भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
२८ जोर नाही
२८ जोर नाही
...
देवकी
रक्षा कसे सुचले ते जरूर सांगा. उत्सुक.
१-९-१० थोरपणा
१-९-१० थोरपणा
२ ८ नाकातून शिरणारे नैसर्गिक
३ ४ फलद्रूपता
४ ५ बोटांना अंगठा लावून बघा : पसा
८ ६ त्याचीच पण लग्नाची नव्हे : रक्षा
७ (पक्के) जोडाक्षर : त्का
संपूर्ण : अध्यात्माशी संबंधित ...... - - - प सा क्षा त्का र - -
सूर
सूर
पु. १ गाण्यांतील स्वर; आवाज; मधुर ध्वनि. २ नाकांतून बाहेर सोडण्यांत येणारा श्वास.
असं मिळालं कोशात
सूर >>> आता फक्त पाहिले अक्षर
सूर >>> आता फक्त पाहिले अक्षर बदला
पूर्ण योग्य शब्दासाठी.
समानार्थी च आहे
स्वर का
स्वर का
स्वस्वरूपसाक्षात्काररूप असा शब्द सापडला
स्वस्वरूपसाक्षात्काररूप
स्वस्वरूपसाक्षात्काररूप
वा, जिंकलात की !
१-९-१० थोरपणा... स्वरूपब
१-९-१० थोरपणा... स्वरूप
२ ८ नाकातून शिरणारे नैसर्गिक...स्वर
३ ४ फलद्रूपता....रूप
४ ५ बोटांना अंगठा लावून बघा : पसा
८ ६ त्याचीच पण लग्नाची नव्हे : रक्षा
७ (पक्के) जोडाक्षर : त्का
अरे वा!
अरे वा!
स्वर,श्वासाकरिता सुचलाही नसता.
थोरपणा म्हणजे स्वरूप हे पण नव्याने कळले.
मलाही रोचक वाटला म्हणून घेतला
मलाही रोचक वाटला म्हणून घेतला
छान सोडवलात सर्वांनी
दिवसरात्र सामना समाप्त !
म्हणजे स्वर = श्वास; सूर =
म्हणजे स्वर = श्वास; सूर = उच्छ्वास असे?
की हे गाण्याशी संबंधित आहे?
जितका श्वास खोल (आत) घेऊ तितके वरच्या पट्टीत/स्वरात गाता येईल
आणि जितका वेळ रोखून / नियंत्रित करून सोडू शकू तितका सूर / आलाप लांबवता ( साssss) येईल?
म्हणून (खालचा मध्यम वरचा) स्वराचा संबंच श्वासाशी आणि सूराचा उच्छ्वासाशी. म्हणून ते समानार्थी.
थोरपणा म्हणजे स्वरूप हे पण
थोरपणा म्हणजे स्वरूप हे पण नव्याने कळले.>>इथे सगळेच शब्द मला जवळ जवळ नव्यानेच कळतात
पण एक शंका आहे की कोशात आहे हे बरोबर पण आता अजिबातच आपण त्या अर्थाने तो शब्द वापरत नसू तर कोशात पाहिल्याशिवाय ही कोडी आपण सोडवूच शकणार नाही.
म्हणजे हे थोडं कोश किती
.
ॐ नमो जी हेरंबा, सकाळादि तू
ॐ नमो जी हेरंबा, सकाळादि तू प्रारंभा
आठवुनी तुझी स्वरुप शोभा, वंदन भावे करितसे.
यातील स्वरूप म्हणजे थोरपणा असावे.
पुणेकरांचा मुद्दा समजला.
पुणेकरांचा मुद्दा समजला.
बृहद कोश आता इथल्यांना माहीत असल्याने अपरिचित अर्थ घेतोय. वृत्तपत्रांच्यापेक्षा वरच्या पातळीवर जावे हा उद्देश आहे. जेव्हा खेळ १-२ दिवस टिकतो तेव्हा इथल्या जास्त लोकांना भाग घेता येतो.
