........ टीप:(कृपया हा लेख वाचताना मायबोलीकरांनी एकांतवास शोधावा कारण पहिल्या प्रेमाची गोष्ट इथे मी अधोरेखित केलेली आहे वाचताना आपले मन भरून आलेच तर अश्रूंना वाट मोकळी करून देता येईल
बस एवढच!.....)
....... प्रेम म्हणजे काय? प्रेम या शब्दात दडलय तरी काय? सर्वप्रथम प्रेमाला आपण परिभाषित करू "शब्दांनी नव्हे तर भावनांनी व्यक्त करता येईल अशी एक निसर्गदत्त देणगी म्हणजे प्रेम!" 'प्रेम' म्हणजे नुसतेच दोन नजरांच्या मौजेचे क्षण नाही किंवा तारुण्यावस्थेत विरुद्धार्थी देहाबद्दल वाटणारे आकर्षणही नाही तर ते त्याहीपलीकडील अलौकिक, अदृश्य तेज आहे. प्रेम करु म्हटल्याने करता येत नाही किंवा आवरतो म्हटल्याने आवरताही येत नाही.
... मोहाला बळी पडून एकमेकांच्या कमकुवतपणाचे भागीदार होण्यापेक्षा वासनेचा तोल न जाऊ देण्याची दक्षता घेणच खऱ्या प्रेमाला अभिप्रेत असतं! जीवनातल्या सगळ्यात मोठ्या सुखाची प्रचिती हेच की कुणीतरी आपल्यावर जिवापाड प्रेम करतं! आपल्या उणिवा जाणून सुद्धा प्रेम करतं.
........ मुळ मुद्दा बाजुलाच राहिला तर 'खरं प्रेम हे एकदाच होतं का?' मी तर म्हणेल 'नाही' ते पुन्हा पुन्हा होतं! पण ते आपल्याला कधी कळतं कधी नाही! किशोरावस्थेत आपण जेव्हा असतो तेव्हा एखादी व्यक्ती पाहताक्षणीच आपल्या नजरेत भरते. त्या प्रिय व्यक्तीला पुन्हा-पुन्हा बघावसं वाटतं. असं वाटतं ती 'नजर' नजरेतून कधी सुटावीच नाही.'ती' किंवा 'तो' समोर आला तरी हृदयाची धडधड होते. हृदयाची स्पंदनं वाढायला लागतात. काळजाच्या ठोक्यांची गती तीव्र होते. हात-पाय गार पडतात. त्या व्यक्तीचा एक हलकासा स्पर्श जरी झाला तरी अंगावर शहारा येतो. एक रोमांचक अनुभव असतो तो पहिल्या प्रेमाचा! पहिल्या प्रेमाचा अनुभव तर सर्वांसाठी निराळाच! प्रेमामध्ये व्यक्ती तहान-भूक विसरते हे खरे! मी सुद्धा अनुभवले आहे. जेवताना त्या व्यक्तीची साधी आठवण जरी आली तरी पोट भरल्यासारखे वाटते. घास घश्यातच अडकतो. काही सुचेनासं होतं. जीव कावराबावरा होतो.
"तुझ्या कुशीतही आठवतं मला
माझं एकटेपण मागे सोडलेलं!
तेव्हा कितीदा कोणी पाहील म्हणून;
तुझं नाव लिहून खोडलेलं!!
...... काहींच्या नशिबी हे प्रेम असतं पण अनेकांच्या नाहीच! म्हणतात ना 'पहिलं प्रेम' हे 'पहिलं प्रेम' असतं आणि ते जर अपूर्ण राहिलं तर ज्या वेदना मनाला होतात त्याची तुलना आपण आयुष्यातल्या कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या दुःखाशी नाही करू शकत! साल १९९९ मध्ये
'कुछ कुछ होता है' बघितला. प्रेमाचा त्रिकोण! या चित्रपटातली 'अंजली' जेव्हा तिच्या पहिल्या प्रेमात अपयशी होते आणि होस्टेलवर येऊन तिच्या मेडला म्हणते 'रुपवती' "मेरा पहला प्यार अधुरा रह गया!मेरा पहला प्यार अधूरा रह गया!" तेव्हा तिच्या अश्रूंचा जो बांध फुटतो आणि छिन्नविच्छिन्न झालेल्या काळजातून जे विदारक विरह गीत फुटतं, 'तुझे याद न मेरी आई, किसी से अब क्या कहना!'
ते दृश्य बघूनच डोळ्यांमध्ये अश्रू तरळले.प्रेमाचं अपूर्ण मिलन हृदय गहिवरून टाकतं आणि आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावून जातं! कधी-कधी हे प्रेम सफल होतं पण ते आयुष्याचा जोडीदार बनन्याईतपत यशस्वी नाही होत! कधी जातीचे बंधनं तर कधी हलाखीची परिस्थिती तर कधी मान-पान मग काय या हताश प्रेमवीरांच्या हातात तिला निरोप देण्यासाठी भेट ठरलेली असते ती शेवटचीच!
