भाग १ वाचायचा असल्यास. नाहीतर जसा 'धूम' कुठलाही भाग पाहिला तरी चालतो तशी ही कथा आहे. आधीच्या भागात दोन बहिणी असतात, एक कथा ऐकल्याने श्रीमंत रहाते, तर दुसरी न ऐकल्याने गरीब होते एवढे एकोळीचे कथानक घडले आहे.
कहाणी आदित्यराणूबाईची (भाग-२)
पांचव्या आदितवारीं आपण उठली, तळ्याच्या पाळीं उभी राहिली. दासींनीं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरीं नेलं. न्हाऊं घात्लं. माखूं घातलं, पाटच बसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणीकरूं लागली. ” काय वसा करतेस तो मला सांग.” बहीण म्हणाली, “अग अग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहींस, म्हणून तुला दरिद्र आलं.”
(बहीणीला इतका थेट फिडबॅक! वसा सांग म्हणलं तर वसा सांगावा उगा पापिणीची पिपाणी वाजवू नये.)
राजाच्या राणीनं विचारलं, बहिणीच्या घरीं राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावूं धाडलं. “मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, पाईक आले, परवर आले.”
(परवर भाजी असते, ती कशाला पाठवली राजाने??!!)
“मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठलीं? पाईक कोठले? परवर कोठे?” बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली. एकमेकींना बहिणीबहिणींनीं अहेर केले. वाटेनं जाऊं लागलीं.
(आहेर काय केले ते पण सांगा म्हणजे #घनघोर नांदणे द्यायचा की नाय ते ठरवायला… )
पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तों कहाणीची आठवण झाली. ” करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे.” असं म्हणून तो राणीकडे आला. तशीं सहा मोत्यें राणीनं घेऊन तीन त्याला दिलीं. तीन आपल्या हातांत ठेवलीं. मनोभावें कहाणी सांगितली, चित्त भावें त्यानं ऐकली. त्याची लांकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, “बाई बाई! कहाणी ऐकल्याचं एवढं फळं, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा.” ” तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील,” उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं.” तेव्हां वसा सांगितला.
(सहा मोत्यांची काय पद्धत आहे!! गरीबाला तर हा ‘कॅच-२२’ आहे. #कॅच २२. मोती नाही म्हणून वसा नाही, वसा नाही म्हणून मोती नाही. आणि सोन्याची मोळी कुठून आणली म्हणून पोलिस डांबत कसे नाहीत ह्या मोळीविक्याला??! )
पुढं दुसर्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. ” करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याच शोध करा.” “उपाशी नाहीं, कांहीं नाहीं” माळ्याचा मळा पिकत नाहीं, विहिरीला पाणी लागत नाहीं, असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली. ‘आमच्या बाईची कहाणी ऐक.” तो आला. राणीनं सहा मोत्यें घेऊन तीन आपण घेतलीं, तीन माळ्याला दिलीं. राणीनं कहाणी मनोभावें सांगितली. चित्तभावें माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकूं लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, ” बाई बाई! कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा.” मग राणीनं त्याला वसा सांगितला.
(आता मळ्यात एवढं पिकलं, रोपांना फळ आली तरी वसा घेतल्याच काय फळ?! एवढं त्या कहाणीच माहात्म्य सांगतात पण ती कहाणी कोणती. ही आदित्यराणूबाईची कहाणी ती कहाणी नाही कारण ही कहाणी त्या कहाणीमुळे घडते आहे… बाकी तीन मोती कहाणी नंतर परत करावे लागतात का? #कॅच २२)
पुढं तिसर्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं. मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. ” करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाहीं, कांहिं नाहीं.” एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनांत गेला होता, एक डोहांत बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, “आमच्या बाईची कहाणी ऐकू.” ती म्हणाली, ” कहाणी ऐकून मी काय करूं? मी मुलांसाठी रडतें आहें. बरं येतें” मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावें ऐकली. तिचा मुलगा वनांत गेला होता तो आला. डोहांत बुडाला होता तो आला. सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली,” बाई बाई! कहाणी ऐकल्याचं हें फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा.” मग राणीनं तिलाही वसा सांगितला.
