Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्रज्ञा सही ! पण आमच्याकडे
प्रज्ञा सही !
पण आमच्याकडे रताळ्याचे गोड काप करतात ते पण उरतात, त्याचे काय करायचे? ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझी मुलगी साबु वड्यांना कंटाळलेली असल्याने संध्याकाळी थालिपीठे लावावी लागतील. बटाट्याचा किस माझे डोके खातो, कारण वाफवायला तासभर जातो.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तेपण द्यायचे ढकलून थालिपीठ
तेपण द्यायचे ढकलून थालिपीठ करताना![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
किंवा मग स्वीट डिश म्हणून दुधात मिसळून एक उकळी काढायची नि वेलचीपूड वगैरे घालून द्यायचे सगळ्यांना. असे हेतेढकलचबाढबीचे पदार्थ हातघाईवर येऊन मूळ पदार्थांपेक्षा लवकर संपतात. एकादशीचं पुण्य पदरात पडतं.
स्वयंपाक करायला नवीन मावशी
स्वयंपाक करायला नवीन मावशी यायला लागल्यात.त्यांना मेथीची पीठ लावुन पळीवाढी भाजी करायला सांगितली तर त्यांनी मेथी न चिरता भाजी फोडणी ला घातली आणि वरुन छान लसुण फोडणी बिडणी घालुन भाजी केली. भाजी चवीला छान झाली आहे पण अखंड पानं तोंडात येत आहेत त्याची सवय नाही त्यामुळे भाजी आज जास्त संपली नाही. अजुन जवळ जवळ २ वाट्या भाजी शिल्लक आहे. त्याचं आता काय करावं सुचवा प्लीज.
आजच सकाळी नाष्ट्यात थालिपीठ करुन खाल्लं त्यामुळे तो पर्याय बाद आहे.
प्लीज दुसरे काही पर्याय असले तर सुचवाल का ?
धन्यवाद
थोडे तेलकट खायची तयारी असेल
थोडे तेलकट खायची तयारी असेल तर बेसन,खसखस घालून मसाले घालून मुठीया बनवून तळता येतील.आपण खसखस तीळ घालून कोथिंबीर वडी करतो तसं.जर तळायचे नसेल तर रोल तयार करून उकडून पातळ वड्या करून तव्यावर परतता येतील.
कणिक भर घालून पराठे करता येतील.पराठ्यात आख्खी मेथी विशेष खटकणार नाही.
मेथी मटर मलई चा रेडी मिक्स मसाला वापरून मेथी मटर मलई करता येईल(अर्थात लसूण फोडणी खूप घातली नसेल तर)
मी अनु, खुप धन्यवाद....पराठे
मी अनु, खुप धन्यवाद....पराठे पर्याय छान वाटतोय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उद्याच्या नाष्ट्याचा प्रश्ण सुटला...
घरात मक्याचे पीठ आहे (पिवळ्या
घरात मक्याचे पीठ आहे (पिवळ्या रंगाचे )
त्याचे काय करता येईल?
Corn flour (हे पांढरे असते आणि ह्या दोघांमध्ये काय फरक आहे मला माहिती नाही ) समजून आणलेले चुकून.
मक्के दी रोटी सरसों दा साग
मक्के दी रोटी सरसों दा साग
सांजा तिखट
सांजा तिखट
ढोकळे
ढोकळे
Corn flour म्हणून ओळखले जाते
Corn flour म्हणून ओळखले जाते ते corn starch असते
ह्या पीठाचे धिरडे किंवा डोसे
ह्या पीठाचे धिरडे किंवा डोसे घालता येतील का?
करता येईल कदाचीत. थोडेसे पीठ
करता येईल कदाचीत. थोडेसे पीठ ट्राय करुन बघ. त्यातच लसुण-मिर्ची वाटुन घाल आणी कोथिंबीर. पाहीजे तर थोडा बारीक रवा घालुन १० मिनीटे भिजवुन ठेव. किंवा मग थोडे तांदळाचे पीठ घाल रव्या ऐवजी. एक डाव भर कर, म्हणजे बाकी वाया जाणार नाही.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/29349
इथे कणसाची धिरडी आहेत, थोड्या पिठावर प्रयोग करून बघ. साबांनी एकदा भाकरी केली होती, मला काही फार आवडली नाही.
ते कणीस आहे
ते कणीस आहे
ह्यांच्याकडे पीठ आहे
सोपं काहीतरी करायचं आहे
सोपं काहीतरी करायचं आहे
डोसे मी एक दोन घातले तर बाकीचे नवरा करु शकतो, कारण सध्या energy राहत नाही जास्त वेळ
थालीपीठ होईल
थालीपीठ होईल
काहीतरी मिसळून थापा
होतीलhttps://www
होतील
https://www.yummytummyaarthi.com/instant-makki-atta-dosa-recipe/
थालीपीठ होतात.
थालीपीठ होतात.
