म्युनिसिपल कॉर्पो रेशन ओफ ग्रेटर मुंबई
सार्वजनिक आरोग्य खाते, श्वान पाळण्याकरता अनुज्ञापत्र
( मुंबई महानगर पालिका अधिनियम १८८८ ( अद्यावत सुधारीत) च्या कलम १९१ अ अंतर्गत.
टर्म्स अँड कंडिशन्स
This license is granted pursuant to the provisions of teh section 191A and 191 b of MMC ACT 1888 and is valid and subsisting subject to the faithful compliance and observance of the conditions stipulated here under.
१) श्वान मालकाने आपल्या श्वानास प्रत्येक सहा महिन्यांनी रोग प्रतिबंधक उपाय म्हणून रेबीज विष प्रतिबंधक लस टोचून घेतली पाहिजे. ह्यासाठी प्राणि रोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.
२) प्रत्येक श्वान मालकाने तो राहात असलेल्या परिसरात आप ल्या श्वानास त्या नियं त्रणाखाली ठेवले पाहिजे.
आणि त्यास बाहेर नेताना मुस्की अगर साखळी बांधून नेले पाहिजे.
३) प्रत्येक श्वान मालकाने जर आपले श्वान वेडाच्या झटक्याने अगर अन्य सांसर्गिक रोगाने आजारी असल्यास
त्याच्यावर प्राणी रुग्णालयातून अगर पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले पाहिजेत व तसा पुरावा
कार्यालयात सादर करावा.
४) श्वानाचा मालकी हक्क बदलल्यास अनुज्ञापत्र नवीन श्वानमालकाच्या नावे करून घ्यावे.
५) नूतनीकरणाच्यावेळी सर्व आवश्यक कागद पत्रे सादर करावीत.
६) श्वानाचा मृ त्यू झाल्यास किंवा ते हरवल्यास त्याबाबत अनुशासन कार्यालयात कळवावे व लायस न्स
रद्द करून घ्यावे.
७ ) अ. पत्राचे उरलेल्याकाळाचे कर परत केले जाणार नाहीत.
८) हे अप कोणत्याही परिस्थिती त दुसृयास देउ नये. अर्थात कुत्र्याची मालकी बदलली जाउ शकते.
९) पाळलेले श्वान हे कोन त्याही परिस्थितीत इतरांना उपद्रवी ठरता कामा नये याची योग्य ती दखल घेतली पाह्जे.
लायसेन्स वर म्युनिसिपल वार्ड, मालकाचे नाव पत्ता फोन नंबर कुत्र्याची माहिती, सर्व वॅ क्सिनेशन्स चा दाखला, व्हेट चे सर्टिफिकेट व नंबर, व्हेट ची जी फाइल असते त्याची कॉपी, द्यावी लाग ते, प्रति लायसेन्स
७५० रु. खर्च येतो व ते लगेच मिळते. ह्यावर असिस्टंट मेडिकल ऑफिसर, व सॅनिटरी इन्स्पेक्टर ची सही होते शिक्का होतो व मग ते हातात येते. दर वर्शी रिन्यू करावे लागते.
व्हॅक्सिनेशन शेड्यू ल व इत र माहिती पण आहे. सवडीने लिहीते.
काही उपयुक्त लिंका:
http://jaagruti.org/2013/07/09/pet-dogs-and-street-dogs-dos-and-donts/
http://www.pawnation.com/2014/05/08/10-dog-park-dos-and-donts/
http://www.cityofboston.gov/animals/regulations.asp
http://www.thedogplace.org/Family-Dog/Rules-for-dog-owners.asp
सध्या नकोच मग. फिरवायला जमणार
सध्या नकोच मग. फिरवायला जमणार नाही.
चिकन उकडून कुस्करुन म्हणजे व्हेज घरात कठीण वाटतं. पेडीग्री किंवा थेट तुकडे विकत आणून देऊन खायला द्यायला जमेल. पेडीग्री जमेल. (हे फक्त थिंकींग लाऊड हां. नाहीतर 'हे जमणार नाही, ते जमणार नाही, कुत्रे आणून आमच्यावर उपकार करताय का' असा विचार करतील वाचक )
जेव्हा आणू तेव्हा नीट विचार करुनच, लोकांना त्याला वेळ आणि प्रेम देता येईल, फिरवण्या इतकी एनर्जी असेल अश्याच फेज मध्ये आणू. मी आजूबाजूला काही इरिटेटेड, कायम उदास वाटणारे भूभू बघते, भुभूला फिरायला न्यायला ठेवलेली माणसं त्याला छोट्या छडीने रट्टे देताना बघते तेव्हा विचार करते की आपण आणला तर हे सर्व विचार करुन, त्याला भावनिक दॄष्ट्या पोसायची क्षमता असेल तेव्हाच आणू.
