Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पोहे दोनदा धुवून पहा.
पोहे दोनदा धुवून पहा.
मायबोलीवर पोह्यांची उकड अशी रेसिपी आहे.
कांदेपोह्यांसाठी पाण्याने
कांदेपोह्यांसाठी पाण्याने भिजवून निथळले तरी जाड्च, ड्राय राहतायत.>>> मग पुन्हा त्यावर पाण्याचा हबका मारायचा. माझी आई दगडी पोहे असतात ते वापरायची. आपण साबुदाणे जसे आदल्या रात्री भिजवतो तसे हे जाड पोहे भिजवावे लागतात.
इडलीच्या पीठात वापरता येतील किंवा ते तळून चिवडा करता येईल.
कांदेपोह्यांसाठी पाण्याने
कांदेपोह्यांसाठी पाण्याने भिजवून निथळले तरी जाड्च, ड्राय राहतायत. >>>> माझ्याकडेही असे पोहे आहेत.हे पोहे कडधान्यासारखे पाण्यात ५ मिनिटे भिजवून ठेवा.मग चाळणीवर उपसून घ्या.तसेच पोह्याचे प्रमाण नेहमीपेक्षा थोडे कमी घ्या.फुलल्याने जास्त होतात.मला उलट हे पोहे चवीला आवडले.
उशीरा उत्तराबाबत क्षमस्व!
पोह्याचे कटलेट करता येतिल.
पोह्याचे कटलेट करता येतिल.
पोहे आणि बटाट्याच्या
पोहे आणि बटाट्याच्या पराठ्याच्या पाकृचा हा व्हिडिओ मी दोन-तीन दिवसांपूर्वी बघितला. छान वाटतोय पराठा.
https://youtu.be/kXeGiJ673Z8
धन्यवाद धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद धन्यवाद सर्वांना.
देवकी, भरत, सोनाली बरोबर आहे. मी पोहे दोन तीनदा धुतले आणि पाण्यात भिजवून ठेवले ५ मिनिटे अॅन्ड इट वर्क्ड!
आता मला पाहिजे तसे झाले
कांदेपोहे वारंवार करत असल्याने मोठे पॅकेट आणले होते आणि तेही नेमके दुसर्या ब्रँडचे.
वावे ती लिंक मस्त आहे आणि रेसिपीपण. त्यातल्या रायते तर फारच आवडले आहे. करुन पाहीन.
मी एकदा चुकून कुठल्या तरी
मी एकदा चुकून कुठल्या तरी भलत्याच ब्रॅंडचे पोहे आणले होते.. ते पण भिजायला फार वेळ घ्यायचे.. मग डोसे बनवण्यासाठी डाळ, तांदूळ भिजत घातले की त्यात एक एक वाटी घालून संपवले. किन्वाचे डोसे बनवत असाल तर त्यातही घालता येतात.
दानणगिरी डोस्यांमधेही पोहे वापरले जातात.
पोह्याचे लाडू पण करतात.
पोह्याचे लाडू पण करतात. शिल्पा शेट्टीला जमले मग आपल्यालाही जमतील....
हो रायतंपण मस्त आहे त्यातलं.
हो रायतंपण मस्त आहे त्यातलं. ते चॅनल चांगलं वाटलं मला.
पोह्यांचा उपमा वाचलेला
पोह्यांचा उपमा वाचलेला कुठेतरी. पोह्यांचा mixer मधून रवा काढून घ्यायचा व कांद्याच्या फोडणी वर रवा टाकून जरासाच परतून मग पाण्याचा हबका देत देत उपमा बनवायचा....
करून पहा....
चकल्या करा की , मस्त होतात
चकल्या करा की , मस्त होतात
भिजलेल्या पोह्याचे कांदा आणि
भिजलेल्या पोह्याचे कांदा आणि बेसन घालून वडे मस्त होतात पण तेल खूप पितात.
पोह्याचे पापड म्हणजे मिरगुंड
पोह्याचे पापड म्हणजे मिरगुंड पण छान बनतात. उन्हाळी सुट्टीत होऊन जातील.
वालभाताची (डाळींबी भाताची)
वालभाताची (डाळींबी भाताची) मसाल्यासकट पाकृ द्या कुणीतरी.
आले जिरे धणे भाजलेले सुक्के
आले ,जिरे ,धणे ,भाजलेले सुक्के खोबरे, हिरवी मिर्ची ,कोथिम्बीर वाटुन घेणे. तांदूळ धुवून अर्धा तास भिजवणे. हिन्ग मोहरीची फोडणी करुन त्यात तांदुळ टाकुन भाजायचे म वाटलेला मसाला घालुन परतणे मिठ घालने. म वाल घालणे भिजवलेले. चवीला गुळ घालणे. म तांदळा ला लागते त्याप्रमाणे पानी गरम करुन घालणे. पातेल्यात शिजवू शकता नाहितर कुकर ला ही.
तुपावर लवंग्,मिरी,दालचिनी
तुपावर लवंग्,मिरी,दालचिनी,तमालपत्राची फोडणी देऊन त्यात कांदा परतवायचा.आले लसूण् , हि.मी यांची पेस्ट घालायची.धुतलेले तांदूळ त्यात परतवायचे.नंतर वाल घालायचे.भातात घालायच्या पाण्यात कच्चा खडा मसाला उकळून घ्यावा.
