दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
आजकाल शाळांमधून आणि इतरत्र
आजकाल शाळांमधून आणि इतरत्र "फटाक्यांमुळे होणाऱ्या वायु आणि ध्वनी प्रदुषणाबद्दल" इतकी जनजागृती केली जाते की उलट मुले पालकांना सांगताना बघितलेय की फटाके नको म्हणून!!
मुलांच्या पण आवडीनिवडी आणि प्राधान्यक्रम बदललेत आजकाल
टीनेजर्सची दिवाळी तर नवनवीन कपडे घालून insta वर मिरवण्यातच निघून जाते!!
>> मुले पालकांना सांगताना
>> मुले पालकांना सांगताना बघितलेय की फटाके नको म्हणून!! मुलांच्या पण आवडीनिवडी आणि प्राधान्यक्रम बदललेत आजकाल
+१ सहमत. हा बदल सकारात्मक आहे असे माझे मत.
आजकाल शाळांमधून आणि इतरत्र
आजकाल शाळांमधून आणि इतरत्र "फटाक्यांमुळे होणाऱ्या वायु आणि ध्वनी प्रदुषणाबद्दल"
अशीच जनजागृती गणपती उत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत होण्याची गरज आहे.
"अशीच जनजागृती गणपती
"अशीच जनजागृती गणपती उत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत होण्याची गरज आहे"
अशीच जनजागृती खालील बाबतीत पण झाली तर बरे
१) कोणत्याही धंदेवाईक-धार्मिक उत्सवानिमित्याने (?) होणारे ध्वनी प्रदूषण (फक्त गणेशोत्सव नव्हे).
२) धार्मिक निमित्ताने होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तली, जसे बकरी ईद / यात्रेतील बळी इत्यादी.
३) प्रायोजित राजकीय सभा , खरे तर यापुढे कोणत्याही प्रत्यक्ष सभेला परवानगी न देता ऑन लाईन सभा (जसे वेबिनॉर ) सक्तीच्या केल्या जाव्यात , त्यामुळे उत्स्फूर्त गर्दी आणि प्रायोजित गर्दीतला फरक पण कळेल.
४) वाहतुकीचे नियम मोडल्याने होणारे दुष्परिणाम, (फोनवर बोलत वाहन चालवणाऱ्या ९०% निर्लज्ज गुन्हेगारांसाठी आणि त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या शासनासाठी )
इत्यादी इत्यादी इत्यादी
अजून एक
अजून एक
वरातीची मिरवणूक! विदर्भात नवरा मुलगा मारोतीला जातो बॅंडबाजा व नाचगाणी! काही ठिकाणी नवरानवरीची मिरवणूक असते.
टीनेजर्सची दिवाळी तर नवनवीन
टीनेजर्सची दिवाळी तर नवनवीन कपडे घालून insta वर मिरवण्यातच निघून जाते!
>>>
हा एक नवीन प्रॉब्लेम उदभवू लागला आहे. यावर एक वेगळा धागा गरजेचा आहे.
ह्यात प्रॉब्लेम काय आहे नक्की
ह्यात प्रॉब्लेम काय आहे नक्की?? तुमचे धागे हा आमचा प्रॉब्लेम आहे. तो सोडावता आला तर बघा. नाहीतर काय आहेच!
ह्यात प्रॉब्लेम काय आहे नक्की
ह्यात प्रॉब्लेम काय आहे नक्की??
>>>>
सध्याची लहान मुलांची पिढी ईन्स्टा आणि रील्सच्या आहारी जाऊ लागलीय हा जर पालकांना चिंतेचा विषय वाटत नसेल तर धागा काढणे खरेच गरजेचे आहे.
सध्या बीजी आहे. त्यामुळे तुर्तास शुभरात्री !!..
आमच्या बागेत सकाळ संध्याकाळ
आमच्या बागेत सकाळ संध्याकाळ विविध पक्षांचा चिवचिवाट चालू असतो .
नवजात पिल्ले खोप्यातून लँडिंग करून खाली आल्या नंतर , एक दोन दिवस त्यांचे पालक जमिनीवरच त्यांना भरवत असतात . मग पंखात बळ आल्या नंतर त्यांचे सुरक्षितपणे उड्डाण होते .
बागेत पक्षांना सुरक्षित वाटत असल्या मुळे बुलबुल , चिमण्या , होला ,सुगरण , शिंपी च्या त्याच त्याच जोड्या नवीन हंगामात येत असतील. अशी परिस्थिती असल्यामुळें कुत्री आणि मांजरे आम्ही पाळत नाही .
मुख्य म्हणजे या पक्षांना त्रास होईल म्हणून मुल स्वयंस्फूर्तीने फटाक्यांवर बहिष्कार टाकतात .
