शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(दोन क्रिया) एकदम

शालेय पुस्तकात असतो

एका शब्दासाठी एक दिवसीय सामना वेळेत संपला,
मस्तच !

होय,
वसती करणे वरून
(दुसरा अर्थ वस्त्र !)

१९४ – गणितातील संज्ञा...एकम
२५९ – बोटीचा प्रकार (मूळ शब्द अल्पसंख्याक भाषेतील; पण बहुतेक भाषांनी तसाच स्वीकारलाय. वृत्तपत्रांच्या कोड्यांत असतो)..... कयाक = एस्कीमो ची बोट

८६९ – लग्नात दिसेल...देवक
३-१० : एक छानसे झाड….सरू

६-३-११ : हवेली...वसन

संपूर्णचा अर्थ एकदम

देवकी
ते टंकन सांगा इंग्लिश कळफलक वापरून कसे ?

AUM

lRU

सरू = सुरु

सरू sarū m (Or सुरू from A) A cypress tree.

खाली एकूण ८ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून एक ज्ञानी व्यक्तीचा गुणविशेष असलेला ८ अक्षरी शब्द तयार करायचा.
..........

कमानेवरतून
धनकोपणच्या

रसिकरंजनात
सदऱ्यावरतून

अगडबंबिष्ट
सकलाधारीतम

मनोविकारतज्ञ
जनकराजामुळे

चांगला गुण

उत्तरातील ज्ञानी हा उदाहरणार्थ असा असेल :

कुशल अभियंता असून सुगरण ; छान फोटो काढतो आणि संगीतावरही हुकूमत आहे .

? ? ? ? ? रसज्ञ नाही
उत्तरात २ अक्षरे समान .

शब्द क्रमाने लावून देऊ का ?

नको, त्या खिमटीत हुडकत जायची मजा नाही.
कला शास्त्र अशा विविध ( random) क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करणारा इतपत कळले. शब्द बघते.

नाही !
अने * * * * * *
असे आहे

Pages