Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इतर जण आहार सुचवतीलच.पण
इतर जण आहार सुचवतीलच.पण threptin ची बिस्किट्स किंवा प्रोटीनेक्स पावडर दुधात घालून द्या.मधुमेह असल्यास बिस्किटे न देता पावडर द्या.
अच्छा ओके. थँक्स सीमा
अच्छा ओके. थँक्स सीमा
धन्यवाद म्हाळसा
धन्यवाद म्हाळसा ,सनव, देवकी. मधुमेह नाही आहे सो ही बिस्किटे बघेन.
ओट्स चे घावन अथवा उपमा,
ओट्स चे घावन अथवा उपमा, मुगाची धिरडी, ज्वारीच्या लाह्यांचे पीठ ताकात कालवून मीठ, हिंग मिरचीची फोडणी देऊन, गव्हाची किंवा पतंजलीची मिक्स सोजी/दलिया, शेवयांचा उपमा, थालीपीठं ...................................... चिकार ऑप्शन्स आहेत!
इथे एक अरुंधति कुलकर्णी आयडी
इथे एक अरुंधति कुलकर्णी आयडी आहे त्यांच्या लेखनात बघा. वयस्कर लोकांसाठी चा आहार असा बाफ सापडेल.
धन्यवाद आंबट गोड.
धन्यवाद आंबट गोड.
ध्यन्यवाद अमा मी पहिला तो बाफ आताच खुप चांगले ऑप्शन्स आहेत.
Eat Millet ब्रांड चा रागी रवा
Eat Millet ब्रांड चा रागी रवा मागवला होता. त्यांच्या वेबसाइटवर रेसिपी आहे ती वापरून उपमा केला होता. म्हणजे आपण रव्याचा करतो तसाच.
नंतर एकदा सरळ नाचणी रवा छोट्या कूकर मध्ये शिजवला.
दोन्ही वेळी हा रवा नीट शिजला नाही. म्हणजे मोकळा झाला नाही. टचटचीत राहीला. काय करता येईल अजून?
नाचणी सत्त्व किंवा पीठाचा उपमा चिकट होतो. रवा मिळाला म्हणून आनंदात होते तर हे असं.
कोणी वापरला आहे का?
वर फोटो मध्ये डाव्या हाताला खाली जे आहे तो रवा आहे..
मी आणलेल्या स्टील कट ओट्सचा
मी आणलेल्या स्टील कट ओट्सचा पण हाच प्रोब्लेम आहे. तो रागी रवा आधी सोक करून मग शिजवुन घेतला तर? कारण मी ओट्स तसेच शिजवणार आहे. चक्क भिजवुन मग कुकरमध्ये खिचडी
थोडासा करून बघते. नाचणी
थोडासा करून बघते. नाचणी असल्यामुळे चिकट होईल अशी भीती वाटते आहे पण ट्राय करेन नक्की. धन्यवाद.
माझ्याकडे घर- घंटी आहे त्यामुळे महिन्याची दळणे मी एकदम करून ठेवते. मागच्यावेळी खूप कंटाळा आल्यामुळे बारा किलो गहू आणि एक किलो नाचणी असे दुकानदाराला दळून आणून द्यायला सांगितले. मला वेगवेगळी पीठे हवी होती. परंतु बहुदा कम्युनिकेशनची गडबड झाली आणि त्याने गहू नाचणी एकत्र दळून काढले. त्यामुळे गेला महिनाभर गडद रंगाच्या पोळ्या खाता होतो सगळे. पीठ कितीही कमी पाण्यात मळले तरी नाचणी मुळे चिकटसरच होत आहे. मुले आणि नवरा तसल्या पोळ्यांना कंटाळली. कारण आमरस आणि पोळी हा आवडता मेनू सुरू झाला आहे. आमरसा बरोबर पोळीचा रंग अजिबात जात नाही. एकंदरीत नाचणी कितीही पौष्टिक असली तरी मला लाभत नाही असे दिसते !