सरसोका साग आणि मकैकी रोटी करायची म्हणून आणलेले मक्याचे पीठ,थालीपीठ करून वापरले.मात्र त्यात बरेच काही काही घालून केले.फारसे चांगले नाही लागत.पण संपवले.
मक्याचे पिवळे पीठ मी फक्त
मक्याचे पिवळे पीठ मी फक्त सरसो साग मधे वापरते, थिकनेस साठी.
बाकी चव खास नसते त्यामुळे कशात च घालत नाहि.
व्हाईट कॉर्न फ्लोर ला पर्याय
व्हाईट कॉर्न फ्लोर ला पर्याय म्हणुन चुकुनही वापरू नका, भयाण मन्चुरिअन खाल्ले होते एकदा प्रयोग म्हणुन.
किल्ले, सिरीयसली. ढोकळेच कर
किल्ले, सिरीयसली. ढोकळेच कर त्याचे. आले -लसुण मिर्ची त वास चव खपुन जाईल त्याची. परदेशात तर आपल्या सारखा पांढरा रवा सगळीकडेच मिळत नाही. मी मक्याच्या रव्याचा कित्येक वेळा शिरा करुन खाल्लाय. काही फरक नाही. चवीकरता म्हणून बदाबदा केशर, वेलची जायफळ घातले होते.
ढोकळे करून पाहते थोड्या
ढोकळे करून पाहते थोड्या पीठाचे
राजस्थानात खट्टा ढोकला म्हणून
राजस्थानात खट्टा ढोकला म्हणून करतात बहूतेक मक्याच्या पिठाचे ढोकळे. मी माझ्या कामवाली कडून ऐकलं होते.
हवे तर तिला उद्या विचारते रेसिपी.
माझ्या सासरी भाकरी करतात साध्या किंवा मग भाज्या घातलेल्या धपाट्या सारख्या. मक्याच्या पिठात मेथी/ पालक/किसलेला मुळा/ मुळ्याची पाने/ शेपू यातलं जे असेल ते आणि हिरवी मिरची, अद्रक मीठ कोथिंबीर... सगळं बारीक चिरून पिठात मिक्स करून पिठ मळायचे आणि प्लास्टिक वर भाकऱ्या थापून पराठा सारख्या तुपावर भाजायच्या. .. छान लागतात. सोबत लोण्याचा गोळा मस्ट.
ज्वारीत मिक्स करून मका ज्वारी
ज्वारीत मिक्स करून मका ज्वारी भाकरी करून संपवता येईल.
किंवा पराठा.
लोलाने कुठल्यातरी गणेशोत्सवात
लोलाने कुठल्यातरी गणेशोत्सवात आव्हाकाडो आणि मक्याचे पीठ घालून थालिपीठाची रेसिपी लिहिली होती. छान होतात . आव्हाकाडो नसेल तरी थोडं दही, एखादी पाले भाजी बारीक चिरून घालून थालिपीठ करता येईल.
घरात जवळ जवळ १ किलो पालक उरला
घरात जवळ जवळ १ किलो पालक उरला आहे, लवकरच खराब व्हायला सुरवात होईल, काही युक्ती / सूचना असतील तर सुचवा जेणेकरून पालक टिकवता येईल , धन्यवाद ..
पालक पराठे, पालक पनीर,
पालक पराठे, पालक पनीर, पालकाच्या पुर्या ( अर्धी जुडी पुरेशी होईल, उरलेला पचडी )
जर परतुन बेसन घालुन भाजी केली तर लवकर संपेल, कारण चिरलेली पालेभाजी परतुन २ माणसांपुरतीच होते.
पालकाची प्युरी फ्रिज मध्ये
पालकाची प्युरी फ्रिज मध्ये किती दिवस टिकते हे मात्र माहीत नाही. पालक ब्लांच करुन प्युरी होईल.
किंवा पालक + दुधी + टॉमेटो असे सूप करता येईल.
पालक सूप मस्त होते.बराच पालक
पालक सूप मस्त होते.बराच पालक वापरला जातो.पालक, एखादा कांदा, मिरची हे सर्व शिजवायचे(मायक्रोव्हेव किंवा कुकर) आणि मग मिक्सरमध्ये बर्फ़ाच्या खड्या बरोबर नीट बारीक करून(पेशन्स..पेशन्स.पालक गरम असेल तर वाफेने झाकण उडून आजूबाजूला सर्व भिंतीवर हिरवे स्प्रे पेंट होते.फुल पंख्याखाली पालक हाताने भांडे उचलता येईल इतका गार करून मग बर्फ़ाच्या खड्याबरोबर मिक्सरमध्ये वाटण.) 1 चमचा बटर/तुपावर परतून एक उकळी किंवा नुसतेच गरम.
अनु , पालक बर्फाच्या खड्या
अनु , पालक बर्फाच्या खड्या बरोबर मिक्सरमध्ये फिरवायचे काही विशेष कारण ? दाट पणाला अजून काही घालायचे नाही का ? घरी अनायसे पालक आहे . करून बघेन . आणि याला टिपिकल पालकाचा वास येत नाही ना ?
Pages