दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
ऋन्मेष, गाडी चालवता येत नाही
ऋन्मेष, गाडी चालवता येत नाही एवढ्या कारणास्तव तुम्ही छुपे पर्यावरणवादी तर नाही ना
बंजी जम्पिंग करणारे,
बंजी जम्पिंग करणारे, विमानातून उड्या मारणारे कुठला आनंद उपभोगतात, हे काही लोकांना कळणार नाही. त्यांना वाटेल की एवढं स्वतःच्या शरीराला आणि मेंदूला त्रास देऊन मरण सिम्युलेट करण्यात कसला आनंद आहे?
असेच फटाक्यांचे असावे. ज्यांना ती भावना उत्पन्न होत नाही, त्यांना तो आनंद कमी, हीन दर्जाचा वाटतो. इतरांच्या आनंदाला कमी न लेखता, ते करत आहेत ते का चुकीचे आहे हे वस्तुनिष्ठपणे सांगावे असे मला वाटते >>>>
मुख्य फरक हा आहे की दुसऱ्या परीच्छेदात त्यात आनंद आहे की नाही, तो हीन की उच्च ईथपर्यंत जाण्याआधी इतरांना ध्वनी आणि वायू प्रदूषणमुळे शारीरिक त्रास होतो हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे.
जर पहिल्या परिच्छेदातील उदाहरणाबाबत कोणी म्हटले की मला ते बघुनच त्रास होतो तर त्याला /तिला ते बघण्याची जबरदस्ती नसते. लाऊडस्पीकर, डीजे, फटाके इत्यादिने मात्र ती आसपासच्या सगळ्यांवर जबरदस्ती होते.
त्रासाचा मुद्दा मान्य आहे.
त्रासाचा मुद्दा मान्य आहे. इतरांना त्रास होऊ नये, हे बरोबर आहे. पण तो आनंदच नाही - हे बरोबर नाही. आनंद घेणारे इतरांना त्रास व्हावा म्हणून तो घेत नाहीत. त्यांना तो त्रास अजून नीट लक्षात आलेला नाहीये. त्यामुळे त्यांच्या आनंदाला कमी लेखण्यापेक्षा किंवा तो आनंदच नाही असे म्हणण्यापेक्षा त्यामुळे इतरांना कसा त्रास होत आहे हे समजवावे. वर काही जणांनी हे केले आहे, त्यांना उद्देशून ही कमेंट नाही. ज्यांना तो फरक कळला नाही, त्यांना उद्देशून आहे.
No AC, no Car.
No AC, no Car.
त्यांना तो त्रास अजून नीट
त्यांना तो त्रास अजून नीट लक्षात आलेला नाहीये >> अच्छा, तुम्ही लहान मुलांबद्दल बोलताय हे माहीत नव्हते. होय त्यांना समजावूनच सांगायला हवे. त्यातील सगळे नाही तर अनेक ऐकतील. हे अनुभवले आहे. आणि असा हळूहळू अवेअरनेस वाढत जाईल.
प्रत्येकामध्ये एक लहान बालक
प्रत्येकामध्ये एक लहान बालक दडलेले असते
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/mumbai/decrease-noise-pollution-collective-effo...
सामूहिक प्रयत्नांमुळे ध्वनी प्रदूषणात घट
ध्वनीप्रदूषणाबाबत शास्त्रीय
ध्वनीप्रदूषणाबाबत शास्त्रीय माहिती देणारी लेखमाला " आवाजबंद सोसायटी " मायबोलीवर पाषाणभेद यांनी चालू केली आहे खालील भाग पहा.
