बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीया,
आरारांची प्रतिक्रिया ते करत असलेल्या कामाबद्दल नाही तर कोविड सेफ्टीबद्दल आहे. येणारी मंडळी तुमच्या पक्क्या सेफ सर्कल मधली आहेत असे मी गृहित धरले होते. असो, तुमच्या घरात ज्या व्यक्ती रहात नाहीत त्यांच्यासोबत सण साजरा करणार आहात तर सुरक्षिततेसाठी जी मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत ती काटेकोरपणे पाळा.

अमा, येणारी मंडळी कोण आहेत , त्यांचे आणि स्वतःचे फूड प्रेफरन्स, आपली कुवत , त्यानुसार जेवणाचा मेन्यू ठरणार ना? आणि स्टेक, बर्गर, अ‍ॅपल पाय, पिझा याला देखील घरी करायचे तर बर्‍यापैकी मेहनत आणि कौशल्य लागतेच. साधा पास्ता, सॅलड म्हटले तरी पाहूण्यांना वाढावे असा दर्जा राखायचा तर हात बसलेला हवा.

Here in mumbai it is possible to get entire Thanksgiving meal home delivered. And a turkey or bacon sandwich doesn't take much skill. Usme kya hai maje karo

अमेरिकेत राहणारे गुज्जू तर सोडाच पण बाकी खूप कमी भारतीय फूडचे इतर ऑपशन एक्सप्लोर करतात. थाई, चायनिज, चिपोटलेचे मेक्सिकन (जे खरे मेक्सिकन नाहीच) व्हेज burrito, सलाड किंवा नाचोज बस एवढेच. पिझ्झाही आता भारतीय style मिळतोच.

आता भारतात पण थॅंक्सगिविंग साजरी होते ? पण का ? मी तर ब्लॅक फ्रायडे शॉपिंगच्या वगैरे ऍड ही पाहिल्या. आताच तर दिवाळी झाली ना ? परत शॉपिंग साठी लोकांना मोहात पडायचे ?

अमा,
डेलीतून मिळणार्‍या टर्कीचे /हॅमचे सँडविच हे जन्म सावित्री लंच. जिथे कन्विनियन्स फूड हे रुटिन आहे तिथे घरी जेवायला बोलावले , तर शक्यतो घरचे अन्न अपेक्षित असते, किंवा मग प्रॉपर प्रायवेट केटरर कडचे फूड - ज्यात मिनिमम ऑर्डर तशी बरीच मोठी द्यावी लागते. पॉटलक केले तरी ' घरी केलेले काहीतरी खास' असा लोकांचा कल असतो. थॅक्सगिविंगचे तयार जेवण इथेही विकत मिळते, पण बर्‍याच जणांचा तो प्रेफरन्स नसतो. जी सणासुदीची मजा 'अ' च्या हातच्या स्वीट पोटॅटो कॅसरोल, 'ब' कडचा पिकान पाय अशी अंगत पंगत करण्यात आहे ती बॉक्समधल्या ठोकळेबाज चवीत नाही येत.

असो. आमच्याकडे कोविडमुळे २६ वर्षांतले पहिलेच थँक्सगिविंग ज्याला फक्त आम्ही दोघेच जेवायला. देशी सणांच्या अंगत-पंगतही टाळल्याच.

स्वातीताई, व्हर्च्युअल फिस्ट करायची मग ओळखीच्या लोकांसोबत. हा एकमेव उपाय आहे आता. 2020 फार वाईट गेलं Sad

इन जनरल या धाग्यावर अवांतर पण अमेरिकेत आल्यावर मला जाणवलं की इथके देसी लोकं नॉन देसी लोकांपेक्षा किंवा भारतातल्या लोकांपेक्षा जास्त घाबरलेले आहेत. अर्थात घाबरून राहिलेलं जास्त चांगलं आहे या काळात हे ही मान्य पण कधीपर्यंत असं जगणार हे ही येतं मनात Sad