तरीपण यापुढे १-२ शब्द सोपे घ्यायचा विचार करू.
सर्वांना धन्यवाद
धन्यवाद. पण का कोड्यांमुळे
धन्यवाद. पण का कोड्यांमुळे बृहतकोश चाळायची चांगली सवय लागली त्याचे श्रेय मात्र तुम्हालाच...
आज सुट्टी घेतली काय? मी एक
आज सुट्टी घेतली काय?
मी एक परिच्छेद देते. उत्तर रात्री उशीरा / उद्या सकाळी देईन.
??च्या जागी शब्द भरायचे आहेत. अक्षरसंख्या कंसात दिल्यानुसार.
आईच्या जुन्या मैत्रिणीला भेटून आलेल्या डॉ मायलेकी आणि त्या भेटीत लेकीचे मैत्रिणीशी जमलेले गूळपीठ पाहून अस्वस्थ झालेली (वर्षानुवर्षे न्यूनगंडाने ग्रासलेली, जगावर राग काढणारी) आई ही पार्श्वभूमी ---
# हे त्या काल्पनिक स्त्रीचे विचार आहेत. व्यक्तिशः मी सहमत नाही.
***************
तिने डोकेदुखीवर आलेल्या ?? (6) गोळी घेतली पण उपयोग झाला नाही. मनातले विचार ?? (4) वीणाची भेट, ते बोलणे मनातून जाईना. लिफ्टमधला चंदाचा कॉमेंट तर ?? (4) कानावर आदळत होता.
" म्हणजे ऐनवेळी ?? (5) करण्याची तुझी सवय जुनीच आहे तर. तू ?? (6) अशीच होतीस!"
"होय ! होय मी अशीच होते.... मला तसे ?? (3) लागले."
# चंदाला खोलीत बोलवावं आणि तिला ?? (4) सांगावं की या जगात असंच ?? (3) लागतं. ?? (5) व्यक्तीला आणि त्यातही सौंदर्याची ?? (3) नसणार्या बाईला. सतत अधिकार मिळवण्यासाठी आणि ?? (3) टिकवण्यासाठी हेच करावं लागतं.
# स्त्रीला सौंदर्याचा लाभ होणं तिच्या अस्तित्वासाठी ?? (5) आवश्यक आहे. सौंदर्य हाच अधिकार. याच सौंदर्याच्या ?? (6) माझ्या आईने श्रीमंत नवरा मिळवला. ?? (6) मूळची श्रीमंती लाभली तर माणसाला फारशी ?? (3) नसली तरी चालते. श्रीमंत बाप आणि सुंदर आई. एकीने सौंदर्याच्या जोरावर श्रीमंती मिळवली तर एकाने पैशाच्या बळावर सौंदर्य विकत घेतले. श्रीमंत लोकांना अक्कल ?? (4) असते अस ?? (3) समाजाला वाटते. आणि सौंदर्याला अक्कल लागत नाही. दोन्हीची ?? (2) झाली की ?? (2) हातात आलं.
त्या ट्रॅकवर छोटी गावं लागत नाहीत. लायन, ?? (3) अशी शहरं असतात. फॉरीनच्या वार्या असतात. ?? (5) पायी जाणार्या दिंड्या नसतात. कारण पायच ठरणार नाहीत अशी त्यांची ?? (2) असतात. तिथून विमानंच सुटतात. एसटीच्या, ?? (6) सर्विसेस सुटत नाहीत. ही सगळी जमात सुटलेलीच असते. चंदा, या जमातीचे पंचतारांकित हॉटेल्समधील ?? (4) मी पाहिले आहेत. अमका लायन तमक्या लायनला हार घालतो आणि तमका लायन पुन्हापुन्हा अमक्या लायनच ?? (3) करतो. इनरव्हीलवर सतत एकमेकांभोवती फिरणार्या या ?? (5) फक्त पैशाचे वंगण असते आणि सौंदर्याची ?? (3) असते.
