अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@फा - दोन्ही पोस्ट्सना अनुमोदन. दुर्दैवाने, हा प्रश्न ट्रम्पनंतर सुटणारा नाही.

>>> प्रॉब्लेम आहे ट्रम्पने मतदारांमधे जो भस्मासूर उभा केला आहे त्याचा. ही निवडणूक टोटल फ्रॉड होती. खरे म्हणजे ट्रम्प जिंकला आहे. असंख्य पुरावे होते पण कोर्टाने ते बघितलेलेच नाहीत. केम्प पासून पेन्स पर्यंत सगळे गरीब बिचार्‍या ट्रम्पच्या मागे हात धुवून लागले आहेत, व हे सगळे प्रोटेस्ट वगैरे करून आपण लोकशाही वाचवत आहोत वगैरे डिल्यूजन मधे अजूनही असंख्य लोक आहेत. यांना ठामपणे सत्य काय आहे ते सांगायची हिंमत फार कमी रिपब्लिकन्सनी केली आहे. आताही ते कितपत करतील माहीत नाही.

--- सहमत आहे. एक वेळ अशिक्षित, माहितीस्रोतांची वानवा असणार्‍या मतदारवर्गाचं असं डिल्युजन क्षम्य मानताही येईल - पण डोळ्यांवर कातडं ओढून बसलेल्या तथाकथित सुशिक्षितांचं काय? ("जाऊ दे ना, माझा स्टॉक पोर्टफोलिओ/४०१ के मजबूत होतोय ना - मग मरेना का ती कॅपिटॉल!" - ही कालच ऐकायला मिळालेली प्रतिक्रिया आहे!)

हो. आणि ट्रम्प व कॅम्पेन जे करत होते त्याचे जाणूनबुजून दिशाभूल करणारे इण्टरप्रिटेशन - मतदान योग्य पद्धतीने झाले की नाही हे विचारण्याचा ट्रम्पला हक्क आहे - छाप आर्ग्युमेण्ट्स.

अनेकांनी हा असलाही एक उद्योग केला - निवडणुकीतील एखादे रॅण्डम निरीक्षण घ्यायचे. ते मुळात किती खरे आहे, त्याचा परिणाम किती, हे याच वर्षी फक्त झाले आहे की अनेक वर्षे हीच पद्धत आहे, त्याबद्दल पक्षविरहीत अधिकारीवर्ग काय म्हणत आहे याचे कसलेही लोड न घेता "बघा हे उदाहरण सिद्ध करते की ही निवडणूक फ्रॉड आहे" असे ठोकून द्यायचे. असेही ऐकले की इतका मोठा वाद सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाने स्वतःहूनच केस घ्यायची होती - त्यांनी नाही घेतली म्हणजे काहीतरी भयंकर षडयंत्र आहे. अरे कसली केस? डिस्ट्रिक्ट कोर्ट्स सुद्धा तुम्हाला दारातही उभे करत नाहीयेत असले दावे, आणि थेट देशाच्या सुप्रीम कोर्टाने घ्यायचे? का तर तुम्हीच लाखो लोकांत समज पसरवून दिले म्हणून? आणि पुन्हा हेच म्हणत आहेत की लोक फार चिडले आहेत.

'गो डाऊन इन हिस्ट्री' हा वाक्प्रचार कळला. प्रेझिडेंटचंच खातं पुल डाऊन .
कपिटॉलच्या आत जाऊन नक्की काय करणार होते विरोधक/समर्थक?

>>राज... यादवी युद्ध होउ शकणार नाही हे तु छातीठोकपणे सांगु शकतोस?<<
मित्रा, उत्तर सोप्पं आहे. आपण आता २१व्या शतकात आहोत, आणि दोन्हि आय्लमधे काहि इन्सेन लोक असले तरीहि, दे विल नेवर आउटनंबर सेन पिपल (दॅट इन्क्लुड्स पिपल इन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, जुडिशियरी, अँड कामन मेन लाइक यु). हां, आता काहि लो लाइफ्स (लो इन नंबर्स टू) आहेत जे अधुन-मधुन डोकं वर काढतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हाच त्यावर उपाय आहे, टु सेंड देम बॅक टु देर रॅटहोल्स...