वावेच्या लिन्कमधील रायत मस्त
वावेच्या लिन्कमधील रायत मस्त आहे. करून पाहीन .
माधव विपु पहा
माधव विपु पहा
पोहे संपवायला गडबड कशाला ?
पोहे संपवायला गडबड कशाला ?
राहतात 1,2 महिने
अमुपरी, देवकी धन्यवाद.
अमुपरी, देवकी धन्यवाद.
पिझ्झा बेस आणून घरी पिझ्झा
पिझ्झा बेस आणून घरी पिझ्झा करायचा आहे. तर त्यावर कांद्याच्या पातळ चकत्या, शिमला मिरचीचे तुकडे ई. टाकून , पॉन मध्ये बेसला खालच्या बाजूने बटर लावून केल्यास , कांदा आणि शिमला मिरची कच्ची लागत नाही का? कुणीतरी सांगा.. ओवन नाहीये.
डबल पैनमधे बनवावा लागेल
डबल पैनमधे बनवावा लागेल .रेडिमेड पिझ्झा बेस वापरणार असाल तर बेसला थोडं पाणी लावा नाहीतर खालून कडक आणि वर भाज्या कच्च्या राहतात. मी बटर लावून ट्राय नाही केलंय.
१. भाज्या आधी थोड्या शिजवून्
१. भाज्या आधी थोड्या शिजवून्/ब्लांच करून घ्या.
२. ओव्हन मधे आग बंद भांड्याच्या आत असते, व त्यातच पदार्थ ठेवलेला असतो. आपल्याकडच्या स्वयंपाकात आग भांड्याच्या बाहेर असते. वातावरणातील फरकाचा परिणाम आहे. पिझा ओव्हन व तंदूरमधे भरपूर साम्य आहे.
सो कुकरमधे केक जसा शिजवला जातो, तेच टेक्निक वापरून पिझ्झा करता येतो. कोरडे भांडे, त्यात ताटलीत पिझ्झा. वर हलके झाकण.( कोंडलेल्या वाफेवर शिजवायचे नाहिये तर वरतून उष्णता लागायला हवी आहे.) म्हणजे तापलेल्या ओव्हनसारखे काम होते. वेळ जास्त लागेल, पण बेस न करपता सगळे नीट शिजेल. नंतर क्रस्ट तव्यावर खरपूस करून घ्यावी, म्हणजे योग्य चव येईल.
मी पिझ्झा बेस ऐवजी अर्धा कच्चा गाकर वापरतो. थिन क्रस्ट होल व्हीट बेस. फक्त यीस्ट लिव्हनिंग नसते. थोडा बद्द लागतो. पण थोडे मोहन घातले तर खरपूस होतो.
आरारा, मस्त टिप्स
आरारा, मस्त टिप्स
तुम्ही बनवता तो गाकर चा पिझ्झा भारतीय डॉमिनोज मध्ये थिन क्रस्ट होल व्हीट म्हणून मिळायचा.पण त्याला प्रतिसाद इतका कमी मिळाला की बिचाऱ्या लोकांनी तो मेनूतून काढून नेहमीच्या मैद्याच्या जाड गाद्या चालू ठेवल्या
बर्गर करताना कांद्याच्या
बर्गर करताना कांद्याच्या चकत्या व पिझा वर घालायच्या कांदा सिमला मिर्चीचे तुक डे मी तेलावर परतून घेते. कच्चे बरे वाटत नाहीत.
अमाने mhatalyapramane
अमाने mhatalyapramane thodyasha तेलावर कांदा, सिमला मिरची अर्धवट शिजवून घेते. पिझा बेसच्या आतल्या बाजूला हलके बटर लावून तव्यावर गरम करते नंतर त्यावर piza सॉस लावायचा.भाज्या pasarvayachya.ओरिगानो घालून चीझ घालायचे.पिबेच्या खालच्या बाजूला बटर लावून तव्यावर ठेवायचा.वर झाकण thevayache.मस्त पिझा होतो.
मी ओवनमध्ये वेळ लगतो म्हणून त्यात करत नाही.दुसरे म्हणजे तव्याच्या खाली अजून एक तवा वापरायचा.
2 तवे घेतल्यास पिबे खालून करपत नाही.
धन्यवाद सगळयान
धन्यवाद सगळयान
करून बघते आणि इथे update देते कसं झाला ते..
वरची भाजी आम्ही पूर्ण शिजवूनच
वरची भाजी आम्ही पूर्ण शिजवूनच घेतो
उष्णतेची कामे तीनच
वरचे चीज वितळणे
लादी खालून भाजणे
घरभर करपट वास सुटणे
पिबेच्या खालच्या बाजूला बटर
पिबेच्या खालच्या बाजूला बटर लावून
<<
नेमकं कशाच्या खालच्या बाजूला बटर लावलं त्याबद्दल दोन मिन्टं जाम कन्फूजन.
चैला, माबो अन इथले शॉर्ट फॉर्म्स!
हाहाहा.. आणि नंतर भाजलं पण
हाहाहा.. आणि नंतर भाजलं पण आहे खरपूस.
Pages