"खरं प्रेम हे एकदाच होतं का?"

Submitted by चंद्रमा on 27 June, 2021 - 13:38

........ टीप:(कृपया हा लेख वाचताना मायबोलीकरांनी एकांतवास शोधावा कारण पहिल्या प्रेमाची गोष्ट इथे मी अधोरेखित केलेली आहे वाचताना आपले मन भरून आलेच तर अश्रूंना वाट मोकळी करून देता येईल
बस एवढच!.....)

....... प्रेम म्हणजे काय? प्रेम या शब्दात दडलय तरी काय? सर्वप्रथम प्रेमाला आपण परिभाषित करू "शब्दांनी नव्हे तर भावनांनी व्यक्त करता येईल अशी एक निसर्गदत्त देणगी म्हणजे प्रेम!" 'प्रेम' म्हणजे नुसतेच दोन नजरांच्या मौजेचे क्षण नाही किंवा तारुण्यावस्थेत विरुद्धार्थी देहाबद्दल वाटणारे आकर्षणही नाही तर ते त्याहीपलीकडील अलौकिक, अदृश्य तेज आहे. प्रेम करु म्हटल्याने करता येत नाही किंवा आवरतो म्हटल्याने आवरताही येत नाही.
... मोहाला बळी पडून एकमेकांच्या कमकुवतपणाचे भागीदार होण्यापेक्षा वासनेचा तोल न जाऊ देण्याची दक्षता घेणच खऱ्या प्रेमाला अभिप्रेत असतं! जीवनातल्या सगळ्यात मोठ्या सुखाची प्रचिती हेच की कुणीतरी आपल्यावर जिवापाड प्रेम करतं! आपल्या उणिवा जाणून सुद्धा प्रेम करतं.
........ मुळ मुद्दा बाजुलाच राहिला तर 'खरं प्रेम हे एकदाच होतं का?' मी तर म्हणेल 'नाही' ते पुन्हा पुन्हा होतं! पण ते आपल्याला कधी कळतं कधी नाही! किशोरावस्थेत आपण जेव्हा असतो तेव्हा एखादी व्यक्ती पाहताक्षणीच आपल्या नजरेत भरते. त्या प्रिय व्यक्तीला पुन्हा-पुन्हा बघावसं वाटतं. असं वाटतं ती 'नजर' नजरेतून कधी सुटावीच नाही.'ती' किंवा 'तो' समोर आला तरी हृदयाची धडधड होते. हृदयाची स्पंदनं वाढायला लागतात. काळजाच्या ठोक्यांची गती तीव्र होते. हात-पाय गार पडतात. त्या व्यक्तीचा एक हलकासा स्पर्श जरी झाला तरी अंगावर शहारा येतो. एक रोमांचक अनुभव असतो तो पहिल्या प्रेमाचा! पहिल्या प्रेमाचा अनुभव तर सर्वांसाठी निराळाच! प्रेमामध्ये व्यक्ती तहान-भूक विसरते हे खरे! मी सुद्धा अनुभवले आहे. जेवताना त्या व्यक्तीची साधी आठवण जरी आली तरी पोट भरल्यासारखे वाटते. घास घश्यातच अडकतो. काही सुचेनासं होतं. जीव कावराबावरा होतो.

"तुझ्या कुशीतही आठवतं मला
माझं एकटेपण मागे सोडलेलं!
तेव्हा कितीदा कोणी पाहील म्हणून;
तुझं नाव लिहून खोडलेलं!!

