Submitted by आस्वाद on 11 June, 2021 - 00:27
सुमारे महिन्याभरापूर्वी मला महेश काळे कोण हे नक्की सांगता आलं नसतं. मुळात शास्त्रीय संगीतात काही विशेष रुची नाहीये.
पण एक दिवस अचानक youtube वर एक विडिओ दिसला.
विडिओ मध्ये महेशला बघून त्याच्याविषयी जाणून घ्यावं वाटलं आणि जी माहिती मिळाली ती ऐकून/ वाचून चकित झाले. त्यानंतर वेड्यासारखे सगळे interviews, व्हिडिओ मिळेल ते बघत सुटले. ‘अरुणी किरणी’ तर रिपीट मोड वर ऐकतेय महिन्याभरापासून. कट्यार चे सगळेच गाणे डाउनलोड केले आणि ऐकतच राहिले. कितीदा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. मनावर जणू महेश काळेचं गारुड झालंय. अजून कोणी आहे का माझ्यासारखे वेडे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Wait for my unplugged version
Wait for my unplugged version of mi Hai koli.
Unplugged version म्हणजे
Unplugged version म्हणजे त्यात फक्त इलेक्ट्रिक वाद्ये नसतात (यात छोट्या बॅटरीवर चालणारी सुद्धा आली), पण बाकी वाद्ये ज्याला वीज लागत नाही ती मात्र असू शकतात, ही माझी समजूत बरोबर आहे का?
महेश काळे चे गाणे आवडत नाही.
महेश काळे चे गाणे आवडत नाही. वर अनेकांनी सांगितली आहेत तीच कारणं. बेसूर, नाकात गाणे, लई जोशात आणि लयकारीत टोटली random आणि ठराविक म्हणून नॉट सो random आलाप ताना घेणे. अरे गाणं काय चाललंय जुगलबंदीत समोरच्याशी किंचीत मिळतं जुळत घेतलेलं चालत. वैताग येतो.
त्याच्या स्वभावाशी देणंघेणं नाही, पण आविर्भावावरून फार बरा असेल वाटलं नाही. अर्ध हळकुंड लावत असेल डोक्याला. तर ते जाऊद्या.
राहुल देशपांडे आवडतो. अन्प्लगड मध्ये गाणी संथ म्हणणे, तालाला सोडून देणे याबद्दल ही काही तक्रार नाही, रादर सुरांच्या जवळ जाताना बारकावे बघताना तालाशी कधीमधी फारकत घेतली तर वावगं वाटलं नाही. मला त्यातील खटकलेली गोष्ट म्हणजे तो जे कॉरड्स वाजवतो ते अजिबात कानाला आनंद देणारे नसतात. भारतीय संगीत शिकताना मला कॉरड्स कधी कोणी शिकवल्या न्हवत्या. एका वेळेला त्यातली गम्मत समजली आणि आम्ही सगळ्या गाण्यात उगाच कॉरड्स वाजवून काहीतरी भारी करतोय असं फील वाटून घेऊ लागलो त्याची उगाच आठवण होते दरवेळी. मराठी सुगम संगीत, आलाप इ. अख्खंच्या अख्खं गाणं त्या कॉरड्स मध्ये ऐकायला मला फार बोर होतं. त्यात त्याने चुका केल्या की आणखी रसभंग होतो. मान्य आहे अंप्लगड आहे, पण कशाला अशा भयानक कॉरड्स आणि ते ही मेलडी टोटली सोडून वाजवायचा ते मला समजलं नाही. माबुदो असेल. कुणाला माहीत असेल तर जरूर सांगा.
Unplugged version म्हणजे तो
Unplugged version म्हणजे तो मॉर्फीयस निओला मॅट्रिक्सची जाणीव करून देतो तेव्हा त्याच्या मानेकडची आणि आणखी कुठली कुठली कनेक्शन्स तटातट तुटतात, त्यानंतरची स्थिती - ही माझी समजूत.
पाश्चात्य संगीतात फक्त
पाश्चात्य संगीतात फक्त अकूस्टिक आवाज म्हणजे unplugged. कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण /आवाज नाही. अतुल तुमची व्याख्या बरोबर आहे.
रादे त्याच्या अर्थ रॉ घेत असावा.
