Submitted by पाषाणभेद on 20 September, 2021 - 19:23
खरे चेहरे झाकण्या चढवूनी खोटे मुखवटे
खरेच आहे भासवतात मग ते चेहरे खोटे ||१||
मनात कटूता असूनी वाहवा करती
हसूनी खोटे वार करती पाठीवरती ||२||
तोंडदेखला आदर देवूनी स्वागत होई
पाठ वळता निंदा करण्याची करती घाई ||३||
स्वार्थ साधण्या स्तूती करती तोंडभरूनी
कार्यभाग संपला, टिकेची झोड वदनी ||४||
खोटे चेहरे वागवीत खोटे जीवन का जगावे?
मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे ||५||
- पाषाणभेद
२१/०९/२०२१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मार्मिक. खूप आवडली.
मार्मिक.
खूप आवडली.
छान आहे.
छान आहे.
मस्तच
मस्तच