सध्याची लहान मुलांची पिढी
सध्याची लहान मुलांची पिढी ईन्स्टा आणि रील्सच्या आहारी जाऊ लागलीय हा जर पालकांना चिंतेचा विषय वाटत नसेल तर धागा काढणे खरेच गरजेचे आहे. >> बरोबर.
मुख्य म्हणजे या पक्षांना
मुख्य म्हणजे या पक्षांना त्रास होईल म्हणून मुल स्वयंस्फूर्तीने फटाक्यांवर बहिष्कार टाकतात . >> मुलांना अक्कल आहे
सध्याची लहान मुलांची पिढी
सध्याची लहान मुलांची पिढी ईन्स्टा आणि रील्सच्या आहारी जाऊ लागलीय हा जर पालकांना चिंतेचा विषय वाटत नसेल तर धागा काढणे खरेच गरजेचे आहे.>>>>
सर तुम्ही काढाच हो नवीन धागा
तुमच्यामुळे तर समाज टिकून आहे, तुम्ही धागा नाही काढलात तर ही लहान मुलांची पिढी वाया जाईल पार आणि पालकांना त्यात काही गैर आहे असेही वाटणार नाही
तुमच्यासारखा दीपस्तंभ कामाच्या व्यापातून वेळ काढून इतकं योगदान देतोय हे ऋण कधीही न फिटणारे आहे
मुख्य म्हणजे या पक्षांना
मुख्य म्हणजे या पक्षांना त्रास होईल म्हणून मुल स्वयंस्फूर्तीने फटाक्यांवर बहिष्कार टाकतात .>>>
वाह मस्तच, खुप कौतुक या मुलांचे
तुमचे धागे हा आमचा प्रॉब्लेम आहे. तो सोडावता आला तर बघा. नाहीतर काय आहेच!>>>>
सण हे लोकांनी एकत्र
सण हे लोकांनी एकत्र येण्यासाठी असतात.
असा पण आज माणूस एकटा पडला आहे.
अनेक आत्महत्या,काहीच संबंध नसणाऱ्या लोकांवर गोळीबार, अनेक मानसिक आजार, .
नैराश्य ह्यांनी समाज पोखरला गेला आहे.
माणूस मेला तरी वास येई पर्यंत कोणाला माहीत पडत नाही.
ऑनलाईन सभा,ऑनलाईन मित्र,ऑनलाईन मीटिंग.
ही काही उत्तर नाहीत.
उलट ह्या मधून माणसाने एकत्र येणे माणसाची मानसिक गरज आहे.
फटाके त्रास दायक आहेत तर आवाज कमी करा, फटाके वाजवणे साठी sound proof जागा निर्माण करा.
पण लोकांना एकत्र येण्या पासून थांबवू नका.
गणपती ustav आसो किंवा कोणताही ustav.
लोक एकत्र येतात.
बंध मजबूत होतात.
उगाच हे बंद करा ते बंद करा .
ह्याला काही अर्थ नाहीं
ऋन्मेषचे धागे हा काही
ऋन्मेषचे धागे हा काही प्रॉब्लेम म्हणता येणार नाही उलट ते सोल्यूशन आहे अनेक प्रॉब्लेम्सवरचे. लाख दुखोंकी एक दवा टाईप.
या धाग्यांचा उपयोग अनेक जण पंचिंग बॅग म्हणून करतात आणि स्वतःची चीड, दु:ख, नैराश्य व्यक्त करतात. ऋन्मेषला कितीही शिव्याशाप दिल्यात तरी त्याने उलटून संताप केल्याचे किंवा अॅडमिनला तक्रार केल्याचे माझ्या नजरेस अद्याप पडले नाही. हां आता ही पंचिंग बॅग स्वतःच्या करामतींनी इतरांना पंचिंग करिता उद्युक्त करत असेल किंवा ऋन्मेषच्याच भाषेत उत्तेजित करत असेल हा काहींच प्रॉब्लेम असल्यास त्याला इलाज नाही. इतरांनी हरकत घ्यावी आणि अॅडमिनकडे तक्रार करावी असा त्याचा एकही धागा आणि प्रतिसाद नाही आणि इतरांकरिता तो हरकत किंवा तक्रार करीत नाही.
सर ही शब्दरचना तर तुमचीच
सर ही शब्दरचना तर तुमचीच वाटते
स्वतःच स्वतःचे भजनी मंडळ काढलेत काय
प्रतिसादाची १५/१६ पाने वाचून
प्रतिसादाची १५/१६ पाने वाचून मला जे ज्ञान झाले ते असे
फटाके युक्त दिवाळी करा.
"फोडा आणि फोडू द्या."