...... काहींच्या नशिबी हे प्रेम असतं पण अनेकांच्या नाहीच! म्हणतात ना 'पहिलं प्रेम' हे 'पहिलं प्रेम' असतं आणि ते जर अपूर्ण राहिलं तर ज्या वेदना मनाला होतात त्याची तुलना आपण आयुष्यातल्या कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या दुःखाशी नाही करू शकत! साल १९९९ मध्ये
'कुछ कुछ होता है' बघितला. प्रेमाचा त्रिकोण! या चित्रपटातली 'अंजली' जेव्हा तिच्या पहिल्या प्रेमात अपयशी होते आणि होस्टेलवर येऊन तिच्या मेडला म्हणते 'रुपवती' "मेरा पहला प्यार अधुरा रह गया!मेरा पहला प्यार अधूरा रह गया!" तेव्हा तिच्या अश्रूंचा जो बांध फुटतो आणि छिन्नविच्छिन्न झालेल्या काळजातून जे विदारक विरह गीत फुटतं, 'तुझे याद न मेरी आई, किसी से अब क्या कहना!'
ते दृश्य बघूनच डोळ्यांमध्ये अश्रू तरळले.प्रेमाचं अपूर्ण मिलन हृदय गहिवरून टाकतं आणि आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावून जातं! कधी-कधी हे प्रेम सफल होतं पण ते आयुष्याचा जोडीदार बनन्याईतपत यशस्वी नाही होत! कधी जातीचे बंधनं तर कधी हलाखीची परिस्थिती तर कधी मान-पान मग काय या हताश प्रेमवीरांच्या हातात तिला निरोप देण्यासाठी भेट ठरलेली असते ती शेवटचीच!
.... निरोपाच्या वेळी तिचे पाणीदार डोळे कसे झळकत होते परततांना उंबरठ्यावर आलेली ती, तिच्या नजरेतले भाव सगळे सूत्र व्यक्त करत होते.
"तू किती लपवत होतीस तुझ्या मेहंदी भरल्या हातांना!
तुला हातही उचलता आला नाही मला निरोप देताना!!"

.... तर एकतर्फी प्रेम करणाऱ्यांचा किस्साच निराळा! 'तो' किंवा 'ती' प्रेम करते पण ते समोरच्याला कळतच नाही. आपण जीव तोडून प्रेम करतो. काळजाचं पाणी करतो पण समोरच्याला कळून सुद्धा वळत नाही मग ते शेवटचं प्रेमपत्र तो तिला अर्पण करतो. "माझ्या प्रस्तावाने तुझे मन नाराज झाले असेल कदाचित माझ्याबद्दलच्या तुझ्या भावनाही जळाल्या असतील. तुला माझ्या अस्तित्वाचा रागही येत असेल पण ते तसेच असू दे. फक्त तुझ्यावर एकतर्फी प्रेम करण्याचा मला अधिकार असू दे!" मग काय उरतात फक्त आठवणी. आठवणींचे जग.
"तुझ्या नयनांनी माझ्या नयनांना
असं कसा दगा दिला!
डोळ्यात तुझ्या होकार असता;
तुझ्या ओठांनी कसा नकार दिला!!"
खरंच ह्या हाताश, विकल आणि काळजाला चर लावणार्‍या चारोळ्या ऐकल्याना की मन उदास होतं आणि ओठांवर "तडप तडप के इस दील से आह निकलती रही" हे विरहगीत येतं!
आयुष्यात सावरण्याची संधी प्रत्येकालाच मिळते. फक्त त्या संधीचं सोनं कसं करता येईल हे त्या व्यक्तिपरत्वे अवलंबून असतं! 'पहिलं प्रेम' जरी अपयशी ठरलं तरी 'दिल तो बच्चा है जी' एक खिलौना टूटा तो क्या हुआ दिल बहलाने के लिये दुसरा ढूंढ ही लेते है! मग हळूहळू या प्रेमविरहातून 'तो' किंवा 'ती' बाहेर पडते आणि आपल्या व्यावसायिक क्षेत्रात ते रमून जातात. पुन्हा नव्याने नक्षत्रांची खेळी भरते आणि हे नभ पुन्हा भरतीला येतात. त्या कोमल, घायाळ हृदयावर पुनश्च स्वातीच्या टपोऱ्या थेंबाचा वर्षाव होतो आणि प्रेमाची स्फुल्लिंगं बाहेर पडतात. पुन्हा हे क्षण नजरेच्या टप्प्यात येतात आणि हा प्रेमाचा संसार पुन्हा फुलून येतो. म्हणतात ना, "एक जखम भरण्यासाठी त्यावर दुसऱ्या प्रेमरूपी नात्यांचा मलम लावावा लागतो" तो हाच की काय कोण जाणे!

प्रेम हे असच असतं कारूण्याची किणार असलेलं,हृदयाला स्पर्शून जाणारं, सांगताविणाच अंतर्मुख करणारं आणि हसता-हसता डोळ्यांच्या कडा ओलावून टाकणारं!
शेवटी एक फार मर्मसत्य सांगणारा शेर आठवला.

"दीलो की बात करता है जमाना,
पर मोहब्बत आज भी चेहरे से शुरू होती है!!"

(पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रेमाची अनुभूती आपण जर अनुभवली असेल तर मायबोलीकरांनी प्रतिसादाच्या रूपात ती मांडावी ही नम्र विनंती)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निकि- भूषणचे पुढे काय झाले? कुर्बानिचि बिर्यानि दोघेही एकत्र एका ताटातुन खातहेत की भुषणही हातात् कागद घेउन प्रेमाचा जमा (शून्य) खर्च (पिझ्झा, उन्च टोकेरी चप्पल, रुमाल, केडबरि) वगैरे मान्डतोय?

त्यांचे प्रेम हे माझ्याच प्रयत्नांचे फळ होते.त्यालाच मी कुर्बाणीचे नाव दिले आहे.
>>>>

हे खरेच अफाट आहे. तिचे तुमच्यावर प्रेम नसले तरी एक वेडी आशा असतेच. आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीचे प्रेम तिला मिळवून देणे ते सुद्धा आपल्याच फ्रेंडसर्कलमध्ये हे कुर्बानीच्याही पलीकडे आहे.

कल हो ना हो मध्ये शाहरूख खानने आपल्या पश्चात प्रिती झिण्टा आणि सैफचे जुळवून दिलेले. पण तेव्हा तो मृत्युमुखी पावणार होता. जिवंतपणी हे करायला मनावर काय दगड ठेवावा लागत असेल याची कल्पनाच करू शकतो. टू बी हॉनेस्ट, मला हे जमले नसते.

माझा एक जुना धागा एक किस्सा आठवला. माझीच वरची पोस्ट वाचून. नवीन वाचकांसाठी लिंक देतो. जुन्यांनी वाचला असेलच

