बीएमसीचे श्वानपालनचे नियम व माहिती.

Submitted by अश्विनीमामी on 6 August, 2014 - 10:15

म्युनिसिपल कॉर्पो रेशन ओफ ग्रेटर मुंबई

सार्वजनिक आरोग्य खाते, श्वान पाळण्याकरता अनुज्ञापत्र
( मुंबई महानगर पालिका अधिनियम १८८८ ( अद्यावत सुधारीत) च्या कलम १९१ अ अंतर्गत.

टर्म्स अँड कंडिशन्स

This license is granted pursuant to the provisions of teh section 191A and 191 b of MMC ACT 1888 and is valid and subsisting subject to the faithful compliance and observance of the conditions stipulated here under.

१) श्वान मालकाने आपल्या श्वानास प्रत्येक सहा महिन्यांनी रोग प्रतिबंधक उपाय म्हणून रेबीज विष प्रतिबंधक लस टोचून घेतली पाहिजे. ह्यासाठी प्राणि रोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.
२) प्रत्येक श्वान मालकाने तो राहात असलेल्या परिसरात आप ल्या श्वानास त्या नियं त्रणाखाली ठेवले पाहिजे.
आणि त्यास बाहेर नेताना मुस्की अगर साखळी बांधून नेले पाहिजे.
३) प्रत्येक श्वान मालकाने जर आपले श्वान वेडाच्या झटक्याने अगर अन्य सांसर्गिक रोगाने आजारी असल्यास
त्याच्यावर प्राणी रुग्णालयातून अगर पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले पाहिजेत व तसा पुरावा
कार्यालयात सादर करावा.

४) श्वानाचा मालकी हक्क बदलल्यास अनुज्ञापत्र नवीन श्वानमालकाच्या नावे करून घ्यावे.
५) नूतनीकरणाच्यावेळी सर्व आवश्यक कागद पत्रे सादर करावीत.
६) श्वानाचा मृ त्यू झाल्यास किंवा ते हरवल्यास त्याबाबत अनुशासन कार्यालयात कळवावे व लायस न्स
रद्द करून घ्यावे.
७ ) अ. पत्राचे उरलेल्याकाळाचे कर परत केले जाणार नाहीत.
८) हे अप कोणत्याही परिस्थिती त दुसृयास देउ नये. अर्थात कुत्र्याची मालकी बदलली जाउ शकते.
९) पाळलेले श्वान हे कोन त्याही परिस्थितीत इतरांना उपद्रवी ठरता कामा नये याची योग्य ती दखल घेतली पाह्जे.

लायसेन्स वर म्युनिसिपल वार्ड, मालकाचे नाव पत्ता फोन नंबर कुत्र्याची माहिती, सर्व वॅ क्सिनेशन्स चा दाखला, व्हेट चे सर्टिफिकेट व नंबर, व्हेट ची जी फाइल असते त्याची कॉपी, द्यावी लाग ते, प्रति लायसेन्स
७५० रु. खर्च येतो व ते लगेच मिळते. ह्यावर असिस्टंट मेडिकल ऑफिसर, व सॅनिटरी इन्स्पेक्टर ची सही होते शिक्का होतो व मग ते हातात येते. दर वर्‍शी रिन्यू करावे लागते.

व्हॅक्सिनेशन शेड्यू ल व इत र माहिती पण आहे. सवडीने लिहीते.
काही उपयुक्त लिंका:
http://jaagruti.org/2013/07/09/pet-dogs-and-street-dogs-dos-and-donts/

http://www.pawnation.com/2014/05/08/10-dog-park-dos-and-donts/

http://www.cityofboston.gov/animals/regulations.asp

http://www.thedogplace.org/Family-Dog/Rules-for-dog-owners.asp

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चपला, बूट, मोजे यांना असणारा उग्र गंध त्याना आकर्षक वाटत असावा
कारण जवळपास सगळे भुभु हे उद्योग करतात >> आमचा निंजापण लहान असताना असं करायचा. आता चप्पलचोरी बंद आहे Happy

It is the texture of pure leather which for them is like sucking on animal skin. They will also chew on old books which have saras in their binding glue. All these are puppy activities.

