चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथले वाचून आत्ता नेफ्लिवर लुडो बघितला.. अमेझींग!!!! कित्येक दिवसांनी चित्रपट पाहताना खळखळून हसले.... सगळीच कामे जबरदस्त... राजकुमार राव प्रचंड आवडायला लागलाय.. जबरदस्त अभिनेता.. त्या इंस्पेक्टरने पण धमाल आणली. अभिषेकशी बोलताना नकळत टाचा उंचावून स्वतःला उंच करून घेतो... सगळ्या गोष्टी आवडल्या. परत पाहणार कारण पहिल्यांदा पाहताना पहिला अर्धा तास काहीच कळत नाही पण तीच दृश्ये परत येतात तेव्हा संगती लागते. यमराज चित्रगुप्त भानगड गॅस फुटतो तेव्हा कळली नाही, ती शेवटी कळली... अभिषेकने खरेच मस्त काम केलंय. बायकोशी बोलताना मुलीशी भेट होणार नाही हे लक्षात आल्यावर बदललेला चेहरा.. चेहऱ्यावर भावना खूप चांगल्या दाखवल्यात... मिनी पण मस्त... चिकु खुश तो मैं खुश.. Happy Happy

अरे मस्त आहे लुडो! मज्जा आली बघायला. स्टोरीच्या ट्रीटमेन्ट मुळे मलाही प्रथम काही वेळ कन्फ्युज व्हायला झाले पण एकदा तो प्रकार लक्षात आल्यावर की मजा येते. सगळे कलाकार मस्त.
पंकज त्रिपाठी बेष्टच. राजकुमार राव पण भारी Happy

आज सोमवारी दुपारी घरी म्हणून राजवाडे आणि सन्स लावला होता. डिस्ने हॉट स्टार वर आहे. प्रचंड डोकेदुखी सिनेमा आहे. मराठीतील करण जोहर पटच. लाडावलेली अति शिरीमंत मुले त्यांची एक्सिस्टं न्शिअल आंग्स्ट. घरचा बिझनेस करायचा नाही. एका मुलीला मॉडेलिन्ग करायचे आहे तर एकीला जग फिरायचे आहे. ( व्हेकेशन म्हणून काम किंवा अनुभव म्हणून नाही.) एक मुलगा जाम नेट सावी आहे व हॅकर आहे. एकाला घरचा बिझनेस जॉइन करून सर्व मलिदा व सुखे हवी आहेत. ही थर्ड जनरेशण. सेकंड जनरेशन चे पण कायकाय पिद्दू इशूज आहेत. बाबांनी लवकर लग्न करवले. मुंबईला जाउ दिले नाही नाटक करायला, मी साधा माणूस आहे. / मी डबल लाइफ जगतो( पक्षी ढोंगी) मी घरातोन पैसे घेउन पळून गेलो आणि जग बघून आता फक्त आईला भेटायला पुणे बघायला आलो इत्यादि. फर्स्ट जनरेशन ला फक्त हे सर्व मोट एकत्र बांधून त्यांच्यावर कडक नियंत्रण ठेवत वरण भात जीवन जगायचे आहे. पण जबरदस्त हाय फाय. घरी ब्लॅक मनी येतो पण एकाचाही आत्मा दुमडत नाही हे का येते असे का होते हे बरोबर नाही. बिझनेस ना मग असेच असायचे. ही तरुणाई रात्री बेरात्री कार मधून बाहेर कॉफी प्यायला जाते.

व पुढे स्वतःची स्वप्ने पुरी करायला घर सोडून जाते. मध्येच हरवलेला गुट् गुटीत काका अनेक असे स्पेशल प्रॉप्स घेउन येतो. जसे यलो ट्रंक. कॅमेरा कवितांची वही. एकूण सर्व लोक्स घरच्या पैशावर मजा करत आणी स्वतःची दु:खे गोंजारत राहतात. सो फार सो बॅड. पण डिरेक्षन, टेकिन्ग वगैरे आता पाहिले तर अगदीच प्राथमिक व बेसिक आहे. कथा कशीही पुढे जाते. व हे सर्व आता फार डे टेड वाटते. नव्या काकाला ही टेक साव्ही मुले ट्विटर अकाउंट आहे का फेसबुक अकाउंट आहे का असे जहाल प्रश्न विचारतात. हा काही स्फूर्तिदायक रेन मेकर टाइप व्यक्ती आहे. ह्याला बघून आई कायम रड्त राहते. तग मग तगम ग झगमज अशी एजी गाणी आहेत.