भू भू प्रेमींसाठी - shvaan
भू भू प्रेमींसाठी - shvaan dog foods अशी एक पुण्यातील लोकल कंपनी आहे. खूप विचारपूर्वक ते डॉग फूड बनवतात. किंमत किंवा पेडिग्रीच्या तुलनेत स्वस्त/महाग माहीत नाही.
Also think about how much
Also think about how much your sweet sensitive dog goes through if the owner does not love him back. It is a two way relationship and they contribute 100% in their short life. Their need for routine and exercise gives you screen free time lowers high blood pressure and fills gaps you didn't know existed.
अमा, भारतात विशेषतः मुंबईत
अमा, भारतात विशेषतः मुंबईत कोणते ब्रीड पाळावेत याबद्दल माहिती देऊ शकाल का ? उत्सुकता आहे .
बरेच ठिकाणी प्रॉपर जागा नसल्यास कुत्रे पाळू नयेत अस म्हटलं आहे आणि ते मला पटलेलं आहे.
Also think about how much
Also think about how much your sweet sensitive dog goes through if the owner does not love him back >>
मॅक्स प्लेअर वर 'चीझकेक' नावाची वेब सिरीज आहे, पेट्स आणि त्यांच्या ओनर च्या नात्यावर.
जेव्हा आणू तेव्हा नीट विचार
जेव्हा आणू तेव्हा नीट विचार करुनच, लोकांना त्याला वेळ आणि प्रेम देता येईल, फिरवण्या इतकी एनर्जी असेल अश्याच फेज मध्ये आणू. मी आजूबाजूला काही इरिटेटेड, कायम उदास वाटणारे भूभू बघते, भुभूला फिरायला न्यायला ठेवलेली माणसं त्याला छोट्या छडीने रट्टे देताना बघते तेव्हा विचार करते की आपण आणला तर हे सर्व विचार करुन, त्याला भावनिक दॄष्ट्या पोसायची क्षमता असेल तेव्हाच आणू.>>>
उत्तम निर्णय ! तुम्हि पेट सिटिन्ग करुन बघा, कूणाकडे असलेले ट्रेन डॉगी आणून त्याला काही तास ते १-२ दिवस पेट सिटिन्ग करा अन्दाज पण येइल.आमच्याकडे पण पेट आणण्याचा लकडा चालु अस्तो पण मला खरोखर एवढी कमिट्मेन्ट अशक्य आहे .
अमा, भारतात विशेषतः मुंबईत
अमा, भारतात विशेषतः मुंबईत कोणते ब्रीड पाळावेत याबद्दल माहिती देऊ शकाल का ? उत्सुकता आहे .>> अहो मी ह्यातली तज्ञ आजि बात नाही. पण छोट्या जागेत छोट्या साइजचे कुत्रे ठेवायला जमते. डॅशंड ़ जे माझ्याकडे आहे. पहिले दोन होती एक वारली. हैद्राबादचे घर मोठे होते तेव्हा ते लोक घर भर पळत राहात. मोठ्या कुत्र्याचे बाळंत पण घरीच केले तेव्हा ती प्लस सहा पपीज घरी होते. फारच मजेचा अ अनुभव अस्तो पपीज बघणे. त्यातले एक ठेवले ते आता कालच १२ वर्शे पूर्ण. म्हणजे सीनीअर डॉग झाले आहे.
चिव्हावा.
पॉमरेनिअन ( सिंड्रेला फेम)
ऑल टाइम फेवरिट लॅब्राडोर रिट्राइव्हर, गोल्डन रिट्रा. ह्यांचा मेंटेनस खुप आहे. व क्रॉफर्ड मार्केट मध्ये फार गैरप्रकार चालतात त्यामुळे ब्रीडर कडून महाग पपी घेउ नये शक्यतो.