नाचणीचा रवा असेल तर अर्धा तास
नाचणीचा रवा असेल तर अर्धा तास भिजत घालून मग बारीक जाळीवर निथळून घेणे आवश्यक. तसेच फोडणी केल्यावर त्यातही ४-५ मिनीटे छान परतून घ्यायचा. शिजवण्यासाठी रव्याच्या अडीचपट आधणाचे पाणी घालायचे.
स्टील कट ओटस ना मापाने तिप्पट पाणी लागते. प्रेशर कुकर/ आयपीत शिजवायचे.
मी आणलेल्या स्टील कट ओट्सचा
मी आणलेल्या स्टील कट ओट्सचा पण हाच प्रोब्लेम आहे....>>> मी स्टील कट ओट्स रात्री पातेल्यात भिजवते आणि सकाळी त्यात सुकामेवा, क्रॅनबेरी/मनुका घालून ते पातेले गॅसवर चढवते. अधून-मधून ढवळायचे म्हणजे खाली लागणार नाही. शिजताना घट्ट होत आले तर त्यात पाणी घालायचे. शेवटी आवडीप्रमाणे मध/गूळ/मेपल सिरप घालते.
नाचणी रव्याचे, इडली डोसे करु
नाचणी रव्याचे, इडली डोसे करु शकाल.आम्बवणे मस्ट आहे.
>>मी स्टील कट ओट्स रात्री
>>मी स्टील कट ओट्स रात्री पातेल्यात भिजवते
सोनाली रात्री ओट्स भिजवताना किती पाणी घालता? बुडतील एवढंच का?
सध्या माझ्याकडे पाच मिनिटात शिजणारे आहेत ते संपत आलेत. आता स्टिल कट आणायचे आहेत.
सोनाली रात्री ओट्स भिजवताना
सोनाली रात्री ओट्स भिजवताना किती पाणी घालता? बुडतील एवढंच का?>>>>त्यापेक्षा जास्त. ओट्सच्यावर तर्जनीचे दिड-दोन पेर पाण्यात बुडतील एव्हढे.
स्वाती आणि सोनाली, धन्यवाद !
स्वाती आणि सोनाली, धन्यवाद ! इंन्स्टंट ओट्सचं नेहमी नट्स आणि मध घालुन पॉरीज करते त्यामुळे स्टील कट ओट्स भाज्या घालुन तिखट बनवणार आहे.
वर्षा, रोल्ड किंवा इन्स्टंट ओट्सची सवय झाली की स्टील कट ओट्स करायला जरा वेळच लागतो हे लक्षात ठेवायला लागेल. आठवणीने भिजवायला लागतील. लागली भुक की काढले आणि शिजवले अशी क्विक डिश नाही.
स्टील कट ओट्स चे मी सेम
स्टील कट ओट्स चे मी सेम पोह्यांसारखे चाळणीत निथळून फोडणीला घालून पोहे केलेले ..पण शिजले नाहीत.....अजून एक वाफ काढायला हवी होती का..की कुकर मधेच शिजतात?
पोह्यांसारखे चाळणीत निथळून
पोह्यांसारखे चाळणीत निथळून फोडणीला >>>> तसे नाही शिजणार. त्याच्या २-३ पट पाण्यात शिजतात. भिजवले असतील तर कमी वेळात शिजतात.
स्टील कट ओट्स ला पोह्यासारखं
स्टील कट ओट्स ला पोह्यासारखं ट्रीट नाही करता येणार. शिजायला वेळ लागतो. त्यालाठी रोल्ड ओट्स वापरू शकता.
ओके...
ओके...
Rolled ओट्स चा लगदा होईल ना एकदम.....
घरात खुप सारा अॅपलसॉस आहे(
घरात खुप सारा अॅपलसॉस आहे( अनस्विटन्ड्) त्याच काय करता येइल?