https://www.maayboli.com/node/78548 :: आवाज बंद सोसायटी - भाग १
https://www.maayboli.com/node/78553 :: आवाज बंद सोसायटी - भाग २
https://www.maayboli.com/node/78559 :: आवाज बंद सोसायटी - भाग ३
https://www.maayboli.com/node/78583 :: आवाज बंद सोसायटी - भाग ४
ऋन्मेष, गाडी चालवता येत नाही
ऋन्मेष, गाडी चालवता येत नाही एवढ्या कारणास्तव तुम्ही छुपे पर्यावरणवादी तर नाही ना
>>>>
हे तर असेही म्हणू शकतो की ज्या लोकांना फटाके वाजवायला भिती वाटते ते छुपे पर्यावरणवादी बनत आहेत
असो, गाडी घरच्यांना येते. माझे म्हणाल तर मी ड्रायव्हरही ठेऊ शकतो. वा शिकू शकतो. ईतकाही लहान नाही मी
एसीबाबत म्हणाल तर तो देखील शेवटी बायकोने घर सोडून जायची धमकी दिल्यावर घेतला. आणि आजही रोज गरज नसताना बायकापोरांनी लाऊ नये म्हणून रिमोट लपवत असतो आणि बायकापोरांच्या शिव्या खात असतो
ट्रॅव्हलिंग कमी व्हावे म्हणून मुंबईला सोडून नवी मुंबईलाच शिफ्ट झालो जिथे कर्मभूमी आहे.
लांबचा विमानप्रवास करावा लागू नये म्हणून दुसर्या शहरात वा देशात जॉब ऑपोर्च्युनिटी शोधत फिरत नाही. अर्थात मी एखादा शास्त्रज्ञ असतो जो मानवजातीचे भले करणार आहे तर वेगळी गोष्ट, पण पोटापाण्यासाठीच कमावणारा असल्याने ते कमावताना कमीत कमी पर्यावरणाचा र्हास होईल हे बघतो.
फटाक्यांना विरोधच आहे. शालेय वयापासून मुले होईपर्यंत कधी दिवाळीत वाजवले ना लग्नात ना भारत वर्ल्डकप जिंकल्यावर.. आताही फटाक्यांतून होणार्या प्रदूषणाचे समर्थन नाही पण आजूबाजुचे मोठाले बिनअकलेचे कांदे वाजवत असताना आपल्या लहान मुलांना या आनंदापासून रोखणे अवघड आहे ईतकाच मुद्दा आहे.
फटाकेमुळे होणारे ध्वनी व
फटाकेमुळे होणारे ध्वनी व वायुप्रदूषण हे निर्विवाद असले तरी त्यामुळे होणारा आनंद वा त्रास या मुद्द्यावर चर्चा आता चालू आहे. इथे मला बोंबलाची आठवण येते. बोंबलाच्या वासाने एखाद्या मध्ये चक्क लाळ गळेपर्यंत भूक निर्माण होते तर एखाद्याला मळमळ उलट्या होउन अन्नावरची वासना उडते. घटना एकच पण दोन भिन्न व्यक्तींवर त्याचे १८० अंश आउट ऑफ् फेज परिणाम होतात. त्या व्यक्तिवरचे संस्कार हे एक महत्वाचे कारण असते, जेव्हा एखाद्याचे अन्न हे दुसर्याचे विष बनते त्यावेळी त्यांचे सहजीवन अशक्य बनते. पण दोन्ही गोष्टी नैसर्गिकच आहेत.फटाक्यामुळेच मुलांना आनंद होतो हे तितकेसे खरे नाही. ते एक प्रकारचं कंडिशनिंग आहे. त्यांना पर्यावरणपुरक योग्य पर्याय दिले तर त्यात सुद्धा आनंद वाटेल उदा. फटाके नको विमाने उडवा हा उपक्रम पुण्यात स्वप्नशिल्प सोसायटीत राबवला आहे. बातमी https://policenama.com/pune-news-dont-firecrackers-fly-planes-a-unique-i...
बोंबलाच्या वासाने एखाद्याला
बोंबलाच्या वासाने एखाद्याला मळमळूच कसे शकते? त्याच्या घरचे बोंबलाच्या नावाखाली भलतंच काहीतरी त्याला खायला देत असावेत नाहीतर चांगले फ्राय करत नसावेत. त्याने माझ्या आजीच्या हातचे बोंबील फ्राय खाल्ले तर भाज्या खायच्या सोडून देईल.
