शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक तीन अक्षरी शब्द घ्या.
त्याची शेवटली दोन अक्षरे जशीच्या तशी घेऊन शेवटी एका अक्षराची भर घालून नविन शब्द तयार करा. परत तसेच करत जा. असे किमान पाच शब्द तयार व्हायला हवेत:

उदा:

विमान मानव नवखा वखार खारट

मूळ शब्द हवेत, विशेषनाम, शब्दांची रूपे, अनेकवचन नको. जसे की वर शेवटी खारका चालणार नाही.

गोदान दानव नवरा वरात रातवा ( रात्री / रात्रभर पडणारा पाऊस)

अक्षरे ३च ठेवायची की कमी जास्त बदलून चालतील? ३-४-५-३-५-४ अशी

मानव, धन्यवाद.
त्या शब्दात नाही हे लक्षातच आले नव्हते.
तो मुद्दाम काढला आहे का हे देवकी सांगतीलच

तो मुद्दाम काढला आहे का हे देवकी सांगतीलच.......... मुद्दाम नाही चुकून लिहिला गेला नाही.मानव यांचे खास आभार.

माझे शब्दः
महापालिका,महानगर,महा, महान,महाग,महार,मग,मगर

हार,हाका
नगरपालिका,नगर,नरम,नग,नर,नकार
गरम,गर,गमन
पालिका,पार,पाम,पामर,पान,पाग
कान,काम,कापा
रम,रग

पाहार,काहार हे शब्द पहार,कहार असे हवेत ना?बाकी लिहा,का हे शब्द,कधीच सुचले नाहीत.

'रम' असा स्वतंत्र मराठी शब्द कोशात दिसला नाही.
आज्ञार्थी धरायचा का ?
संस्कृत ‘रम’ मध्ये म चा पाय मोडला आहे.

रम् = खेळणें; क्रीडा करणें

ऱ्हस्व दीर्घ बदलून चालेल, हे गूढ शब्दकोड्यातही चालवून घेतो. न बदलले तर उत्तमच पण बदलल्यास हरकत नाही.

----------
दहा शब्दांपर्यंत पोचता येते का पाहुयात. वर माझे आठ शब्द झालेत.

हे बघा दहा शब्द:
नियम, यमक, मकर,
करप, रपका, पकार (=२५),

कारक, रकटा, कटार,
टारले (पाळणा)

छान. टारलें (ले वर अनुस्वार ) हवे ना?

तुमचे आणि वरील माझे मिळुन बारा:
नियम, यमक, मकर,
करप, रपका, पकार
कारक, रकबा, कबाड
बाडगा, डगाळी, गाळीव

चालेल.
मी पुढचा १५०० ला देउ शकतो.
.....................
चालू खेळ म्हणजे (उप + अंत्य) अक्षरी आहे !

शब्दव्यूह आणि अंताक्षरी
खाली ओळीने ९ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. एक आड एक अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:

• पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे (दिलेले) अक्षर घ्या.
• त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे (दिलेले) अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• नऊव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.
• पहिली दोन लागोपाठची उत्तरे एकदम लिहा. पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल.
…………………………………………………………

१. सुगंधी औषधी वनस्पती (४, प )
२. प्रत्युत्तर (५) ...........पलटवार

३. अशी कहाणी उत्सुकतेने ऐकावी (५, त ) .......... .रसभरित
४. हा तिऱ्हाईत गम्मत पाहतो (५)

५. भटक्या ( ५, म)
६. मोठ्या प्रदेशाशी संबंधित (६)

७. शंकेखोर शब्द (६, त)
८. पोटाची अवस्था (५)

९. योजना (अरबी उगम) ( ४, क्र १ चे पहिले).
………………………………………………………………….

Pages