एक मुलगा त्यातल्या त्यात मैत्रीणीला व्हल्गर बोलत राह्तो. व हे सर्व स्काइप वरून चॅट करत असतात. ( प्रि हिस्टॉरिक वाटे)
मुलांची मेन तक्रार काय तर चार भले मोठे फ्लॅट आपल्या नावावर होउन ते आतून जोडले जातील म्हणजे प्रायव्हसी नाही!!! एक दिवस
धारावीत राहुन बघाना नेपो किड्स असे म्हणावे वाटले. आय मीन सेल्फ डिस्कव्हरी वगैरे.

चक्चकीत मीनिन्ग लेस मुव्ही.

अमा Lol वंदना गुप्ते, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी ,ज्योती सुभाष वगैरे लोकांचे चित्रपट बघायला कंटाळा येतो अक्षरशः.
आणखी काही अ‍ॅड यातच : मिथिला पालकर, सुकन्या कुलकर्णी

राजवाडे आणि सन्स महाभिकार चित्रपट आहे. टॉर्चर मेथड म्हणून टेररिस्टविरुद्ध वापरावा इतका वाईट चित्रपट आहे.
(त्यात पर्ण पेठे नाही हीच एक कमी आहे अन्यथा annoyance ची परिपूर्णताच गाठली असती.)

लेम वाटला मलाही , डेलीसोप टाइप किंवा अजून बेकार Lol

मी मृणाल /अतुल कुलकर्णी गटातून गिरिष कुलकर्णी गटात उडी मारली आहे. प्रेक्षक म्हणून जरा समाधान वाटतेयं.

पूर्वी बेकरीत लिहीले होते राजवाडे बद्दल. सेव्ह करून ठेवले होते:

रूम कडे फेस करून ठेवलेला कॅरम. खानदानी कुटुंब वाड्यात जेवताना प्रवेशद्वारासमोर तेथेच बसलेत. एक हेवी पुस्तक व त्याचे संदर्भ असायलाच हवेत चित्रपटात. त्याशिवाय वजन प्राप्त होत नाही. ट्विटर, फेसबुक च्या जमान्यातील व्यक्तीला न्यू यॉर्क मधे राहताना "सवाई गंधर्व अजून सुरू आहे का" माहीत नाही. आणि पर्वती आहे का अजून हा काय प्रश्न आहे? खानदान, परंपरा वगैरे मधे मोठी मुलगी सोडून धाकट्या मुलीच्या लग्नाचे आधी प्रयत्न. एका ज्वेलर कुटुंबातील मुलगी प्रतिस्पर्धी कंपनीसाठी मॉडेल. मृणाल कुलकर्णी ला मुंबई बद्दल माहिती आहे की नाही याचा सस्पेन्स. म्हणजे हे लोक पुण्याबाहेर पडले नाहीत हे मेटॅफोरिकली, की खरेच अजिबात पडले नाहीत? आणि अतुल कुल्कर्णीची सेक्रेटरी, तिचे नाव व तिचा अ‍ॅक्सेण्ट पाहिल्यावर तर "सिरीयसली, यू टू सचिन?" शिवाय दुसरी प्रतिक्रिया आली नाही.

आणि तो विक्रम? रोमेनियाचा पासपोर्ट. राहिला लंडन आणि न्यू यॉर्क मधे. बोलतो ते जर्मन वाटले. आणि इन्व्हेस्टमेण्ट कन्सल्टंट आहे. पण काय करतो ते विचारल्यावर सांगतो ट्रान्स अटलांटिक केबल मधे त्याचा शेअर आहे. म्हणजे नक्की काय? ती केबल बसवणार्‍या टेलिकॉम कंपनीत त्याचा शेअर आहे, की अचानक अशा कंपन्या स्पेसिफिक प्रोजेक्ट चे शेअर विकू लागल्या?

