दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
फटाके ते थेट बलात्कार हे
फटाके ते थेट बलात्कार हे बिलकुल झेपले नाही.
त्या हिशोबाने आमच्या दारासमोरून जो रस्ता जातो तिथे ट्राफिक जाम झाल्यावर हॉर्न वाजवणारे सारेच खुनी बलात्कारी दहशतवादी झाले.
अमुकतमुक आजीबाई आजारी आहेत तिथे काही इनसेन्सिटीव्ह लोकांनी फटाके वाजवले तर ते चुकीचे आहेतच. पण ज्यांनी त्यांना अडवले नाही ते देखील तितकेच जबाबदार आहेत. आमच्याईथे मुंबईतल्या जुन्या चाळीत असे काही घडले असते तर पोरांनी त्या फटाके वाजवणार्यांना चोप दिला असता. हल्ली मात्र त्यांचा प्रॉब्लेम आहे, ते बघतील, मला काय ही वृत्ती वाढत चालली आहे
जगातलं पहिलं इंग्लिश
जगातलं पहिलं इंग्लिश संकेतस्थळ : info.cern.ch :: जगातलं पहिलं मराठी संकेतस्थळ : ? (उत्तर - अर्थातच मायबोली.)
अश्यासारखे प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेला असतात. आता ह्यात अर्थातच टिम बर्नर्स लीच्या पहिल्यावहिल्या अचिव्हमेंट वेबसाईटची तुलना मायबोलीशी करायचा हेतू नसून, म्हणजेच ऑब्जेक्ट्सची तुलना नसून, पहिल्या दोन आणि शेवटच्या दोन ह्यांच्यातल्या नात्याची सिमिलॅरिटी अपेक्षित आहे. तद्वत नानबा ह्यांचं म्हणणं आहे असं मला वाटतं. बलात्कार/फटाके ह्या घटनांमध्ये/ऑब्जेक्ट्समध्ये इक्विव्हॅलन्स आहे असं त्याही म्हणणार नाहीत, मात्र दुस-या व्यक्तीच्या हक्कांना न जुमानणे ह्या साधर्म्याबद्दल त्यांना म्हणायचे आहे. त्यात थोडा एक्स्ट्रापोलेट करून ॲब्सर्डिटीला रिडक्शन करण्याचाही भाग असावा. (Reductio ad absurdum) परंतु उदाहरण इतकं टोकाचं आहे, की ते मिसरीड होण्याचीच शक्यता अधिक, आणि ते तसे झाले तर ते तसे (मिस)रीड करणा-या इतरांनाही त्यात फार बोल लावता येणार नाही, असंही मला वाटतं.
मात्र दुस-या व्यक्तीच्या
मात्र दुस-या व्यक्तीच्या हक्कांना न जुमानणे ह्या साधर्म्याबद्दल त्यांना म्हणायचे आहे
>>>>>>
हे असे रीड करूनही ते चुकीचेच वाटले
कारण बलात्कारात दुसर्या व्यक्तीवर बल वापरलेच जाते. ते त्या व्याख्येतच आहे. त्या क्रियेतच आहे.
फटाक्यांबाबत म्हणा वा डीजेबाबत म्हणा हे तसे लागू नाही. यात कोणाच्या मनाविरुद्ध हे घडतेय वा कोणाला मुद्दामून त्रास दिला जातोय वा आपल्या नकळत होतोय असे नेहमीच नसते. वा मुळात जाणीव असली तर ते तसे होऊ नये याची काळजी घेत फटाके फोडता येतात, डीजे वाजवता येतो.
अवांतर - हे खरे आहे का?
अवांतर - हे खरे आहे का?
जगातलं पहिलं मराठी संकेतस्थळ : ? (उत्तर - अर्थातच मायबोली.)
मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा
मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा त्रास होतो हे १००% मान्य आहे. पण म्हणून सरसकट फटाक्यांविरुद्ध आवाज उठवणारे हे पर्यावरणप्रेमी स्वतः रोज कितीवेळा वाहनाचा हॉर्न वाजवतात किंवा इतरांना त्या कर्णकर्कश आवाजाबद्दल सांगतात की तुमच्या हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषण होते ज्याचा इतरांना रोज त्रास होतो?