ब्रेक अप % के बाद !!
Submitted by ऋन्मेऽऽष on 21 September, 2014

https://www.maayboli.com/node/50887

२०१४.. बापरे.. मी किती जुना सदस्य आहे Happy

मजा आली लेख आणि प्रतिसाद वाचताना. चंद्रमा, तुम्ही खरच पहिल्या प्रेमाच्या आठवणी जाग्या केल्यात.
माझं पण पहिलं प्रेम कॉलेजच्या दिवसातलं होतं. मित्र मैत्रीणींच्या ग्रुप मधे ती विषेश आवडायची आणि मी कधीच तीला तसं स्पष्ट म्हणालो नाही तरी पण माझ्या वागण्यातून तिलाही ते कळायचच. आणि एक दिवस अचानक ती येऊन म्हणाली 'तू मला आवडतोस'. आणि मला स्वर्ग ठेंगण का काय म्हणतात तसं झालं. सुरुवातीचे काही दिवस अगदी परफेक्ट लव्ह स्टोरीचे होते. सगळं छान चालु होतं. ती एकदम साधी होती. ग्रुप मधल्या इतर मुलींच्या फारच "सपनों का राजकुमार", "माझ्यावर खूप पैसे खर्च करणारा मुलगा हवा" इ. कल्पना होत्या. पण ती तशी अजिबात नव्हती. आणि मला तेच फार आवडायचं. मग नंतर कुरबुरी चालु झाल्या, वाढत गेल्या आणि शेवटी आम्ही वेगळे झालो. पुढची काही वर्ष मी स्वतःची समजूत घातली होती कि आम्ही दोघही चुकिचे वागलो आणि आमच्यात गोष्टी बिघडत गेल्या, म्हणून ते नातं तुटलं.
पण नंतर काही वर्षांनी, जगाचा व नात्यांचा अनुभव आल्यावर, थोडा समजुतदारपणा वाढल्यावर हे लक्षात आलं कि तेव्हा मीच जास्त वेड्यासारखा वागलो. तीचे तेव्हाचे प्रश्न, प्रॉब्लेम्स अगदी टीपिकल टीनेजर मुलींचे होते पण मी मात्र जणू काही तीची ह्यापुढची सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे असा समज करून घेतला होता. आणि सतत मी तिला तीने काय करायचं, काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे हे सांगत राहयचो. तिचे प्रश्न तीने माझ्याच पद्ध्तीने सोडवले पाहिजेत (मग ते प्रोजेक्ट ग्रुप मधली भांडण असो वा जॉब सर्च असो वा घरी बहिणीशी मतभेद असो) असा माझा आग्रह असे. अर्थात, माझा प्रचंड जाच झाला असेल तीला.. आमचे वाद व्हायचे, एक शब्द न बोलता आम्ही नुसते फोन हातात धरून थांबायचो किंवा बाहेर फिरायला गेलो तरी अबोला असायचा कारण दोघांचीही चिड्चिड झालेली असायची. वगैरे.. पण तीने नातं तोडलं नव्हतं. मीच मग एक दिवस ठरवलं कि ह्या सगळ्यामुळे माझ्या अभ्यासावर परिणाम होतो आहे आणि "आय डिसायडेड टू टेक अ ब्रेक". तीने तो एकतर्फी निर्णय मान्य केला आणि आम्ही काही दिवसांसाठी वेगळे झालो. त्या ब्रेक च्या दिवसात मी ठरवलं कि हे काही पुढे वर्क आउट होणार नाही आणि ज्या दिवशी आम्ही परत भेटायचं ठरवलं होतं त्या दिवशी भेटल्या भेटल्या मी तीला सांगीतलं कि आपण वेगळे होऊया. थोडक्यात एकतर्फीच पूर्णविराम देऊन मोकळा झालो. त्यानंतर मी सगळं संपल्याच्या, मोकळं झाल्याच्या थाटात वावरत होतो पण तीला माझ्यामुळे झालेला मनस्ताप, दु:ख आणि तिची माझ्यामुळे झालेली ओढाताण मला तेव्हा जाणवली नाही.
थोडक्यात काय तर मी मूर्खासारखा वागलो आणि पहिलं प्रेम वाया घालवलं. आमच्या नात्याबाबत मी कायमच खूप सीरीयस होतो, ती माझ्यासाठी कधीच टाईमपास नव्हती. माझ्यासाठी ती 'गर्लफ्रेंड' नव्हती तर पहिल्या दिवसापासून जणू जीवनसाथीच झाली होती. सो मी जरा अतीच सीरीयस होतो आणि खूप इम्मॅचुअर पणे वागलो हे आता कबूल करतो आहे.
लग्न, मुलं बाळं होऊन ती तिच्या संसारात खुष आहे. मी पण माझ्या संसारात खूष आहे. सो लाईफ ईज फाईन नाऊ. तेव्हा मी बरा वागलो असतो तर आम्ही आजही एकत्र असतो कि स्वभावच वेगळे असल्यामुळे यथावकाश वेगळे झालोच असतो, माहिती नाही. पण त्यातली दुसरी शक्यता आता जास्त वाटते.
तेव्हा तीला वरवर सॉरी म्हणालो होतो; पण आता, शहाणपण आल्यावर तीची मनापासून माफी मागायची ईच्छा मनात घर करून आहे. त्यापाई माझी रोजची झोप उडत नसली तरी असा एखादा लेख वाचनात येतो आणि मग जुन्या आठववणी परत येतात. आणि तो दुखरा कोपरा परत डोकं वर काढतो. सर्व काही छान चाललं असताना आता एवढ्या वर्षांनी उगाच फेसबूक वगैरे वरून तीला कॉन्टक्ट करून हे सगळं बोलण्यात काही अर्थ आहे का, ते माहिती नाही. पण तीला मनापासून सॉरी म्हणायचं माझ्या बकेट लिस्ट वर नक्कि आहे.

धन्यवाद मृणाली!
अजिंक्यजी ते चूकून spell mistake झालं,show off लिहायचं होतं,
पण झम्पू दामलू यांनी त्याचाही अर्थ लावला त्याबद्दल त्यांचे आभार!

shoe off प्रेम:
१. एकतर्फी प्रेमात मुलगा मुलीच्या इतक्या मागे लागतो वैतागुन ती चप्पल काढते अर्थात मारायला.

२. असे प्रेम ज्यात प्रेमी एकमेकांना देवासमान मानतात आणि एकमेकांचे दर्शन घेताना चपला/जोडे काढतात.

३. असे प्रेम ज्यात प्रेमींकडे काहीच पैसा शिल्लक रहात नाही, अनवाणी फिरण्याची पाळी येते.