आपल्या घरच्यांचे चे मोजे, बूट ( संधी मिळाली तर डर्टी लाँड्री सुद्धा!) नेहमीच कुत्री पळवतात त्याचे कारण त्यांचा वास येतो त्या चपला बुटांना. कुत्री आपल्या फॅमिली मेंबर्स शी खुप अटॅच्ड असतात आणि वापरलेले कपडे, मोजे आपल्याला ईई वाटले तरी त्यांना कंफर्टिंग वाटतो तो वास Happy थोडे ट्रेन करावे लागते त्यांना बूट, मोजे घ्यायचे नाहीत म्हणून.

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

आमच्या पिल्लू ला थोडे फिरून झाले की लगेच घरी यायचे असते. बॅकयार्ड मधे बॉल, टग ऑफ वॉर वगैरे खेळेल आनंदाने पण वॉक म्हटले की फार लांब जायचे नसते. व्यायाम कमी झाला तर मग झूमीज होतात कधी मधी Happy बघायला फारच विनोदी प्रकार आहे यांचे झूमीज! आपले आपण च घर भर धाव पळ करून एक्स्ट्रा एनर्जी खर्च करतात भुभू.

आपले आपण च घर भर धाव पळ करून एक्स्ट्रा एनर्जी खर्च करतात भुभू>>>> हो अक्षरशः डोंगराला आग लागली पळा पळा स्टाईल ने पळत राहतात. थांबतच नाहीत

हवामान कसेही असले तरी रुटीन फॉलो करायला लागतच.>>>> हो ना,मला वाटलेलं इतक्या पावसात नको म्हणेल
काही नाही दार उघडताच जाऊन मोपेडवर जाऊन बसला
म्हणलं चल आज तुझी सगळी हौस जिरवतो
मग आम्ही मस्त सुनसान ट्रॅक वर भटकलो
धोधो पावसात

ज्याची भीती वाटत होती तेच झालं, घरात कोव्हिड डेथ झाल्यामुळे आम्ही बाकी तीन जण टेस्ट रिपोर्टच्या प्रतीक्षेत home isolated आहोत. घरातल्या बाळाला ओडिनसारखं रोज फ़िरायला आणि रनिंग करायला न्यावं लागतच. कोणताही सिझन असू दे, बदाबदा पाऊस असू दे पण तो आम्हाला वॉक काही चुकवु देत नाही. आता आम्ही घराबाहेर पडू शकत नाही आणि शेजारी इच्छा आणि सवय असुनही त्याला नेऊ शकत नाहीत, कारण आम्ही त्याला स्पर्श केलेले असतात. पूर्ण करोना काळात आम्हाला इन्फेक्शन झालं तर त्याच्या वॉकची सोय काय ही भीती होती, ती शेवटी खरी झाली. त्याच्या वॉकच्या दोन्ही वेळेस खूप अस्वस्थ होतो. मग रडारड, हट्ट, इमोशनल ब्लॅकमेल चालु

मीरा
काळजी घ्या सर्व. सगळ्यांना लवकर नीट ठणठणीत आणि दु:खातून सावरण्या साठी शुभेच्छा.

सगळ्यांच्या सहानुभूती आणि शुभेच्छा मेसेजेस साठी आभारी आहे. शुभेच्छा सुफळ झाल्या. घरातले तिघेही जण कोव्हिड निगेटिव्ह आहेत. (हे एक आश्चर्य म्हणायला हवं कारण कोव्हिड पेशंटला एकही सिम्प्टम नसल्याने आम्ही 9 दिवस पूर्ण 24 तास बरोबर होतो.
आमचे रिपोर्टस मिळाल्यावर आम्ही एक दिवस घरातच राहिलो आणि आजपासुन आमच्या फरबेबीचा वॉक चालू केला. सोसायटी WA ग्रुपमध्ये कळवलं की रिपोर्ट्स निगेटिव्ह आले असले तरी आम्ही अजून 5 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहु, पण दिवसातून एकदा त्याला वॉकला नेऊ. जाताना लिफ्ट वापरणार नाही आणि जिन्यातून जाताना gloves घालू आणि कुठेही स्पर्श करणार नाही. इथे सोसायटीमध्ये आता आणि आधी टेस्ट होण्याआधी सुद्धा कुठे काही वेगळी वागणुक नव्हती. लोकांनी एवढं सहकार्य केलं की शब्दच नाहीत.