बाय्दवे, नोव्हेंबर पासुनच्या गदारोळात एक उल्लेखनीय बाब निरिक्षणात आलेली आहे, आणि ती म्हणजे बाय्डन-हॅरीस या द्वयींचा संयम आणि मचुरिटी. दे हॅव अर्न्ड माय रिस्पेक्ट. त्यांचा स्टँड बहुतेक हा असावा - वि डिड व्हॉट वी कुड पासिबली डु, नाव लेट द सिस्टम टेक ओवर. हेच डेम्सच्या इथल्या समर्थकांबाबत सांगु शकत नाहि; कारण किटलीसे भी चाय गरम अशी परिस्थिती आहे. असो... Proud

आली आली नवीन थिअरी आली. अँटिफा यात असल्याचे "पुरावे बाहेर येत आहेत" म्हणे Happy

आता यांचे पुरावे म्हणजे गेले दोन महिने जसे होते तितकेच दमदार असावेत Happy बिग बिब्लिकल टाइप. एक कागद घेतला, पार्किंग मधे नाचवला. दुसर्‍याने ढमक्याला उद्देशून एक अ‍ॅफिडेव्हिट बनवले. तिसर्‍याने एक रॅण्डम व्हिडीओ पब्लिश केला. चौथ्याने एक इररिलेव्हंट स्टॅटिस्टिक्स दिले. झाला पुरावा. आहे काय आणि नाही काय. सुप्रीम कोर्टाने स्वतःहून घ्यावा.

मात्र तात्यानेच एक गोची करून ठेवली आहे. आधी लोकांना स्वतः तेथे जायला सांगून व नंतर तेथे जाणार्‍यांची तारीफ करून आणि इव्हन जे घडले त्याचे जस्टिफिकेशन देउन (ते डिलीट केलेले ट्विट). त्यामुळे त्याचे समर्थक त्यात नव्हते असेही म्हणता येणार नाही.

मात्र तात्यानेच एक गोची करून ठेवली आहे. आधी लोकांना स्वतः तेथे जायला सांगून व नंतर तेथे जाणार्‍यांची तारीफ करून >>>> आज बरोब्बर उलट स्टेटमेंट दिलंय.
https://www.yahoo.com/news/trump-finally-admits-defeat-a-new-administrat...

आज बरोब्बर उलट स्टेटमेंट दिलंय.>>> नेहमीप्रमाणेच ! आधी एक बोलुन मग परत घुमजाव.

लोल, सेनापती पळून* गेले - त्यासोबतच शेंदाड शिपाईही शेपूट घालून पळ काढताना पहायला मिळतंय! Happy
बेट्सी डेवॉसने राजीनामा दिला. तो उशीरा झालेला साक्षात्कार म्हणायचा की २५वी अमेंडमेंट लागू झाली की त्यात निवड करायचा प्रसंग येऊ नये, म्हणून शोधलेली पळवाट, देव जाणे!

(*अर्थात, 'टेलिप्रॉम्प्टर तात्यां'चा काहीच भरवसा नाही. अजून दोनएक दिवसांत अजून एक यू-टर्न घेतील. एकदा स्वतःच स्वतःला पार्डन करून घेतलं, की काहीही बोलायला मोकळे!)

तात्याबद्दल ओबामाने बरंच लिहिलंय नवीन पुस्तकात( A Promised Land). ओबामाच्या बर्थ सर्टिफिकेटबद्दलही घोळ घातला होता.

Brian Sicknick ह्या यूएस कॅपिटॉलमधील पोलिस अधिकार्‍याचा आज दंगलीत झालेल्या जखमांमुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

ट्रम्पतात्यांनी चिथावणी देऊन सुरु केलेल्या ह्या दंगलीत बळी पडलेल्यांची संख्या आता पाचवर पोचली आहे.

असो, पण ह्यात काही विशेष नाही म्हणा - आजच्याच दिवसात कोव्हिडमुळे ह्या संपन्न देशात चार हजाराहून अधिक लोक मरण पावले. त्या तुलनेने पाच हा आकडा किरकोळच नाही का?*

चला आपण एओसीच्या ट्वीट्समध्ये काही आक्षेपार्ह सापडतंय का ते पाहू, किंवा सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कशी काल्पनिक अनागोंदी माजली आहे आणि शरीया लागू झाला आहे, ह्याबद्दल गरमागरम चर्चा करत राहू!