(ये कहाणी नाही बालाजी टेलिफिल्म्स हो गई… फॉरेन्सिक सायन्स मधली मंडळी ‘एक पे रेहना...बुडाला या खाल्ला.. कभी बुडला कभी खाल्ला’ अशाने ‘कॉज ऑफ डेथ’ काय लिहायचं सर्टीफिकेटवर… त्या गोंधळापायीच यमराजाने परत पाठवला असावा. बाकी इथे टायटल ९ एज-सेक्स डिस्क्रिमिनेशनची केस होऊ शकते. म्हातारीला तीन मोती नाही दिले… )
पुढं चौथ्या मजलेस गेलीं. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. “करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाहीं, कांहीं नाहीं.” काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीं, पाय नाहीं, असा एक मनुष्य रस्त्यामध्यें होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताणा केला. सहा मोत्यें होतीं. तीन मोत्यें त्याच्या बेंबीवर ठेवलीं, तीन मोत्यें आपण घेतलीं, राणीनं मनोभावे कहाणी सांगितली; ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, “कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला.
(तीन मोती परत आले, बिचाऱ्याला आधीच हात-पाय नाही त्याच्यावर पाणी कशाला ओतायचं?!! कहाणी आहे की जीन-एडीटींग थेरपी. असो… मोती कपाळावर किंवा इतर दर्शनीय अवयवावर ठेवावे… उगा नायतर हात-पाय फुटल्यावर ‘मी टू’ केस करायचा)
पांचव्या मुक्कामाला घरीं आलीं. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. साती दरवाजे उघडले. लोहघंगाळं पाणी तापवलं. पड्रस पक्कान्नं जेवायला केलीं. सूर्यनारायण भोजनाला बसले, त्यांना पहिल्या घांसाला केंस लागला. ते म्हणाले, “अग अग, कोणा पापिणीचा केंस आहे?” राजाच्या राणीला बारा वर्षं दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारीं वळचणीखालीं बसून केस विंचरलें. “काळं चवाळं, डोईचा केंस; वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे.” राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊं नये.
( अरे काय गोष्ट आहे की मस्करी.. पुन्हा दारिद्र्य … इतक्या लोकांच्या दु:खी कथा ऐकून बिचारीला टेंशनने गळाला एखादा केस तर काय एवढं कोपयाचं. व्हिटॅमिन डी कमी पडल असेल तिला तर…. देवा, सूर्यनारायणा 'सूरज तो ला दो जरा' ही ऍड बघा तुम्हीच!! )
ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
(उन्हात बसा, केस गळत असतील तर काळजी घ्या. श्रीमंताला अधिक श्रीमंत होणे सोपे असावे म्हणून तीन मोत्या इतके पैसे तरी जवळ सेव्हींग मध्ये बाळगा. #मॉडर्न चातुर्मास.)
अर्रर्र
अर्रर्र
एकदाच हसले होते, तिनदा कसं आलं.
अमच्याकडे त्याला पाचदा
आमच्याकडे त्याला पाचदा म्हणतात.
हो ना मला वाटलं तिनदा आलं परत
हो ना मला वाटलं तिनदा आलं परत मागच्या पानावर बघून आले..पाचदा आहे खरं.. आज हसून हसून पुरेपूर झालं ह्या धाग्यावर..
गुडघेदुखीच्या रुग्णांना आपले
गुडघेदुखीच्या रुग्णांना आपले म्हणा.(आधीच आपले असतील तर आपले म्हणणे कन्टीन्यू ठेवा.)
मी_अनू:
मुलांनो आणि मुलींनो, तुमची
मुलांनो आणि मुलींनो, तुमची मस्ती मग आणि वाड्यावर करा बरं.हा चातुर्मासाचे धागा हाई.देवादीकाचे सांगून राहिली आपली सीताई.आशी मस्ती मंग कशापायी करून रहायला?
देवा, सूर्यनारायणा 'सूरज तो
देवा, सूर्यनारायणा 'सूरज तो ला दो जरा' ही ऍड बघा तुम्हीच!! >>> मस्त आहे ही अॅड
त्यांना पहिल्या घांसाला केंस लागला. ते म्हणाले, “अग अग, कोणा पापिणीचा केंस आहे? >>> यावर तर वेगळा धागाच काढूया. एकतर पुरुषांना आकर्षित करायला लांबसडक केस ठेवा. वर त्यांना खुश ठेवायला साग्रसंगीत स्वयंपाक करा. आणि मग स्वयंपाकात तोच केस सापडला तर कौतुकाची पापी राहीली बाजूला पापिणीचा शिक्का घ्या.