अरे वाह हे एक बरे झाले
तुमचं फर बेबी तुम्हाला या दुःखातून आणि आघातातून लवकरच बाहेर काढेल

मीरातै, काळजी घ्या. देवाच्या कृपेने तुम्ही यातुन लवकरच सुखरुप पार पडाल ह्या शुभेच्छा.
झालेले दु:ख सहन करण्याचे बळ देव तुम्हाला देवो.

कुत्रा पालक का अग्रेसिव्ह होतात याचं उत्तर आज मिळालं
आज दोन पोलिसांनी आम्हाला अक्षरशः भिकाऱ्यासारखं ट्रॅक वरून हुसकावून लावलं
का तर म्हणे हा ट्रॅक माणसांसाठी आहे कुत्र्यांसाठी नाही
म्हणलं काही दिवसांचा प्रश्न आहे, पावसामुळे मातीचा रस्ता जिथे आम्ही जातो फिरायला तो पार दलदल झालाय
म्हणे मग पाऊस थांबल्यावर आणा
याच ट्रॅक वर किमान डझनावारी भटकी कुत्री हिंडत असतात, त्यांच्या आपसात मारामाऱ्या सुरू असतात, गाई म्हशी जातात, त्यांचे शेणाचे पो ट्रॅकभर पडलेले असतात
तीन चार ठिकाणी मोठाले कचऱ्याचे ढीग आहेत जिथे कोणीही साफ करायला नसतं
तरी लोकांना त्रास कोणाचा तर नियमाने वागणाऱ्या लोकांचा
कुत्रा पाळतोय म्हणजे जणू काही गुन्हाच करतोय असे फिलिंग यायला लागलं आहे
मनस्ताप नुसता

Dont worry आशूचाम्प,त्या पोलिसांनाही आवडत नसतील पेट्स म्हणून चिडले असतील किंवा आधीची एखादी घटना असावी,एखाद्या पेट्स ने जखमी वगैरे केल्याची
एखाद्या दिवशी वाईट अनुभव आला म्हणून असं चिडू नका,

का तर म्हणे हा ट्रॅक माणसांसाठी आहे कुत्र्यांसाठी नाही>> जिथे अशी बोर्ड लावलेली नोटीस असते तिथे जाउ नये कारण आपला व त्यापेक्षाही कुत्र्याचा अपमान होतो तो आपल्याला सहन होत नाही. म्हणून अश्या जागा व लोक अवॉइड करावेत. आमच्या इथे जॉन्सन पार्क मध्ये अशी नोटिस सुरुवातीलाच लावली आहे. हैद्राबदेस जे घराच्या जवळ भले मोठे निझामी जंगल कम वॉकर्स पार्क आहे तिथे ही अशीच नोटीस आहे. जिथे मनुष्य वावर सर्वात कमी तिथे न्यावे म्हणजे कुत्र्याला आरामात वावरता येते.

चालणार्‍या व्यक्ती, ल्हान मुले, म्हातारे व्यक्ती, इतर पाळीव कुत्रे, पोलीस व इतर अधिकारी व्यक्तिमत्वे अगदी कानाला खडा अवॉइड. ऑल द बेस्ट. इट वॉज जस्ट अ वॉक गिव हिम अ ट्रीट अँड मुव्ह ऑन.

मी सध्या होम क्वारिंटाइन त्यामुळे वॉक पण नाही. घरीच पळापळी करतो.