हस्की कॉली सेंट बर्नार्ड बिग डॉग घेउ नयेत. कारण ते बर्फाळ प्रदेशात व गवतात चिक्कार पळायला जन्मलेले आहेत. इथे त्याम्चा घामात जीव घुसमटतो. फॉरीन ब्रीडच्या तब्येतीच्या तक्रारी असतात.
अगदी बेस्ट बिल्डिम्ग च्या बाहेर जन्मलेले पपी. आईला सोडून भटकायला लागले जन्मापासून दोन तीन आठवडे महिना झाला की. व्हेट कडे नेउन इंजेक्षने देउन व्हेक्सिन देउन घरी आणले तर बेस्ट. माज्या बिल्डिंग समोर बिझनेस पार्क मध्ये दुसृया बाजूला साइट वर जन्मलेले अश्या पपीज च्या दोन गृप आहेत. बिझनेस पार्क वाले गुड नेचर्ड हेल्दी आनंदी आहेत तर साइट वरचे कायम रात्र भर भां ड त असतात.
पण व्हेटच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या. त्यांना चां गले जन्मलेले पपी माहीत असतात.
रॉट वाइलर डॉबरमन शक्यतो घेउ नयेत. फार पॉवरफुल ब्रीड. ह्याला फार्म हाउस पाहिजे नाहीतर जलसा बंगला.
मुंबईत असे लोक आहेत आपले नको असलेले पेट्स जलसा समोर सोडून देतात. अमिताभ काहीतरी अॅक्षन घेइल म्हणून.
ओके अमा, धन्यवाद
ओके अमा, धन्यवाद
जाई, माझ्याकडे बिगल आहे. खुप
जाई, माझ्याकडे बिगल आहे. खुप आनंदी आणि खेळकर ब्रीड आहे. अर्थात राग आणि attitude पण असतो. यांचा साईझ छोटा असल्याने फ्लॅटसाठी योग्य ब्रीड आहे. शिवाय बऱ्याच गोष्टी पटापट शिकतात, हुशार असतात. आणि घेताना व्हेटशी कन्सल्ट केलं होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की बिगल्सची इम्युनिटी चांगली असते. मी गेल्या दोन वर्षात vaccine आणि नेल ट्रीमिंग सोडल्यास त्याला दवाखान्यात नेलं नाही ( touch wood ! )
पग्ज छोटे असले तरी त्यांना स्किन डिसीज खूप होतात आणि वजन आणि श्वासाचे विकारही असतात. ल्हासा, शितझु, कॉकरस्पनियल छोटे आणि क्युट असतात पण घरभर प्रचंड केस होतात. ज्यांच्याकडे डॉग नाही त्यांना सांगून कळणार नाही एवढ्या प्रमाणात जिथे तिथे केस होतात. शिवाय ही ब्रीडस जरा तब्येतीने नाजूक असतात. लॅब, गोल्डन रिट्रीवर पण चालतील. फ्लॅटसाठी जरा मोठे वाटतात, पण बरेच जण ठेवतात.
बाकी ब्रीड कोणतंही असु दे, घरच्यांची कमीतकमी 13-15 वर्षांची कमिटमेंट खूप महत्त्वाची. एवढी वर्ष जमणार असेल तर आणि तरच पेट डॉग ठेवण्याचा विचार करावा. जर पूर्ण फॅमिली मेम्बरसारखं ठेवलं तर खर्च पण बऱ्यापैकी असतो. (डॉग फुड, चिकन, ट्रीटस, बिस्किट्स, ग्रुमिंग मटेरिअल, रेग्युलर स्पॉट ऑन, बेल्टस, कपडे, व्हेटच्या लठ्ठ फिज, औषधं, खेळणी, महिन्याला कमीत कमी 3 स्पा भेटी)
माहितीबद्दल धन्यवाद मीरा
माहितीबद्दल धन्यवाद मीरा
माझ्या भावाच्या डोक्यात कुत्र्याचे पिल्लू आणूया हे खूळ घुसलेय
त्याला ही पोस्ट दाखवते
मस्त माहिती मिळतेय
मस्त माहिती मिळतेय
माझेही अनुभव लिहितो थोड्याच वेळात
अमा - धाग्याचे नाव बदलून भुभु संगोपन ठेवूया
म्हणजे सगळी माहिती एका जागी देता येईल
नवे पालक, होऊ घातलेले पालक यांना मार्गदर्शन होईल
Spaying operation costs inr
Spaying operation costs inr 7600 around
बापरे खूपच आहे
बापरे खूपच आहे
सरकारी दवाखान्यात मोफत होत असेल
पेडिग्री ब्रांड डॉग फूड बेस्ट
पेडिग्री ब्रांड डॉग फूड बेस्ट व स्वस्त उपलब्ध आहे.
