शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

११ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही उपशब्दांची शोधसूत्रे अशी :

१ २ योग्य स्थान
३ ४ संकटाची वेळ

५ ६ तऱ्हा ..... परि
७ ८ ग्रहणांचा स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ

९-१० अपूर्णांक (विशिष्ट आकडा नाही)
११ संस्कृत नामे व विशेषणांना लावायचा प्रत्यय..... त्व

संपूर्ण : काही बाबतींतला फरक

३ ४ संकटाची वेळ --- घात (वेळ), पेच, विघ्न, दशा,

५ ६ तऱ्हा -- रीत, वृत्ती, ढब, ढंग, (नाना) परी

७ ८ ग्रहणांचा स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ -- वेध, पुण्य

९-१० अपूर्णांक (विशिष्ट आकडा नाही) --- हिस्सा, अंश, भाग, कोर, कला

११ संस्कृत नामे व विशेषणांना लावायचा प्रत्यय >>> आधी लागणार की नंतर?

देवकी
सर्व नाही
पण
११ ला 'क्त' या धर्तीवर अन्य शोधा.
म्हणजे जोडाक्षर

पाय? २२/७ नाही.
विशिष्ट अंक नाही.

* * चा अर्थ अपूर्णांक आहे.

मानव,
छान !
देशकालपरिस्थितिभिन्नत्व

१ २ योग्य स्थान ....देश
३ ४ संकटाची वेळ….. काल

५ ६ तऱ्हा …….परि
७ ८ ग्रहणांचा स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ….. स्थिति

९-१० अपूर्णांक (विशिष्ट आकडा नाही)..... भिन्न
११ संस्कृत नामे व विशेषणाना लावायचा प्रत्यय ...त्व

एका पुस्तकातून खालील उतारा घेतला आहे. त्यातिल काही शब्द गाळुन त्या ठिकाणी गाळलेल्या शब्दांची अक्षरसंख्या कंसात दिलेली आहे. आपल्याला योग्य वाटतील असे तेवढे अक्षरी शब्द लिहून उतारा पूर्ण करायचा आहे. पुस्तक आणि लेखकाचे नाव शेवटी जाहीर करण्यात येईल.

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

माणूस (३) पावला की त्याच्या फक्त आठवणी उरतात, असं युरीपिडीसचं म्हणणं होतं, तर ’ (२) संपला की आत्माही नष्ट होत’ असं डेमोक्रिटस स्पष्टपणे म्हणत असे. अशा प्रकारे ग्रीक तत्वज्ञांमध्ये आत्म्याबद्दल मत-मतांतरं होती.

रोमन लोक (६) होते. (३) वाढवावं, संपत्ती मिळवावी, चांगल्या गोष्टींचा (४) घ्यावा अशी त्यांची (२) होती. आत्मा आणि (५) स्थिती याच्यासंबंधी त्यांनी फार विचार केला नव्हता. प्राचीन चीनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये (६) जीवनाबद्दल आणि आत्म्यासंबंधी वेगवेगळ्या समजुती (४) असल्याचं दिसतं. मात्र चिनी तत्वज्ञ कन्फ्युशियसही आत्मा मानत असावा असं दिसत नाही. " (५) आपलं काय होतं?" या प्रश्नावर "जिवंतपणी आपलं काय होणार हे जर आपल्याला नीटसं कळत नाही, तर (६) आपलं काय होणार याचा विचार करण्यात काय फायदा आहे?" असा (४) तो करत असे.

पारशी लोकांमधील (७) मृतात्मा तीन दिवस प्रेताभोवती (४) असतो. अखेरीस या देहाचा उपयोग नाही अशी (६) आत्म्याची खात्री पटली की मगच तो आत्मा त्याच्या (७) दूर हटतो. त्यामुळे पारशी लोकांमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचा मृतदेह तीन दिवस ठेवून मगच त्याच्यावर (५) करण्याची प्रथा पडली.