भारतात फक्त कुत्रेधारी मालकांसाठी, कुत्र्यांना मोकळेपणी घेऊन जाता यावे, किंवा हॉटेल मध्ये घेऊन जाता यावे अश्या जागा कमी आहेत का? बहुतेक असतील त्या पण मुंबई दिल्ली बंगलोर सारख्या मेट्रो मध्ये असतील.

जिथे अशी बोर्ड लावलेली नोटीस असते तिथे जाउ नये>>>> अशी कसलीही नोटीस नाहीये
ती असती तर नेलं नसतच
तिथे तर गेट पण नाहीये फक्त कॅनाल च्या बाजूने पेव्हर ब्लॉक टाकलेत म्हणून त्याला ट्रॅक म्हणतात इतकं
बाजूला कचरपेट्या आहेत आणि ढीग पडलेले असतात
भटकी कुत्री त्यातलंच ओढून ट्रॅक वर आणतात
वास सुटलेला असतो

भारतात फक्त कुत्रेधारी मालकांसाठी, कुत्र्यांना मोकळेपणी घेऊन जाता यावे, किंवा हॉटेल मध्ये घेऊन जाता यावे अश्या जागा कमी आहेत का?>>>>
पुण्यात मला तरी अशी कुठली जागा माहिती नाही
एक हॉटेल होते अशी बातमी वाचलेली पण ते काय उपयोगाचे नाही

पुण्यात व्हेअर एल्स कॅफेमध्ये पेट्स वेलकम आहेत. खुद्द मालकाचा भुभु आणि तिघी मांजरी मस्त फिरत असतात. पेटसाठी पण मेनुकार्डात पदार्थ होते आधी. अजूनही असतील.
फ्लार वर्क्स कॅफे कल्याणीनगर ब्रँच, रास्ता कॅफे, फॅट कॅट्स कॅफे अशी अजून काही ठिकाणे आहेत जेथे पेट्स ना घेऊन जाता येते. आधी बाणेर रोडला एक 'cafe twos and fours' म्हणून होता तिथे भुभुंना खेळायला, हुंदडायला पण जागा होती. शिवाय पेट्सचा वेगळा मेनू पण. आत्ता पाहिले तर तो बंद झालाय असे दिसले.

भारतात फक्त कुत्रेधारी मालकांसाठी, कुत्र्यांना मोकळेपणी घेऊन जाता यावे, किंवा हॉटेल मध्ये घेऊन जाता यावे अश्या जागा कमी आहेत का?>>>> हो आता बऱ्याच आहेत. Pet friendly restaurant अस शोधलं तर बरेच ऑप्शन्स येतात. आम्ही फ्लार वर्क्स आणि प्रेम्स मध्ये नेहमी घेऊन जातो. मात्र प्रेम्स मध्ये एकच टेबल डॉग ओनर साठी आहे त्यामुळे आधी बुक करून जावं लागतं. फ्लार वर्क्स मध्ये पेट्सचं नेहमीच स्वागत असतं. डेक्कनला BCL जवळ कॅफे कथा मध्ये पण पेट्सना परवानगी आहे. मी अजून नेलं नाही, पण एकदा विचारलं तेव्हा त्यांनी उत्साहाने आणा सांगितलं होतं.
Pune Eat Outs नावाच्या फेसबुक पेजवर शोधलं तर अजुनही सापडतील. मी तिथे पाहूनच काही रिझोर्ट्स मध्ये 2-3 दिवसासाठी घेऊन गेले होते. आमचं क्लब महिंद्रा मात्र जाम तयार होत नाही त्यामुळे गेले दोन वर्ष त्यांच्याकडे बुकिंग केलं नाही. मेम्बरशीपचं काय करावं हा प्रश्नच आहे.

