Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अमुपरी धन्यवाद.
अमुपरी धन्यवाद.
मुंबई हलवा म्हणजे मिठाई बॉक्स मध्ये हिरव्या लाल रंगाचा असतो तोच ना.
हान. बॉम्बे हलवा सर्च करा
हान. बॉम्बे हलवा सर्च करा यूट्यूब वर आहेत रेसिपी.
मी ही केला होता यूट्यूब वर बघुन 2,3 वर्षा पुर्वी छान झाला होता पण मला कोणती रेसीपी फॉलो केली तेच आठवत नाही.
माहिमी हलवा सुद्धा.
माहिमी हलवा =बॉंबे आइस हलवा सुद्धा
बदामी हलवा = कराची हलवा
अनेक नावांनी ओळखले जातात म्हणून
ते यु ट्यूब वर बघून मी ट्राय
ते यु ट्यूब वर बघून मी ट्राय केला होता, हेब्बर फॉलो करून. दिसताना कृती एकदम सोप्पी वाटली, टेक्स्चर पण मस्त दिसत होतं. माझं फसलं. दिसायला छान होतं. पण त्या वड्या उचलताना चिकटत होत आणि पिठूळ लागलं चवीला.
2,4 रेसिपी बघून ट्राय करा.
चिकन पालकची रेसीपी डिटेलात
चिकन पालकची रेसीपी डिटेलात सांगा की.
१. पालक स्वच्छ धुवुन त्याला ब्लांच करुन घ्या.
२. व्यवस्थित निथळुन त्याची पेस्ट करुन घ्या.
३. चिकनसुद्धा स्वच्छ धुवुन घ्या.
४. २/३ कांदे बारीक चिरुन ३ पळी तेलात तळतानाच त्यात नेहमीचे फोडणीचे साहित्य जसे की चेचलेला लसुण/आलं, जिरे, दालचिनी, तेजपत्ता, दोन लाल सुक्या मिरच्या, हळद आणी ज्या प्रमाणात तिखट खात असाल त्यानुसार मसाला टाका.
५. या तळणात चिकनचे तुकडे टाकुन नीट परतुन घ्या. चवीनुसार मीठ (जरा कमीच, पालकाच्या पेस्टमुळे खारट होते) टाकुन झाकण ठेवुन एक वाफ काढा.
६. चिकन अर्धकच्च शिजलं की पालकाची पेस्ट टाकुन नीट ढवळुन चिकन पुर्ण शिजुन होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. शिजवण्यासाठी पाणी टाकु नका.
माझ्या कडे जवळपास पाऊण किलो
माझ्या कडे जवळपास पाऊण किलो कॉर्नफ्लोअर आहे.
त्यापासून काय पदार्थ करता येतील म्हणजे कसं संपवता येईल.>>>>>>> करंज्यांसाठी साटे म्हणून, कुठलेही पॅटीस वा कटलेट साठी बाईंडिंग म्हणून, कुठल्या सुपासाठी पण वापरता येईल. मुंबई/ बाँबे हलवा तर बनेलच. Expiry Date अजून जास्त असेल तर डिप फ्रिझ मध्ये ठेवा, दिवाळीत पण वापरता येईल.
मदत करणाऱ्या सगळ्यांना
मदत करणाऱ्या सगळ्यांना धन्यवाद.
घरी गेल्यावर संध्याकाळी करून पहाते.
सुनिता थोड्याप्रमाणात करुन
सुनिता थोड्याप्रमाणात करुन पाहा, बॉन्बेहलव्याला भयकर प्रमाणात तुप लागते, टाकाल ते सगळ जिरत जात, कॉर्नफ्लोअर शिजल्यावर दुप्पट होत तेव्हा त्या अन्दाजाने करा.
पाऊण किलोच आहे ना?
पाऊण किलोच आहे ना?
)
स्प्रिंग रोल,सूप, ग्रील चे मॅरीनेशन,कटलेट यात पटापट वापरून संपेल
(आमच्याकडे हे पदार्थ करताना ऐनवेळी ते नसतं. मी जवळ असते तर घ्यायलाच आले असते
Hi please consider the pure
Hi please consider the pure carbs and fats you are adding to your diet. The halwa will also add sugar. Health advice
सुनीता तुम्ही पाऊण किलो
सुनीता तुम्ही पाऊण किलो कॉर्नफ्लोअर चा हलवा बनवणार होता का ??
एक वाटी चा करुन बघा एक वाटीला अर्धा वाटी किन्वा त्यापेक्षा थोडे कमी तुप लागेल. आणी त्यात 10 छोट्या वड्या होतिल.
तसे आपल्या सगळ्या इंडियन स्वीट बनवताना तुप साखर याचे प्रमाण जास्त असते. बेसन लाडु, रवा लाडु, रव्याचा शिरा, खोब्र्यच्या वड्या.
Icecream , केक . पण ते आपण करतो च ना.
तसेच हे पण एक स्वीट आहे. स्वीट हे कधीच healthy नसते . पण trial साठी तुम्ही करु शकता.
पाऊण किलोच आहे ना?
पाऊण किलोच आहे ना?
