Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कित्ती सुंदर दिसतेय डीश.
कित्ती सुंदर दिसतेय डीश. भाकरीचा तुकडा मोडून ठेच्याबरोबर खावासा वाटतोय.
कॉलेजात असताना एकदा एक ट्रीप केलेली शेजारच्या family सोबत, देवदर्शन होती. पंढरपूरला एस टी stand वर जाताना एक रुपयात भाकरी ठेचा खाल्लेला तो ठेचा एकदम आठवला. ती भाकरी ज्वारी किंवा बाजरीची होती, मोठी होती आणि त्यावर टेस्टी ठेचा, भाजी होती पण सर्वांनी भाकरी ठेचा घेतला. अजूनही चव तोंडावर आहे, स्वस्त आणि मस्त.
शेंगदाण्याचे ओलं तिखट करून बघायला हवं. वेगळी रेसिपी लिहा खरंतर, इथे हरवून जाईल.
मस्त आणि वेगळा बेत जे.बॉ.
मस्त आणि वेगळा बेत जे.बॉ.
फोटो पण भारीए...
कित्ती सुंदर दिसतेय डीश.
कित्ती सुंदर दिसतेय डीश. भाकरीचा तुकडा मोडून ठेच्याबरोबर खावासा वाटतोय....
+1
ओके. मस्त दिसतोय फोटू.
ओके. मस्त दिसतोय फोटू.
लाल मिर्च्या आप्ल्या चविनुसार
लाल मिर्च्या आप्ल्या चविनुसार?
हो साधनातै. ज्याप्रमाणात घरात तिखट खाल्ल जातं त्यानुसार. पण खर सांगतो जरा झणझणीतच ठेवाल तर अजुन भारी.
शेंगदाण्याचे ओलं तिखट करून बघायला हवं. वेगळी रेसिपी लिहा खरंतर, इथे हरवून जाईल.
हो अन्जुतै टाकतोच रेसीपी लवकरच. तुम्हीही करुन बघा नी कळवा.
टाका चटणीची रेसिपी जे.बॉ.
टाका चटणीची रेसिपी जे.बॉ.
मी पण करेन
कळणा भाकरी
कळणा भाकरी
वांगे भरीत
मटकीची उसळ
भात
पायनेपल शिरा
आमचा एक hiv रुग्ण स्वयंपाक मस्त करतो , दरवेळी दोन भाकरी व भाजी आणतो , तो ट्रान्सजेंडर आहे
यावेळी एकाला पार्टी द्यायची होती , ऑर्डर त्यालाच दिली आहे
मस्त बेत BLACKCAT.
मस्त बेत BLACKCAT.
शनिवारी दुपारी आहे
शनिवारी दुपारी आहे
गलोटी कबाब
गलोटी कबाब
गलोटी म्हणजे काय ?
गळणारे ?
हिरवी पपई ?
बाँड भाऊ , इथे वाचून काल
बाँड भाऊ , इथे वाचून काल शेंगदाण्याचं ओलं तिखट केलं . एक वाटी दाणे, अर्धी वाटी तीळ आणि ८ ब्याडगी मिरच्या घेतल्या होत्या. लागेल तसं मिरची भिजवलेलंच पाणी घालून वाटलं. फुलके आणि भरली वांगी याबरोबर एकदम मस्त लागत होतं. चिल्लर पार्टी उद्या ब्रेकफास्टला बेगल + क्रीम चीझ + हे तिखट असं करणार आहे म्हणे. आता चिकनीचे पापड म्हणजे काय ते पण सांगून टाका.
>>चिकनीचे पापड >>
>>चिकनीचे पापड >>
मेधा,
चिकनी ही ज्वारीची एक जात आहे त्या भागातली. दाणा लाल असतो. त्याचे पापड करतात
गलोटी म्हणजे काय ? >>गिलावटी
गलोटी म्हणजे काय ? >>गिलावटी कबाब खाल्लेत..
गिलावटी नावाप्रमाणेच अगदी मऊ असतात.
चिकनी ही ज्वारीची एक जात आहे
चिकनी ही ज्वारीची एक जात आहे त्या भागातली. दाणा लाल असतो. त्याचे पापड करतात
अरे हो विसरलो होतो. हे बरोबर आहे. लाल ज्वारी. धन्यवाद स्वातीतै.
मेधातै भारीच बेत बनवला तुम्ही.
उद्या दोघीजणी लंचला येणार
उद्या दोघीजणी लंचला येणार आहेत. काश्मिरी दम आलू, पनीर बुर्जी, जिरा राईस किंवा साधा भात, दाल फ्राय, आंब्याचा शिरा असा बेत असेल.
याबरोबर कोशिंबिर/रायतं काय करता येईल? दम आलूची ग्रेवी दह्यातील असल्याने शक्यतो रायतं दहीवालं नकोय.
घरात कैरी, पेरु, डाळिंबं, स्वीट कॉर्न, बीट, भोपळी मिरची आहे. यातले काही पदार्थ वापरुन (बिनदह्याचे) काही करता येईल का?