ओळखीत अनेक जण देतात पण त्याचे इनग्रेडींट वाचले तर अक्षरश फोलकटे आहेत, जे पदार्थ आवश्यक आहेत जसे की चिकन ते अगदी कमी आणि त्यातही ते बायप्रोडक्ट. बाकी पण ग्लुटेन आणि काय काय भरताड आहे. त्यामानाने मग पेडीग्री प्रो जरा बरे आहे. ड्रुल्सचे फोकस चांगले आहे. रॉयल कॅनीन बळंच महाग आहे. चांगल्या ओळखीच्या डिलरकडून डिस्काउंट मिळत असला तरच घ्यावं.
आम्ही आथ सुरुवातीला तेच देत होतो कारण ओडीनची आई त्यावरच वाढली होती आणि त्यांनी पिलांना त्याचीच सवय लावली होती,आम्हीही तेच सुरु ठेवले कारण फूड बदलले तर पपीजचे पोट बिघडते.
नंतर मग फार्मिना सुरु केले, तो एक इटालियन ब्रँड आहे आणि ओळखीतून आम्हाला रॉयल कॅनीनच्याच किंमतीत मिळत होता आणि त्याचा रिझल्ट एकदम मस्त होता. पण आता नेमके लॉकडाऊन मध्ये माझ्या आणि बायकोच्या पगारात निम्म्याने घट झाली त्यामुळे हे महागडे फूड थोडे जड जाऊ लागले मग बरीच शोधाशोध करून हिमालय कंपनीचे आणले. त्याचाही रिझल्ट चांगला आहे.
वरती श्वानबद्दल लिहीलं आहे तो आपला मित्रच आहे केदार. त्याच्याच रेकमेंडशनने ओडीन घेतला. ते सात आठ लोकरीचे गुंडे बघून सगळेच घरी घेऊन जावेसे वाटत होते. मालकांनी जे पाहिजे ते सिलेक्ट करा सांगितल्यामुळे. मग केदारच्या मदतीने आम्ही त्यातल्या त्यात अक्टीव्ह आणि हेल्दी दिसणारे सिलेक्ट केले.
तर केदार ने त्याचा आयटी मधला जॉब सोडून हा व्यवसाय सुरु केला आहे. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि खूप अभ्यास करून त्याने हे फुड तयार केले आहे. त्याच्यानुसार मार्केटमधे जे रेडी फूड मिळते ते म्हणजे कुत्र्यांचे जंकफूडसारखेच त्याने कुत्री अनावश्यक जाड होतात. पण श्वान मध्ये कुत्र्यांची शारिरीक गरज लक्षात घेऊन योग्य ते घटक योग्य प्रमाणात मिसळले आहेत.
आम्हीही ओडीनला देत होतो. चांगलाच फरक जाणवला. नंतर मग लॉकडाउन मुळे दर वेळी जाऊन घेणे शक्य झाले नाही. पण ज्यांना कुणाला मार्केट फूड नको असेल आणि घरी चिकन शिजवणे प्रकारपण नको असेल त्याना श्वान हा सर्वोत्तम पर्याय आहे हे मी नक्कीच सांगू शकेन.
आमच्याकडे बड्डे गिफ्ट म्हणून
आमच्याकडे बड्डे गिफ्ट म्हणून कुत्रा आणा, आम्ही सगळी नीट काळजी घेऊ वगैरे भावनिक अपील मागच्या वर्षी पासून चालू आहे.कुत्रा नुसती हौस म्हणून आणायचा नसतो.ते एक लहान बाळ आहे.आपल्याला काय आवडतं या बरोबरच त्याला आपल्या बरोबर करमेल का, आपण त्याला वेळ देऊ का हे पण महत्वाचं हवंअसं सर्व समजावून अजून 5 वर्षं होल्ड केलंय.>>>>>>>>
अगदी बरोबर, भूभूंचा नाही म्हणला तरी बराच व्याप असतो आणि मनापासून आवड असेल तर त्याचे काही वाटत नाही पण हट्टापायी आणला गेला तर मग चिडचिड होऊ शकते. त्यांच्या खायच्या प्यायच्या आणि फिरायला जायच्या वेळा ठरलेल्या असतात आणि त्यावेळी ते नाही केले तर ते उच्छाद मांडतात. काही शांत सुस्वभावी भूभू वगळता.