एखादा निर्धन पण साहित्य, नाट्य कला चित्रकला ?? ?? (3+2 दोन शब्द आहेत) असलेला माणूस यांचा सभासद होऊ शकत नाही. त्या माणसाच्या संस्थेला ते फार तर देणगी देतील. कारण ?? (7) तिथे आपल्या संस्थेच्या नावाची पाटी लावता येते. पण एखाद्या कलावंताचे निव्वळ ?? (5) पाहून त्याला ते मेंबरशिप देणार नाहीत. माझी आई आणि पिताश्री सतत याच विश्वात ?? (4) झालेले होते.
मला आई होती पण ती ?? (6) बाराखडीमधील दोन अक्षरे एकत्र आली म्हणून. त्यातील ?? (3) जास्त खरी. त्या टोचणार्या ?? (4) मी दुर्लक्ष करायला शिकले तेही माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी. माया ही भावना व्यक्त करणारी ?? (2) माझ्या वाट्याला आली नाही. माझ्यासारख्या ?? (3) नव्हे ?? (3) मुलीला जन्माला घालून ?? (4) माझ्या आईची जिरवली, असं मला सुरूवातीसुरूवातीला वाटलं. पण ?? (3) माणसांची कोणीही जिरवू शकत नाही. अर्थात हे कळायला मला फार वेळ लागला.
***********
क्षमस्व. कामात अडकलोय
क्षमस्व. कामात अडकलोय
क्षमस्व कशाला सर, हा विरंगुळा
क्षमस्व कशाला सर, हा विरंगुळा आहे, मुख्य काम नाही ना... हे होणारच.
कोणीच काहीच लिहीले नाही संध्याकाळपर्यंत म्हणून विचारले.
तुम्ही एवढी उत्तम कोडी घालून
तुम्ही एवढी उत्तम कोडी घालून आम्हाला डोकं चालवायला लावता ते खूपच भारी आहे सर.
सोडवतो आहे.
तिने डोकेदुखीवर आलेल्या शिणवट्यावर (6) गोळी घेतली पण उपयोग झाला नाही. मनातले विचार घोळताना (4) वीणाची भेट, ते बोलणे मनातून जाईना. लिफ्टमधला चंदाचा कॉमेंट तर दणादण (4) कानावर आदळत होता.
" म्हणजे ऐनवेळी विश्वासघात (5) करण्याची तुझी सवय जुनीच आहे तर. तू पहिल्यापासून (6) अशीच होतीस!"
"होय ! होय मी अशीच होते.... मला तसे जाणवू (3) लागले."
# चंदाला खोलीत बोलवावं आणि तिला ओरडून (4) सांगावं की या जगात असंच असावं /वागावं (3) लागतं. माझ्यासारख्या (5) व्यक्तीला आणि त्यातही सौंदर्याची देणगी (3) नसणार्या बाईला. सतत अधिकार मिळवण्यासाठी आणि वर्चस्व (3) टिकवण्यासाठी हेच करावं लागतं.
# स्त्रीला सौंदर्याचा लाभ होणं तिच्या अस्तित्वासाठी सदासर्वदा (5) आवश्यक आहे. सौंदर्य हाच अधिकार. याच सौंदर्याच्या अधिपत्यावर (6) माझ्या आईने श्रीमंत नवरा मिळवला.
परंपरागत/घराणेशाहीची (6) मूळची श्रीमंती लाभली तर माणसाला फारशी अक्कल (3) नसली तरी चालते. श्रीमंत बाप आणि सुंदर आई. एकीने सौंदर्याच्या जोरावर श्रीमंती मिळवली तर एकाने पैशाच्या बळावर सौंदर्य विकत घेतले. श्रीमंत लोकांना अक्कल मोजकीच/तुटपुंजी (4) असते अस इतर/गरीब (3) समाजाला वाटते. आणि सौंदर्याला अक्कल लागत नाही.