निकि- भूषणचे पुढे काय झाले? कुर्बानिचि बिर्यानि दोघेही एकत्र एका ताटातुन खातहेत की भुषणही हातात् कागद घेउन प्रेमाचा जमा (शून्य) खर्च (पिझ्झा, उन्च टोकेरी चप्पल, रुमाल, केडबरि) वगैरे मान्डतोय?>>> Lol Lol .. अण्णा को प्यारी है कुर्बाणी. ( णी , पुणे णे इति मुंपुमुं १ मोड मध्ये वाचावा. )

जिवंतपणी हे करायला मनावर काय दगड ठेवावा लागत असेल याची कल्पनाच करू शकतो>>> कसला डोमलाचा दगड अन् कसलं काय रे बाबा. आपल्यासोबत आपल्यासाठी सगळं आयुष्य सावरणारे आपापले नवरा बायकोच फक्त आपलं खरं प्रेम असतं. बाकी सब झूठ आहे. पूर्वी मीही कधी काळी अशा फॅन्टसीमधे रमायचे अर्थात कॉलेज लाईफ मध्ये. पण लग्नानंतर हे सगळं किती फोल असतं हे कळालंय . असो. Happy

साधनाजी खरं तरं वाचकांकडून ही अपेक्षा होतीच माझी!
भूषीला वडील नाही आहेत त्यामुळे तो डिप्लोमा नंतरच जाॅबला लागला!
पण निकीने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि ती distribution मध्ये कार्यरत झाली.निकीच्या घरच्यांचा आधीपासूनच प्रेमविवाहाला विरोध होता.डिप्लोमानंतर काही वर्षे ते contact मध्ये होते दोघे‌.पण निकीसाठी स्थळ आल्यानंतर तिने स्वतःहूनच ते संबंध संपुष्टात आणले.आता दोघांचेही लग्न झालीत पण partner वेगवेगळे.
यालाच काय तर आयुष्याचा समजौता म्हणतात की काय कोण जाणे?

युनिकाॅर्न तुमचं सर्वात आधी कौतुक की तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन आपल्या पहिल्या-वहिल्या प्रेमाची आठवण ताजी केली.खरतर सर्व काही घडून गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो.
मनाच्या घायाळ भुजंगाला शंकांच्या असंख्य मुंग्यांनी कडकडून डसायला सुरुवात केली की असं घडतं. मनाच्या मोहळातून विचारांच्या असंख्य लाल मधमाशा इकडे तिकडे नाचू लागतात आणि त्याची परिणती मग विच्छेदात होते.

आपल्या मतांबद्दल आभारी आहे भाग्यश्री.खरचं practical जीवन जगण्यातच अर्थ असतो नाहीतर या
प्रेमाच्या आठवणींवर जगणे हे जीवघेणे असते

ऋन्मेषजी वीरू आपण माझ्या मनातले भाव ओळखले आणि त्यावर उत्तम उपमापण दिली त्याकरीता धन्यवाद!

आपल्यासोबत आपल्यासाठी सगळं आयुष्य सावरणारे आपापले नवरा बायकोच फक्त आपलं खरं प्रेम असतं.
>>>

त्या प्रेमात पडलेल्या दोन व्यक्तीही एकमेकांना नवराबायको म्हणूनच बघत असतात.

बाकी जे खरे नवराबायको असतात ते एकमेकांचे आयुष्य सावरतातच असे कुठे असते. किंबहुना बरीच नाती तर तुटलेली वा नाईलाजाने बांधून ठेवलेली असतात. माझ्या हातात असते तर मीच दहाबारा लग्ने केली असती. एकाच जोडीदारासोबत अख्खे आयुष्य घालवणे हिच खरे तर मोठी कुर्बानी आहे. ती आपण सर्वांनी फारसे आढेवेढे न घेता द्यावी म्हणून नवराबायकोच्या नात्याचे एवढे उदात्तीकरण करून ठेवलेय.

पण निकीसाठी स्थळ आल्यानंतर तिने स्वतःहूनच ते संबंध संपुष्टात आणले.आता दोघांचेही लग्न झालीत पण partner वेगवेगळे.>>> अरेरे ! तुमची 'कुर्बाणी' वाया गेली.

मनाच्या घायाळ भुजंगाला शंकांच्या असंख्य मुंग्यांनी कडकडून डसायला सुरुवात केली की असं घडतं. मनाच्या मोहळातून विचारांच्या असंख्य लाल मधमाशा इकडे तिकडे नाचू लागतात>> फारच अलंकारीक भाषा आहे तुमची.

