शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कनवाळूपणे .... न
कायमसाठी....... य
मनमोकळा..... न
नमस्काराच्या...... म
मनोधैर्यवान ...... नो
सहवासातून....ह
करवादणे........ र

अरे सुटलं.... मस्त विक्रमसिंह
मनोहर. मनोरम दोन्ही शब्द निघतात की दिलेल्या शोधसूत्रातून
मला मनमोहक सुचले पण उरलेली २ अक्षरे नाही जुळली अर्थपूर्ण.
नयन नाही बघितला

गूढ

१. स्वतःच्या वास्तूत शत्रू म्हणतो माझे सर्वांचे आवडत्या गोष्टी मिळण्याचे ठिकाण (६)
२. लांबून बघा पण जवळच बसा (५) = दूरदर्शन
३. यात रबरापेक्षा हिरा लवचिक ? (६)
४. आपला आपण खा हा जंगलातला काटकोन (५)
५ पोचायचा की मारायचा (२)
६ विस्कळीत प्रयत्न निश्चित सुरवाती नंतर अंतर मग शेवटी हाती काहीच नाही (६)

दोन्ही नाही.

३ सोडून बाकी नेहमीच्या वापरातले शब्द आहेत. ३ सुद्धा नेहमी वापरत नसलो तरी सर्वांच्या माहितीचा आहे. दहावी बारावीत शास्त्र शिकलेल्यांना नक्कीच. Happy

३.
उत्तर : यंग्ज मॉड्युलस?
की
यात म्हणजे "भौतिकशास्त्रात" हे उत्तर?

६ विस्कळीत प्रयत्न निश्चित सुरवाती नंतर अंतर मग शेवटी हाती काहीच नाही (६)

प्रयन्त अथवा त्याच्या समानार्थी शब्दाची अदलाबदल, + नि (निश्चितची सुरूवात) + अंतर चा समनार्थी शब्द . ही दिशा बरोबर आहे का?

दूरदर्शन बरोबर

नि (निश्चितची सुरूवात) + अंतर चा समनार्थी शब्द, हे बरोबर
श्रमपरिहार नाही

"भौतिकशास्त्रात" हे बरोबर नाही पण दिशा बरोबर Happy
यंग मॉड्युलस याच्याशी संबंधीत.

६ निरवानिरव ?

नि(श्चीत) (सु)रवा(त) ....

सर्व गोष्टी दुसऱ्यांवर सोपवल्याने ‘हाती काहीच नाही’.

नाही.
कुमारजी नेहमीचेच शब्द आहेत.

१. स्वतःच्या वास्तूत शत्रू म्हणतो माझे सर्वांचे आवडत्या गोष्टी मिळण्याचे ठिकाण (६)

स्वतःची वास्तू = स्वयं घर

शत्रु : पाक

स्वतःच्या वास्तूत शत्रू म्हणजे पाक हा स्वयं घर मध्ये जाईल.

स्वयं(पाक)घर. - आवडत्या (खाद्य) गोष्टी मिळण्याचे ठिकाण.

१. स्वतःच्या वास्तूत शत्रू म्हणतो माझे सर्वांचे आवडत्या गोष्टी मिळण्याचे ठिकाण (६) = स्वयंपाकघर.
२. लांबून बघा पण जवळच बसा (५) = दूरदर्शन
३. यात रबरापेक्षा हिरा लवचिक ? (६)
४. आपला आपण खा हा जंगलातला काटकोन (५)
५ पोचायचा की मारायचा (२)
६ विस्कळीत प्रयत्न निश्चित सुरवाती नंतर अंतर मग शेवटी हाती काहीच नाही (६)

४. आपला आपण खा हा जंगलातला काटकोन (५)

खा - स्वाहा ~ त्यातला हा खाऊन - स्वा.
स्वा व(लंब)न ( वनामध्ये लंब)

Pages