आशुचॅम्प, रोज तुम्हाला शक्य होणार नाही, पण सुटीच्या दिवशी ओडिनला तळजाईला नेत जा. मस्त मोकळेपणाने फिरेल. अनलिश करून मस्तपैकी हुंदडु दे. तिथे रविवारी एका स्पॉटवर खूप सारे डॉग ओनर्स भेटतात. असं एकत्र भेटणं डॉग सोशलायझेशनसाठी गरजेचं आहे. ओडिनला आवडेल आणि तुम्हालाही खूप नवनवीन माहिती कळेल. आम्ही हल्ली बोपदेव घाटात नेतो.

बाळाचा लाडोबा होण्याआधी त्याला थोडी हॉस्टेलची सवय लावा. अत्यंत गरजेचं आहे, मग मोठेपणी ठेवायची वेळ आली तर त्रास होणार नाही. आता मात्र गरज असो वा नसो, महिन्यातून 1-2 दिवस दूर ठेवा, पुढच्या सगळ्या भावनिक त्रास, मनस्तापा पासून वाचवण्यासाठी सांगते आहे. मी फार मोठी चूक केली आता त्याच्याशिवाय फक्त बाथरूममध्ये जाते. अर्थात तेव्हाही तो बाहेर बसुन असतो. 5 ची 6 मिनिटं लागली तर बाहेरुन कुं कुं रडणं चालू होतं. मला टीप द्यायला कोणी नव्हतं, म्हणून तुम्हाला अलर्ट देऊन ठेवते आहे.

तळजाई ला कुठं नक्की
कारण मी एकदा नेलं तर मला सांगितले की तळजाई वन्य विभागात येत त्यामुळे तिथे पाळीव प्राणी घेऊन जाणे गुन्हा आहे
त्यामुळे परत गेलोच नाही

तो सोशल आहे
त्यांची गॅंग पण आहे त्यात एक जर्मन शेफर्ड, दोन तीन हस्की, तीन लॅब, एक डॉबरमन असे आहेत सगळे मिळून एकत्र धुमाकुळ घालतात
पण आता लोकांची फारच कटकट व्हायला लागली आहे

हॉस्टेल चा आहे विषय डोक्यात
ओडीन ला पण सेप्रेशन अनक्सयटी आहे
मी बाहेर गेलो त्याला न घेता तर घर डोक्यावर घेतो
पण मुद्दामच त्याला रोज थोडा वेळ सोडून जयला सुरुवात केली
आता भुंकत नाही पण मी येईपर्यंत डोळ्यात करुण भाव आणून दाराकडे बघत राहतो असे आई म्हणते
त्याला वेगळी खोली आहे वरती जिथे त्याला फारसं फडफडी किंवा तोडफोड करायला काही नाही
तिकडे किमान एक तासभर तरी ठेवतोच
स्पेशली जेवण किंवा फिरून आल्यावर
एक डुलकी काढत असावा

हॉस्टेल ला सोडणार आहे पण एक दोन दिवस तरी

मी एकदा १५ दिवसांच्या ट्रिपला जाताना स्वीटीला केनेल मध्ये ठेवले. प्रथम एक दोन चेक केले पण त्यातले एक अगदीच वाइट होते. म्हणजे ओट्या खालची कपाटे असतत तसल्या पिंजर्‍यात एक एक कुत्रा ठेवला होता. मग रडून झाले( माझे) मग परत आले तिला लगेच घेउन आले.

भाउ व वहिनी चा पुण्या हून फोन आला कझिनला बाळ झाले त्याचे नामकरण आहे. तर रविवारी या. आता मला काही स्वीटीबरोबर सेपरेशन नको होते लगेच नेक्स्ट वीकेंड. मग नाही गेले पुण्याला. वहिनी बाई अजून रागावलीच आहे. बोलणेच टाकले. त्यांना हे कारण नव्हते सांगितले कारण कोणाला समजत नाही.

पण २०१६न्मध्ये स्वीटीची आई गेल्यावर मी तिला वीनीची अमानत म्हणून संभाळते. वीनी वॉज माय डॉग ऑफ डोंग्ज ती जर लहान पणी भेटती तर माझी वाढ वेगळी झाली असती. १००%

Pages