दोन्हीची युती (2) झाली की राज्य (2) हातात आलं.
त्या ट्रॅकवर छोटी गावं लागत नाहीत. लायन, रोटरी (3) अशी शहरं असतात. फॉरीनच्या वार्या असतात. भक्तिभावाने (5) पायी जाणार्या दिंड्या नसतात. कारण पायच ठरणार नाहीत अशी त्यांची चाके(2) असतात. तिथून विमानंच सुटतात. एसटीच्या, शेअररिक्षाच्या (6) सर्विसेस सुटत नाहीत. ही सगळी जमात सुटलेलीच असते. चंदा, या जमातीचे पंचतारांकित हॉटेल्समधील सोपस्कार (4) मी पाहिले आहेत. अमका लायन तमक्या लायनला हार घालतो आणि तमका लायन पुन्हापुन्हा अमक्या लायनच आर्जव (3) करतो. इनरव्हीलवर सतत एकमेकांभोवती फिरणार्या या जोडचक्रांना (5) फक्त पैशाचे वंगण असते आणि सौंदर्याची झालर (3) असते.
एखादा निर्धन पण साहित्य, नाट्य कला चित्रकला आदींची जाण (3+2 दोन शब्द आहेत) असलेला माणूस यांचा सभासद होऊ शकत नाही. त्या माणसाच्या संस्थेला ते फार तर देणगी देतील. कारण प्रसिद्धीनिमित्ताने (7) तिथे आपल्या संस्थेच्या नावाची पाटी लावता येते. पण एखाद्या कलावंताचे निव्वळ अंतस्थगुण (5) पाहून त्याला ते मेंबरशिप देणार नाहीत. माझी आई आणि पिताश्री सतत याच विश्वात रममाण (4) झालेले होते.
मला आई होती पण ती नाईलाजानेच/ योगायोगानेच (6) बाराखडीमधील दोन अक्षरे एकत्र आली म्हणून. त्यातील शक्यता (3) जास्त खरी. त्या टोचणार्या वेदनेला (4) मी दुर्लक्ष करायला शिकले तेही माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी. माया ही भावना व्यक्त करणारी गोष्ट/कृती (2) माझ्या वाट्याला आली नाही. माझ्यासारख्या दुर्दैवी,(3) नव्हे नकोशा (3) मुलीला जन्माला घालून नियतीने (4) माझ्या आईची जिरवली, असं मला सुरूवातीसुरूवातीला वाटलं. पण निर्लज्ज (3) माणसांची कोणीही जिरवू शकत नाही. अर्थात हे कळायला मला फार वेळ लागला.
आईच्या जुन्या मैत्रिणीला
आईच्या जुन्या मैत्रिणीला भेटून आलेल्या डॉ मायलेकी आणि त्या भेटीत लेकीचे मैत्रिणीशी जमलेले गूळपीठ पाहून अस्वस्थ झालेली (वर्षानुवर्षे न्यूनगंडाने ग्रासलेली, जगावर राग काढणारी) आई ही पार्श्वभूमी ---
# हे त्या काल्पनिक स्त्रीचे विचार आहेत. व्यक्तिशः मी सहमत नाही.
***************
तिने डोकेदुखीवर आलेल्या (6) गोळी घेतली पण उपयोग झाला नाही. मनातले विचार (4) वीणाची भेट, ते बोलणे मनातून जाईना. लिफ्टमधला चंदाचा कॉमेंट तर वारंवार(4) कानावर आदळत होता.
" म्हणजे ऐनवेळी मानखंडना (5) करण्याची तुझी सवय जुनीच आहे तर. तू पहिल्यापासून (6) अशीच होतीस!"
"होय ! होय मी अशीच होते.... मला तसे वागावे (3) लागले."