>> पाश्चात्य संगीतात फक्त
>> पाश्चात्य संगीतात फक्त अकूस्टिक आवाज म्हणजे unplugged. कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण /आवाज नाही
अमित, धन्यवाद.
काही गायक "Unplugged पहिल्यांदाच गातोय" असे म्हणताना पाहिलंय. पण तबला सूरपेटी व तत्सम वीज न लागणारी इतर अनेक वाद्ये जर साथ देऊ शकत असतील तर unplugged हे वेगळे/आव्हानात्मक का समजले जाते? (विषयांतर आहे पण यासंदर्भात हाच एक प्रश्न. unplugged चा उल्लेख झालाय त्या अनुषंगाने)
अरेरे.. महेश काळेची लोकांनी
अरेरे.. महेश काळेची लोकांनी पारच वाट लावली... भेळ काय न हिमेश रेशमिया काय... धाग्याचे नाव महेश काळे हटर्स क्लब करूयात का?
मला तर भारी आवडलाय, नुसता गायक नव्हे तर एकूण personality... इन्स्टा वर काय मस्त फोटो असतात त्याचे... एका शो मध्ये तो आणि सुबोध भावे आजूबाजूला बसलेत. हिरो तर महेशच दिसतोय त्यात.. हाहा... please आता शास्त्रीय गायकाने असं हॅंडसम कशाला असावं, असा सूर नकोय...
अॅडमिन मोड ऑन.
अॅडमिन मोड ऑन.
मंडळी धागा महेश काळेंच्या गाण्याबद्दल नाहीए. कृपया विषयाला धरून चर्चा करा.
अॅडमिन मोड ऑफ.
वेमांनी माझा प्रतिसाद नीट वाचला नाही. म्हणून दोन शब्द ठळक केलेत.
धन्यवाद भरत . हेच सांगायला
धन्यवाद भरत . हेच सांगायला इथे आलो होतो.
इतर गायकांबद्दल चर्चा करायची असेल तर त्यांचे नवीन धागे सुरु करा.
Oh! Sorry webmaster. लक्षात
Oh! Sorry webmaster. लक्षात आलं नाही आधी.
भरत वाटलंच मला!
भरत
वाटलंच मला!
अजून कोणी आहे का माझ्यासारखे
अजून कोणी आहे का माझ्यासारखे वेडे?>> नाही. नॉट माय टाइप.
म्हणजे महेश काळे कसा दिसतो,
म्हणजे महेश काळे कसा दिसतो, कसा गातो, काय गातो, काय करतो फक्त यावरच चर्चा करायची आहे. त्याच्यापेक्षा कोण चांगला/वाईट गातो, काय गातो यावर चर्चा ईथे करायची नाही.
त्यातून हा फॅन क्लब आहे, म्हणून फक्त म का ची स्तूतीच अपेक्षीत आहे.
महेश काळे कोणते स्किन केअर
महेश काळे कोणते स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरतो?
ढिश्श्यूम् ढिश्श्यूम् महेश:
ढिश्श्यूम् ढिश्श्यूम् महेश:
Google Chrome मध्ये ह्या बातमीच्या लिंकवर जाऊन "Translate to मराठी" करा:
https://www.sfcv.org/articles/feature/after-beating-bollywood-mahesh-kal...
नाय हो भरत, धागा मकाच्या
नाय हो भरत, धागा मकाच्या गाण्यासाठीच सुरु केला होता. त्याचं दिसणं, प्रोजेक्ट्स वगैरे अवांतर.
वर महेश काळे नाकातुन गातो हे
वर महेश काळे नाकातुन गातो हे वाचल्यावर आधीच्या पिढीतले वसंतराव देशपांडे (कुणी जाल का...) आणि कुमारजी (ऋणानुबंधाच्या...) अनुनासिक गायचे कि काय, हा प्रश्न पडला...
मकांचे कुरळे केस व दाढीच्या
मकांचे कुरळे केस व दाढीच्या प्रेमात असाल तर केरळी नट बघा तुम्हाला आवडतील त्यांचे सिनेमे. कुंबलंगी नाइट्स मधली पोरे गोड आहेत गात पण नाहीत.
