Submitted by अ'निरु'द्ध on 18 June, 2019 - 09:48
आडरानी दाट
भग्न शिवालय
उध्वस्त पाषाण
तयाचेही...
खुल्या प्रांगणात
सोसे उन्ह ताप
नंदी पाषाणाचा
धष्टपुष्ट...
पसरी आवारे
पाला नि पाचोळा
सुखे विहरती
नाग सर्प...
वन्य श्वापदांचा
अवचित डेरा
वाघाचाही फेरा
कधिमधी...
कधी काळी कोणी
एखादा पांथस्थ
आणिक भाविक
तुरळक...
योगी साधकांचा
कधी पदस्पर्श
परी अशा वेळा
कवचित...
गाभारी विलसे
सदा ही अंधार
जागे गूढ भाव
अंतरीचा...
परि रोज एक
दिवटी ती तेवे
तिजला पेटवे
कोण जाणे...
अशा त्या काळोखा
भेदी तो प्रकाश
भासवोनी त्यास
गूढगर्भ...
परि साधकासी
नसे भय चिंता
जागे आत्मज्योत
अंतरंगी...
माथा मी टेकिता
आरण्यकेश्वरा
वाहे डोळा पाणी
अनिरुद्ध... !!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शब्दचित्र रेखाटलं आहे. ते ही
शब्दचित्र रेखाटलं आहे. ते ही ६/४ या साडेतीन चरणी अभंगाच्या स्वरूपात.
तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे निरुदा !
छान कविता, आवडली.
छान कविता, आवडली.
परि साधकासी
नसे भय चिंता
जागे आत्मज्योत
अंतरंगी...
>>>> वाह.
सुंदर!
सुंदर!
Pages