त्यांना काहीही खायला घालून चालत नाही (फॉरेन ब्रीडचे असेल तर) त्यांची पोटं बिघडतात नैतर उलट्या करतात. त्यांचे ओषध पाणी बघावे लागते, इकडे तिकडे धडपड करतात तेव्हा लावून घेतात, रॅश येते, बाहेरून खेळून आले की टिक्स (गोचीडसारखं) आहेत का ते तपासावं लागतं, अगदी नाकाच्या शेंड्यापासून बुडख्यापर्यंत आणि बोटाच्या मधल्या जागेत, उलटा पालटा करून, कानापासून सगळं तपासावं लागते. त्यावेळी ते स्वस्थ बसत नाहीत, खेळायच्या मूडमध्ये असतील तर हात चाव, पायच मार असले करतात त्यावेळी शांतपणे सगळं सहन कराव लागतं
खायचे पण अनेकदा नखरे असतात, हेच खाणार नाही तेच नाही. एक दिवस तेच आवडीने खातील दुसरे दिवशी तोंडही लावणार नाहीत. अशा नाना तर्हा. त्यामुळे हे सगळे करून न चिडण्याची खात्री असेल तरच आणा.
पण एक सांगतो एकदा आणल्यावर
पण एक सांगतो एकदा आणल्यावर मनापासून केले जाते इतका लळा ते लावतात. माझ्या बायकोचा प्रचंड विरोध होता. घरात कुत्रा राहील नाहीतर मी इतपत. मी आणि पोराने बरीच खिंड लढवत कसे तरी तीला मनवले. त्यासाठी एक वेगळा धागा काढायला पाहिजे.
आल्यावरही तो जवळ आलेला मुळीच चालत नसे, जोरात किंचाळायची त्याला धर, लांब ने, मी म्हणायचो हे पिल्लू आहे काही महिन्यांचे. तरी तिला चालत नसे. हळूहळू त्याच्या लाघवी स्वभावाने तिला जिंकून घेतले आणि आता आम्ही त्याची कशी आबाळ करतो, आणि तो किती बारीक झालाय हे ऐकून घ्यावे लागते. अंगणात ती मांडी घालून त्याच्या बाऊल मध्ये भात कुस्करून देतीय आणि तो प्रेमाने अंग घासत उभा आहे असा एक फोटो आहे. त्यावर मी कॅप्शन दिली होती याच त्या बाई ज्या घरात कुत्रा आणला तर कायमची माहेरी निघून जाईन असे म्हणणाऱ्या.
(डॉग फुड, चिकन, ट्रीटस,
(डॉग फुड, चिकन, ट्रीटस, बिस्किट्स, ग्रुमिंग मटेरिअल, रेग्युलर स्पॉट ऑन, बेल्टस, कपडे, व्हेटच्या लठ्ठ फिज, औषधं, खेळणी, महिन्याला कमीत कमी 3 स्पा भेटी)>>>>>>
यातला कपडे आणि स्पा इतकाच अनावश्यक वाटला पण बाकी सगळ्याच्या बाबतीत अनुमोदन. नाही नाही म्हणत बराच खर्च होतो.
अर्थात अनुभवाने शिकत जातो. आम्ही आधी उगाचच महागडे फरग्लो टॉनिक, ओमेगा३ कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे देत होतो. नंतर कळले की स्वस्तात पण हे साध्य करता येते.
अंडी उकडून त्याच्या टरफलाचा बारीक चुराकरून त्यासकट दिले तर व्यवस्थित कॅल्शियम मिळते. खेरीज जवस तेल, खोबरेल तेल थोड्या प्रमाणात खाण्यात मिक्स करुन दिले तर स्कीनपण चांगली राहते आणि ओमेगापण मिळते.
एखादा दिवस पूर्ण उपास किंवा त्यादिवशी फक्त दही दिले खायला तर पोटाच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात.