अईगो आईगो हसून हसून पोटाची
अईगो आईगो हसून हसून पोटाची पार वाट लागली. ( गालात न मावणारं हसू) डोक्याला चोळी आणि पायाला काय? खोळी ? झोळी मोळी पण बसवा कि जरा . मधेच प्रामाणिक लाकूडतोड्या ची गोष्ट घुसली? पायाला कांद्याचं पोल्टीस लावलं
धमाल टिपण्या आहेत :). पण भाग
धमाल टिपण्या आहेत :). पण भाग एक आणि दोन मिळुन कुठेच राणुबाईचा उल्लेख नाही. मुळ कथेत असेच आहे का? आणि असेल तर मग शीर्षकात राणुबाई का आहेत? आणि मुळात राणुबाई म्हणजे कोण?
पर्णिका, नाही माहिती. पण
पर्णिका, नाही माहिती. पण रेणुका शहाणे असावी. आदित्य राणा म्हणजे आशुतोष राणा असावा. आशुतोष म्हणजे झटपट प्रसन्न होणारा. सूर्य तसाच असतो - झटपट पावतो. म्हणला कुंतीने एक मंत्र पावला... तर त्या आदित्य राणाची राणूबाई म्हणजे रेणूका शहाणे असावी.
आशुतोष म्हणजे झटपट प्रसन्न
आशुतोष म्हणजे झटपट प्रसन्न होणारा..... घे तुला हा मोत्यांचा कंठा! मला केव्हाचा याचा अर्थ हवा होता.पण नक्की तोचार्थ आहे की पिसे काढून काढलेला अर्थ?
रच्याकने,तुझ्याही नावाचा अर्थ मागे एका धाग्यात वाचायला होता.आता लक्षात नाही.परत सांग हां.
तोच अर्थ आहे देवकी.
तोच अर्थ आहे देवकी.
आशु म्हणजे कमी किंवा अल्प.
तोष म्हणजे संतोष, समाधान.
अल्पसंतुष्ट असल्याने लवकर प्रसन्न होतो, म्हणून महादेवाला म्हणतात आशुतोष.
सीमंतिनी हे पार्वतीचे एक नाव आहे. शिवलिलामृतात तसा उल्लेख आहे.
बाकी प्रतिसाद
अरे तब कहां कहां "आशुतोष" बने
अरे तब कहां कहां "आशुतोष" बने फिर रहे थे तुम महादेव, जब सीमंतिनी तपश्चर्या कर रही थी??!! पार्वतीला म्हणे ६४ वर्ष तप करावे लागले शंकराला प्रसन्न करण्यासाठी.... नो वंडर एक मूल मळापासून नि दुसरे सरोगसीने करावे लागले.... ये तो टाईम टाईम की बात जानी....
देवकी, सीमंतिनी पार्वतीला शंकराने केलेले संबोधन आहे. पार्वतीचे नाव आहे.
हे उगाच मला वाटते म्हणून.....
हे उगाच मला वाटते म्हणून......
पार्वतीला जगदंबा व्हायचं होतं म्हणूत तिची परीक्षा कठीण होती. फक्त चौंसष्ट वर्षे नाही तर आधी कित्येक जन्म घेऊन आदिदेवाचाच ध्यास मनी ठेवावा लागला, सती दाक्षायणी होती व दक्षाने महादेवाचा अपमान केला , ते सहन न झाल्याने ते दक्षाने दिलेले शरीर नको म्हणून तिने अग्नित उडी मारली.
पार्वतीने घोर तप केले, म्हणून आधी फक्त कंदमुळं पानं खाऊन 'पर्णा' व नंतर तेही सोडून देऊन 'अपर्णा' झाली ती, हा प्रवास तिने महादेवाची पत्नी होण्यासाठी नाही तर आदिदेवाची 'आदिशक्ती' होण्यासाठी केला. तिचा स्वतःचा स्वतंत्र व मनुष्यत्वाकडून दैवी होण्याचा प्रवास होता तो. सबब महादेव सामान्य भक्तांसाठी भक्तवत्सल 'आशुतोष' आहेत. पार्वतीसाठी नाही. तिची नावं सुद्धा तिच्या प्रवासातल्या टप्प्यानुसार तिने केलेले समर्पण, त्याग व निष्ठेने मिळवलेली आहेत. (सी तू नाही, जनरली म्हणतेय सगळंच ) आपण मात्र सोळा सोमवार=चांगला नवरा ई ई करून पार्वतीलाही लिमिट करतो. खरंतर खूप सुंदर, अमर्याद व खोल आहे हे !!!