फटाक्यांमुळे नक्कीच आनंद मिळतो. पण त्यासाठी पुढील उपाय अमलात आणता येतील.
१. ठराविक वेळीच फटाके उडवता येतील उदा. सकाळी ६ नंतर किंवा रात्री १० पूर्वी.
२. लहान मुलांनी मोठयांच्या देखरेखीतच आणि मोकळ्या जागेत/ मैदानावर फटाके उडवावे.
३. मोठया माणसांनी आवाजाचे फटाके विकत आणू नये, फुलबाज्या, भुईचक्र, पाऊस असे फटाके आणावेत.
४. सिगरेटवर जसा टॅक्स लावला जातो, तसा भरमसाठ टॅक्स विशिष्ट डेसीबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर लावावा म्हणजे आपोआपच कमी फटाके खरेदी केले जातील.
५. शक्य झाल्यास सरकारने सार्वजनिक फटाके उडवावेत, जे सगळ्यांना बघता येतील.
सरसकट फटाक्यांवर बंदी घालणे योग्य नाही.
उपाशी बोका, तुम्ही आता
उपाशी बोका, तुम्ही आता मांडलेल्या मुद्द्यांवर तीनचार पानं खर्ची पडली आहेत. लोकांनी उत्तरं दिली आहेत.
फटाक्यांचा फक्त आवाज नसतो,
फटाक्यांचा फक्त आवाज नसतो, त्यातून धूरही निघतो. घातक केमिकल्स हवेत मिसळतात. आवाज न करणाऱ्या फटाक्यांची हे होतं.
रेस्टॉरंट मध्ये जसे स्मोकिंग झोन असतात तसं दिवाळी पुरतं लोकांना
फटाके दोन आणि नो फटाके झोनमध्ये तात्पुरतं स्थलांतरित करायची सोय हवी.
मुंबैत अनेक लोक या कारणासाठी गावी जातात. पुण्यात काही लोक गणेशोत्सवात अन्यत्र राहायला जातात.
तेव्हा फटाके वाल्यांना एकत्र सोडा. काय तो आवाज आणि धूर तुमच्याच टापूत करा.
<< त्यातून धूरही निघतो. घातक
<< त्यातून धूरही निघतो. घातक केमिकल्स हवेत मिसळतात >>
मान्य आहे, पण तरीही सिगरेट विक्री लीगल आहे ना?
साधं इकॉनॉमिक्स आहे. डिमांड-सप्लाय सांभाळा की आपोआप लोकंच कमी खरेदी करतील. समाजप्रबोधन चांगले आहे, पण खिशाला चिमटा बसला की तो जास्त प्रभावशाली असतो.
सिगरेट वापरावर निर्बंध आहेत.
सिगरेट वापरावर निर्बंध आहेत. सार्वजनिक स्थळी स्मोकि़गला बंदी आहे.
फटाक्यांचा धूर सिगरेटच्या धुरा पेक्षा बराच लांब जातो.
इन्डोअर क्लोज्ड स्टेडियम मध्ये एकत्र येऊन फटाके उडाले. धुराचा आणि आवाजाचा मनसोक्त आनंद लुटा.
सिगरेट दररोज ओढली जाते, पूर्ण
सिगरेट दररोज ओढली जाते, पूर्ण जगातले १२% स्मोकर्स फक्त एका देशात म्हणजे भारतात आहेत. फटाके वर्षात खूपच कमी उडवले जातात. पण तरी असे समजू/मान्य करू की फटाक्यांचा त्रास हा धूम्रपान + कर्कश्य हॉर्नपेक्षा जास्त आहे.
त्याच्यावर उपाय वर ५ प्रकारे सांगितला आहे. धुम्रपानाचे कडक नियम आहेत, तसे फटाक्यांसाठी पण करा. पण सिगरेट लीगल आहे, त्याचे दुष्परिणाम माहीत असूनही ती राजरोसपणे विकत मिळते, मग फटाके का नकोत?