रीया,
आमच्या ओळखीतले देशी एकत्र जमत आहेत आम्ही मात्र काइंड ऑफ सेल्फ क्वारंटिन आहोत कारण इतरांसारखे घरुन काम नवर्‍याला नाही. दोन मुख्य प्लांट्स + सिस्टर कंपनीला सपोर्ट+ आउटसोर्स केले आहे ते प्लांट्स असा बराच मोठा व्याप त्याच्याकडे आहे. दर आठवड्याला त्यात कुठे ना कुठे कोविड केसेस , कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वगैरे भानगडी बघता सगळी नियमावली पाळत काळजी घेतली तरी संसर्गाचा धोका आहेच. मी अधुन मधुन मुलांसोबत काम करते तेव्हा सोशल डिस्ट्न्स , मास्क वगैरे प्रोटोकॉल पाळायला लावणे तर धन्यवादच असते. आमच्यामुळे इतर कुणाला त्रास नको म्हणून आम्ही आपले सोवळे पाळतो. Happy

Happy रिया, कधीपर्यंत हा प्रश्न बहुतेक लोकं विचारू लागले आहेत. I am with you there. सगळ्यात सोपे उत्तर जीव प्यारा आहे तोवर. आता जरा नुआन्स्ड उत्तर- तुम्ही ज्या भागात राहता तिथे किती लोकांत अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत त्यावर हे ठरेल. त्यामुळे काऊंटीच्या वेबसाईटवर वेळोवेळी येणारी माहिती वाचणे फायद्याचे ठरते. त्यानुसार उत्तर बदलेल. आता अगदी ठोबळ उत्तर- मॅरॅथॉन आहे... अजून एक वर्ष.

पण हा विचार आता जाऊ दे.... येणारच आहेत लोकं आता तर करा एंजॉय हे क्षण सुरक्षा नियम पाळून...

एक कोव्हीड काळासाठी खास म्हणून 'इम्यून बूस्टींग कचोरी' यूट्यूबवर पाहिली होती. ती स्टार्टर म्हणून (एरवी करायला, पाहुण्यांसाठी नाही) चांगली असेल असे वाटले होते. सापडली तर टाकते इथे नंतर.

हा हा सीमंतिनी, कालच इम्युनिटी बूस्टर पावभाजीची जाहिरात पण पहिली Lol

आमच्या एरियात 1400 केसेस आणि 7 डेथ आहेत. सध्या स्प्रेड थांबलाय म्हणे पण आम्ही संभाळूनच आहोत.

आमच्या भागात दुसरी लाट सुरू झाली आहे. १-२ महिन्यापुर्वी तर बऱ्याच लोकांनी दणकून पार्ट्या केल्या होत्या.
ईथे ओक ट्री (एडीसन) रोडवर नेहमी गर्दी दिसते. पटेलमधे भाजी घेत होते तर बाजूला दोन बायका येऊन उभ्या राहिल्या. मास्क लावला होता पण तोंडाचा पट्टा कायम चालू. काही लोक सहकुटुंब भाजी घ्यायला येतात. त्यांची पोरं दुकानभर पळत असतात. Sad
त्यामुळे कमी गर्दीचा दिवस आणि वेळ शोधावी लागली. शॅापराइट मधे विकांतला सकाळी ७.३० लाही गर्दी पाहून तशीच माघारी आले होते. तिथे जावे लागले तर विकडेज मधे रात्री १०.३० ला जाते. अजून वर्षभर असेच रहावे लागेल.

मुख्य म्हणजे अमेरिकेत राहणारे लोक तिथलेच काही का नाही खात बनवत असा प्रश्न पडतो. तिथे देशी खाण्याचे काय कौतूक?>>>
उलट असतं अमा. बाहेर इतर गोष्टी सहज मिळून जातात पण देशी खाणे मिळत नाही म्हणूनच अप्रुप असते. अमेरिकेचे काय घेऊन बसलात, इथे पंजाबात आम्ही मराठी कुटुंबं भेटलो तर ' साधं पिठलं भाकरी, दाल खिचडी' मेनू सांगायचो मुद्दाम. घरी आपण बनवत असलो तरीही कधी कधी दुसऱ्या चविचे पण आपल्या सवयीतले पदार्थ खावे वाटतात.