# चंदाला खोलीत बोलवावं आणि तिला बजावून/रोखठोक (4) सांगावं की या जगात असंच वागावे/असावे (3) लागतं.कामचुकार (5) व्यक्तीला आणि त्यातही सौंदर्याची देणगी (3) नसणार्या बाईला. सतत अधिकार मिळवण्यासाठी आणि वर्चस्व(3) टिकवण्यासाठी हेच करावं लागतं.
# स्त्रीला सौंदर्याचा लाभ होणं तिच्या अस्तित्वासाठी हवेइतके (5) आवश्यक आहे. सौंदर्य हाच अधिकार. याच सौंदर्याच्या बडेजावावर(6) माझ्या आईने श्रीमंत नवरा मिळवला. सौंदर्यवतीला (6) मूळची श्रीमंती लाभली तर माणसाला फारशी अक्कल/हुशारी (3) नसली तरी चालते. श्रीमंत बाप आणि सुंदर आई. एकीने सौंदर्याच्या जोरावर श्रीमंती मिळवली तर एकाने पैशाच्या बळावर सौंदर्य विकत घेतले. श्रीमंत लोकांना अक्कल भरपूर्/उपजत (4) असते अस बाकीच्या/इतर (3) समाजाला वाटते. आणि सौंदर्याला अक्कल लागत नाही. दोन्हीची युती/भेट (2) झाली की जग (2) हातात आलं.
त्या ट्रॅकवर छोटी गावं लागत नाहीत. लायन, ?? (3) अशी शहरं असतात. फॉरीनच्या वार्या असतात. वारकर्यांच्या (5) पायी जाणार्या दिंड्या नसतात. कारण पायच ठरणार नाहीत अशी त्यांची स्वप्ने(2) असतात. तिथून विमानंच सुटतात. एसटीच्या, खाजगीगाड्यांच्या(6) सर्विसेस सुटत नाहीत. ही सगळी जमात सुटलेलीच असते. चंदा, या जमातीचे पंचतारांकित हॉटेल्समधील अवतार (4) मी पाहिले आहेत. अमका लायन तमक्या लायनला हार घालतो आणि तमका लायन पुन्हापुन्हा अमक्या लायनच निवड (3) करतो. इनरव्हीलवर सतत एकमेकांभोवती फिरणार्या या जमातीवर (5) फक्त पैशाचे वंगण असते आणि सौंदर्याची आसक्ती (3) असते.
एखादा निर्धन पण साहित्य, नाट्य कला चित्रकला ?? (3+2 दोन शब्द आहेत) असलेला माणूस यांचा सभासद होऊ शकत नाही. त्या माणसाच्या संस्थेला ते फार तर देणगी देतील. कारण ?? (7) तिथे आपल्या संस्थेच्या नावाची पाटी लावता येते. पण एखाद्या कलावंताचे निव्वळ कलानैपुण्य (5) पाहून त्याला ते मेंबरशिप देणार नाहीत. माझी आई आणि पिताश्री सतत याच विश्वात रममाण(4) झालेले होते.
मला आई होती पण ती नाईलाजास्तव (6) बाराखडीमधील दोन अक्षरे एकत्र आली म्हणून. त्यातील ?? (3) जास्त खरी. त्या टोचणार्या शब्दांकडे/काट्यांकडे (4) मी दुर्लक्ष करायला शिकले तेही माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी. माया ही भावना व्यक्त करणारी व्यक्ती/आई (2) माझ्या वाट्याला आली नाही. माझ्यासारख्या सुमार ( 3) नव्हे कुरुप( 3) मुलीला जन्माला घालून दैवानेच (4) माझ्या आईची जिरवली, असं मला सुरूवातीसुरूवातीला वाटलं. पण घमेंडी (3) माणसांची कोणीही जिरवू शकत नाही. अर्थात हे कळायला मला फार वेळ लागला.
***********
येउद्यात मूळ उतारा...