त्या कमी वेळात उडवल्या
त्या कमी वेळात उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांचा प्रमाण खूप जास्त असतं. इतरांना ते काही दिवस दिवसांतले काही तास गॅस आणि नॉइस चेंबर मध्ये कोंडल्यासारखं होतं
समजा ते फटाके समप्रमाणात वर्षभर उडवले गेले तर त्रास खूपच कमी होईल.
मी म्हटलं तसं फटाके उडवण्याची दूर वेगळी सोय करा.
रॉकेट ने भलत्या कोणाचं घर जाळायचं आणि पळून जायचं हे प्रकार पाहिलेत
उपाशी बोका- पर्यावरणप्रेमी
उपाशी बोका- पर्यावरणप्रेमी वगैरे असे कोणी नसते... पर्यावरणप्रेमी आहोत असे गैरसमज बाळगणारे भरपूर असतात...
<< इतरांना ते काही दिवस
<< इतरांना ते काही दिवस दिवसांतले काही तास गॅस आणि नॉइस चेंबर मध्ये कोंडल्यासारखं होतं >>
एक बरं झालं की तुम्हीच मान्य केलं की फटाक्यांचा त्रास हा रोजच्या कर्णकर्कश्य हॉर्नच्या तुलनेत कमी असतो. दिवाळीच्या दिवसात आवाजाची पातळी किती डेसिबलने वाढते आणि गेल्या काही वर्षांत याचा ट्रेंड (मराठी?) काय आहे याचा कुणी अभ्यास केला आहे का? की आपलं दरवर्षीप्रमाणे ठोकून द्यायचं की यंदा दिवाळीत(च) ध्वनिप्रदूषण फार वाढले आहे पूर्वीपेक्षा.
<< पर्यावरणप्रेमी वगैरे असे
<< पर्यावरणप्रेमी वगैरे असे कोणी नसते...>>
असतात, असतात. इथेच मायबोलीवर आहेत की ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने गळा काढणारे. पण मग शंका व्यक्त केली की आवडत नाही. आपल्या गरजा, आवडीनिवडी, मजा पूर्ण झाल्यावर पर्यावरणाची आठवण येणारे ते पर्यावरणप्रेमी.
माझ्या मते खरा पर्यावरणप्रेमी म्हणजे, जी व्यक्ती निसर्गातले रिसोर्सेस जपून वापरते ती, ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने आणि आता जगबुडी होणार असे म्हणत भोकाड पसरणारी न्हवे.
-{एक बरं झालं की तुम्हीच
-{एक बरं झालं की तुम्हीच मान्य केलं की फटाक्यांचा त्रास हा रोजच्या कर्णकर्कश्य हॉर्नच्या तुलनेत कमी असतो}
सोयीचे शब्द निवडून चुकीचा अर्थ? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
आवाज आणि वायू प्रदूषण दोन्हींची पातळी वाढते.
रेकॉर्डेड आहे. न्यायालयाने त्याआधारेच निर्णय घेतलाय.
तुम्ही कधीचं काहीही न वाचता लिहिताय.
मला माझा आणखी वेळ वाया घालवायचा नाहीये.
फटाक्यांचं प्रमाण कमी होतंय, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.
आत्ताची तीनचार वर्षं दिवाळीत खिडक्या बंद ठेवायला लागलेल्या नाहीत.
काही वर्षांपूर्वी मुलं जिन्यात मोठे फटाके फोडत. तेही बंद झाल़.
मी स्वतः आधी लिहिलं आहे की
मी स्वतः आधी लिहिलं आहे की टीव्हीवर बघितले की प्रदूषण कमी झाले आहे. (झी किंवा एबीपी माझावर). आधी माहीत असते तर फोटो काढून दाखवला असता तुम्हाला.
प्रदूषण होते आणि शक्य तितके कमी करायला हवे याबद्दल दुमत नाही. पण ते कडक नियम आणि समाजप्रबोधनातून होणार, इतकेच माझे म्हणणे आहे. फटाक्यांवर बंदी घालून नाही.