(*कोव्हिडच्या सुरुवातीच्या दिवसांत फॉक्स न्यूजवर हे असलं आर्ग्युमेंट भलतंच लोकप्रिय होतं - फ्ल्युमुळे हजारो लोक मरतात, कोव्हिडने शेकडोच गेलेत इ.)

आपण आता २१व्या शतकात आहोत, आणि दोन्हि आय्लमधे काहि इन्सेन लोक असले तरीहि, दे विल नेवर आउटनंबर सेन पिपल (दॅट इन्क्लुड्स पिपल इन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, जुडिशियरी, अँड कामन मेन लाइक यु). हां, आता काहि लो लाइफ्स (लो इन नंबर्स टू) आहेत जे अधुन-मधुन डोकं वर काढतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हाच त्यावर उपाय आहे, टु सेंड देम बॅक टु देर रॅटहोल्स...>> I really commend your optimism! पण एकविसाव्या शतकात मानवी स्वभाव फारसा बदलला आहे असं वाटत नाही. शिवाय आत्ताही अनेक देशांत राजकीय अस्थिरता, वंशवाद, हिंसाचार या सर्व घटना घडतच आहेत. Somehow अमेरिकेत असं काही घडू शकणारच नाही याला आत्मविश्वास म्हणायचं की ignorance?
या तो जो ना-फहम है वो बोलते हैं इन दिनों
या जिन्हे खामोश रहने की सजा मालूम है
- शुजा खावर

बेट्सी डेवॉसने राजीनामा दिला>> जहाज बुडायला लागले कि जसे उंदीर पळ काढतात तसा प्रकार आहे. इथे दिसते तसेच सगळ्या भंपक लोकांना एकदम उच्च लोकशाही मूल्ये , आदर्श वगैरे चा साक्षात्कार झाला आहे. मॉस्को मिच, लिंडसे, लायिंग टेड, ख्रिस्टी हि लोक जी काही वर्षे तात्याची हांजी हांजी करण्यात एकामेकांवर कुरघोडी करण्याच्या शर्यती मधे होती ते अचानक १८० वळून बोंबा मारायला लागले आहेत. टेड क्रूज ह्यआंचा सच्छा म्होरक्या शोभावा. कालपर्यंत 'मी तुझ्या लॉसूटचे नेत्रुत्व करेन, ईलेक्टोरल कॉलेज काऊंटींग मधे आक्षेप घेण्यासाठी पुढे आहे' वगैरे बडबड करणारा आज ' गेली चार वर्षे तात्या बोलला ते मला मान्य नव्हत' वर आला. ह्यातच सगळे समजायचे.

really commend your optimism! >> जिज्ञासा दुर्दैवाने ह्यात optimism वगैरे काही नाही. सध्या तोंड वर करून बोलायला जागा नाही म्हणून त्यात्याच्या समर्थकांनी घेतलेला हा भंपक स्टान्स आहे, दुसरे काही नाही.

बाय्दवे, नोव्हेंबर पासुनच्या गदारोळात एक उल्लेखनीय बाब निरिक्षणात आलेली आहे, आणि ती म्हणजे बाय्डन-हॅरीस या द्वयींचा संयम आणि मचुरिटी. दे हॅव अर्न्ड माय रिस्पेक्ट. त् > > मी राजचे पोस्ट आहे का परत परत चेक केले. दोन दिवसआंपूर्वी मला 'बायडन संयम खाऊन काय मिळवणार ' वगैरे वर प्रश्न विचारत होता. ही पश्चातबुद्धी म्हणयाची का टेड , ग्रॅहम सारखे ..... असो Wink

बडबड करणारा आज ' गेली चार वर्षे तात्या बोलला ते मला मान्य नव्हत' वर आला >>> क्रूझ म्हंटला का हे आज? म्हणजे चार वर्षांपूर्वी त्याला हे मान्य नव्हते, आजही नाही. फक्त मधली चार वर्षे तो एकदम लॉयल होता या सर्वाशी Happy लिंडसीचेही तेच.

really commend your optimism! >>>> optimism????? हा कसला आलाय बोडक्याचा optimism. जो काही गोंधळ झाला त्याला तात्याच जबाबदार आहे या बद्दल एकही अवाक्षर नाहीये त्या पोस्टमधे. बिनबुडाची सारवासारव आहे फक्त.

