बीएमसीचे श्वानपालनचे नियम व माहिती.

Submitted by अश्विनीमामी on 6 August, 2014 - 10:15

म्युनिसिपल कॉर्पो रेशन ओफ ग्रेटर मुंबई

सार्वजनिक आरोग्य खाते, श्वान पाळण्याकरता अनुज्ञापत्र
( मुंबई महानगर पालिका अधिनियम १८८८ ( अद्यावत सुधारीत) च्या कलम १९१ अ अंतर्गत.

टर्म्स अँड कंडिशन्स

This license is granted pursuant to the provisions of teh section 191A and 191 b of MMC ACT 1888 and is valid and subsisting subject to the faithful compliance and observance of the conditions stipulated here under.

१) श्वान मालकाने आपल्या श्वानास प्रत्येक सहा महिन्यांनी रोग प्रतिबंधक उपाय म्हणून रेबीज विष प्रतिबंधक लस टोचून घेतली पाहिजे. ह्यासाठी प्राणि रोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.
२) प्रत्येक श्वान मालकाने तो राहात असलेल्या परिसरात आप ल्या श्वानास त्या नियं त्रणाखाली ठेवले पाहिजे.
आणि त्यास बाहेर नेताना मुस्की अगर साखळी बांधून नेले पाहिजे.
३) प्रत्येक श्वान मालकाने जर आपले श्वान वेडाच्या झटक्याने अगर अन्य सांसर्गिक रोगाने आजारी असल्यास
त्याच्यावर प्राणी रुग्णालयातून अगर पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले पाहिजेत व तसा पुरावा
कार्यालयात सादर करावा.

४) श्वानाचा मालकी हक्क बदलल्यास अनुज्ञापत्र नवीन श्वानमालकाच्या नावे करून घ्यावे.
५) नूतनीकरणाच्यावेळी सर्व आवश्यक कागद पत्रे सादर करावीत.
६) श्वानाचा मृ त्यू झाल्यास किंवा ते हरवल्यास त्याबाबत अनुशासन कार्यालयात कळवावे व लायस न्स
रद्द करून घ्यावे.
७ ) अ. पत्राचे उरलेल्याकाळाचे कर परत केले जाणार नाहीत.
८) हे अप कोणत्याही परिस्थिती त दुसृयास देउ नये. अर्थात कुत्र्याची मालकी बदलली जाउ शकते.
९) पाळलेले श्वान हे कोन त्याही परिस्थितीत इतरांना उपद्रवी ठरता कामा नये याची योग्य ती दखल घेतली पाह्जे.

लायसेन्स वर म्युनिसिपल वार्ड, मालकाचे नाव पत्ता फोन नंबर कुत्र्याची माहिती, सर्व वॅ क्सिनेशन्स चा दाखला, व्हेट चे सर्टिफिकेट व नंबर, व्हेट ची जी फाइल असते त्याची कॉपी, द्यावी लाग ते, प्रति लायसेन्स
७५० रु. खर्च येतो व ते लगेच मिळते. ह्यावर असिस्टंट मेडिकल ऑफिसर, व सॅनिटरी इन्स्पेक्टर ची सही होते शिक्का होतो व मग ते हातात येते. दर वर्‍शी रिन्यू करावे लागते.

व्हॅक्सिनेशन शेड्यू ल व इत र माहिती पण आहे. सवडीने लिहीते.
काही उपयुक्त लिंका:
http://jaagruti.org/2013/07/09/pet-dogs-and-street-dogs-dos-and-donts/

http://www.pawnation.com/2014/05/08/10-dog-park-dos-and-donts/

http://www.cityofboston.gov/animals/regulations.asp

http://www.thedogplace.org/Family-Dog/Rules-for-dog-owners.asp

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशुचॅम्प च्या ओड्या ने धागा हायजॅक केलाय Happy
मला पण तो वजन राखून असलेला उडी मारणारा ओड्या , ते डॅम्बीस मांजर आणि या सगळ्यात कुठेच नसलेले, दुपारचे झोपलेले बाबा सगळं डोळया समोर आलं Lol