कुरकुरीत बोंबील फ्राय आणि
कुरकुरीत बोंबील फ्राय आणि तांदळाची भाकरी. तोड नाही या कॉम्बिनेशनला. :तोंडाला पाणी सुटलेली बाहुली:
फटाक्यामुळेच मुलांना आनंद
फटाक्यामुळेच मुलांना आनंद होतो हे तितकेसे खरे नाही. ते एक प्रकारचं कंडिशनिंग आहे. त्यांना पर्यावरणपुरक योग्य पर्याय दिले तर त्यात सुद्धा आनंद वाटेल
>>>>>>>
मुलांना सर्दी झाली असेल तेव्हा आईसक्रीम न देता आपण त्यांना चॉकलेट देतो. ते खुश होतात. पण याचा अर्थ आईसक्रीम आनंद देत नाही असे नाही. पण ते सर्दीत घातक असल्याने आपण टाळतो.
हेच ईथे फटाक्यांबाबत लागू. त्यातून आनंद मिळत नाही हा मुद्दा मला तितकासा योग्य वाटत नाही. आणि प्रॅक्टीकली तो रेटून धरण्याने या प्रश्नाचे सोल्युशनही मिळणार नाहीये. फटाके वाजवण्यातून भले आनंद मिळत असेल, पण आनंदासोबत ते प्रदूषणाची समस्या घेऊन येतेय. ती समस्या टाळायला आपल्याला आता नवीन पर्याय शोधायचे आहे. दॅटस ईट ..
बोंबला! माझ्या हातच्या भाज्या
बोंबला! माझ्या हातच्या भाज्या खाल्ल्या तरी एखादा बोंबील खायचे सोडून देईल. कारण एकंदरीतच अन्नावरची वासना उडून जाईल.
बोंबलाच्या वासाने एखाद्याला
बोंबलाच्या वासाने एखाद्याला मळमळूच कसे शकते? >>>> मच्छी साफ केल्यावर जो कचरा असतो त्याचा वास असतो मळमळण्यासारखा. पण फ्राय केल्यावर आहाहा. त्यापलीकडे वास नाही जगात. मी बाहेरून जेवून आलो आणि घरी आल्यावर त्या वासानेच कळले की फिशफ्राय आहे तर पुन्हा ताटावर बसतो आणि आलमोस्ट पुर्ण जेवतो
>> "मोठा आवाज करून इतरांचे
>> "मोठा आवाज करून इतरांचे लक्ष वेधून घेणे आणि त्यातून आनंद मिळवणे"
>>>>>>
>> हे एकच लॉजिक फटाक्यांमागे असावे हे काही पटले नाही. तेच एक लॉजिक डीजेलाही लावलेय हे देखील पटले नाही.
काही वर्षांपूर्वी वृत्तपत्रात एक रोचक बातमी आली होती. ती इथे कदाचित इतरांनीहि वाचली असेल. बातमी अशी कि एका मंडळाच्या (शहर/गावाचे नाव आता आठवत नाही) गणपतीच्या मिरवणुकीत पारंपारिक डीजे न लावता सर्व कार्यकर्त्यांनी आपआपापल्या कानात इअरफोन लावून त्या तालावर ते बेफाम नाचत होते. मला हि कल्पना भन्नाट आवडली. त्यांना त्यातून आनंद मिळतोय तो मिळत होता शिवाय आसपास सुद्धा कुणालाही आवाजाचा त्रास होत नव्हता. तरीही हि कल्पना नंतर फार कोणी उचलून धरली असे वाटत नाही. एक वेगळा प्रयोग यापलीकडे कुणी फार दखल घेतली नसेल. त्याचे माझ्या मते कारण एकच असेल: तो आवाज आजूबाजूला इतर कोणालाच ऐकायला जात नसेल व त्यामुळे मिरवणूक आणि आपले नृत्य याकडे कोणाचे लक्ष वेधले जात नसेल तर मग नाचून काय उपयोग? असा विचार कदाचित मनात येत असावा.