स्प्रिंग रोल,सूप, ग्रील चे मॅरीनेशन,कटलेट यात पटापट वापरून संपेल
(आमच्याकडे हे पदार्थ करताना ऐनवेळी ते नसतं. मी जवळ असते तर घ्यायलाच आले असते Happy ) +१११
मी डीप फ्रिजर ला ठेवून देते. आमच्याकडे चिकन ६५, चिकन पॉपकॉर्न, मंचुरियान वैगरे बनत असतं नेहमी त्यामुळे वापरले जातेच.
अगं अमुपरी, आम्ही कोणी
अगं अमुपरी, आम्ही कोणी सुनिताला अख्ख्या कॉफ्लॉ चा हलवा नाही करायला सांगत आहोत. थोडे कटलेट/ पॅटीस, थोडे करंज्या व बाकी हलवा असे सांगीतलेय.
ओके असे आहे का रश्मी. काही
ओके रश्मी. मला मी असे सांगितले असे वाटले तुम्ही नाही.
वॅनिला एस्सेन्स घालुन कस्टर्ड
वॅनिला एस्सेन्स घालुन कस्टर्ड करा. तुप नाहीये पण साखर आहे. प्रायश्चित (हवे असल्यास) आधी 1 तास व्यायाम करा आणि मग एक बाउल सॅलड खाऊन मग फ्रुटस बरोबर कस्टर्ड खा.
धन्यवाद जेबॉं. नक्की करून
धन्यवाद जेबॉं. नक्की करून बघेन पालक चिकन.
दीड वाटी दाण्याची चटणी शिल्लक
दीड वाटी दाण्याची चटणी शिल्लक आहे .कोणी खात नाहीये घरी..भरल्या वांग्याला घालून थोडी संपवली..इतर भाज्यात घालून बघितली तर ज्यात त्यात लसणाचा वास नको वाटतोय ...
इतर काही मार्ग आहे का संपवण्याचा?
आभा, कॉर्नफ्लोअर चे कस्टर्ड
आभा, कॉर्नफ्लोअर चे कस्टर्ड कसे करायचे?
.
केया, मला गरम भातावर तूप आणि
केया, मला गरम भातावर तूप आणि चटणी हा प्रकार फार आवडतो. तसेच, गरम पोळीवरही छान लागते.
पराठ्यासारखे चटणी स्टफ करून पण करता येईल. किंवा पराठा लाटताना घडीमध्ये चटणी पसरून लावून मग घडी घालून लाटून पराठे करता येतील.
चटणीचा डबा ऑफीसात नेऊन ठेवा
चटणीचा डबा ऑफीसात नेऊन ठेवा
प्राची..पराठ्याची idea चांगली
प्राची..पराठ्याची idea चांगली वाटतीय...thnx.. करून बघते..
चटणीचा डबा ऑफीसात नेऊन ठेवा>>>>त्याने काय होईल?
केया लसणीचा वास राहिलंच
केया लसणीचा वास राहिलंच कशातही घातली तरी ...
आॅफिसमध्ये म्हणजे कलीग्जना देऊन संपव
बटरमध्ये कालवून ब्रेडला स्परेड म्हणून वापर फार मस्त लागतंगे प्रकरण
दीड वाटी दाण्याची चटणी शिल्लक
दीड वाटी दाण्याची चटणी शिल्लक आहे .
१. हिरव्या जाड मिरच्यात भरुन (भजीवाल्या मिरच्या) एक पळी तेलात शॅलो फ्राय
२. भेंडी मधे चिरुन त्यात भरुन एक पळी तेलात शॅलो फ्राय
३. बटाटवडे बनवाल तर त्यासोबत
४. कमी तिखट हिरव्या मिरच्यांची सरबरीत कुटुन त्यात ते कुट टाकुन भाजी बनवा (मिरची का सालन टाईप)
४. अळुच्या पानांचे चौकोनी तुकडे कापुन त्यात हे कुट दह्याबरोबर (स धारण घट्ट पसरु नये) मिक्स करुन भरुन त्याची पुडी बनवा आणी मग बेसनात घोळवुन भजी काढा. (जेबॉ स्पेशल)
गवारीच्या भाजीत वापरा.
गवारीच्या भाजीत वापरा.
बटरमध्ये कालवून ब्रेडला
बटरमध्ये कालवून ब्रेडला स्परेड म्हणून वापर फार मस्त लागतंगे प्रकरण>>>>>> अगणित वेळा खाल्लय हे. जाम भारी !
जेम्स बाँड, मस्त टिप्स !
जेम्स बाँड, मस्त टिप्स !>>>>
जेम्स बाँड, मस्त टिप्स !>>>>+१.
अरे वाह..भारी idea मिळाल्यात.
अरे वाह..भारी idea मिळाल्यात..thnx मंजुतै आणि बाँड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ती चटणी इकडे पाठवून द्या
ती चटणी इकडे पाठवून द्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमचे हे आणि साबु एका जेवणात संपवतील
किल्ली..जरूर
किल्ली..जरूर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ढेमसे आणुन भाजी करा आणि त्यात
ढेमसे आणुन भाजी करा आणि त्यात वापरा चटणी, भरली ढेमसी करून.
Pages