माझे तुमच्याशी किंवा कुणाशीही वैर नाही. मी फक्त माझे मत सांगितले, कदाचित जरा तीव्र शब्द वापरले, त्यामुळे राग नसावा. आणि हो, माझी फटाक्यांची फॅक्टरी नाही अथवा त्याच्याशी संबंधित धंदा पण नाही.
मग मी काय वेगळं लिहिल़य?
मग मी काय वेगळं लिहिल़य?
प्रदूषण यंदा कमी होतं हे सांगणाऱ्या मुलाखतीची लिंकही आधी दिली आहे.
पण तुम्हांला न वाचताच प्रतिसादरूपी प्रदूषण करायचं आहे.
मी माझ्या लहानपणापासून च
मी माझ्या लहानपणापासून च फटाक्यांच्या विरोधात आहे. एक वर्ष मी दिवाळीला लंडन ला असणार होते. फटाक्यांपासून आपली ह्या वर्षी तरी सुटका म्हणून खूप छान वाटत होतं. लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी चांगलेच आवाज यायला लागले आजूबाजूला. आमचा परिसर भारतीय नव्हता तरी ही घर एक मजली असल्याने आवाजाला अडथळा येत नव्हता आणि दूरवरून ही फटाक्यांचे आवाज कानावर आदळत होते. माझ्या भ्रमाचा भोपळा त्यादिवशी चांगलाच फुटला . अर्थात आपल्याकडे रात्री बेरात्री कधीही मनात येईल तेव्हा सुरू करतात तसं झालं नाही. नऊ साडे नऊला बंद झाले. जगाच्या पाठीवर कुठे ही गेलं तरी फटाके समर्थक जोवर आहेत तोवर माझी फटाक्यांपासून सुटका नाही. कधी ही कानावर कानठळ्या बसवणारा आवाज आदळू शकतो ह्या विचाराने आणि तो कल्पना नसताना येत ही असतो म्हणून झोप लागण ही मुश्कील असतं ह्या दिवसात मला. असो.
दिवाळीत चालत कुठे जायचे नाही (विशेषतः संध्याकाळी रस्ता फटाके वाल्याना आंदण दिलेला असतो ) हे पथ्य पाळते. ह्यांच्यावर आपला कंट्रोल शून्य म्हणून त्यातल्या त्यात मन शांत ठेवायचा माझा प्रयत्न चालू असतो.
<< जगाच्या पाठीवर कुठे ही
<< जगाच्या पाठीवर कुठे ही गेलं तरी फटाके समर्थक जोवर आहेत तोवर माझी फटाक्यांपासून सुटका नाही. >>
ज्यांना फटाक्यांचा आनंद मिळाला नाही, त्यांना असेच वाटणार. निव्वळ एक उदाहरण म्हणून हे बघा. प्रत्यक्षात ते अजून छान दिसतात.
<< कधी ही कानावर कानठळ्या बसवणारा आवाज आदळू शकतो >>
खरं आहे तुमचं म्हणणं. म्हणूनच आता मंजूळ आवाजाचे हॉर्न आणणार आहेत अशी नितीन गडकरी यांची बातमी बघितली काही दिवसांपूर्वी.
<< माझी फटाक्यांची फॅक्टरी
<< माझी फटाक्यांची फॅक्टरी नाही अथवा त्याच्याशी संबंधित धंदा पण नाही. >>
------ lungs किंवा ENT Specialist?
ध्यान लावून जगाच्या पाठीवर
ध्यान लावून जगाच्या पाठीवर कोण काय करतं हे पाहण्याची दिव्य शक्ती खरच असते आणि ती इतकी कॉमन आहे याची कल्पना नव्हती.
