सखे इतके दिवस आपण घालवले सोबत
पण तुला नाही कळली माझ्या प्रेमाची कुवत!
आता तू तोडला माझ्याशी संबंध,
म्हणून घातले स्वतःवर निर्बंध!!
प्रिये तू आता एक काम करशील का.....
माहित आहे का तुला तुझ्यासोबत राहता-राहता!
मि घातला बराच पैसा खर्ची
आता माझ्या तोंडाला लागली आहे मिरची!!
त्यातले तू काही परत करशील का?
कॅन्टीन च्या समोस्याचे राहू दे
पण रेस्टॉरंट मधल्या पिझ्झाचे परत करशील का?
कोल्ड्रिं्स चे हवे तर राहू दे
पण पाइन ऍपल शेक चे परत करशील का?
तुझ्यासोबत राहून मी पुरता झालो कंगाल,
झालो आता वेडा-पिसा अन् वेड बंगाल!
हे प्रिये वाईट वाटून घेऊ नको,
दुनियादारित उतरलो आहे मी जसा!
मी दिसतो असा तसा
पण मला समजू नको तसा!!
अल्पेनलीबे चे राहू दे,
पण कॅडबरी चे परत करशील का?
स्लीपर चप्पल चे राहू दे,
पण पेन्सिल टोक संडल चे परत करशील का?
गुलाब पु श्पाचे असू दे,
पण बुके चे परत करशील का?
नाटकाचे वाटलं तर नको देऊ,
पण मल्टिप्लेक्स मधल्या पिक्चर चे परत करशील का?
काय करू प्रिये
हीच तर आहे जगाची रित!
मी जीवापाड प्रेम केले तुझ्यावर,
पण तुला नाही कळली प्रीत!!
लिपस्टिक चे राहू दे,
पण परफ्यूम चे परत करशील का?
रुमालाने राहू दे पण,
जीन्स आणि टॉप चे परत करशील का?
अश्या मी बऱ्याच वस्तूंची केली लिस्ट,
प्रेमामध्ये असते अशे बरेच ट्विस्ट!
का करावा मी प्रेमाचा विषाद;
जीवनाचा आनंद लुटावा मनमुराद!!
Hmmmmm..
Hmmmmm..
एकुण किती रुपयाचा फटका बसला.
एकुण किती रुपयाचा फटका बसला.
बुडीत खात्यात लिहा आता.. बाकी
बुडीत खात्यात लिहा आता.. बाकी कविता भारी...
(No subject)
खूप-खूप आभार
खूप-खूप आभार
मन्या,विरू,रुपाली आणि हाडळीचा आशिक!
मस्त
मस्त
तेजो आपल्या प्रतिसादाबद्दल
तेजो आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
भारीए की कविता
भारीए की कविता
प्रेरणा: लेकिन पहले देदो मेरा
प्रेरणा: लेकिन पहले दे दो मेरा पांच रुपय्या बारा आना ?
अत्यंत आशयघन कविता!
अत्यंत आशयघन कविता!
हस्ताक्षर आणि शुद्धलेखनावर घेतलेली प्रचंड मेहनत विशेष भावली.
सर्वसामान्य जनतेवर आपल्या प्रेयसीसाठी खर्च केलेले पैसे परत मागायची वेळ आणल्याबद्दल मोदी सरकारचा जाहीर णीशेद
गुलजार आठवले:एक दफा वो याद है
गुलजार आठवले:
एक दफा वो याद है तुमको, बिन बत्ती जब साईकिल का चालान हुआ था हमने कैसे भूखे प्यासे बेचारों सी एक्टिंग की थी, हवलदार ने उल्टा एक अठन्नी दे कर भेज दिया था
एक चवन्नी मेरी थी, वो भिजवा दो....
तात्पर्य: वेळच्या वेळीच आपली
तात्पर्य: वेळच्या वेळीच आपली चवन्नी घेऊन टाकायची.
बिल भरतानाच अर्धे अर्धे भरावे किंवा एक वेळा याने, एक वेळा तिने असे करावे. नगद आणि चोख व्यवहार ठेवायचा.
उगाच मी व्यवहारी नाही अशी नाटके करू नये.
नाहीतर शेवटी पस्तावण्याची, अशा बोंब मारणाऱ्या कविता शायरी करण्याची वेळ येते.
छान आहे आशय
छान आहे आशय
आवडली कविता
रुमालाचे राहू दे पण,
जीन्स आणि टॉप चे परत करशील का?
>>>>>
"ब्रांडेड रुमाल" असेल तर बिलकुल सोडू नका त्याचेही पैसे
मेरा कुछ सामान तुम्हारे पास
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है.. ( पर्फुम, जीन्स, टॉप्स )
किती खर्च केला तुम्ही.. असा खर्च कायम bad debt च असतो..
तिची प्रेमपत्रे किंवा मेसीज
तिची प्रेमपत्रे किंवा मेसीज तिच्या घरच्यांना किंवा आजी बॉयफ्रेंड ला दाखवेन म्हणा .. दिलंय ते व्याजासकट वसूल करा..