त्यामुळे डीजेला "लक्ष वेधून घेणे" हा हेतू असण्याचे लॉजिक लागू पडते असे वाटते. अर्थात, फटाक्याच्या आवाजाचा आनंद घेणाऱ्यानी प्रत्यक्ष फटाके न फोडता तो रेकॉर्डेड आवाज इअरफोन लावून ऐकावा अशी अपेक्षा करणे पण जरा अतीच होईल. म्हणून मला वाटते अशा गोष्टींसाठी एखादे मैदान आरक्षित केले तर ते सर्वांच्याच सोयीचे होईल. गणेश चतुर्थीला सर्व मंडळांचे सार्वजनिक गणपती, मंडप, डीजे इत्यादी सगळे तिकडे साजरे करता येईल. त्याच मैदानावर दिवाळीला सर्वांनी फटाक्यांच्या आतषबाजी साठी जायचे.
त्याचे माझ्या मते कारण एकच
त्याचे माझ्या मते कारण एकच असेल: तो आवाज आजूबाजूला इतर कोणालाच ऐकायला जात नसेल व त्यामुळे मिरवणूक आणि आपले नृत्य याकडे कोणाचे लक्ष वेधले जात नसेल तर मग नाचून काय उपयोग? असा विचार कदाचित मनात येत असावा.
>>>>>
पुन्हा तुम्ही हा मुद्दा योग्य दाखवायला कारण एकच असेल असे म्हणून टाकले.
माझ्या डोक्यात ती कल्पना वाचताच बरीच कारणे आली..
१) जेवढे नाचणारे तेवढे ईअरफोन कंपलसरी अरेंज करावे लागतील. बेग बॉरो ऑर स्टील, पण कंपलसरी हवेतच.
२) नाचताना पडले, त्यावर शेजार्याचा पाय पडला. डॅमेज झाले तर तो खर्च वेगळाच.
३) नाच बघणार्यांना नाचाचा आनंद लुटताच येणार नाही. प्लीज, आता नाच बघण्यात कसला आलाय आनंद असे कोणी म्हणू नये
४) ईअरफोन सांभाळत नाचणे अवघड आहे. त्या नादात बेभान नाचावर मर्यादा येऊ शकतात. त्यात माझ्यासारखा नाचणारा असेल तर कानाला शिवूनच घ्यावा लागेल
५) ईअरफोनचा कानांना जास्त त्रास होतो. स्वानुभव आहे. डीजेच्या आवाजाने नाही पण कानात ईअरफोन लावले की थोड्यावेळाने कान ठणकू लागतात माझे. मी वापरत नाही कधीच ते यंत्र.
६) नाचाचा विडिओ काढला की तो कसा वाटेल. नंतर त्या विडिओत नेमक्या जागी गाणे अॅड करणे वैतागवाणे आहे.
डीजेच्या आवाजाने नाही पण
डीजेच्या आवाजाने नाही पण कानात ईअरफोन लावले की थोड्यावेळाने कान ठणकू लागतात माझे. मी वापरत नाही कधीच ते यंत्र >>> बरोबर आहे. इअरफोन तुला सहन होत नाही, तू वापरत नाहीस कारण कान ठणकु लागतात. तसेच डीजेचा आपल्याला त्रास होत नाही पण इतरांचे कान ठणकु शकतात. यासाठी रस्त्यावर, उघड्यावर, डीजेसाठी तो किती मोठ्या अवाजात असावा, वापरण्याची वेळ यावर बंधने असावीत. दुसरा उपाय म्हणजे बंद सभागृहात व्यवस्था करणे. तिथे बाहेर वर नमूद केलेल्या मर्यादे पलीकडे आवाज जाणार नाही एवढ्या मोठ्या आवाजात लावावा म्हणजे आत त्याहून बराच मोठा आवाज करता येईल. आणि तिथे कोणी आत येऊन म्हणु लागले की मला आत याचा त्रास होतोय आवाज कमी करा तर त्याला सांगायचे बाबा रे तुला सहन होत नसेल तर आत येण्याची जबरदस्ती नाहीय.