मी स्टील कट ओट्स सरळ धुवून,
मी स्टील कट ओट्स सरळ धुवून, पाणी घालून डाळ तांदुळासारखे कुकर किंवा आयपीमध्ये शिजवून घेते. रोजच्या कुकरमध्ये तिसऱ्या डब्यात ओट्स ठेवायचे. नंतर त्यात दूध साखर ट्रेल मिक्स घालून जरा आटवून खाता येतं. मला स्वतःला आवडत नाही पण माझ्या सासूसासऱ्यांना आवडतो हा नाश्ता. आणि त्यांना स्टील कट ओट्सच लागतात, रोल्ड ओट्सला काही पूर्वतयारी नसते तरी ते नको असतात.
Applesauce बेकिंगमध्ये वापरता
Applesauce बेकिंगमध्ये वापरता येतो.
किंवा त्यात मीठ साखर लिंबूरस घालून पन्ह्यासारखं पेय बनवता येईल गारेगार.
मी स्टील कट ओट्स जरासे
मी स्टील कट ओट्स जरासे कोरडेच परतून मग राइस कूकरमधे शिजवते. गार झाले की फ्रीजमधे ठेवते. ( अरोमा राइस कूकर - यात ओटमील , किन्वा असे प्रीसेट आहेत).
आठवडाभर लागेल तसे मायक्रोवेव्ह करुन मीठ- मिरपूड , मीठ मेतकूट, सॉय सॉस - तिळाचं तेल- फुरिकाके असे काहीतरी घालून पटकन ब्रेक फास्ट होतो.
मँगो पल्प चा गेल्या वर्षीचा
मँगो पल्प चा गेल्या वर्षीचा डबा विकत घेतला तर चांगला असतो का?
नेट वर 2 वर्षे टिकतो असे दिले आहे
धन्यवाद सोनाली.
धन्यवाद सोनाली.
होय मीरा. इन्स्टंट सारखे पटकन होणार नाहीत हे लक्षात ठेवायला हवंय.
त्या पल्प मध्ये जर
त्या पल्प मध्ये जर प्रिझर्व्हेटिव्हज असतील तरच तो टिकेल, नाहीतर नुसताच आंब्याचा पल्प असेल तर त्याची चव उन्हाळ्यामुळे उतरुन खराब लागते. अगदी उतरलेला आंबा लागावा तशी. मला अख्खा डबा फेकावा लागला होता मागच्या वर्षी.
स्टील कट ओट्सच्या ईडल्या,
स्टील कट ओट्सच्या ईडल्या, डोसे फार छान होतात. एकदा बॅटर केलं कि त्याच्या ईडल्या, डोसे, आप्पे, उत्ताप्पे असे सगळे प्रकार होतात आणि छान लागतात
ओट्सचा पोह्यासारखा प्रकार करायचा असेल तर रोल्ड ओट्स वर पाण्याचा हबका मारून वापरायचे.
@ प्राजक्ता,
घरात खुप सारा अॅपलसॉस आहे( अनस्विटन्ड्) त्याच काय करता येइल?>> त्यात लेमोनेड (हे नसेल तर पाणी, लिंबाचा रस, साखर/गूळ, मीठ) वेलची पावडर, केशर घालून त्याचे पन्हे करता येइल.
@मीपुणेकर , स्टील कट ओट्सच्या
@मीपुणेकर , स्टील कट ओट्सच्या ईडल्या, डोसे फार छान होता >>
क्रुपया क्रुती मिळेल का?
15 डबे मागवले आमर्सचे
15 डबे मागवले आमर्सचे
त्याने दवाखान्यात पोच केले
10 वाटले , 1 फोडून खाल्ला , चांगला होता , 4 घरी नेले
@मनमोहन, हो लिहिते १, २
@मनमोहन, हो लिहिते थोड्या वेळाने.
Pages