देव करतो ते भल्यासाठी असे
देव करतो ते भल्यासाठी असे समजावे
उद्या लग्न करून तिने टांग दिली असती तर पोटगी म्हणून जे पुढे कमावणार आहात त्यातलेही निम्मे द्यावे लागले असते
अतिसुंदर! जेव्हा प्रेमतरंग
अतिसुंदर! जेव्हा प्रेमतरंग मनःपटलावर ताडन करत राहतात तेव्हा असा शब्दकल्लोळ प्रस्फुटित होणारच.
खर्चाची बिलं सांभाळुन ठेवली
खर्चाची बिलं सांभाळुन ठेवली असतील तर सांगा. वकीलाचा सल्ला घेता येईल.
अक्कल खाती जमा समजायचे. आणि
अक्कल खाती जमा समजायचे. आणि पुढील वेळी फक्त ऑनलाईन भेटायचे . स्विग्गी ने आपल्या पैशात आपल्याच घरी जेवायचे. तीचे बिल तिच्या खात्यावर.
प्रतारणेचा मार
प्रतारणेचा मार
वर बिलांचा भार
हाय रे प्रेमभंगा
प्रेमाला व्यवहाराचा
विळखाच फार
कवी नुसता खर्चच करत राहिला.
कवी नुसता खर्चच करत राहिला. परतावा काही मिळला नाही वाटतं.
सस्मित परतावा मिळाला असेल कि.
सस्मित परतावा मिळाला असेल कि..
कवी ने लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट केली होती.. पण तिने शॉर्ट टर्म कॅपिटल गेन देऊन कंपनी पार्टनरशिप ब्रेक केली..
चंद्रमा
चंद्रमा
विषय अन कविता छान
एक अवांतर
तुम्ही ज्या पद्धतीने कविता मांडली आहे , तसे पाहता
नाटकाचे तिकीट हे सध्या मल्टीप्लेक्स पेक्षा हि महाग आहे .
ते उलट असायला हवे
तिच्या सहवा साचा आनंद घेतला
तिच्या सहवा साचा आनंद घेतला ना तो अमूल्य. त्याची पैशात किंमत का बरे करायची. तिच्या निर्णयाचा मान ठेवा व अक्कल खाती जमा करून
बाजूला व्हा. तुमची वहिदा तुम्हाला भेटेलच. ( ह्याला वपूंच्या मीच तुमची वहिदा ह्या कथेचा संदर्भ आहे. तो नवरा असाच सुंदर परस्त्रीयां डे बघून व्यथित होतो तेव्हा बायको त्याला असे म्हणते.)
तिच्या सहवा साचा आनंद घेतला
तिच्या सहवा साचा आनंद घेतला ना तो अमूल्य. त्याची पैशात किंमत का बरे करायची.
>>>>>>
एक्झॅक्टली असाच विचार करून सहवासाचा आनंद लुटत असताना पैश्याचा विचार केला जात नाही. तसेच आता आपली सोबत आयुष्यभरासाठी आहे अशी फिलींग त्या काळात असल्याने काय तुझे माझे करायचे, जे आहे ते दोघांचे असाच विचार केला जातो.
पैश्यांचा विचार तर नाते तुटल्यावर सुरू होतो जे स्वाभाविकच आहे कारण आता ती फिलींग ऊरली नसते
यातही दोन प्रकार असतात
जर मन अजूनही एकतर्फी अडकून असेल तर ब्रेक अप नंतर तिचे आपल्या आयुष्यात नसणे हाच मोठा लॉस असतो. मग पैश्याच्या नुकसानीचे विचार मनात येत नाही.
पण जर मन त्या गुंत्यातून बाहेर पडले असेल तर मग वर सांगितले तसे या काळात किती पैसे गमावले हा विचार मनात येतोच. स्पेशली काही पोरं चादरीच्या बाहेर जाऊन खर्च करून बसली असतात. त्यातही समोरची मुलगी त्याच हिशोबानेच रिलेशनमध्ये असेल तर तिने मजबूत कापलेले असते.
एक किस्सा आठवतोय...
आता झोप आलीय, नंतर उठल्यावर सांगतो.
अमा,ऋन्मेशजी,बिपिनजी,श्रवु
अमा,ऋन्मेशजी,बिपिनजी,श्रवु,सस्मित आपल्या मनमुराद प्रतिसादासाठी फार-फार धन्यवाद!
विशेष आभार वीरूचे त्यांनीच या
विशेष आभार वीरूचे त्यांनीच या कवितेला न्याय मिळवून दिला.
सियोना,जिद्दु,मृणाली,मानवी
सियोना,जिद्दु,मृणाली,मानवी,अतुल,व्यत्यय आपले सर्वांचे प्रतिसाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत!
धन्यवाद!
सियोना,जिद्दु,मृणाली,मानवी
सियोना,जिद्दु,मृणाली,मानवी,अतुल,व्यत्यय आपले सर्वांचे प्रतिसाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत>>> कसे ?
विशेष आभार वीरूचे त्यांनीच या
विशेष आभार वीरूचे त्यांनीच या कवितेला न्याय मिळवून दिला.>> हा तुमचा मोठेपणा झाला.
पण तुमची कविता खरोखर आगळीवेगळी होती. एका व्यवहारी तरुणाचे चित्रण केले आहे तुम्ही कवितेत.
Pages