हेच ईथे फटाक्यांबाबत लागू.
हेच ईथे फटाक्यांबाबत लागू. त्यातून आनंद मिळत नाही हा मुद्दा मला तितकासा योग्य वाटत नाही>>>>फटाक्यामुळेच मुलांना आनंद होतो हे तितकेसे खरे नाही. ते एक प्रकारचं कंडिशनिंग आहे. त्यांना पर्यावरणपुरक योग्य पर्याय दिले तर त्यात सुद्धा आनंद वाटेल. असे मी म्हटलय. आनंद मिळत नाही असे मी म्हटलेलेच नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे. असे मी मूळ म्हटलय. तुम्ही काढलेला अन्वयार्थ मला अभिप्रेत नाही.
>> पुन्हा तुम्ही हा मुद्दा
>> पुन्हा तुम्ही हा मुद्दा योग्य दाखवायला कारण एकच असेल असे म्हणून टाकले. माझ्या डोक्यात ती कल्पना वाचताच बरीच कारणे आली..
हि सर्व कारणे उपाययोजना करता येण्यासारखी आहेत. किंबहुना त्यातील बहुतांश तर आहेतच आहेत. पण आतापुरते समजून चलू कि या सर्व समस्यांवर उपाय मिळाले, तरी तुम्हाला असे वाटते का कि खुल्या डीजे पेक्षा कानाला इअरफोन लावून नाचण्याला प्राधान्य दिले जाईल? मला तरी तसे वाटत नाही. आमच्या इथे सोसायटीचा कॉमन हॉल आहे. अनेक सोसायट्यांमध्ये तो असतो. मंडप तर असतातच असतात. गणपती तिथे बसवले जातात. विसर्जनाच्या दिवशी या हॉल मध्ये मनमुराद व जितका वेळ करयचे तितके डीजे व नृत्य करून मग शांतपणे ती उत्सवमूर्ती विसर्जनासाठी नेता येऊ शकते. तरीही, तसे शक्य असूनही ते करत नाहीत. बाहेर सगळी सोसायटी दणाणून जाईल इतका आवाज असल्याशिवाय नाच करणाऱ्यांना मजा येत नाही. हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे. अनेक ठिकाणी असेच घडताना पहावयास मिळते.
>> बोंबलाच्या वासाने एखाद्या मध्ये चक्क लाळ गळेपर्यंत भूक निर्माण होते तर एखाद्याला मळमळ उलट्या होउन अन्नावरची वासना उडते. घटना एकच पण दोन भिन्न व्यक्तींवर त्याचे १८० अंश आउट ऑफ् फेज परिणाम होतात.
इथे त्रास होणाऱ्या व्यक्तीचा विचार होणे वास्तविक अपेक्षित आहे. शक्य असेल तर त्यांना आधी कल्पना देऊन तिथून जायला सांगणे किंवा नसेल शक्य तर आपणच अन्यत्र जाऊन बोंबील खाणे. पण "तू तो वास एन्जोय करत नाहीस म्हणून तुला त्रास होतो. एन्जोय करायला शिक. आम्ही बोंबील तळणार" असे त्यांना सांगणे हा उपाय नव्हे. पण आपल्याकडे बहुतांश नागरिकांना एखाद्या गोष्टीचा त्रास होत नसेल तर त्रास होणाऱ्या थोड्यांची फार फिकीर केली जात नाही असे चित्र आहे. "आवाजाचा त्रास होतो, पण काय करणार. सण आहे. तक्रार करून कशी चालेल. ते बरे दिसणार नाही" अशी भूमिका बरेचजण घेताना दिसतात.
