माज

Submitted by सिद्धेश्वर विला... on 25 June, 2021 - 08:14

स्वैर वारा खेळ खेळतो, लालबुंद मातीशी

कणकणास उंच उडवे, दूरवर आकाशी

रंग वेगळा धूलिकणांचा मिसळला नभांत

सूर्यागमनाने झाल्या दशदिशा मूर्तिमंत

डोकावे अधूनमधून कळस एका मंदिराचा

दावे जणू दिशा कुणा , जरी आसमंत धुरळ्याचा

स्वैर वारा अन कळस , स्थितप्रज्ञ भासले

रंग घेऊनि सोनेरी मात्र धूलिकण माजले

माज उतरला क्षणात आपटले धर्तीवरती

स्वैर वारा मंद झाला , परतली लाल माती

==================================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच!
छान सोपे पण नेमके शब्द निवड व रचना,
प्रतिभा आहे तुमच्यात. अशा कविता लिहा आणखी.

छान..