पण निकीसाठी स्थळ आल्यानंतर तिने स्वतःहूनच ते संबंध संपुष्टात आणले.आता दोघांचेही लग्न झालीत पण partner वेगवेगळे>> शाब्बास, ना तुला ना मला घाल कुत्र्याला! सर्वात प्रॅक्टिकल तर निकी च होती. Wink

आशु,श्रवु निक्की ने जे केले ते केवळ settlement म्हणून नव्हे तिला त्या वेळेस medical condition मधूनपण जावं लागलं.तिला 'ब्रेन ट्यूमर' झाला होता तिच्या बाबांनी तिला बरं करण्यासाठी लाखो रूपये खर्च केले ‌मग निकीची काही हिंमत झाली नाही आपलं प्रेमप्रकरण पुढे सांगण्याची कारण तिला आता आपल्या पाल्याची मर्जी राखायची होती आणि कर्तव्यदक्षतेची बाजू सांभाळायची होती.story थोडी filmy वाटते ना पण हे खरे आहे.

वीरू धन्यवाद कौतुक केल्याबद्दल! कधी कधी या घायाळ मनाचं रोपटं विचाऱ्यांच्या वादळी वाऱ्यात सैरभैर डोलू लागत कधी-कधी!

तिला 'ब्रेन ट्यूमर' झाला होता तिच्या बाबांनी तिला बरं करण्यासाठी लाखो रूपये खर्च केले>> तुम्ही जर हम दिदे चुके सनम मध्ये अजय देवगणने केली तशी निक्कीची सेवा केली असती तर तुमची ऐश्वर्या तुमच्याकडे परत आली असती. पण तुम्ही हिशेब मांडत बसलात.

हाडळीचा आशिक
निकीला ब्रेन ट्यूमर' झाला होता ना आणि तिच्या बाबांनी तिला त्या स्थितीतून काढण्यासाठी लाखो रूपये खर्च केले ‌त्यामुळे निकी आपल्या पित्याच्या ऋणात होती.
तिला आपल्या कर्तव्याची जाण झाली. तिला कोणत्याही प्रकारे आपल्या बाबांना दु:खं नाही द्यायचे होते.त्या पुत्री जबाबदारीची जाणीव म्हणालो मी.

निक्की ने जे केले ते केवळ settlement म्हणून नव्हे तिला त्या वेळेस medical condition मधूनपण जावं लागलं.तिला 'ब्रेन ट्यूमर' झाला होता तिच्या बाबांनी तिला बरं करण्यासाठी लाखो रूपये खर्च केले >>> हायला जबरी ट्विस्ट आहे की राव, ऋन्म्याला ह्यत थोडी अ‍ॅडिशन करायला सांगा Proud

जाओ पहले पाल्य और पालक का फर्क समझके आओ.
कथेवर काही प्रतिसाद दिला नव्हता. पण प्रेमाचं रोपटं मनाचं खोपटं आणि पाल्य! वाचुन प्रतिसाद लिहिला गेला. Lol

पाल्य म्हणजे ज्याचे पालन केले जाते, पालक म्हणजे जो ते पालन करतो.
गरजेचे नाही की आयुष्यभर आईवडीलच पालक आणि मुले पाल्ये राहावीत.
किंबहुना वयोपरत्वे आईवडील थकल्यावर आणि मुले जबाबदारी घेण्याईतपत मोठी झाल्यावर मुलांनी पालक बनून आपल्या आईवडीलांना पाल्य समजून त्यांची काळजी घ्यायला हवी.

प्रियकराने तुम्हाला हजारो लाखो पर्यायातून आपल्या आवडीनुवडी नुसार निवडले असते. उद्या ज्या कारणासाठी तुम्हाला निवडले असते ते कारणच नाहीसे झाले तर त्याच्या मनातील तुमच्याबद्दलच्या भावनाही लोप पावण्याची शक्यता असते.
बाबांचे मात्र तसे नसते. जे पदरी पडले ते, जसे आहे तसे त्यांनी तुम्हाला आनंदाने स्विकारले असते. त्यांच्या तुमच्यावरच्या प्रेमाला कधीही ओहोटी लागायची शक्यता नसते. पितृप्रेम अखेरपर्यंत कायम राहते. बाबांच्या पलीकडे काही नाही !

प्रियकर एकापेक्षा जास्त बनू शकतात आयुष्यात
बाबा एकच असतात>> वाटल्यास यावर तुम्ही वेगळा धागा काढा. पण इथे कुर्बाणीची जी ट्रॅजीडी झाली आहे त्यावरच चर्चा करा.

अरे भई ऋन्मेष केहना क्या चाहते हो???
तुझ्या मेंदुच्या खोपटात जे ज्ञानाचं रोपटं आहे त्याला तरी समजतंय का काय लिहिलयंस ते.

Pages