बाकी काल ट्रंप जे बोलला त्यासाठी त्याच्या लॉयरने त्याला लॉसूटच्या धमक्या दिल्या असाव्यात. त्याशिवाय इतके मवाळ शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडणार नाहीत. आज ट्विटर हातात आलं की परत मूळपदावर आलाय.

>>बोलायला जागा नाही म्हणून त्यात्याच्या समर्थकांनी घेतलेला हा भंपक स्टान्स आहे, दुसरे काही नाही.<<
अरेच्च्या! मग आता अमेरिकेत यादवी होणारंच अशी खुणगांठ बांधुन घेतली आहेस का तु? मग आता टेक्सस सुद्दा युनियन मधुन फुटणार असं तुला वाटत असेल ना... Lol

>>मला 'बायडन संयम खाऊन काय मिळवणार ' वगैरे वर प्रश्न विचारत होता.<<
आता काय बोलणार याच्यावर, दोन भिन्न गोष्टिंचा बादरायण संबंध लावलेला आहेस. सेनेट मेजॉरिटिचं लेवरेज असताना नाकर्तेपणा मुळे बिलं पास करुन घेता न येणे, आणि बोलबचनगिरी न करता संयम बाळगणे यात तुला साम्य दिसतंय, हाच एक उच्चकोटिचा इनोद आहे...

मग आता टेक्सस सुद्दा युनियन मधुन फुटणार असं तुला वाटत असेल ना... >> तीनच शब्द सांगतो Texas Nationalist Movement. त्याचा उगम बघ नि कुठे जातेय ते बघ. ह्यात सामील असलेले लोक त्यात्या वाले आहेत बरंका.

आता काय बोलणार याच्यावर >> काही बोलायला आहे का खरच तुझ्याकडे पण ? नाकर्तेपणा शब्द वापरलास तिथेच तुझ्या भूमिके मधले बिंग उघडे पडते. तेंव्हाही तो प्रश्न तू खवचटपणे विचारला होता हे उघड होते रे.

क्रूझ म्हंटला का हे आज? >> हो रे. माणसाने किती कोडगे असावे ह्याला पण हद्द आहे. तात्या परवडला असे म्हणायचे ह्या नगांपेक्षा..

>>ह्यात सामील असलेले लोक त्यात्या वाले आहेत बरंका.<<
म्हणुनंच विचारलं तुला. टेक्सस सेपरेट होणार का? तुला काय वाटतं, हो कि नाहि, एव्हढंच सांग. सारवासारव नको... Wink

>>नाकर्तेपणा शब्द वापरलास तिथेच तुझ्या भूमिके मधले बिंग उघडे पडते.<<
ते कसं काय? मेजॉरिटि असुन देखील बिलं पास झाली नाहित तर त्याला नाकर्तेपणाच म्हणणार ना? कि तुझ्या मते ते संतुलित, संयत नेतृत्व...

म्हणुनंच विचारलं तुला. टेक्सस सेपरेट होणार का? तुला काय वाटतं, हो कि नाहि, एव्हढंच सांग. सारवासारव नको... >> एव्हढ्यात शोधून वाचून झालं पण ? आधीपासून माहित होते ना तुला ? मला वाटलेलेच. वेगळे होणार का की नाही हे बघण्याचा क्रिस्टल बॉल माझ्याकडे नाही पण असा विचार करून त्याची मूव्हमेंट काढणारे नतद्रष्ट आहेत हे दिसतेय , गेल्या आठवड्यापर्यंत देशाचा राष्ट्राध्यक्ष देशाच्या लोक्नियुइक्त प्रतिनिधींच्या संसेदेवर हल्ला करण्याचे चिथावणी देईल असे वाटत नव्हते. गेल्या वर्षापर्यंत देशाचा राष्ट्राध्यक्ष स्वतःच्याच देशाच्या निवडणूक प्रकारांवर एव्हढी तद्दन खोटी राळ उडवेल असे वाटले नव्हते. त्यामूळे सेन-ईंसेन मेजॉरिटी-मायनॉरिटी मधे असणे ह्याबाबात मला तरी विश्वास नाही. तू ज्याला तुझी निष्ठा वाहिली आहेस त्या सारख्या नालायक व्यक्तीला निवडून देण्याचा नि नुसतेच तेव्हढेच नाही तर त्याची सातत्याने भलावण करणे, पाठीराखण करणे ह्या सारखे करंटे प्रकार एक पार्टी सातत्याने करू शकते , एव्हढे सगळे रामायण झाल्यावरही डोनाल्ड्विन सारखा फोरम अजूनही भरभरून वाहतोय. हे बघितल्यावर 'काहीही होऊ शकते' ह्यावर माझा तरी विश्वास सहज बसतो.