आपल्याकडे (३) आत्म्यांची जी भुतं बनतात ती (४) आहेत. भारतात वेगवेगळे धर्म, जाती, जमाती यानुसार (६) अनेक प्रकार कल्पिलेले असून मुंजापासून (८) त्यांच्या श्रेणीही पाडलेल्या आहेत. अशा प्रकारे प्राचीन काळापासून विविध संस्कृतींमध्ये आत्म्यांविषयी विविध समजुती प्रचलित असल्याचं आढळून येतं. थोडक्यात सांगायचं तर आत्मा ही संकल्पना (४) चालत आल्याचं दिसतं. साहजिकच सर्वदूर सर्वपरिचित अशा या आत्म्याचं गूढ उकलण्याचे, आत्म्याचं (३) तपासून पहाण्याचे प्रयत्न झाले नसते तरच नवल!

गेले शतकभर शास्त्रीय (४) आधारे आत्म्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न (४) चालवला आहे. त्यातला पहिला प्रयत्न असा.

इ. स. १९२१ मध्ये डंकन मॅक्डुगल या (८) "२१ ग्रॅम" या नावाने प्रसिद्ध असलेला प्रयोग केला होता. एखादी व्यक्ती (५) तिचं वजन किती कमी होतं हे बघण्याचा त्याच्या प्रयोगाचा हेतू होता. त्याने अशा सहा व्यक्तींची तपासणी केली होती. तेव्हा या व्यक्तींचं (४) वजन आणि (५) लगेचच केलेलं वजन यात ११ ते ४३ ग्रॅमचा फरक पडतो, असं त्याला दिसलं. हे कमी झालेलं वजन (३) असणार असा त्याने निष्कर्ष काढला. वृत्तपत्रांनी बातमी देताना य सर्व वजनांची बहुधा (४) काढून "आत्म्याचं वजन २१ ग्रॅम" असा (५) मथळा छापला होता. यानंतर इतर शास्त्रज्ञांनी जेव्हा असेच प्रयोग केले तेव्हा मॅक्डुगलच्या प्रयोगांना दुजोरा देणारे निष्कर्ष मिळू शकले नव्हते. त्यामुळे मॅक्डुगलना प्रसिद्धी मिळाली तरी त्या प्रयोगांना "प्रमाण" म्हणून मानायला वैज्ञानिक (५) नाकारलं.

माणूस (मरण) पावला की त्याच्या फक्त आठवणी उरतात, असं युरीपिडीसचं म्हणणं होतं, तर ’ (जीव) संपला की आत्माही नष्ट होत’ असं डेमोक्रिटस स्पष्टपणे म्हणत असे. अशा प्रकारे ग्रीक तत्वज्ञांमध्ये आत्म्याबद्दल मत-मतांतरं होती.
रोमन लोक (उपभोगवादी ) होते. (साम्राज्य) वाढवावं, संपत्ती मिळवावी, चांगल्या गोष्टींचा ( उपभोग ) घ्यावा अशी त्यांची वृत्ती होती. आत्मा आणि (मृत्यूपश्चात ) स्थिती याच्यासंबंधी त्यांनी फार विचार केला नव्हता. प्राचीन चीनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये (मृत्यूनंतरच्या ) जीवनाबद्दल आणि आत्म्यासंबंधी वेगवेगळ्या समजुती (प्रचलित) असल्याचं दिसतं. मात्र चिनी तत्वज्ञ कन्फ्युशियसही आत्मा मानत असावा असं दिसत नाही. " (मरणोत्तर) आपलं काय होतं?" या प्रश्नावर "जिवंतपणी आपलं काय होणार हे जर आपल्याला नीटसं कळत नाही, तर (मरणानंतर) आपलं काय होणार याचा विचार करण्यात काय फायदा आहे?" असा (युक्तिवाद) तो करत असे.