कुरकुरीत बोंबील फ्राय आणि
कुरकुरीत बोंबील फ्राय आणि तांदळाची भाकरी. तोड नाही या कॉम्बिनेशनला. :तोंडाला पाणी सुटलेली बाहुली >>>>>>>
लहानपणी घरी कोणी नसले की चूल पेटवून बोंबील भाजून खायचो , आता मात्र वयोमानानुसार नुसार ओले फ्राय बोंबील जबरी वाटतात एकदम लुसलुशीत
डीजेच्या आवाजाने नाही पण
डीजेच्या आवाजाने नाही पण कानात ईअरफोन लावले की थोड्यावेळाने कान ठणकू लागतात >>>>>>>>>>>>>>>>
माझे तर dj च्या प्रतिसादाने पण डोके ठणकते
>> ते एक प्रकारचं कंडिशनिंग
>> ते एक प्रकारचं कंडिशनिंग आहे. त्यांना पर्यावरणपुरक योग्य पर्याय दिले तर त्यात सुद्धा आनंद वाटेल.
सहमत!!
तसेच डीजेचा आपल्याला त्रास
तसेच डीजेचा आपल्याला त्रास होत नाही पण इतरांचे कान ठणकु शकतात. यासाठी रस्त्यावर, उघड्यावर, डीजेसाठी तो किती मोठ्या अवाजात असावा, वापरण्याची वेळ यावर बंधने असावीत.
>>>>
यावर मी आधीच एक धागा काढलेला .. सात वर्षांपूर्वीच ! पुन्हा वर काढतो
फटाके वाजवण्याच्या वेळेसंदर्भात काही कायदा आहे का?
https://www.maayboli.com/node/51337
>फटाक्यामुळेच मुलांना आनंद
>फटाक्यामुळेच मुलांना आनंद होतो हे तितकेसे खरे नाही. ते एक प्रकारचं कंडिशनिंग आहे. त्यांना पर्यावरणपुरक योग्य पर्याय दिले तर त्यात सुद्धा आनंद वाटेल. असे मी म्हटलय. आनंद मिळत नाही असे मी म्हटलेलेच नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे. >> अगदी बरोबर.
पुढे जाऊन मी असं म्हणेन, "बलात्कार करणे चूक की बरोबर मुद्दाच नाही. मला त्या क्षणी जो आनंद मिळतो तो महत्त्त्वाचा" हे आर्ग्युमेंट जितके योग्य आहे तितकेच मुलांना आनंद मिळतो म्हणून करू देत हे म्हणणे!
कंडिशनिंग बाबत, बर्थडे आणि गिफ्ट, रिटर्न गिफ्ट संदर्भातलं उदाहरण देते:
तुम्हाला लग्नातले आणि इतर आहेर चालतात तर लहान मुलांनीच काय घोडं मारलय असं आर्ग्युमेट अनेकदा ऐकले.
एकतर बर्थडे आमच्या इथे तरी महिन्यातून दोनदा येतात. जे गिफ्ट्स, रिटर्न गिफ्ट्स असतात ते एकदा, दोनदा वापरले जातात फक्त.
घरात फक्त रिटर्न गिफ्ट्स च्या पेन्सिल्स, खडू, वगैरेचा इतका ढीग आहे (येस, ते डोनेट करता येतात, पण त्याकरता असे येण्याची गरज नाही).. बाकी प्लास्टिकच्या फालतू गोष्टी तर बोलूच नका.
तर आमच्या मुलांच्या (१३ आया) गृप ने मिळून असे ठरव ले. की एकच मोठे गिफ्ट सगळ्यांनी मिळून, मुलाच्या गरजेप्रमाणे द्यायचे.
आणि रिटर्न गिफ्ट रद्दबातल करायचे.
मुलांनी ते अॅक्सेप्ट केले आहे. बाकी भरपूर मुले आहेत इथे, ज्यांच्या बर्थडे ला अजूनही रिटर्न गिफ्ट्स वगैरे असतात - तरीही मुलांनी आपल्या गृपमधे असे असणार हे अॅक्सेप्ट केले आहे.
जर ते लॉकडाऊन मधे मित्रमंडळीं शिवाय घरी राहू शकतात, तर फटाके, रिटर्न गिफ्ट्स वगैरे फार छोट्या गोष्टी आहेत.
लहानपणी भरमसाठ कपडे, चपलांचे ढीग, गाड्यांमधून फिरणे वगैरे वगैरे करत होतात का? तो बदल चालला तसाच हा देखील चालवून घ्या ना.
