शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त ड ता ड व ड

५/६ बरोबर, आता फक्त १ अक्षर बदला !

अस्मिता नाही

'शिकवण्याचे श्रम फुकट गेले' (आपले).
'त्याचे' वर्णन नको

त ड ता ड व ड

चौथे बदला
३. होय, तशीच
शिकवण्याचे फुकट गेलेले श्रम हाच ३ चा अर्थ
…........
छान झुंज देताय; यातच मजा आहे .

अवांतर..

तिळगूळ घ्या गोड बोला
शब्दस्नेह वाढता राहू द्या

सर्वांना 'रसरंगी' शुभेच्छा !

२. हा मध्यात असतो (५)

३. ( ५, ट) / शिकवण्याचे फुकट गेलेले श्रम
४. सढळपणे (५)

५. लागलीच ( तडता ? वड)

तडताथवड
अगदी बरोबर !

क्रिवि. तत्काळ; ताबडतोब; त्त्क्षणीं. -शर. [तड + तातडी]

दाते शब्दकोश

आता

२. हा मध्यात असतो (५) म ????

३. शिकवण्याचे फुकट गेलेले श्रम ( ( ५, ट)

पौषाची थंडी सुगडाची जोडी
तिळाचा स्नेह गुळाची गोडी
दिवसही सरला रात्र झाली थोडी
पहाट म्हणे उठा, सोडवूया कोडी ?!

* संक्रांतीच्या शुभेच्छा *

३. शिकवण्याचे फुकट गेलेले श्रम ( ( ५, ट) --- हल्लीच्या भाषेत डोक्यालाशॉट ?
शेवटी फुकट आहे ? ??फुकट
किंवा फुका???
किंवा ??चर्‍हाट

टचटचीत:

विशेषतः फुगणें, भरणें या क्रियापदांबरोबर, क्रियाविशेषण असतांना योज- तात). -क्रिवि. सढळ हातानें; औदार्यानें (खर्च करणें).

दाते शब्दकोश

? ??फुकट>>>

नाही, बिलकूल नाही !

बरं मग, उरलेत त्याची गूढकोडी बनवून देता का ? अक्षरे सुचतील.

२. हा मध्यात असतो (५) म ???? >>>> हे संगीताशी संबंधित आहे?
मध्यमस्वर, मध्यसप्तक वगैरे?

ठीक, गूढ करू:

२. वासनेला लागलेला पुढारी मध्यात उभा

३. व्यंजनाला भिंत व पर्वत लावूनही सगळे व्यर्थच.

३. व्यंजनाला भिंत व पर्वत लावूनही सगळे व्यर्थच
व्यंजन: क
भिंत: पाळ
पर्वत(शिखर): कूट

कपाळकूट = व्यर्थ खटाटोप.

कपाळकूट

अगदी बरोबर, छान सांगता !
सर्वांचेच उत्तम प्रयत्न

१. सतत (४, म ) : फारसी उगम …. गहदम
२. हा मध्यात असतो (५).... मदनायक
३. समजावून काही उपयोग नाही ( ५, ट)... कपाळकूट

४. सढळपणे (५)...टचटचीत
५. लागलीच (६, ड)... तडताथवड
६. खळखळ वाहात (५)....डळमळीत

७. राज्यकर्ता ( ५, ती).... तख्ताधिपती
८. कर्मकांडाशी संबंधित व्यक्ती (५).... तीर्थोपाध्याय
९. पूर्णपणे ( ४, क्र १ चे पहिले )...यथासांग

Pages