गोड आहेत गात पण नाहीत. >>>>और
गोड आहेत गात पण नाहीत. >>>>और ये मारा सिक्सर
अमांची अशी वाक्य वाचली की मी स्ट्रेट फेस अमा visualize करते आणि मला प्रचंड हसु येतं.
कुरळ्या केसांचा केरळी मुलगा/पुरुष पटकन आठवला म्हणजे फॅमिली मॅन - सिझन 1 मधला मुसा उर्फ अल कातील.
फॅन क्लब धागा ज्या
आवड किंवा नावड ही व्यक्तीसापेक्ष असते. योग्यच आहे ते.
पण फॅन क्लब धागा ज्या व्यक्तीबद्दल असेल ती व्यक्ती आवडत नसेल तर तो धागा दुर्लक्षित करणे हे इतके अवघड का असावे ?
नको त्या धाग्यांमधे शारुक
नको त्या धाग्यांमधे शारुक आलेला चालतो तर मकाच्या धाग्यात रादे आला तर त्यात एवढा गहजब माजवायचं काय कारण ?
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.......खरच की मीच कोपर्यात उभ्या असलेल्या कुर्हाडीवर जावुन पाय मारलाय :((
आभोआकफ.
आभोआकफ.
हो माझ्या डोळ्यांसमोर पण मुसा
हो माझ्या डोळ्यांसमोर पण मुसा च येतो सारखा .
कोपर्यात उभ्या असलेल्या कुर्हाडीवर जावुन पाय मारलाय>>>>
हर्पेन यांच्याशी सहमत.
हर्पेन यांच्याशी सहमत.
पण फॅन क्लब धागा ज्या
पण फॅन क्लब धागा ज्या व्यक्तीबद्दल असेल ती व्यक्ती आवडत नसेल तर तो धागा दुर्लक्षित करणे हे इतके अवघड का असावे ?
>>>>
काही सेलिब्रेटींबद्दल हे नाही जमत
अश्या सेलेब्रेटी मग हळूच शाहरूखच्या पंक्तीत जाऊन बसतात.
यू कॅन हेट हिम, यू कॅन लव्ह हिम, बट यू कान्ट इग्नोर हिम..
जसे की वरचे प्रतिसाद वाचा. लोकं वाट पाहतात पाहतात आणि स्वत: शाहरूखला धाग्यावर घेऊन येतात
महेश काळे हे देखील आपला हा प्रवास पाहून आता आनंदीत असतील. दुर्लक्षित असा शास्त्रीय गायनप्रकार आणि रागावर वगैरे बेतलीली गाणी गाणारया गायकावर ईतकी चर्चा होतेय, त्याची गाणी शोधून ऐकली जाताहेत, त्यावर बरीवाईट मते व्यक्त होत आहेत हे त्याच्यासाठी बहुधा चांगलेच असावे जर त्याचा दृष्टीकोण व्यावसायिक असेल तर.. आणि नसेल तर त्याला काही फरक पडू नये.
मला महेश काळेंचं अरूणी किरणी
मला महेश काळेंचं अरूणी किरणी हे गाणं आणि कौशिकी चक्रवर्ती बरोबर गायलेलं सूर चराचर छायो हे गाणं आवडतं
हर्पेन - +१११ लोकं टवाळखोरी
हर्पेन - +१११ लोकं टवाळखोरी करण्यातच धन्यता मानतात...
मला महेशचं ’शब्दावाचून कळले सारे’ पण फार आवडतं. (भाई चित्रपट)
कुरळ्या केसांचा केरळी मुलगा
कुरळ्या केसांचा केरळी मुलगा/पुरुष पटकन आठवला म्हणजे फॅमिली मॅन - सिझन 1 मधला मुसा उर्फ अल कातील.
>>> आजच पहिले दोन एपिसोड पाहिले फमेली मॅन 1 चे. मुसा म्हणजेच अल कातिल वाचून धक्का बसला...
वर काही प्रतिसादांतून आलेली
वर काही प्रतिसादांतून आलेली उल्लेखनीय गाणी:
१. अरूणी किरणी
२. शब्दावाचून कळले सारे
३. सूर चराचर छायो
४. सुरत पिया की
५. कानडा राजा पंढरीचा
अतुल, त्यात ‘सुरत पिया की’
अतुल, त्यात ‘सुरत पिया की’ (कट्यार) पण ऍड करा
Pages