पारशी लोकांमधील (संकल्पनेनुसार) मृतात्मा तीन दिवस प्रेताभोवती (वावरत) असतो. अखेरीस या देहाचा उपयोग नाही अशी (६) आत्म्याची खात्री पटली की मगच तो आत्मा त्याच्या (मृतदेहापासून) दूर हटतो. त्यामुळे पारशी लोकांमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचा मृतदेह तीन दिवस ठेवून मगच त्याच्यावर (अंत्यसंस्कार ) करण्याची प्रथा पडली.
आपल्याकडे (अतृप्त ) आत्म्यांची जी भुतं बनतात ती (काल्पनिक) आहेत. भारतात वेगवेगळे धर्म, जाती, जमाती यानुसार (भूतपिशाच्चांचे) अनेक प्रकार कल्पिलेले असून मुंजापासून (भानामतीपर्यंतच्या) त्यांच्या श्रेणीही पाडलेल्या आहेत. अशा प्रकारे प्राचीन काळापासून विविध संस्कृतींमध्ये आत्म्यांविषयी विविध समजुती प्रचलित असल्याचं आढळून येतं. थोडक्यात सांगायचं तर आत्मा ही संकल्पना (पूर्वापार ) चालत आल्याचं दिसतं.
साहजिकच सर्वदूर सर्वपरिचित अशा या आत्म्याचं गूढ उकलण्याचे, आत्म्याचं (अस्तित्व ) तपासून पहाण्याचे प्रयत्न झाले नसते तरच नवल!
गेले शतकभर शास्त्रीय (प्रयोगांच्या) आधारे आत्म्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न (अविरत / सातत्याने ) चालवला आहे. त्यातला पहिला प्रयत्न असा.

इ. स. १९२१ मध्ये डंकन मॅक्डुगल या (शरीरवैज्ञानिकाने ) "२१ ग्रॅम" या नावाने प्रसिद्ध असलेला प्रयोग केला होता. एखादी व्यक्ती (मेल्यानंतर ) तिचं वजन किती कमी होतं हे बघण्याचा त्याच्या प्रयोगाचा हेतू होता. त्याने अशा सहा व्यक्तींची तपासणी केली होती. तेव्हा या व्यक्तींचं (मृत्युपूर्व) वजन आणि (मेल्यानंतर ) लगेचच केलेलं वजन यात ११ ते ४३ ग्रॅमचा फरक पडतो, असं त्याला दिसलं. हे कमी झालेलं वजन (आत्म्याचे) असणार असा त्याने निष्कर्ष काढला. वृत्तपत्रांनी बातमी देताना य सर्व वजनांची बहुधा (सरासरी ) काढून "आत्म्याचं वजन २१ ग्रॅम" असा (सनसनाटी ) मथळा छापला होता.
यानंतर इतर शास्त्रज्ञांनी जेव्हा असेच प्रयोग केले तेव्हा मॅक्डुगलच्या प्रयोगांना दुजोरा देणारे निष्कर्ष मिळू शकले नव्हते. त्यामुळे मॅक्डुगलना प्रसिद्धी मिळाली तरी त्या प्रयोगांना "प्रमाण" म्हणून मानायला वैज्ञानिक (मान्यवरांनी /परिषदांनी) नाकारलं.

माणूस (३ मरण) पावला की त्याच्या फक्त आठवणी उरतात, असं युरीपिडीसचं म्हणणं होतं, तर ’ (२ देह) संपला की आत्माही नष्ट होत’ असं डेमोक्रिटस स्पष्टपणे म्हणत असे. अशा प्रकारे ग्रीक तत्वज्ञांमध्ये आत्म्याबद्दल मत-मतांतरं होती.

रोमन लोक (६ इहलोकवादी) होते. (३ साम्राज्य) वाढवावं, संपत्ती मिळवावी, चांगल्या गोष्टींचा (४ रसास्वाद) घ्यावा अशी त्यांची (२ मते) होती. आत्मा आणि (५ मरणोत्तर) स्थिती याच्यासंबंधी त्यांनी फार विचार केला नव्हता. प्राचीन चीनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये (६ मरणपश्चात) जीवनाबद्दल आणि आत्म्यासंबंधी वेगवेगळ्या समजुती (४ प्रचलीत / अस्तित्वात) असल्याचं दिसतं. मात्र चिनी तत्वज्ञ कन्फ्युशियसही आत्मा मानत असावा असं दिसत नाही. " (५ मेल्यानंतर) आपलं काय होतं?" या प्रश्नावर "जिवंतपणी आपलं काय होणार हे जर आपल्याला नीटसं कळत नाही, तर (६ जगल्यानंतर) आपलं काय होणार याचा विचार करण्यात काय फायदा आहे?" असा (४ युक्तिवाद) तो करत असे.

