटाके वाजवण्यावर कुणाचे रोजचे
फटाके वाजवण्यावर कुणाचे रोजचे जीवन किंवा दिनचर्या अवलंबून नाही. वातानुकूलित यंत्रणा, मांसाहार, गाड्या/वाहने यांच्यावर आहे. ते बंद केले तर कित्येक आयुष्ये अनंत गैरसोयींचा सामना करतील. जीवांची तडफड होईल इतके ते आयुष्याचा भाग बनून राहिले आहेत.>>>
आपापल्या सोयीप्रमाणे लोकांचे
आपापल्या सोयीप्रमाणे लोकांचे कश्याकश्यावर जीवन अवलंबून राहिले आहे आणि कोण किती मतिगुंग हे सांगणारे अतिबुद्धीवादी बिचाऱ्यांना मध्येच दिवाळीच्या फटाक्यांचा विषय सतीप्रथेवर नेऊन ठेवला देखील आणि इतरांना बाकी विषय कश्याला म्हणून ओरड.... बाकी गोष्टींची सरमिसळ झोंबते का? कि इतर वेळी तुमच्या पण बुद्धीला ग्रहण लागतो. धर्म जोडा अथवा नका जोडु, ज्या गोष्टीवर चर्चा करता ती किती प्रामाणिक करता? कि तुम्ही म्हणता तेच १००% खर आहे असं तुम्हाला वाटतं म्हणून इतरांनी पण तेच मान्य करावे.
@मानव पृथ्वीकर-तुम्हाला
@मानव पृथ्वीकर-तुम्हाला कोणीही अडवलं नाही. खुशाल तुमच्या पद्धतीने साजरी करा. या विधानाला नक्की काय संदर्भ आहे हे कळलं नाही. मी मला कुणी अडवतंय असे म्हटल्याचे आठवत नाही, माझ्या कुठल्या पोस्ट वरून तुम्हास तसे वाटले असल्यास निदर्शनास आणुन द्या.
चला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे
चला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लोकांनी दिवाळीला फटाके नाही फोडले. त्याने खरोखर कितीसा फरक पडेल?
दिवाळीत नाही फोडले म्हणून लोक इतर कार्यक्रमात फोडतील. शेवटी कुठेतरी भरपाई करण्याचा निसर्गतः नियम सर्वांच्यातच असतो.
@मानव पृथ्वीकर
@मानव पृथ्वीकर
तो पर्यँत आम्ही एक फटाक्याच्या धागा, दुसरा वाहन प्रदूषणाचा धागा, तिसरा सांडपाण्याच्या प्रदूषणाचा धागा वगैरे जसे येतील त्यावर चर्चा करून काही बदल करू आमच्यात. सर्व समावेशक धागा येई पर्यंत तेवढीच थोडी पूर्व तयारी होईल.
---या विधानाला प्रत्युत्तर केलं बाकी काही नाही..
माझा मुद्दा पटलेला आहे असे
माझा मुद्दा पटलेला आहे असे गृहीत धरतो
नवीन सर्व समावेशक धागा काढला
नवीन सर्व समावेशक धागा काढला आहे.
तर चला पृथ्वीवरचे प्रदूषण कमी करण्यास हातभार लाऊया
https://www.maayboli.com/node/80513
Pages