येउद्यात मूळ उतारा...
सकाळी चक्कर टाकली, कॉणीच
सकाळी चक्कर टाकली, कोणीच नव्हते....
दोघांचेही अर्धे अर्धे शब्द बरोबर आलेत. आणि काही शब्द आपलेच चांगले वाटतात मूळ शब्दापेक्षा.
आता कोणी यायचे बाकी नसेल बहुतेक. उत्तर देते २ मिनीटात.
तिने डोकेदुखीवर आलेल्या सँपल्समधून (6) गोळी घेतली पण उपयोग झाला नाही. मनातले विचार त्याहीपेक्षा (4)वीणाची भेट, ते बोलणे मनातून जाईना. लिफ्टमधला चंदाचा कॉमेंट तर पुन्हापुन्हा (4) कानावर आदळत होता.
" म्हणजे ऐनवेळी अडवणूक (5) करण्याची तुझी सवय जुनीच आहे तर. तू कॉलेजपासून (6) अशीच होतीस!"
"होय ! होय मी अशीच होते.... मला तसे व्हावेच (3) लागले."
# चंदाला खोलीत बोलवावं आणि तिला ओरडून (4) सांगावं की या जगात असंच वागावं (3) लागतं. माझ्यासारख्या (5) व्यक्तीला आणि त्यातही सौंदर्याची देणगी (3) नसणार्या बाईला. सतत अधिकार मिळवण्यासाठी आणि वर्चस्व (3) टिकवण्यासाठी हेच करावं लागतं.
# स्त्रीला सौंदर्याचा लाभ होणं तिच्या अस्तित्वासाठी श्वासाइतकं (5) आवश्यक आहे. सौंदर्य हाच अधिकार. याच सौंदर्याच्या अधिकारावर (6) माझ्या आईने श्रीमंत नवरा मिळवला. सौंदर्याप्रमाणे (6) मूळची श्रीमंती लाभली तर माणसाला फारशी अक्कल (3) नसली तरी चालते. श्रीमंत बाप आणि सुंदर आई. एकीने सौंदर्याच्या जोरावर श्रीमंती मिळवली तर एकाने पैशाच्या बळावर सौंदर्य विकत घेतले. श्रीमंत लोकांना अक्कल उपजत (4) असते असं निर्धन (3) समाजाला वाटते. आणि सौंदर्याला अक्कल लागत नाही. दोन्हीची युती (2) झाली की जग (2) हातात आलं.
त्या ट्रॅकवर छोटी गावं लागत नाहीत. लायन, रोटरी (3) अशी शहरं असतात. फॉरीनच्या वार्या असतात. तीर्थक्षेत्राला (5) पायी जाणार्या दिंड्या नसतात. कारण पायच ठरणार नाहीत अशी त्यांची तीर्थं (2) असतात. तिथून विमानंच सुटतात. एसटीच्या, यात्राकंपनीच्या (6) सर्विसेस सुटत नाहीत. ही सगळी जमात सुटलेलीच असते. चंदा, या जमातीचे पंचतारांकित हॉटेल्समधील सेमिनार्स (4) मी पाहिले आहेत. अमका लायन तमक्या लायनला हार घालतो आणि तमका लायन पुन्हापुन्हा अमक्या लायनचे कौतुक (3) करतो. इनरव्हीलवर सतत एकमेकांभोवती फिरणार्या या सिहांजवळ (5) फक्त पैशाचे वंगण असते आणि सौंदर्याची आयाळ (3) असते.
एखादा निर्धन पण साहित्य, नाट्य कला चित्रकला गुणाचे धन (3+2) असलेला माणूस यांचा सभासद होऊ शकत नाही. त्या माणसाच्या संस्थेला ते फार तर देणगी देतील. कारण देणगीपाठोपाठ (7) तिथे आपल्या संस्थेच्या नावाची पाटी लावता येते. पण एखाद्या कलावंताचे निव्वळ कलावैभव (5) पाहून त्याला ते मेंबरशिप देणार नाहीत. माझी आई आणि पिताश्री सतत याच विश्वात रममाण (4) झालेले होते.