हा बेत परवा केलेला. पुढच्यावेळी एक भाजी कमी करेन बहुदा.
साबुदाणा वडा
सुरळीची वडी
चिप्स/चिवडा वगैरे होते जोडीला.
चपाती (विकतच्या)
भरली भेंडी (कुट घालून)
पनीर लबाब्दार
आलु मेथी
ग्रीन पुलाव
टोमॅटो सार
बीट कोशिंबीर
गाजर हलवा

परवा संध्याकाळी मित्र सहकुटुंब सहपरिवार जेवायला आमंत्रित होता. त्यावेळचा मेन्यु असा होता.
१. सुरुवात चहा पासुन (वातावरण बर्‍यापैकी थंड होतं)
२. सोबत कोबीच्या कुरकुरीत भज्या.
३. नंतर रात्रीच्या जेवणात कळण्याची भाकर
४. शेंगदाण्याचं ओलं तिखट
५. मिरचीचा ठेचा
६. शेंगदाण्याचं कच्च तेल, कच्चा कांदा
७. घरगुती लोणचं,
८. चिकनीचे आणी तांदळाचे पापड तळुन.

मित्राचा परिवार साधारणपणे मुंबईचा असल्याने कळण्याची भाकर वगैरे ऐकुनच माहित असणारा नी खुपच कमी तिखट खाणारा होता.
त्यांच्या हिशोबाने कमीच तिखट बनवल होत त्यांनीही हा हु करत खाल्ल आणी आवडलं ही त्यांना.

मानव भारी जोक Lol

मला माहिती असल्याने कळली, डोंबिवलीत मिळते काही पोळी भाजी केंद्रात ही भाकरी. टेस्टी असते आणि त्याबरोबर ठेचा जबरी लागतो. थोडी माहिती आहे पिठाची कसे करतात ते पण जेम्स बॉंड नीट सांगतील. कळणे म्हणजे आख्खे उडीद बहुतेक.

कळण्याची भाकरी म्हणजे ज्वारी+ उडीद याच्या पिठाची करतात.सालासकट उडीद किंवा उडीद डाळ घेतात. इती खानदेशी मैत्रीण!

आमच्याकडे कळना म्हणजे तुरीच्या डाळीच्या कण्यांची कांदा व आंबा टाकून केलेली भाजी , तर उडीद +ज्वारी भाकरी म्हणजे उडदाची भाकरी.

सीमा, इतके पदार्थ घरी केले? बापरे!!

भाकरीसोबत फक्त तोंडी लावण्याचे पदार्थ चालून जातात का? एकतरी भाजी हवी असे वाटले पण तिकडे तशी पद्धत असेलही.

धन्यवाद लोकहो.
अन्जुतै, देवकीतै बरोबर आहे.
कळणं म्हणजे ज्वारी, उडीद आणी त्यात प्रमाणानुसार मीठ टाकुन दळुन आणुन त्या पिठाच्या भाकर्‍या करायच्या. ही भाकरी निखार्‍यावरुन/गॅस वरुन ट्म्म फुगलेली असताना उतरवुन तिचा पापुद्रा(पोपडा) उलगडुन त्यावर लगेचच शेंगदाण्याचं कच्च तेल टाकुन नुसती खाल्ली तरी अशी लागते नां की ते इथे सांगुन समजणार नाही.
अंजली_१२ तै भाकरीत आधीच मीठ असल्याने ती नुसत्या ठेच्या बरोबर किंवा शेंगदाण्याचं कच्च तेल टाकुन छान लागते.
साधना तै ही भाकरी अशीच खातात. ज्वारी, बाजरी किंवा दादर(शाळु ज्वारी) सोबत भाजीवगैरे लागते.
भाकर कळण्याची असूनही कळली नाही.
मानवदा भारीच.........आता कळली असेल कळण्याची भाकर
सूर्यगंगा तै/दा
हे मला वाटतं सटाणा, कळवण कडचं व्हेरीएशन आहे नां???

शेंगदाण्याच ओलं तिखट...
लाल सुक्या मिरच्या. पाण्यात भिजत ठेवाव्यात १५-२० मि.
शेंगदाणे भाजुन घ्यावेत. एक वाटी
तीळ भाजुन घ्यावेत. १/२ वाटी
मीठ चवीपुरते.
या चारही गोष्टी पाट्यावरवंट्यावर्/मिक्सर ग्राईंडरला वाटुन घ्याव्यात किंचीत पाणी/तेल(१/२ चमचा) टाकुन.
भाकरी बरोबर ही चटणी खाताना यावर शेंगदाण्याचं कच्च तेल टाकुन खावं.

Pages