ते कसं काय? >> नाकर्तेपणा कौतुकाने वापरतात असे वाटण्याएव्हढे तुझे मराठी कच्चे नाही ह्याची मला जाणीव आहे नि तू 'त वरून ताकभात ओळखणारा आहेस' अशा ढूषा तू बेहमीच मारत आला आहेस तेंव्हा तूच समजून घे. तेव्हढा दूधखुळा नक्कीच नाहीस.

जे झाले त्याचे मला अजिबातच आश्चर्य वाटले नाही. सतत चिथावणी सुरु होतीच. मात्र याची जबाबदारी एकट्या ट्रम्पची नाही तर त्याला साथ देणार्‍या, या निवडणूकीच्या अवैधतेबद्दल खोटे दावे करणार्‍या सर्वांचीच आहे. यात राज्यांचे गवरनर्स, कॉग्रेसमन, सेनेटर्स वगैरे सर्वच मंडळी आली. अगदी गावोगावचे शेरीफ, मेयर आणि काउंसिल मेंबर्सही भागिदार आहेत. खोटा प्रचार करणारा मेडीआ देखील जबाबदार आहे. जे काही झाले तो डोमेस्टिक टेरेरीझम , त्यासाठी अकांउटिबिलीटी हवी. आता यात आपली काहीच जबाबदारी नाही दाखवण्यासाठी अचानक साक्षात्कार झाल्यासारखी विधाने हे एनेबलर्स करत आहेत, हात झटकणे सुरु आहे त्याचेही नवल वाटत नाही.
लोकशाही ही गृहित धरायची बाब कधीच नव्हती, नाही. आपल्या लोकशाहीवर आणि घटनेवर हल्ला झाला त्याचे पडसाद बराच काळ रहातील. फ्यू इन नंबर्स, लो लाईफ म्हणून जे झाले ते ट्रिवीलाईज करण्यासारखे हे नाही. डेमॉक्रॅट्स, रिपब्लिकन आणि इंडिपेंडंट कुणीही असा , एक नागरीक म्हणून आपल्याला खूप काम करायला लागणार आहे.

मायबोलीकरांसाठी माझा एक प्रश्न आहे - कॅपिटल हिलवरच्या निदर्शनात एक व्यक्ती भारताचा झेंडा घेवून होती. ही व्यक्ती जर का अमेरीकन सिटीझन असेल तर अशा प्रकारे भारतीय प्रजासत्ताकाचा तिरंगा वापरायचा तिला काय अधिकार आहे. हा त्या झेंड्याचा गैरवापर नाही का होत? आणि ती व्यक्ती जर का अमेरीकन सिटीझन नसेल तर मग इथे पाहूणे म्हणून रहाताना अमेरीकेच्या निवडणूकीच्या बाबतीत भारताचा झेंडा घेवून निदर्शन करायचा तरी काय अधिकार?

>>> आज ट्विटर हातात आलं की परत मूळपदावर आलाय.
--- ट्विटरने पण हाकललं नुकतच कायमचं - https://blog.twitter.com/en_us/topics/company/2020/suspension.html

फॉक्स न्यूजवरसुद्धा ख्रिस वॉलेसच्या इंटरव्ह्यूमध्ये तात्यांचा खोटेपणा उघड पडला होता (तरी काही भंपक भोटमामा उलट ख्रिस वॉलेसचीच चूक कशी आहे अशा वावड्या पिकवत होते! वर म्हटलं तसं, डिनाय - डाऊनप्ले - डायव्हर्ट अशी ही जुनी स्ट्रॅटेजी आहे, दुसरं काही नाही!); आता ट्विटरनेही नारळ दिला. तात्या तर लाज कोळून प्याले आहेत, पण अमेरिकेच्या अध्यक्षपदाची इतकी बेअब्रू कधी होईल असं वाटलं नव्हतं.

