शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यातले २-४ च माहिती होते. बाकी नसनखवडा कोड्यासारखे वाटतायत....

मदनायक = मधला मणी? म्हणजे कुठला? मेरूमणी? की त्याच्या विरूद्ध पोझिशनचा सराच्या मध्यभागचा?

टचटचीत डळमळीत दिलेल्या अर्थाला पटत नाही कारण आता आपण वेगळ्या अर्थाने वापरतो.
टचटचीत नैसर्गिकरीत्या भरीव पुष्ट गोष्टीसाठी ठीक आहे. शेंग, कणीस, बांधा यासाठी. टच्च टंच असेही आहेत. सढळपणे भरणे / देणे या कृती-अर्थी पण? कोशात आहेत तर कधीकाळी असतील वापरत.

त्यानिमीत्ते नवीन कळले हा फायदा आहेच.

११ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही उपशब्दांची शोधसूत्रे अशी :
१९४ – गणितातील संज्ञा

२५९ – बोटीचा प्रकार (मूळ शब्द अल्पसंख्याक भाषेतील; पण बहुतेक भाषांनी तसाच स्वीकारलाय. वृत्तपत्रांच्या कोड्यांत असतो).

८६९ – लग्नात दिसेल
३-१० : एक छानसे झाड

६-३-११ : हवेली
७ – जोडाक्षर.

संपूर्णचा अर्थ अगदी सोप्पा आहे ! तुम्हीच शोधून काढा शब्द .

१९४ – गणितातील संज्ञा ---
बेरीज, प्रमाण, आलेख, आयत, चौरस, त्रिकोण, वर्तुळ, प्रमेय, सिद्धता,

३-१० : एक छानसे झाड --- चाफा कुंद पाचू नेचे जाई जुई लिली

६-३-११ : हवेली --- सदन महाल प्रासाद बंगला

७ – जोडाक्षर. >>>> हे प्रॉपर जोडाक्षर की ज्ञ क्ष ऋ हृ सारखे एकाक्षरी पण उच्चारात जोडाक्षर?

८६९ – लग्नात दिसेल --- नवरा नवरी कंकण हवन विहीण कदली गारवा जोडवी मांडव मेहुणा/णी जानोसा पंगत

जरा खोलात बघा . सापडेल एक ३ अक्षरी

लग्न वा कुठल्याही शुभ कार्यात असतो

सुन्मुख नाही
अगदी मूलभूत असतो

एकक व सुरू
थोडे सुधारून घेणे.
जवळ आलात

पुणेकर
तुम्ही अर्थाने बरोबर आहात

एकेक अक्षर सुधारणे

एकम
कयाक
बरोबर

७.ॐ / लॄ(हे नाही
( हे दोन्ही टंकन तुमच्याकडून शिकले पाहिजे !)

तरु ? सरू ?
एकसमयावच्छेदकरून ?

7 च्छे बरोबर

झाड गल्ली उगाच चुकताय !
विशिष्ट झाड

Pages