माझी मुलगी इतकी वर्षे अभिमानाने सांगायची की मी फटाके उडवत नाही कारण प्राण्यांना, पक्ष्यांना, आजारी माणसांना, लहान मुलांना, म्हातार्यांना त्रास होतो आवाजाने. प्रदुषण होते (मला तर इतके वर्ष दिवाळी झाली की इन्हेलर वापरावा लागतो. ते माहित नसतानल, लहानपणी खोकल्याची औषधेच्या औषधे रिचवली आहेत त्या नंतरच्या महिन्यात. जागरणं, त्रास वगैरे) ..
ह्यावर्षी तिने मैत्रिणीकडे एक फटाका उडवून पाहिला. तिला फार गिल्टि वाटले. तिला सांगितले की तुला कुतुहल वाटणे नैसर्गिक आहे, तसे वाटून घेऊ नकोस. फक्त सेफटी ह्या दृष्टीने दुसर्याकडे उडवू नकोस, आम्ही हजर असलो पाहिजे.
तिने विचारले, आई तू आणशील का फटाके. तिला सांगितले की तुलाही अॅलर्जीचा त्रास होतो (खोकला, इन्हेलर वगैरे), बाकीचे मुद्दे (इतरांचा त्रास, प्रदूषण वगैरे) अजूनही वॅलिड आहेत. त्यातूनही तुला वाजवून बघायचे असतील तर आपण अगदी थोडे आणू शकतो, पण तू नीट विचार करून सांग.
त्यानंतर ती म्हणाली नाही, नाहीतर अगदी मिनिमम आणले असते - कुतुहल शमण्याकरता - वन टाईम.
नाही ऐकणे - पचवणे, सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेणे (अपायकारक गोष्टी टाळणे), एम्पथी (इतर प्राणी, पक्षी, म्हातारी, आजारी माणसे, लहान मुले वगैरे ना होणारा त्रास) वाटणे आणि त्यानुसार अॅक्शन घेणे, 'आनंद एखाद्या मटेरियलिस्टिक गोष्टीवरच आनंद अवलंबून नाही - त्या वस्तूशिवाय ही आनंद मिळू शकतो' हे कळणे - हे सगळे इसेन्शियल लाईफ स्किल्स अशा प्रसंगातूनच तर हळूहळू प्रॅक्टिस करता येतात!! काय हरकत आहे एखादे वेळेस एखादी गोष्ट नाही करता आली तर?
दिवाळीचा आनंद आम्ही रांगोळ्या शिकून (माझ्या दारापुढे राडा करतात पोरं रांगोळीने, त्यांना नाही म्हणत नाही कधी. नंतर ती रांगोळी जमा करून पुन्हा खेळायला देतेय दुसर्या दिवशी) , आकाशकंदील करायला शिकून (जमेल तसे, आम्ही ३ आकाशकंदील केले - प्रत्येकाने एक) , पणत्या रंगवून, सकाळी मुलांना तेल लावून अंघोळी - ओवाळणे इ. करून, नातेवाईक - मित्रमैत्रीणींबरोबर फराळ शेअर करून , त्यांना भेटून मिळवला.
वेळ असेल तर फराळाचे पदार्थ तयार करणे, किल्ला तयार करणे वगैरेही करता येतेच.
मुलीचा शेजारचा फटाके उडवणारा एक मित्र आहे, तो खोक खोक खोकतो आहे बाय द वे. त्याच्याशी आणि त्याच्या आईशीही बोलणार आहे .
बलात्कार करणे चूक की बरोबर
बलात्कार करणे चूक की बरोबर मुद्दाच नाही. मला त्या क्षणी जो आनंद मिळतो तो महत्त्त्वाचा" हे आर्ग्युमेंट जितके योग्य आहे तितकेच मुलांना आनंद मिळतो म्हणून करू देत हे म्हणणे! >> हे जरा अति होतंय हो! बलात्कार करणे कायद्याने गुन्हा आहे. फटाके उडवणे गुन्हा नाही. उलट माझं म्हणणं आहे की तो गुन्हा मानला जावा यासाठी सरकारवर दबाव आणावा.