घाटपांडे, जिज्ञासा आणि त्यांच्या सारखे, त्यांचे म्हणणे पटणारे लोक स्वतः एसीत लोळत असतात, सारखे धूर ओकणाऱ्या गाड्यांतून कर्कश्श हॉर्न वाजवत फिरत असतात, वीज, गॅस, पाणी, हानिकारक रसायने वाट्टेल तसे वापरत असतात म्हणजे स्वतः पर्यावरण चांगले ठेवण्यास काहीच करत नाहीत हे कित्येक लोकांनी असे ध्यान लावून दिव्यदृष्टीतून पाहून घेतलेय.
<< lungs किंवा ENT Specialist
<< lungs किंवा ENT Specialist? Happy >>
गुड वन. उत्तर "नाही".
>>>>असेच फटाक्यांचे असावे.
>>>>असेच फटाक्यांचे असावे. ज्यांना ती भावना उत्पन्न होत नाही, त्यांना तो आनंद कमी, हीन दर्जाचा वाटतो. इतरांच्या आनंदाला कमी न लेखता, ते करत आहेत ते का चुकीचे आहे हे वस्तुनिष्ठपणे सांगावे असे मला वाटते.
+1111111111
माझ्या मते खरा पर्यावरणप्रेमी
माझ्या मते खरा पर्यावरणप्रेमी म्हणजे, जी व्यक्ती निसर्गातले रिसोर्सेस जपून वापरते ती >> यात पुढे "आणि ते ती कुणालाही सांगत नाही, त्यावर सोशल मीडियावर लेख वगैरे लिहीत नाही, आपले आपण रिसोर्सेस जपून वापरत जगत असते." असे काही आहे किंवा कसे?
ज्यांना त्यात आनंद वाटत नाही,
ज्यांना त्यात आनंद वाटत नाही, त्यांना ते चूक आहेत हे सांगणं ही थांबवा.
कम्बख्त....
अर्थातच. ज्यांना फटाके
अर्थातच. ज्यांना फटाके उडवायचे नाहीत त्यांनी उडवू नयेत. पण म्हणून अजिबात फटाकेच नकोत, हे म्हणणे चुकीचे आहे. आणि यात दिवाळीचा संबंध नाही, हवे असेल तर १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला सार्वजनिक फटाके महोत्सव साजरा करा. ज्यांना बघायचंय ते बघतील, नाही तर नाही.
साधू संतांनी फटाके कसे
साधू संतांनी फटाके कसे वाजवावेत त्याचं वर्णन केलं आहे, याचा अर्थ लोक्स पूर्वीपासून फटाके वाजवताहेत.
फटाके वाजवताना कपडे घालावे नीटनेटके
निवडावा फटाका आणि पेटवावा फुलबाजा
लावूनी वात पळावे धूम ठोकोनी मागे न बघोनी
आवाजाचा रोषणाईचा घ्यावा आनंद द्यावा आनंद
<< पर्यावरणप्रेमी वगैरे असे
<< पर्यावरणप्रेमी वगैरे असे कोणी नसते... पर्यावरणप्रेमी आहोत असे गैरसमज बाळगणारे भरपूर असतात... >>
------- तुम्ही मुद्दाम असे वणवा पसरवणारे विधान करत आहात का?
अत्यंत बेजबाबदार विधान आहे , पर्यावरणाबद्दल आस्था दाखविणारे जे थोडेफार लोक आहेत त्यांच्यावर अन्याय करणारे आहे.
मायबोलीवर पर्यावरणाशी निगडीत काही धागे आहेत. आणि असे धागे विणायला कष्ट लागतात, अभ्यास लागतो, स्वत: चा फार मोठा वेळ द्यावा लागतो. मी स्वत: ला पर्यावरणप्रेमी समजत नाही... पण आसपासचे कुणी पर्यावरणाबद्दल आस्था दाखवत असतील तर त्या व्यक्तीचे पर्यावरणाबद्दलचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पटल्यास आणि जिथे शक्य असेल तिथे जिवनशैलीत बदल करण्याचा प्रयत्न करतो.