कालच्या खोड्यांची भरपाई म्हणून आज सात्त्विक प्रतिसाद
धन्यवाद दोघींना!
धन्यवाद दोघींना!
सी, आशुतोष राणा, रेणुका शहाणे
सी, आशुतोष राणा, रेणुका शहाणे ( तसा रेणुकेचे अर्थ पण पार्वतीच का?)
मला सीमंतिनी नाव खुपच आवडतं. एकतर तुझं आहे म्हणून दुसरं ही तुझं आहे म्हणूनच तू आणि अस्मिता ने छान माहिती दिलीत.
खोडकर अस्मिता सात्त्विक अस्मिता छान च लिहीलयस पार्वतीचा प्रवास.
तिची नावं सुद्धा तिच्या
तिची नावं सुद्धा तिच्या प्रवासातल्या टप्प्यानुसार तिने केलेले समर्पण, त्याग व निष्ठेने मिळवलेली आहेत. .....अस्मिता,वेळ मिळेल त्यावेळी यावर विस्तृत पाने लिही ग.
अस्मिता आर यु शुअर सीमंतिनी
अस्मिता आर यु शुअर सीमंतिनी पार्व तीचे नाव आहे?
सीमंतिनी महात्म्य वर्णन करणारे २ अध्याय आहेत परंतु सीमंतिनी म्हणजे पार्वती नव्हे - असे धूसर आठवते.
अय्यो.... कहानीमे ट्वीस्ट....
अय्यो.... कहानीमे ट्वीस्ट.... सीमंतिनी नॉट पार्वती नेम??? माय होल लाईफ हॅज बीन अ लाय!!!!!!!.....
धनुडी थँक्यू.
धनुडी थँक्यू.
देवकी , हो अगदी आनंदाने
सामो , शुअर्टी होती पण हे वाचून गडगडली !
पण सी चं तर आयुष्य पणाला लागलयं म्हणा ,
हसा अजून चातुर्मास कथांना
हे काही तरी सापडले.
..... शिवलिलामृत अध्याय सहावा
तिचें नाम सीमंतिनी ॥ सीमा स्वरुपाची झाली तेथूनी ॥ लावण्यगंगा चातुर्यखाणी ॥ शारदेऐसी जाणिजे ॥२०॥
राव संतोषें कोंदला बहुत ॥ तों अमृतांत विषबिंदु पडत ॥ तैसा एक पंडित ॥ भविष्यार्थ बोलिला ॥२१॥
चवदावे वर्षी सीमंतिनीसी ॥ वैधव्य येईल निश्चयेसी ॥ ऐसें ऐकतां राव मानसीं ॥ उद्विग्न बहुत जाहला ॥२२॥
वाटे वज्र पडिलें अंगावरी ॥ कीं सौदामिनी कोसळली शिरीं ॥ किंवा काळिजी घातली सुरी ॥ तैसें झालें रायासी ॥२३॥
पुढती बोले तो ब्राह्मण ॥ राया शिवदयेंकरून ॥ होईल सौभाग्यवर्धन ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥२४॥
विप्र सदना गेले सवेग ॥ रायासी लागला चिंतारोग ॥ तंव ती शुभांगी उद्वेग ॥ रहित उपवर जाहली ॥२५॥
सकळकळाप्रवीण ॥ चातुर्यखाणीचें दिव्य रत्न ॥ तिचें ऐकतां सुस्वर गायन ॥ धरिती मौन कोकिळा ॥२६॥
अंगीचा सुवास पाहून ॥ कस्तूरीमृग घेती रान ॥ पितयास आवडे प्राणांहून ॥ पाहतां नयन न धाती ॥२७॥
खात्री नाहीच पण अवांतर तरी पुरे करते. शिवाय हे आख्यान , हे मोठं आयरॉनिक झालं.
https://m.facebook.com/1617117931685531/photos/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%...
----
कुणी तरी कन्फर्म करा , हीरा ?