तुमचं लॉजिक तुमच्याच पुढच्या उदाहरणालाही लागू होत नाही. कुतूहल शमविण्यापुरतं थोडासा बलात्कार करू द्यावा, मग त्यातला फोलपणा लक्षात येईल - असं काहीतरी विचित्र होईल ते.
मी स्वतः फटाके उडवून प्रदूषण व अन्य लोकांना त्रास देण्याच्या विरोधातच आहे. फक्त तो विरोध करताना काय मुद्दे मांडले जावेत, ह्यावर माझं काही एक मत आहे. लोकांवर बळजबरी करून शाश्वत उपाय मिळणार नाही, त्यासाठी शासकीय पातळीवर फटाके व इतर सर्वच डीजे वगैरे त्रासदायक गोष्टींवर बंदी घातली गेली पाहिजे.
अतुल ह्यांनी सांगितलेला उपाय खरंच छान आहे. एका पटांगणावर फक्त फटाके उडवू द्यावेत, इतरत्र नाही. मी म्हणेन की तेही सरकारतर्फे, प्रशिक्षित लोकांनी, फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित असताना उडवावेत. बाकीच्यांना उडवण्यास परवानगी असू नये.
हरचंद बलात्कार मुद्द्याबाबत +
हरचंद बलात्कार मुद्द्याबाबत + १.
कायद्याने गुन्हा वगैरे राहु द्या बाजूला, एका व्यक्तीला धरून सरळ सरळ क्रूर अत्याचार आहे तो. फटाके फोडणे हे ठराविक ठिकाणी, ठराविक दक्षता घेऊन , ठराविक प्रमाणात चुकीचे नाही. त्यात इको फ्रेंडली वगैरे प्रकार आणता येतात.
तुलना एकदम गंडली आहे.
हरचंद पाल व आणि मानव - मला
हरचंद पाल व आणि मानव - मला वाटतय उदाहरणाला तुम्ही तुलना म्हणून वापरताय.
मनसोक्त, दरवर्षी, वाढलेल्या लोकसंख्येत , वाढलेल्या प्रदुषणात - आजूबाजूला काय आ हे, वेळ काय आहे ह्याची पर्वा न करता - हे सगळे शब्द वापरून पहा विरुद्ध - फटाके असे अस तात - हे बघण्याकरता - वन टाईम - २-३ फुलबाज्या, एखादा सिंगल फटाका (माळ नव्हे ), २-३ भुईनळे उडवणे ह्यात फरक नाहिये का? (गेले २५ एक वर्ष एकही फटाका उडवला नाहिये. आधीही कुणी सेंसिटाईज केले असते तर नक्की उडवले नसते.)
आमच्या इथल्या एक आजी
आमच्या इथल्या एक आजी गल्लीतल्या मुख्य रस्त्या समोर रहातात. त्यांना कोरोना झालेला, मग म्युकर मायकोसिस - ऑपरेशन असे सगळे होऊन मरता मरता वाचल्या. अजूनही १००% नॉर्मल ला आल्या नाहीयेत.
कुणाशीही वाईट संबंध नाहीत.
असे असतानाही तिथे मुख्य र स्ता आहे म्हणून २-३ फॅमिलीजनी मनसोक्त फटाके उडवले त्यांच्या घरासमोर.
ह्या सेंसिटिविटीला(!) काय म्हणावे कळत नाही.
>>डीजेच्या आवाजाने नाही पण
>>डीजेच्या आवाजाने नाही पण कानात ईअरफोन लावले की थोड्यावेळाने कान ठणकू लागतात >>>>>>>>>>>>>>>>
माझे तर dj च्या प्रतिसादाने पण डोके ठणकते Happy >> अरे हा जोक भारी होता. मिस नको व्हायला तुमच्या बलात्कारात, म्हणून वेगळं हसुन घेतो.
बाकी हपांच्या बहुतेक पोस्टी पटल्या.
Pages