आमच्या बाळाला खारी सतावतात इथे.
">>>> Happy Happy

यावरुन रावसाहेब त्याच्या कुत्र्याला जिम्या म्हणायचे ते आठवल.>>>>
हे पण तसलंच आहे
ओडीन यु यु म्हणलं तर येत नाही
ओड्या चला आता म्हणलं की येतो

आता फनी ऍनिमल व्हिडिओ चॅनल चालू करा >>>
आहे प्लॅन
युट्युब वर एक टकर, मिया पोलर बेअर आणि बडी असे चॅनेल आम्ही नेहमी बघतो
लै भारी भुभु आहेत हे
आम्हलाही टाकायचे आहेत ओड्या चे व्हीडिओ
नाव पण ठरलं आहे
Thor the God of Thunder
च्या धर्तीवर
Odin the God of Hunger Happy

आशुचॅम्प च्या ओड्या ने धागा हायजॅक केलाय>>>
हो ना, मलाही वाटलं म्हणलं आपण हे सगळं वेगळा धागा काढुन लिहायला पाहिजे

माबो वाचतो का ओडीन>>>>
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

असले काहीतरी वाचले की भूभू palavasa वाटतो.
पण हाती नाही बळ,
दारी नाही आड
त्याने फुलझाड लावू nayechya धर्तीवर तो विचार रद्द होतो.

हो टकर चे व्हिडिओ मी पण पहाते. अजून ते एक चार्ली द गोल्डन म्हणून आहे, त्यात चार्ली ,बडी, डेझी असे ३ कुत्रे आहेत तेही मस्त आहे चॅनल.

कालपासून या धाग्यावरचे ओडिनचे किस्से वाचयेय. भारी किस्से आहेत.
आशूचँप आणि इतर प्राणीबालकांच्या पालकांना विनंती, एक वेगळा धागा काढा ना.

'ओड्याच्या खोड्या' हे नाव मला सुचले आहे. ज्यात भुभुच्या गमतीजमती व धमाल येऊद्या Happy
गंमत म्हणून सहज सुचवतं आहे. पण वेगळा धागा खरंच काढा.

ग्गोग्गोड गोष्टी दुसरीकडे गेल्या ( वाचतोय ) तेव्हा आता हे इथे विचारता येईल.

भूभूने रस्त्यावर टाकलेला प्रसाद कागदात गोळा करणारे भुभूपालक (भारतात) कोणी पाहिले आहेत का?
आमच्या समोरच्या सोसायटीत एकींचा अर्धा फूट उंचीचा भूभू होता, तो त्यांच्या आवारातच ( घर तळमजल्यावर) प्रसाद टाकायचा. त्या तो
नंतर येऊन कागदात गोळा करीत. हे एकमेव उदाहरण पाहिलंय.

गंमत म्हणजे रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांच्या चाकांना त्या वाहनांच्या मालकासमोरच पाळीव भूभू पालकांच्या देखरेखीखाली अभिषेक करताना अनेकदा पाहिलंय Lol

I pick up dog poop every day. Correct way is written in bb. It is mandatory in society premices. And also on bmc roads. Footpaths anywhere especially. Correct way to dispose off is to put it in biodegradable waste bag and put in ol a kachra box of bmc.

भुभु हे एकाचवेळी क्यूट आणि त्रासदायक असे दोन्ही वाटू शकतात Happy
कालचीच गोष्ट , यू ट्यूबवर काल सजेशन आलं म्हणून क्यूट भुभुचे व्हिडीओ पाहत होते , नंतर काही कामानिमित्त घराबाहेर पडले , परत येताना स्त्यावर 5 ते 6 कुत्रे एकत्र जमून जाम भुंकत होते येण्याऱ्या जाण्याऱ्या लोकांवर. एकत्र जमलेले ते कुत्रे बघूनच भीती वाटली. सरळ रस्ता बदलून घरी गेले .