कैरीचा मेथांबा , स्वीट कॉर्न
कैरीचा मेथांबा , स्वीट कॉर्न-डाळिंब कोशिंबीर, पेरू चि गूळ घालून भाजी, सिमला-टोमॅटो-काकडी-कांदा सर्व उभे उभे चिरून त्यात चाट मसाला, लिंबू पिळून तंदूर सॅलड
कैरी, पेरु, डाळिंबं, स्वीट
कैरी, पेरु, डाळिंबं, स्वीट कॉर्न, बीट, भोपळी मिरची>>>>> यातली फळे वगळ ता बाकीचे जरा वाफवून मीठ्,चाट मसाला किंवा हलकीशी जिरेपूड घालून सलाड म्हणूनही चालेल.
वाटली डाळ , कैरी घालून
वाटली डाळ , कैरी घालून
डाळिंबे स्वीट कॉर्न घातले तरी चालेल
आंबटगोड, देवकी, ब्लॅककॅट :
आंबटगोड, देवकी, ब्लॅककॅट : धन्यवाद छान पदार्थ सुचवलेत.
आत्ताच मेथांबा करून ठेवला. बाकी उद्या सांगेन काय केले ते.
आज ज्वारी मिक्सर मध्ये भरडली
आज ज्वारी मिक्सर मध्ये भरडली आणि कण्या केल्या
ज्वारीची अशी आयती तयार भरड करून डब्यात ठेवली तर ती टिकते का? म्हणजे आयत्यावेळी कण्या करता येतील
ज्वारीची अशी आयती तयार भरड
ज्वारीची अशी आयती तयार भरड करून डब्यात ठेवली तर ती टिकते का? म्हणजे आयत्यावेळी कण्या करता येतील>> मला वाट्ते आठवड्या पुरती करून ठेवावी. रविवारी आपण आस्वपू करतो तेव्हा. धान्ये हलकी भाजून घेतली तरी छान होईल.
घरात खूप दिवसांपासून दलिया पडला होता आज पाकीट उघडून तिखट उपमा बनवला. गाजर बीन्स मटार व मक्याचे दाणे घातले. छानच चव आलेली व गरम गरम . ह्याचाच गूळ घालून गोड शिरा कसा करायचा? मला दलिया आवड ले. मधुमेह्यांना उपयुक्त असावे.
टेक्ष्चर थोडे कुसकुस सारखे दिसते. भाता पेक्षा मोकळे होते.
ज्वारी भाजून कोरडी भरड
ज्वारी भाजून कोरडी भरड केल्यास टिकेल. नाहीपेक्षा फ्रीजमध्ये ठेवा.ज्वारी गोड धान्य असल्याने पोरकिडे लवकर लागतात.
त्यात भाजतानाच थोडे जिरे मिरे
त्यात भाजतानाच थोडे जिरे मिरे घातल्यास अजून चव येइल.
ह्याचाच गूळ घालून गोड शिरा
ह्याचाच गूळ घालून गोड शिरा कसा करायचा? ...... अमा, प्रेशर pan मध्ये 1चमचा तूप घालून दलिया 4-५ मिनिटे partayacha.नंतर त्यात गूळ,मीठ,पाणी घालून 3 शिट्या घ्यायच्या.
पाणी जरा जास्तच घ्या.1वाटी दलियाला अडीज ते 3 वाट्या पाणी लागेल.तूप नको असेल तरी वरीलप्रमाणे करा.पण तुपाने मस्तच लागते.बेदाणे काजू हे सर्व एकदम टाकले तरी चालते.आता उद्याच करायला हवे.
अरे वा धन्यवाद. माझ्याकडे
अरे वा धन्यवाद. माझ्याकडे केशर वेल दोडा आहे आणी बदाम भिजत घालते. मला आवड्तो गुळाचा सांजा.
देवकी यांनी रेसिपी सांगितली
देवकी यांनी रेसिपी सांगितली आहेच
तरी माझं थोडं...
दलिया अर्धी वाटी घेतला तरी तिप्पट होईल,
कढईत गरम तूप एक चमचा त्यात 2-3 लवंग फुलली की दलिया खमंग भाजून घ्यायचा,मग, तिप्पट पाणी घालून 3-4 शिट्ट्या करून घ्यायचा
मग कढईत काजू,बदाम तुपात तांबूस करून त्यात शिजवलेला दलिया घालून चांगली वाफ आल्यावर दुप्पट गूळ घालावा, दलिया पूर्ण शिजायला हवा,गुळ घातला की ताठरतो तो चिकटपणा मुळे,
गूळ विरघळळा की गॅस बंद करावा
खाताना गरम दूध हव्या तेवढ्याच दलियात mix करून घ्यावे, सगळ्यात दूध घातलं तर फ्रिजबाहेर टिकत नाही
एक असंच निरीक्षण..
गुळाच्या पदार्थात फ्लेवर नाही लवंग, जायफळ, सुंठ,वेलदोडा घालावा
पण केशर साखरेच्या पदार्थात घालावे,
गुळाच्या खमंगपणात केशराचा वास खुलत नाही
चपातीने ह्या पदार्थावर आक्रमण
चपातीने ह्या पदार्थावर आक्रमण केले आहे
Rakhi purnime la gharatle
Rakhi purnime la gharatle sagle vadildhari means sinior lokan chi get together majhya ghari aahe ..20 ek lok hotil..kahi tari pot bhari ch one meal dish suchava please.. sweet dish goda cha sheera aahe.
बिशी बॅळी भात (aka बिशी बॅळी
बिशी बॅळी भात (aka बिशी बॅळी हुळी अन्ना)
पाव भाजी गोडाला नारळी भात करा
पाव भाजी
गोडाला नारळी भात करा
Pages