निकलना ख़ुल्द से आदम का सुनते आये थे लेकिन,
बहुत बेआबरू हो कर तेरे कूचे से हम निकले!

>>हे बघण्याचा क्रिस्टल बॉल माझ्याकडे नाही <<
क्रिस्टलबॉल माझ्याकडे हि नाहि, परंतु इतकि समज/खात्री निश्चितच आहे कि सिविल वॉर किंवा ससेशनचे प्रयत्न फलरुपास येणार नाहित; जे सुरुवाती पासुनच मी लिहितोय. फार-फार काय होईल, तुझ्या सारख्याने केलेल्या फियरमाँगरीनला काहि नरम दिलाचे बळी पडत रहातील, भविष्यात त्यांचे डोळे उघडत नाहि तोपर्यंत...

ती भारतीय झेंडा घेतलेली व्यक्ती मायबोलीकर आहे का हा प्रश्न कुणीतरी विचारला होता.
तर तो माणूस व्हिन्संट झेवियर आहे, केरळचा आहे. मायबोलीकर नसावा. भारतातल्या काँग्रेसचा समर्थक आहे. Proud

आपण भारतीय अमेरिकन्स लोक ट्रम्पचा सपोर्ट करतात हे दाखवण्यासाठी भारताचा झेंडा आणला होता असा त्याचा दावा आहे. मला ते ठीक वाटलं. तसंही इथले राजकारणी इंडियन अमेरिकन, कोरियन अमेरिकन, क्युबन अमेरिकन असे ग्रुप्स बनवून त्यांना कोर्ट करतातच. इंडियन अमेरिकन आयडेंटिटी म्हटल्यावर भारताचा झेंडा न्यायला हरकत नसावी. (Unless flag was disrespected in any way). क्रिकेट मॅचेसना पण आता ऑसी सिटीझन असलेले भारतीय पब्लिक भारतीय झेंडे घेऊन येतातच की.

असहमत. भारताचा झेंडा एखाद्या अमेरिकेतल्या कोणत्याही राजकीय कार्यक्रमात वापरणे अयोग्य आहे. मग तो अगदी शांततापूर्ण कार्यक्रम का असेना. याच कारणाने "अबकी बार ट्रंप सरकार" वगैरे घोषणा देणेही अयोग्य आहे.

आणी हे काही शांततापूर्ण निदर्शन नव्हते. पाच लोक जिवानिशी गेले आहेत.

हा रूडी ज्युलियानी २००१ सालचा. डॅन रादर ने घेतलेल्या मुलाखतीमधला. त्यावेळेस काय कमालीचा रिस्पेक्ट त्याला होता ते लक्षात आहे.

आज बहुधा सर्वात जास्त विनोद त्याच्यावर होतात ट्रम्प खालोखाल.

सिडनी पॉवेलने आधी हाय प्रोफाइल केसेस लढलेल्या आहेत. एक लॉयर म्हणून तिचा बराच दबदबा होता.

गेले ४-५ आठवडे वाट्टेल त्या वल्गना केल्यानंतर आता रिपब्लिकन लोकही तिच्यावर विश्वास ठेवत नाहीत. आता तर डॉमिनियनने तिच्यावर १ बिलियन डॉलर्स चा दावा दाखल केला आहे. ट्विटरनेही तिचे अकाउण्ट बॅन केले.

या लोकांना काय गरज पडली असेल ट्रम्पच्या षडयंत्रात सामील होण्याची? पैसा हे कारण तर नसावे. एकतर त्यांच्याकडे भरपूर असेल आणि मुळात ट्रम्पचा पैसे चुकते करण्याबाबत फार लौकिक आहे असेही नाही Happy

हे दोघेही लॉयर आहेत. इतके जाणकार नक्कीच असतील की गेले दोन महिने जे चालले होते त्यात लीगली काहीही दम नव्हता हे यांना माहीत असेलच. मग इतके काय कम्पल्शन असावे याचे आश्चर्य वाटते.

शेवटी ट्विटर ने तात्यांना कायमचा नारळ दिला. शॉपिफायनेही अर्धचंद्र दिला. रेडिट ने केव्हाच फोरम बंद पाडला होता. पार्लर ही आता गूगल प्ले स्टोर मधून काढून टाकला. डोनाल्डविन हा एकमेव फोरम शिल्लक आहे. कदाचित तोही बंद पडेल. हे खरेच योग्य आहे का ? मी ट्रंप समर्थक नाही पण तरीही प्रश्न पडला.