आणि ते डबिंग. नाट्यवाचन सुरू आहे असे सहज कळते. सीन मधे हे ऐकू येत आहे असे वाटत नाही. ज्योती सुभाष यांनी इतका फिका परफॉर्मन्स दिला नसेल कधी. आणि ती श्वेता चा रोल केलेली - नाव आठवत नाही- सगळे संवाद एकाच कलरलेस, ओडरलेस सुरात म्हणते. कोणी कोणाशी नैसर्गिक भाषेत बोलत आहे असे वाटतच नाही. मुळात घरात कोणाला त्या भावाबद्दल काही वाटत आहे वगैरे दिसत नाही. समोर आला की भाउ. नाहीतर विसरले.

त्या कलरफुल शूज वाल्या एण्ट्र्यांचे काय लॉजिक आहे नक्की? किती वेळा प्रत्येकजळ व्हायब्रण्ट कलर चे शूज घालून येतो, आणि रजनी च्या एण्ट्री प्रमाणे कॅमेरा तेथे क्लोजप घेउन मग झूम आउट करतो!

अनेक सीन "हा बघा किती भारी सीन झाला. चला आता पुढचा सीन पाहून इम्प्रेस व्हा" अशा पद्धतीने तुकड्यातुकड्यात येत जातात.

ती पूर्णिमा मनोहर म्हणजे पूर्वीची पूर्णिमा गानू ना? तिने पूर्वी बरेच मोठे आणि चांगले रोल केले आहेत हे लक्षात आहे ("ऑल द बेस्ट" मधेही होती ना?). इथे नोटांची बंडले हाताळण्याशिवाय काही मीटी स्टफ नाही तिला

आणि तरीही पिक्चर आवडला नाही असे म्हणवत नाही. सचिन खेडकर आणि अतुल कुलकर्णी दोघांचा वावर मस्त आहे. जरी अतुल कुलकर्णे शुक्र-सोम याच्या मधे सॅन फ्रान्सिस्कोलाही जाउन येतो ही सिनेमॅटिक लिबर्टी धरल तरी (एकदा सिंगापूर ला ८ तास हॉल्ट वाल्या फ्लाइट ने जा म्हणावं). काहीतरी नक्कीच आहे पिक्चर मधे बघण्यासारखे. पण नेमके बोट ठेवता येत नाही. मुलांचे एकमेकांशी वागणे वगैरे आवडले.

पण नेमके बोट ठेवता येत नाही.>>>
मला तर लक्षातच राहिला नाही. छाप सोडत नाही म्हणता येईल. दोन दिवसात विसरून जातो. पुनःपुन्हा पहावा वाटत नाही. Basically it doesn't add anything to your core (कोरेच रहातात प्रेक्षक) or demand any new emotion from you. This is applicable for books also !! It should take time to process and it should marinate to some extent.
काही तरी द्या बाबा आम्हाला Happy
असे सिनेमे कितीही बिग ब्रँड /बजेट वाले असले तरी काही प्रभाव सोडत नाहीत. एक प्रेक्षक म्हणून मी तर फक्त strong script व गुणी कलाकार असलेले काहीही आवडीने बघू शकते. बाकी सर्व पर्यायी !!

देऊळ मात्र पुन्हा पुन्हा पहावा वाटतो.
तो नसिर यांचा दरोडेखोर सिन तर फार आवडता आहे.

>>>मला अतुल कुलकर्णी आणि सागरीका घाटगेचा 'प्रेमाची गोष्ट' पिक्चर
अरे कशी बोलते ती मराठी.. इंटरेस्ट गेला माझा..

लक्षुमी मस्त आहे

पण ओरिजिनल कंचना मस्त आहे , त्यात कॉमेडी सहज होती
लक्षुमीत ओढाताण आहे

प्रेमाची गोष्ट पण भयाण आहे.
त्यातलं ते ओल्या सांजवेळी गाणं फक्त छान आहे.

त्या तुलनेत गुलाबजाम आणि मुरांबा हे नावाप्रमाणेच गोडमिट्ट चित्रपट - 'द युनायटेड स्टेट्स ऑफ स.पे., कोथरुड अँड प्रभातरोड' मधील #firstworldproblems वरच असले तरी आवडले होते.

प्राइमवर "छलांग" आला आहे. अर्धा पाहिला काल. मस्त आहे. कॉमेडी जमली आहे. >>> हांं, पाहिला . Predictable आहे. पण चांगला आहे. कबड्डी फायनल मस्त जमलीय.
नुसरत ने असे वेगळे रोलस् करावेत. ती Dreamgirl मध्ये पण छान दिसते.