मला आई होती पण ती स्वरमालेतल्या (6) बाराखडीमधील दोन अक्षरे एकत्र आली म्हणून. त्यातील खडीच (3) जास्त खरी. त्या टोचणार्या खडीकडे (4) मी दुर्लक्ष करायला शिकले तेही माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी. माया ही भावना व्यक्त करणारी माय (2) माझ्या वाट्याला आली नाही. माझ्यासारख्या सामान्य (3) नव्हे कुरूप (3) मुलीला जन्माला घालून नियतीने (4) माझ्या आईची जिरवली, असं मला सुरूवातीसुरूवातीला वाटलं. पण नफ्फड (3) माणसांची कोणीही जिरवू शकत नाही. अर्थात हे कळायला मला फार वेळ लागला.
छान आहे.
छान आहे.
काही शब्द इंग्लिश होते ; शोधताना हा विचार केला नाही.
'नफ्फड' चा अर्थ ? शब्द छान आहे !
मी जसा होता तसाच घेतला
मी जसा होता तसाच घेतला परिच्छेद. शब्द बदलले नाहीत १००% मराठीसाठी.
खरं सांगायचं तर, शब्द इंग्लिश आहेत हे लक्षातच आले नाही इतकी सरावलीये नजर मिक्स भाषेला.
तशी सूचना हवी होती का? पुढच्या वेळी लक्षात ठेवेन. परिच्छेद-कोडे पहिलेच हे.
वाचल्यावर नफ्फड मीही नेटवर पाहिले शोधून... त्यात हे सापडले --
तात्पुरती उपरती होऊन नशा सोडून परत परत तिच्या आहारी जाणाऱ्या नशेबाजास नफ्फड म्हणतात.
अन्य ठिकाणी संदर्भाने -- अडेलतट्टू, जगाची पर्वा न करता आपल्या गुर्मीत रहाणारे, खरे कुचकामी पण स्वतःच्या लायकीबद्दल अवास्तव कल्पना असणारे, बडा घर पोकळ वासा व्यक्ती, समोरच्याला कायम तुच्छ वागणूक देणारे असे अर्थ निघतायत.
(उदा -- राजकारणी, गुंड टोळीतील नव्याने आलेली टपोरी मुले टाईपची माणसे.)
तात्पुरती उपरती होऊन नशा
तात्पुरती उपरती होऊन नशा सोडून परत परत तिच्या आहारी जाणाऱ्या नशेबाजास नफ्फड
>>>
मस्तच !
.........................................
उतारा खेळाबद्दल एक वेगळा मुद्दा लिहितो.
एकंदरीत वाचनसाहित्य अफाट आहे. प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार ठराविक प्रकारचे वाचत असतो. या खेळाच्या निमित्ताने आपल्याला उतारा देणाऱ्या व्यक्तीच्या वाचनविश्वाची एक झलक मिळते आणि ती नक्कीच सुखद असते.
Chhaan होता उतारा.किती शब्द
Chhaan होता उतारा.किती शब्द चुकले हे लक्षात येतं.
महानरपालिका या शब्दा पासून
महानरपालिका या शब्दा पासून किती शब्द होतात ते पाहूया का?
महा, महान, मन, मर, मका, मकान
महा, महान, मन, मर, मका, मकान
हा, हार, हाका, हाकार
नर, नरम, नलिका, नकार,
रम,
पामर, पाहार, पान, पार,
लिहा,
का, काम, काहार, कान, कापा
मकार
मकार, पालिका ,, गरका, महार
कागर ( अर्थ आहे अंकुर.)
मगर, नगर,
महानगर, नगरपालिका
मलिन, पारका (= शत्रू),
गरम
Pages