.... निरोपाच्या वेळी तिचे पाणीदार डोळे कसे झळकत होते परततांना उंबरठ्यावर आलेली ती, तिच्या नजरेतले भाव सगळे सूत्र व्यक्त करत होते.
"तू किती लपवत होतीस तुझ्या मेहंदी भरल्या हातांना!
तुला हातही उचलता आला नाही मला निरोप देताना!!"
.... तर एकतर्फी प्रेम करणाऱ्यांचा किस्साच निराळा! 'तो' किंवा 'ती' प्रेम करते पण ते समोरच्याला कळतच नाही. आपण जीव तोडून प्रेम करतो. काळजाचं पाणी करतो पण समोरच्याला कळून सुद्धा वळत नाही मग ते शेवटचं प्रेमपत्र तो तिला अर्पण करतो. "माझ्या प्रस्तावाने तुझे मन नाराज झाले असेल कदाचित माझ्याबद्दलच्या तुझ्या भावनाही जळाल्या असतील. तुला माझ्या अस्तित्वाचा रागही येत असेल पण ते तसेच असू दे. फक्त तुझ्यावर एकतर्फी प्रेम करण्याचा मला अधिकार असू दे!" मग काय उरतात फक्त आठवणी. आठवणींचे जग.
"तुझ्या नयनांनी माझ्या नयनांना
असं कसा दगा दिला!
डोळ्यात तुझ्या होकार असता;
तुझ्या ओठांनी कसा नकार दिला!!"
खरंच ह्या हाताश, विकल आणि काळजाला चर लावणार्या चारोळ्या ऐकल्याना की मन उदास होतं आणि ओठांवर "तडप तडप के इस दील से आह निकलती रही" हे विरहगीत येतं!
आयुष्यात सावरण्याची संधी प्रत्येकालाच मिळते. फक्त त्या संधीचं सोनं कसं करता येईल हे त्या व्यक्तिपरत्वे अवलंबून असतं! 'पहिलं प्रेम' जरी अपयशी ठरलं तरी 'दिल तो बच्चा है जी' एक खिलौना टूटा तो क्या हुआ दिल बहलाने के लिये दुसरा ढूंढ ही लेते है! मग हळूहळू या प्रेमविरहातून 'तो' किंवा 'ती' बाहेर पडते आणि आपल्या व्यावसायिक क्षेत्रात ते रमून जातात. पुन्हा नव्याने नक्षत्रांची खेळी भरते आणि हे नभ पुन्हा भरतीला येतात. त्या कोमल, घायाळ हृदयावर पुनश्च स्वातीच्या टपोऱ्या थेंबाचा वर्षाव होतो आणि प्रेमाची स्फुल्लिंगं बाहेर पडतात. पुन्हा हे क्षण नजरेच्या टप्प्यात येतात आणि हा प्रेमाचा संसार पुन्हा फुलून येतो. म्हणतात ना, "एक जखम भरण्यासाठी त्यावर दुसऱ्या प्रेमरूपी नात्यांचा मलम लावावा लागतो" तो हाच की काय कोण जाणे!
प्रेम हे असच असतं कारूण्याची किणार असलेलं,हृदयाला स्पर्शून जाणारं, सांगताविणाच अंतर्मुख करणारं आणि हसता-हसता डोळ्यांच्या कडा ओलावून टाकणारं!
शेवटी एक फार मर्मसत्य सांगणारा शेर आठवला.
"दीलो की बात करता है जमाना,
पर मोहब्बत आज भी चेहरे से शुरू होती है!!"
(पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रेमाची अनुभूती आपण जर अनुभवली असेल तर मायबोलीकरांनी प्रतिसादाच्या रूपात ती मांडावी ही नम्र विनंती)
प्रियकराला सोडणे तोडणे विसरणे
प्रियकराला सोडणे तोडणे विसरणे घसरणे हि कुर्बाणी आहे हे मान्य
पण बाबांचा विचार करून सोडले असल्यास त्यात कुठलाही त्याग नाही
बाबा पहिले, प्रियकर सारे नंतर
बाबांचा विचार करून नाही खर्च
बाबांचा विचार करून नाही खर्च केलेल्या लाखो रुपयांचा विचार करुन
ब्रेन ट्युमर नक्कि कधी झाला
ब्रेन ट्युमर नक्कि कधी झाला होता? कितव्या वर्षी?
ब्रेन ट्युमर झालेल्या कन्येला तिच्या आवडीचा वर पालकानि का निवडु दिला नाही??
बाबांचा विचार करून नाही खर्च
बाबांचा विचार करून नाही खर्च केलेल्या लाखो रुपयांचा विचार करुन
>>>>>
मग खर्च कोणी केले रुपये? बाबांनीच ना..