एकत्र जमलेले ते कुत्रे बघूनच भीती वाटली. सरळ रस्ता बदलून घरी गेले .>> त्यांना भूक लागली असेल. किंवा तहान. किंवा त्यांचे काही अंतर्गत इशू असतील पण रेबीज चा धोका कायम आहेच. काळजी घ्यावी. आता पाउस नाही जमेल तसे तुमच्या एरिआत प्लास्टिक बोल मध्ये एक एक बाटली पाणी ओतुन ठेवा. श्रीमंतांच्या गाड्या धुवायला पाणी असते पण कुत्रे मांजरी पक्षी प्राणी प्यायच्या पाण्याला तरसतात कार ण माणसांनी सर्व रिसोर्स काबीज केले आहेत व स्वतःचे काँप्ले क्सेस पूर्वग्रह त्यावर ठोकून बस वले आहेत. मंदिरे बंद असल्याने तिथे मिळणारे दूध बिस्किटे पाणी पण बंद झाले आहे.

माझा एरिया नव्हता तो . आमच्या सोसायटीत वॉचमन आहे तो ठेवतो पाणी.
कुत्रांच्या बाबतीत मी त्यांच्या वाटेला जात नाही आणि ते ही माझ्या वाटेला जात नाहीत. पसरस्पर सामंजस्याने जगतो.

याबाबत फारसे कडक नियम आणि दंड केले जात नसावेत.>> पुण्यात काय आहे माहीत नाही पण बी एम सी तर ५०० रु दंड लावते. जो गोळा पण करतात पोलि स. आणि सोसायटीत आत कचरा केला तर हाकलून देउ शकतात ( कुत्र्यासकट तुम्हाला भाडेकरू असाल तर ओनरला फोन करून सामानासकट हाकलून देउ शकतात)

पुण्यात नवी पॉलीसी ड्राफ्ट होत होती. ती झाली का ते चेक करू शकता. व तुमच्या सूचना तिथे देउ शकता.
https://punemirror.indiatimes.com/pune/civic/pmc-drafting-new-policy-for...

मी अनू तुमचे कुत्र्यांबद्दलचे जे काही अन रिझॉल्वड इशू आहेत ते कृपया " ह्या श्वान प्रेमींचे काय करावे ? हया धाग्यावर लिहा. तिथे तुम्हाला समदु:खी लोक भेटतील व चर्चा पण होईल. हा धागा फक्त बी एम सी नियमा नुसार कुत्रे कसे पाळा वे इतकाच मर्यादित आहे.

अर्र! मी आजवर कुणाही श्वानमालकाला श्वानप्रसाद उचलताना बघितलेलं नाहीये. रस्त्यावर फुटपाथवर चालताना श्वानप्रसादापासुन वाचायला कसरत करावी लागते. काही श्वामा तर जॉगिंग ट्रॅक पण सोडत नाहीत. हे सगळं फॉरेनात होत असावं.

. हे सगळं फॉरेनात होत असावं. >>>> मुळीच नाही. आपल्याकडे पण अवेअरनेस वाढला आहे. आपल्याकडे, म्हणजे अगदी आमच्या आगाऊ शिष्ठ पुण्यात पण पुप गोळा करणारे ओनर्स दिसतात. ऑनलाइन चांगले पुप स्कुपर्स मिळतात, ज्यामुळे हात न लावता, अगदी खाली न वाकता सुद्धा पुप गोळा करता येते.

Yes I have observed this seniority pee mails. If it is male female Jodi this is also opening note for mating behaviour. 2 3 days just peeing together and sniffing. Then they move to next step. Very systematic. It just needs some space without disturbance and patience on our part. If you don't want the dog s to mate separate them at this level. It is less traumatic for the dogs. Last three days of female heat are crucial. Male dogs will be most actively sniffing her and she will also not listen to you. Hormones!!. Best to walk her at different times and away from her pee friends. Change the walk route also. 10 days of period for female are a bit tricky for owners. Now my dog is operated and old also but she continues the sniffing and peeing when a male comes around. Males check out females by sniffing. Lots of patience from owners needed. Or be prepared for puppies!I have done two deliveries for Weanie. 6 to 8 pups. So at one time had 8 dogs at home .

<< If you don't want the dogs to mate separate them >>

कुत्र्यांच्या मेटिंगच्या, नैसर्गिक प्रवृत्तीला त्यांच्या मालकांनी असा आळा घालायचा, हे वाचून कसंसंच झालं. पिल्ले नको असतील तर मालकांनी नसबंदी करावी सरळ.

Pages