शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गहदम

२. हा मध्यात असतो (५)

३. समजावून काही उपयोग नाही ( ५, ट)
४. सढळपणे (५)


५. लागलीच (६, ड)
६. डळमळीत

७. तख्ताधिपती
८. तीर्थोपाध्याय

९. यथासांग
…………………………….

९ सांगोपांग विचार
अच्छा य वरून हवे
पोटपूजा झाली तोवर अर्धे कोडे साफ.... मस्त

डळमळीत - अस्थिर हा फार सोपा अर्थ.
म्हणून मुद्दाम वेगळा अर्थ निवडला.

........
जो कष्ट घेतो तो यशस्वी; दिगग्ज वगैरे काही नाही हो !

५. लागलीच (६, ड) --- ??? निकड / तातड असे आहे का?
घाईगडबड
तडाअणिफड ( तडकाफडकी सारखे)
कडोवि़कड असा शब्द आठवतो, अर्थ विसरले; तो ५ अक्षरी पण आहे

ताबडतोबड नाही
कारण सुरवातीला ता नाही
त्यासाठी ४ शोधावे लागेल !

छान गतीने चालू आहे.
चहापानापर्यंत निम्मे सुटलंय.

पुढील प्रयत्न ही योग्य दिशेने
दिवसरात्र सामना रंगतो आहे नक्की !

५. लागलीच (६, ड)
हो रेणु ६ अक्षरी;
त ड ने सुरूवात ड ने शेवट.
ड म्हणजे ड च.... डा डि ..... डै नकोत
त ड ? ? ? ड

त ड ? ? व ड
डकारान्त झाड वड घेतलयं.

त ड प र व ड
त ड फ ड व ड

हे कैच्याकै ...

त ड ? ? व ड

होय, असेच. आता ?ड असे अजून एक झाड शोधा. ते यात घुसवायचे . (सलग शब्द असणार नाही)
मग अजुन एक वेगळे अक्षर .

चांगले प्रयत्न.

३. निगरगट नाही.

एखाद्याला कितीही समजावले आणि उपयोग नाही झाला, की आपण वैतागून काय म्हणू ?
ही दिशा

(व्यक्तीचे विशेषण नाही)

Pages