सीमंतिनी पार्वतीला शंकराने
सीमंतिनी पार्वतीला शंकराने केलेले संबोधन आहे. पार्वतीचे नाव आहे......
पण त्याचा अर्थ काहीतरी असेल ना.जसे उमा म्हणजे अग नको.तो अर्थ पाठी पडून पार्वतीचे नाव एवढेच राहिले.
अगं महात्म्य नाही आख्यान आहे.
अगं महात्म्य नाही आख्यान आहे. सहावा अध्याय वाच सीमंतिनी आख्यान वाचल्याने सौभाग्यवर्धन होते. पण सीमंतिनी म्हणजे पार्वती नव्हे.
चातुर्मासाच्याांचातुर्मासाच्य
चातुर्मासाच्याांचातुर्मासाच्यांचातुर्मासाच्य्रांचातुर्मासाच्रांचातुर्मासाचच्रांचातुर्मासांच्रांचातुर्मासंच्रांचातुर्मासांच्रांचातुर्मायांच्रांचातुर्मयांच्रांचातुर्मम्यांच्रांचातुर्म्यांच्रांचातुत्म्यांच्रांचातात्म्यांच्रांचाहात्म्यांच्रांचहात्म्यांच्रांचहात्म्यांच्रांच
--------------
मिष्किल शैलीत मांडलेल्या, चातुर्मासाच्या कथा आवडल्या.
--------------
बाय द वे तो वरील बग देखील कोणीतरी फिक्स करा रे/गं.
तिचें नाम सीमंतिनी ॥ सीमा
तिचें नाम सीमंतिनी ॥ सीमा स्वरुपाची झाली तेथूनी>> म्हणजे सौंदर्याची सीमा असे का? छान आहे माहिती. अस्मिता पार्वती बद्दल वेगळा लेख लिहा धागा काढून.
सीमंत म्हणजे केसांचा भांग,
सीमंत म्हणजे केसांचा भांग, किंवा हिंदीत जिला मांग म्हणतात ते. ते असलेली म्हणजे सीमंतिनी. हा शब्द 'स्त्री'ला समानार्थी (महाभारत, हितोपदेश वगैरे ठिकाणी) वापरला गेला आहे (पहा: wisdomlib dot org).
सीमंत पूजन ( लग्नच्या आधल्या
सीमंत पूजन ( लग्नच्या आधल्या रात्री, सुधारस / साखरभात फेम) याचा संबंध आहे का ?
सीमंत म्हणजे केसांचा भांग,
सीमंत म्हणजे केसांचा भांग, किंवा हिंदीत जिला मांग म्हणतात ते. ते असलेली म्हणजे सीमंतिनी. हा शब्द 'स्त्री'ला समानार्थी (महाभारत, हितोपदेश वगैरे ठिकाणी) वापरला गेला आहे (पहा: wisdomlib dot org).>> किती सुरेख.
मला सुधारस साखरभाताचे जेवण हवे. गोवर्धन मंगल कार्यालयातले. कोई शादी कर रहा है क्या?!
सीमंतिनी म्हणजे पार्वती असच
सीमंतिनी म्हणजे पार्वती असच समजत होते मी . अस्मिता फार छान माहिती दिली आहेस. अजून लिही खरच. वाचायला आवडेल.
केसांचा भांग हे माहीत नव्हतं. ह पा छान माहिती.
धागा भरकटवून घ्यायची सीमंतिनी ची इच्छा चांगलीच सफळ संपूर्ण होतेय.
भरकटलेला धागा पुन्हा
भरकटलेला धागा पुन्हा मायबोलीरूपी सुईत ओवायला कुणीतरी सीमंतपूजनाची कथा (नसल्यास तयार करून) टाका रे/ग (शेवटचे 'रे ग' ही सांगीतिक आलापी नाही - जनहित में जारी).
ते सीमांतपूजन असतं बहुतेक.
ते सीमांतपूजन असतं बहुतेक. (पूर्वी नवरा मुलगा सोबत वऱ्हाड घेऊन नवरीच्या गावी यायचा तेव्हा गावाच्या सीमेवर त्यांचं स्वागत करायचे तेव्हाचा काही विधी असेल)
अच्छा! पुढील सर्व गोष्टी
अच्छा! पुढील सर्व गोष्टी 'सीमलेस' व्हाव्यात म्हणून असावं ते.
Pages