लक्ष्मी तद्दन फालतू!
फक्त शरद केळकरसाठी बघावा (दहा पंधरा मिनिटांसाठी!!!)

लुडो सुरू केला पण कन्फुजिंग वाटला फारच त्यामुळे सोडून दिला. पण इथे वाचून वाटतेय बघायला हवा. छलांग पण सुरवातीचा थोडाच पाहिला. जेवढा पाहिला तेवढा तरी आवडला.

लक्ष्मी च्या पुढे बाँब नावाचं प्रयोजन काही कळलं नाही. शरद केळकरचं काम जास्त आवडलं.

लक्ष्मी तद्दन भिकार चित्रपट आहे, प्रेक्षकांना गृहीत धरून चित्रपट बनवला आहे, अर्थात त्यांची पण पूर्ण चुकी नाही, हाऊसफुल 4 सारखा चित्रपट जर 200 crore पेक्षा जास्त कमावतो तर प्रेक्षकांना गृहीत धारणारच

राजवाडे अँड सन्स मलाही अज्जिबात म्हणजे अज्जिबात आवडला नव्हता.
त्यातल्या त्यात आवडलेल्या गोष्टी म्हणजे भावंडांचं एकमेकांशी दाखवलेलं नातं, वाडा रिकामा करून गेल्यावर प्रत्येकजण आपापला (किंवा कुणाला तरी घेऊन) परत येऊन काही खास करतो ते. दिवसाचं गजबजलेलं, ट्रॅफिकने तुंबलेलं पुणंही दाखवलं असतं तर रात्रीचे निवांत रस्ते बघायला कदाचित आवडले असते. (जसं गली बॉयमध्ये आहे). नुसतेच रात्रीचे निवांत रस्ते दाखवल्यामुळे ते खरे वाटत नाहीत.
तो एकाला फोन आला की दुसऱ्याने घेण्याचा गेम काय!! असं कुणी फोनवर पलीकडून बोलायला सुरुवात करतं का परस्पर? उगाचच काहीही. जिला मॉडेलिंग करायचंय ती मुलगी जरा खुट्ट झालं की घळाघळा रडते काय!

फारएन्ड, <<अनेक सीन "हा बघा किती भारी सीन झाला. चला आता पुढचा सीन पाहून इम्प्रेस व्हा" अशा पद्धतीने तुकड्यातुकड्यात येत जातात.>> अगदी अगदी.

बटबटीत आहे हा पिक्चर. " वाडा चिरेबंदीमधलं माझं काम बघून जब्बार पटेल म्हणाले होते, दुसरी स्मिता पाटील जन्माला आली आहे" हे वाक्य तर कहर आहे.
अतुल कुलकर्णीचं पात्र काहीच्या काही आहे. तसंच त्या पळून गेलेल्या भावाचंही. फक्त तो परत येतो तेव्हा सहज आल्यासारखा टेबलाजवळच्या रिकाम्या खुर्चीवर बसतो तो सीन आवडला होता.
मला मृणाल कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, ज्योती सुभाष हे सगळे आवडतात. (म्हणून तर आवर्जून जाऊन बघितला सिनेमा) पण ठार निराशा झाली.

मला लक्ष्मी पाहिल्यावर हाऊसफुल्ल 4 पण अर्थगर्भ वगैरे वाटायला लागला.त्यातले जोक चिजी आहेत.बाकी सर्व राजकुमार बाला प्रकार अतियक्क आहे.

मृणालचा अभिनय आणि एरवीचं बोलणंही फार नाटकी वाटतं हल्ली. नुकतीच सुलेखा तळवलकरनं घेतलेली एक मुलाखत पाहीली. भयंकर इंग्रजी फाडलंय त्यात. मराठीसुद्धा इंग्रजी अॅक्सेटमधे बोलते ती. मराठीच्या प्राध्यापकांची मुलगी आणि गोनिदांची नात..तिला मराठीचा इतका न्यूनगंड का असावा?

तिला मराठीचा इतका न्यूनगंड का असावा?>> कारण ती शि ष्ट व केव ळ सुंदर दिसण याने उगीच हाइप झालेली नटी आहे. अभिनय येत नाही. दुसरी स्मिता पाटील म्हणे. सुभा श मायलेकींना पण बोटीत घालून दूर कुठेतरी नेउन सोडले पाहिजे.

Pages