पारशी लोकांमधील (७ समजुतीप्रमाणे) मृतात्मा तीन दिवस प्रेताभोवती (४ घोटाळत) असतो. अखेरीस या देहाचा उपयोग नाही अशी (६ घुटमळणाऱ्या ) आत्म्याची खात्री पटली की मगच तो आत्मा त्याच्या (७ मृतदेहापासून) दूर हटतो. त्यामुळे पारशी लोकांमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचा मृतदेह तीन दिवस ठेवून मगच त्याच्यावर (५ अंत्यसंस्कार) करण्याची प्रथा पडली.

आपल्याकडे (३ अतृप्त) आत्म्यांची जी भुतं बनतात ती (४ विविधांगी ) आहेत. भारतात वेगवेगळे धर्म, जाती, जमाती यानुसार (६ भूतपिशांच्चंचे) अनेक प्रकार कल्पिलेले असून मुंजापासून (८ कर्णपिशाच्चापर्यंत) त्यांच्या श्रेणीही पाडलेल्या आहेत. अशा प्रकारे प्राचीन काळापासून विविध संस्कृतींमध्ये आत्म्यांविषयी विविध समजुती प्रचलित असल्याचं आढळून येतं. थोडक्यात सांगायचं तर आत्मा ही संकल्पना (४ पूर्वापार) चालत आल्याचं दिसतं. साहजिकच सर्वदूर सर्वपरिचित अशा या आत्म्याचं गूढ उकलण्याचे, आत्म्याचं (३ स्वरूप) तपासून पहाण्याचे प्रयत्न झाले नसते तरच नवल!

गेले शतकभर शास्त्रीय (४ प्रयोगांच्या) आधारे आत्म्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न (४ शास्त्रज्ञांनी) चालवला आहे. त्यातला पहिला प्रयत्न असा.

इ. स. १९२१ मध्ये डंकन मॅक्डुगल या (८ वैद्यकसंशोधकाने ) "२१ ग्रॅम" या नावाने प्रसिद्ध असलेला प्रयोग केला होता. एखादी व्यक्ती (५ मेल्यानंतर) तिचं वजन किती कमी होतं हे बघण्याचा त्याच्या प्रयोगाचा हेतू होता. त्याने अशा सहा व्यक्तींची तपासणी केली होती. तेव्हा या व्यक्तींचं (४ जाण्याआधी) वजन आणि (५ मेल्यानंतर) लगेचच केलेलं वजन यात ११ ते ४३ ग्रॅमचा फरक पडतो, असं त्याला दिसलं. हे कमी झालेलं वजन (३ आत्म्याचं) असणार असा त्याने निष्कर्ष काढला. वृत्तपत्रांनी बातमी देताना य सर्व वजनांची बहुधा (४ सरासरी) काढून "आत्म्याचं वजन २१ ग्रॅम" असा (५ निष्कर्षाप्रत ) मथळा छापला होता. यानंतर इतर शास्त्रज्ञांनी जेव्हा असेच प्रयोग केले तेव्हा मॅक्डुगलच्या प्रयोगांना दुजोरा देणारे निष्कर्ष मिळू शकले नव्हते. त्यामुळे मॅक्डुगलना प्रसिद्धी मिळाली तरी त्या प्रयोगांना "प्रमाण" म्हणून मानायला वैज्ञानिक (५ समुदायाने) नाकारलं.

धन्यवाद. कुमार सरांनी लिहिलेले सनसनाटी, परिषदांनी, उपभोगवादी वगैरे शब्द अधिक योग्य वाटतात

माणूस मरण(३) पावला की त्याच्या फक्त आठवणी उरतात, असं युरीपिडीसचं म्हणणं होतं, तर ’देह (२) संपला की आत्माही नष्ट होत’ असं डेमोक्रिटस स्पष्टपणे म्हणत असे. अशा प्रकारे ग्रीक तत्वज्ञांमध्ये आत्म्याबद्दल मत-मतांतरं होती.