फर्स्ट अमेंडमेंट खाजगी कंपनीला लागू नाही हे मान्य, पण थेट अमेरिकन प्रेसिडेंट चे तोंड बंद करायचे अधिकार डोर्सी वा झुकरबर्ग कडे असणे हेही धोकादायाक नाही का? शिवाय हे चवताळलेले ट्रंप समर्थक अजूनच चेकाळतील. त्यापेक्षा तात्याला हवे ते बोलू देऊन त्यचा प्रतिवाद करणे योग्य नसते का झाले ?

>>थेट अमेरिकन प्रेसिडेंट चे तोंड बंद करायचे अधिकार डोर्सी वा झुकरबर्ग कडे असणे हेही धोकादायाक नाही का?>> अमेरीकन प्रेसिडेंटचे अकाउंट म्हणजे potus account , ते सुरु आहे की. जे खाजगी अकाउंट होते ते बंद केले. potus account वरच्या ट्वीट्स डीलीट केल्या .

<< शेवटी ट्विटर ने तात्यांना कायमचा नारळ दिला. शॉपिफायनेही अर्धचंद्र दिला. रेडिट ने केव्हाच फोरम बंद पाडला होता. पार्लर ही आता गूगल प्ले स्टोर मधून काढून टाकला. डोनाल्डविन हा एकमेव फोरम शिल्लक आहे. कदाचित तोही बंद पडेल. हे खरेच योग्य आहे का ? मी ट्रंप समर्थक नाही पण तरीही प्रश्न पडला.

फर्स्ट अमेंडमेंट खाजगी कंपनीला लागू नाही हे मान्य, पण थेट अमेरिकन प्रेसिडेंट चे तोंड बंद करायचे अधिकार डोर्सी वा झुकरबर्ग कडे असणे हेही धोकादायाक नाही का? शिवाय हे चवताळलेले ट्रंप समर्थक अजूनच चेकाळतील. त्यापेक्षा तात्याला हवे ते बोलू देऊन त्यचा प्रतिवाद करणे योग्य नसते का झाले ?
>>

------ योग्य आहे का अयोग्य हा लाख मोलाचा प्रश्न. पण अध्यक्ष महाशय स्वत: खुले आम जनतेला खोट्या बातम्या सतत एकवत आहेत, त्या खोट्या बातम्यांच्या आधारावर हजारो लोकांना एकत्र येतात... हे बेभान लोक... माईक पेन्स, लिन्डसी ग्रॅहॅम यांच्या मागे पण लागले आहेत. पेन्स च्या नावाने किंचाळत होते (शब्द लिहीवतही नाही... )... काय अपराध केला होता त्याने?

ट्रम्पची नंतरची सावरासवर आणि लोकांना शांततेचे आवाहन हे केवळ कोर्टासाठी (जर केस पुढे कोर्टात गेली तर) डॉक्युमेंटेशन साठी होते... तो अजूनही पराभव मान्य करत नाही. पराभव झाला आहे हेच त्याला कळत नाही.

कुठलिही कृती केली तर त्याचे परिणाम होणारच आहे ( ट्रम्प भक्त चेकाळणार आहेतच)... पण काहीच केले नाही तरी ते शांत बसणार नाही आहेत. आता तर ते सुरक्षा रक्षाकांना मारायला पण कमी करत नाही. दिवसंदिवस धाडस वाढत चालले आहे.

सर्व काही आलबेल आहे हा मोठा गैरसमज ट्रम्पने दुर केला. झालेला प्रकार लोकशाही साठी लांच्छन्नास्पद आहे. बायडन यांचा शपथविधी शोहळा शांततेने पार पडावा...

<< potus account वरच्या ट्वीट्स डीलीट केल्या . >>
----- फर्स्ट लेडीचे पण account आहे. Happy

शपथविधीच्या अगोदर तो काही करणारच नाही याची काही शास्वती नाही. संपर्कासाठीचे अनेक माध्यमे आहेत... आणि ते (त्यातले काही तर मारामारीच्या) तयारीत आले होते हेच दिसते.

Pages