प्रियकर का नाही आला रुपये घेऊन?
ब्रेन ट्युमर झालेल्या कन्येला
ब्रेन ट्युमर झालेल्या कन्येला तिच्या आवडीचा वर पालकानि का निवडु दिला नाही??
>>>>>
ब्रेनमध्ये ट्युमर झालेली व्यक्ती सारासार विचार करून योग्य निर्णय घेईल याची खात्री नसते म्हणून बाबांनी लाखो रुपये खर्च करून योग्य तो निर्णय घेतला.
(No subject)
माझ्यासाठी प्रेम पहिलं ,दुसरं
माझ्यासाठी प्रेम पहिलं ,दुसरं and so on नसते...पहिलं प्रेम खास यासाठी असते कारण ते सगळं आपण पहील्यांदा अनुभवत असतो म्हणून आपल्या त्या आठवणी खास असतात तोच जोडीदार झाला तरीही किंवा नाही झाला तरीही..(तो/ती)....
पण प्रेम कितीही वेळेस झाले तरीही ते खास असते..
प्रियकर का नाही आला रुपये
प्रियकर का नाही आला रुपये घेऊन?>> प्यार को पैसे में तोल रहे हो बाबु.
प्यार को पैसे में तोल रहे हो
प्यार को पैसे में तोल रहे हो बाबु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>
छे, हा आरोप तर मीच त्या प्रियकरावर करतोय
पण प्रेम कितीही वेळेस झाले
पण प्रेम कितीही वेळेस झाले तरीही ते खास असते..
>>>>
प्लस ७८६
मला तर ३०+ वेळा झालेय. प्रत्येकवेळी खासच वाटलेले. त्यातल्या २६ जणींना मी प्रपोजही केलेले. त्यावर ईथे दोन भाग लिहिलेले. मग ती मालिका लिंक तुटली तसे अर्धवटच राहिली
माझे २६ प्रपोज भाग पहिला
https://www.maayboli.com/node/58006
माझे २६ प्रपोज भाग दुसरा
https://www.maayboli.com/node/58071
ऋन्मेषजी आपलं मत पटलं मला
ऋन्मेषजी आपलं मत पटलं मला!खरतर वयाची एक आयुमर्यादा ओलांडल्यानंतर पालकांनाही वाटतं की आपल्या पाल्यानी आपली काळजी वाहावी.
अखेर वृध्दत्व म्हणजे काय पिकलेल पानच आहे.नविन पालवी आली की ते आपोआप गळून पडणारच!
सस्मित तुम्ही जे म्हणालात ते
सस्मित तुम्ही जे म्हणालात ते काही प्रमाणात खरेपण आहे.कारण निक्की ने आपल्या आजारासाठी जो पैसा बाबांनी खर्च केला आहे त्याची जाण ठेवूनच कदाचीत तिने वडीलांची मर्जी सांभाळणं योग्य समजलं!
वीरू प्रेमासाठी वाट्टेल ते हे
वीरू प्रेमासाठी वाट्टेल ते हे खरे आहे पण भूषी नुकताच job वर लागला होता त्यामुळे त्याच्याकडे तेवढा पैसा नव्हता तिला बरं करायला आणि वडील वारल्यामुळे त्याची परीस्थिती ही बेताचीच होती पण निकीनेच त्याला ही गोष्ट कळू दिली नव्हती तिचे operation ज्या वेळेस झाले तेव्हा कळालं त्याला!
Black widow आपण म्हणालात ते
Black widow आपण म्हणालात ते शतप्रतिशत खरं आहे
पहिलं प्रेम हे पहिलंच असतं आणि खास असतं!
प्रतिसादासाठी धन्यवाद!
मला वाटते
मला वाटते
निकीला डायरेक्ट नाही म्हणता येत नाही म्हणुन ती गोष्ट सांगते. तुम्हाला बहिणीच्या प्रेमाची गोष्ट सांगितली. भुषणला पाल्याच्या जबाबदारीची गोष्ट सांगितली. अर्थात ब्रेन ट्युमर वगैरे खरे असेलही पण ती आई वडिलांच्या शब्दा बाहेर गेली असती असे वाटत नाही.
आपला प्रतिसाद अर्थपूर्ण आहे
आपला प्रतिसाद अर्थपूर्ण आहे निलीमा!
धन्यवाद!
पहिलं प्रेम हे पहिलंच असतं,
पहिलं प्रेम हे पहिलंच असतं, कारण दुसरं प्रेम पहिलं असू शकत नाही. पण प्रेम हे पहिलं, दुसरं, तिसरं, .. , सव्वीसावं वगैरे असू शकतं. म्हणजे एकदाच होतं असं म्हणणं चुकीचं आहे.
हरचंदजी आपलं मत योग्य आहे!
हरचंदजी आपलं मत योग्य आहे!
प्रतिसादासाठी धन्यवाद!
Pages