रोमन लोक (६) होते. गोधन(३) वाढवावं, संपत्ती मिळवावी, चांगल्या गोष्टींचा उपभोग(४) घ्यावा अशी त्यांची वृत्ती(२) होती. आत्मा आणि पारलौकिक(५) स्थिती याच्यासंबंधी त्यांनी फार विचार केला नव्हता. प्राचीन चीनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मृत्युनंतरच्या/परलोकातील (६) जीवनाबद्दल आणि आत्म्यासंबंधी वेगवेगळ्या समजुती अस्तित्वात(४) असल्याचं दिसतं. मात्र चिनी तत्वज्ञ कन्फ्युशियसही आत्मा मानत असावा असं दिसत नाही. "मृत्युनंतर/परलोकात (५) आपलं काय होतं?" या प्रश्नावर "जिवंतपणी आपलं काय होणार हे जर आपल्याला नीटसं कळत नाही, तर मरणानंतर(६) आपलं काय होणार याचा विचार करण्यात काय फायदा आहे?" असा युक्तीवाद(४) तो करत असे.

पारशी लोकांमधील (७) मृतात्मा तीन दिवस प्रेताभोवती घोटाळत(४) असतो. अखेरीस या देहाचा उपयोग नाही अशी (६) आत्म्याची खात्री पटली की मगच तो आत्मा त्याच्या मृतदेहापासून(७) दूर हटतो. त्यामुळे पारशी लोकांमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचा मृतदेह तीन दिवस ठेवून मगच त्याच्यावर अंत्यसंस्कार(५) करण्याची प्रथा पडली.

आपल्याकडे अतृप्त(३) आत्म्यांची जी भुतं बनतात ती मजेदार(४) आहेत. भारतात वेगवेगळे धर्म, जाती, जमाती यानुसार (६) अनेक प्रकार कल्पिलेले असून मुंजापासून कालकायकापर्यंत/महापुरुषापर्यंत(८) त्यांच्या श्रेणीही पाडलेल्या आहेत. अशा प्रकारे प्राचीन काळापासून विविध संस्कृतींमध्ये आत्म्यांविषयी विविध समजुती प्रचलित असल्याचं आढळून येतं. थोडक्यात सांगायचं तर आत्मा ही संकल्पना पूर्वापार(४) चालत आल्याचं दिसतं. साहजिकच सर्वदूर सर्वपरिचित अशा या आत्म्याचं गूढ उकलण्याचे, आत्म्याचं (३) तपासून पहाण्याचे प्रयत्न झाले नसते तरच नवल!

गेले शतकभर शास्त्रीय शोधनाच्या(४) आधारे आत्म्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न अविरत (४) चालवला आहे. त्यातला पहिला प्रयत्न असा.

इ. स. १९२१ मध्ये डंकन मॅक्डुगल या (८) "२१ ग्रॅम" या नावाने प्रसिद्ध असलेला प्रयोग केला होता. एखादी व्यक्ती (५) तिचं वजन किती कमी होतं हे बघण्याचा त्याच्या प्रयोगाचा हेतू होता. त्याने अशा सहा व्यक्तींची तपासणी केली होती. तेव्हा या व्यक्तींचं (४) वजन आणि मृत्यूनंतर(५) लगेचच केलेलं वजन यात ११ ते ४३ ग्रॅमचा फरक पडतो, असं त्याला दिसलं. हे कमी झालेलं वजन आत्म्याचे(३) असणार असा त्याने निष्कर्ष काढला. वृत्तपत्रांनी बातमी देताना य सर्व वजनांची बहुधा सरासरी(४) काढून "आत्म्याचं वजन २१ ग्रॅम" असा सनसनाटी(५) मथळा छापला होता. यानंतर इतर शास्त्रज्ञांनी जेव्हा असेच प्रयोग केले तेव्हा मॅक्डुगलच्या प्रयोगांना दुजोरा देणारे निष्कर्ष मिळू शकले नव्हते. त्यामुळे मॅक्डुगलना प्रसिद्धी मिळाली तरी त्या प्रयोगांना "प्रमाण" म्हणून मानायला वैज्ञानिक अधिकार्‍यांनी/समुदायाने(५) नाकारलं.

कुमार सरांनी लिहिलेले सनसनाटी, परिषदांनी, उपभोगवादी वगैरे शब्द अधिक योग्य वाटतात>>>>+१.

छान देवकी.
कारवी आणि अजून कोणी देतंय का बघू.
मूळ उतारा उद्या सकाळी १०:०० नंतर देईन.

Pages