अर्थातच. ज्यांना फटाके
अर्थातच. ज्यांना फटाके उडवायचे नाहीत त्यांनी उडवू नयेत. पण म्हणून अजिबात फटाकेच नकोत, हे म्हणणे चुकीचे आहे. >> असे म्हटले की ते पर्यावरणप्रेमी रहात नाहीत, फक्त तसे स्वतःला तसे समजणारे ढोंगी होतात? ही चर्चा काही वर्षे सुरू आहे आणि लेखकानेही पुढे अजिबात बंद वरून कमी करणे, इतर पर्याय यांचाही उहापोह केलाय.
तुम्ही जे इतर मुद्दे मांडले आहेत, किमती वाढवणे वगैरे ते ही योग्य आहेत. (ते आधीही अनेकदा आले असले तरी यातून तुमची भूमिका कळली). पण माबोवरील पर्यावरणवादी ढोंगी, किंवा एकंदर पर्यावरणवाद्याने कसे गुपचूप आपला पर्यावरणवाद पाळावा सारखी विधाने खटकली.
इन्डोअर क्लोज्ड स्टेडियम
इन्डोअर क्लोज्ड स्टेडियम मध्ये एकत्र येऊन फटाके उडाले. धुराचा आणि आवाजाचा मनसोक्त आनंद लुटा. >>
अगदी अगदी..
रॉकेट ने भलत्या कोणाचं घर जाळायचं आणि पळून जायचं हे प्रकार पाहिलेत >> हे कदाचित आधी कुठेतरी लिहिलय.
आम्ही आधीच्या सोसायटीत असताना ची गोष्ट.
. नव्या घरातली पहिली दिवाळी ... तिथे मध्यात बाग होती - तिथे मुलं फटाके उडवत होती.
आम्ही हॉल मधे बसलेलो.. अचानक वास आला थोडासा म्हणून गेलो तर रॉकेट बेडरूम मधे बेडवर - पडद्याला भोकं पडलेली त्याचा वास होता.
पेटलं कसं नाही ह्याचच आश्चर्य वाटत!
असेच फटाक्यांचे असावे. ज्यांना ती भावना उत्पन्न होत नाही, त्यांना तो आनंद कमी, हीन दर्जाचा वाटतो. इतरांच्या आनंदाला कमी न लेखता, ते करत आहेत ते का चुकीचे आहे हे वस्तुनिष्ठपणे सांगावे असे मला वाटते. >> सांगितले की.. प्रदुषण होते, दमा आणि इतर विकार बळावतात, अपघात होऊन उडवणारे आणि इतरांचा जीवही धोक्यात येतो.
(फाटे फोडणारे अशा प्रतिसादात ही फोडणारच)
भरत आणि इतर सगळेच अनक्न्ट्रोल्ड - आत्ताच्या स्वरुपात आहे तसे करायला विरोध करताहेत. सरसकट नाही कुठे म्हणताहेत?
दारू प्यायची नाही प्यायची तुमचा चॉईस - पण दारू पिऊन गाडी चालवणे हे पब्लिक हेल्थ ला अपाय करते, म्हणून ते नाही - तसेच काहीस.
(मला विचाराल तर पूर्ण बंद करा म्ह णेन, पण मला कुणी विचार णार नाही आणि ऐकणार तर त्याहून नाही माहितीये ;). मध्यम मार्ग असेल तर काहीतरी तोडगा निघायची शक्यता असते, त्यामुळे - तो बरा!)
अजून एक उदाहरण आठवले - ४ जुलै चे फायरवर्क्स बघायला काही वर्षांपूर्वी ऑफिस बिल्डिंग वर गेलेलो. शहरातली खूप उंच बिल्डिंग म्हणून कौतुकाने.
फटाके उडवणं ऑलरेडी बंद केलं असलं तरी हे "विशेष दिवशीचे" वगैरे कौतुक वाटत होतं त्यावेळेस.
मग हे आवाजी फटाके नसुनही सैरावैरा उडणारे, अस्वस्थ झालेले पक्षी त्या रात्री पाहिले आणि ह्या प्रकाराचंही कौतुक संपलं, माझ्याकरता.
तरीही निदान इम्प्लिमेंट व्हावं म्हणून मिडल ग्राऊंड ला पाठिंबा.
Pages