माझ्या मुलाने केलेली ही कविता वाचा.
एक फटाका द्या मज आणुनी
फोडीन मी जो उदबत्तीने
कानठळी त्या आवाजाने
भेदरतील मग सारे पक्षी
असा फटाका द्या मज बाबा
(प्रताधिकार मुक्त }
मुलांना अक्कल आहे >>>>>>>>
मुलांना अक्कल आहे >>>>>>>>
जाऊ द्या हो !
पर्यावरण चे महत्व मदरशात शिकलेल्याना नाही कळणार ....
पहिल्या पानावर चायवाला या
पहिल्या पानावरचे चायवाला या सदस्याचे प्रतिसाद वाचा. ते आणि मागच्या पानावरचे च्रप्स हे दोघे मदरश्यात शिकलेत, हे माहीतच नव्हतं.
पर्यावरण चे महत्व मदरशात
पर्यावरण चे महत्व मदरशात शिकलेल्याना नाही कळणार >>>>
मदरशा मध्ये शिकलेले लोकं दिवाळीला फटाके उडवून प्रदूषण करतात
ऋन्मेषला कितीही शिव्याशाप
ऋन्मेषला कितीही शिव्याशाप दिल्यात तरी त्याने उलटून संताप केल्याचे किंवा अॅडमिनला तक्रार केल्याचे माझ्या नजरेस अद्याप पडले नाही. >> बरोबर.
पर्यावरण चे महत्व मदरशात
पर्यावरण चे महत्व मदरशात शिकलेल्याना नाही कळणार><>>>
आपण कसे कंडीशन्ड् झालेलो असतो ते समजून घ्यायचे असेल तर हा लेख वाचावा.
https://aisiakshare.com/node/8389
मी राजा शिवाजी विद्यालय /
मी राजा शिवाजी विद्यालय / किंग जॉर्ज या शाळेत शिकलोय.
अशी कुठली शाळा होती का मुंबईत जिथली पोरे तेव्हा फटाके वाजवत नव्हती. असल्यास जाणून घ्यायला आवडेल.
धागा काढा सर यावर
धागा काढा सर यावर
होऊ दे खर्च
मायबोली आहे घरचं
मी धागा काढावा की नाही, या
मी धागा काढावा की नाही, या विषयावर पण धागा काढता येईल खरं तर.
मी राजा शिवाजी विद्यालय /
मी राजा शिवाजी विद्यालय / किंग जॉर्ज या शाळेत शिकलोय.>> :क.हा.मा.बा.:
फटाक्यांची समस्या ही शहरात
फटाक्यांची समस्या ही शहरात जास्त आहे.कारण जागेचा अभाव.
मैदान मोठ्या प्रमाणात शहरात नसणे.
ही मूळ समस्या आहे.
फटाके नाहीत.
खेळायला पण मुलांना मोकळी जाग नाही.
त्या cricket वरून पण लोकांना त्रास होतो.
खेळायला पण मुलांना मोकळी जाग
खेळायला पण मुलांना मोकळी जाग नाही.
त्या cricket वरून पण लोकांना त्रास होतो.
>>>>
यावर नक्कीच एक धागा काढायला हवा. मी पाहिलेय की लोकं हल्ली नव्या सोसायटीत घर घेताना पार्किंग आहे का पहिले बघतात. पण पोरांना खेळायला जागा आहे का नाही याचे कोणाला काही पडले नसते. यात लोकांनाही दोष देत नाही मी. कारण जागेच्या अभावापायी शहरातल्या लोकांची मेंटेलिटीच तशी झाली आहे. बाकी सविस्तर नवीन धागा काढला कोणी तर बोलूच..
सर तुम्हीच खरे दिल दर्या आणि
सर तुम्हीच खरे दिल दर्या आणि बाकी समंदार टाइप व्यक्ती आहात
इतका आवडीचा विषय असताना दुसऱ्याला धागा काढायला देत आहात
तुमच्या दर्यदिलीला तर तुलनाच नाही
Churchgate
Churchgate
मध्ये दोन किलोमीटर च्या परिघात दोन तीन मैदान आहेत
Oval मैदान तर खूप मोठे आहे.
दादर ला शिवाजी पार्क आहे.
Nepence rd ल priydarshani पार्क,जरा अलीकडे hanging गार्डन. अशा मोकळ्या जागा आहेत
चुनाभट्टी मध्ये मोठे मैदान आहे.
पण आता ज्या नवीन वस्त्या आहेत तिथे मोकळ्या जागा नाहीत.
नवी मुंबई तर प्लॅन city aahe.
त्यांनी पण प्लॅन मध्ये मोकळ्या जागा ठेवल्याचं नाहीत.
Pages