भोपळ्याच्या बिया वाळवून त्या मिक्सरमध्ये घालून पूड खाण्यात टाकली तर जंत होण्याचे प्रमाण कमी होते. (अर्थात तरी दर तीन महिन्यांनी एकदा डीवॉर्मींग केलेले चांगले नव्हे आवश्यक)
एकदा आणल्यावर मनापासून केले
एकदा आणल्यावर मनापासून केले जाते इतका लळा ते लावतात. >> याला +१००. आमच्या घरी ती व्यक्ती मीच होते वर्षानुवर्षे मुलं कुत्रा घ्यायचा हट्ट करत होती पण घेऊ दिला नाही कारण मीच घाबरायचे. आता लॉकडाउन मधे इतर कलिग्ज सोबत झूम कॉल्स वर सतत त्यांचे डॉग्ज बघून आणि त्यांच्यातलं बाँडिंग बघून काय वाटले काय माहित पण परवानगी दिली आणि आधीची ती मी अन आता भुभू मे मधे घरी आल्यापासून आताची मी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असाव्यात अशी परिस्थिती आहे भुभू च्या चार्म ला १ आठवडा पण रेझिस्ट करू शकले नाही. आता घरची मेंब्रं मला त्याला अति लाडावण्यावरून टोमणे मारत असतात.
बाकी इथे तर पपी पॅन्डेमिक आली आहे सध्या. जो उठतोय तो कुत्रा घेतोय. इच्छुक लोकांना पपीज मिळेनासे झालेत! होपफुली नंतर लोक शाळा-कॉलेज -कामावर जायला लागल्यावर या सगळ्या कुत्र्यांची आबाळ होऊ नये!
आता घरची मेंब्रं मला त्याला
आता घरची मेंब्रं मला त्याला अति लाडावण्यावरून टोमणे मारत असतात.>>>>> एकच नंबर
ते खरंच लाडोबे होतात
इच्छुक लोकांना पपीज मिळेनासे झालेत! होपफुली नंतर लोक शाळा-कॉलेज -कामावर जायला लागल्यावर या सगळ्या कुत्र्यांची आबाळ होऊ नये!>>>>>
हो मी पण ऐकलं, खूप लोकांनी घेतले आहेत
आणि नंतर आबाळ होण्याची शक्यता पण खूप
आबाळ अगदी नाही तरी आता त्यांना आपल्या सतत घरी असण्याची सवय लागली आहे
त्यांना सेप्रेशन ताण सुद्धा येऊ शकतो
घरचे ऑफिस ला गेल्यावर
आशुचॅम्प , फोटो टाका जमल्यास
आशुचॅम्प , फोटो टाका जमल्यास तुमच्या भुभुचा
कुत्र्यांना कच्चे मांस आणि
कुत्र्यांना कच्चे मांस आणि शिजलेले हाड देऊ नये. मांजराला शिजलेले मांस देऊ नये. हे आमच्या व्हेटने सांगितले आहे. कुत्र्यांना अॅलर्जीज वैगेरे पण असू शकतात. ते सुद्धा लक्षात घ्यायला लागते. आमच्या कुत्र्याला चिकन (कोणतेही बर्ड मीट, अंडी) आणि ग्रेनची अॅलर्जी आहे.
कुत्रा नुसती हौस म्हणून आणायचा नसतो.ते एक लहान बाळ आहे.आपल्याला काय आवडतं या बरोबरच त्याला आपल्या बरोबर करमेल का, आपण त्याला वेळ देऊ का हे पण महत्वाचं हवं>>> अगदी बरोबर आहे. त्यांचे रुटीन सांभाळायला लागते. त्याप्रमाणे स्वतःचे रुटीन बदलायला लागते.
(No subject)
सुपरक्यूट !
सुपरक्यूट !
क्यूट!!!
क्यूट!!!
मी अजून सोशल मिडीयावर टाकलेच
मी अजून सोशल मिडीयावर टाकलेच नाहीत फोटो
उगाच दृष्ट लागू नये म्हणून
म्हणलं वर्षाचा झाला की मगच टाकावेत
@ आशुचॅम्प, नाकाचा शेंडा काळा
@ आशुचॅम्प, नाकाचा शेंडा काळा आहे, नाही दृष्ट लागणार.
(No subject)
धन्यवाद
देखणा आहे भुभू
देखणा आहे भुभू
रॉसीन असं काहीतरी नाव आहे ना?
फार फार देखणा आहे हा ,
फार फार देखणा आहे हा ,
रॉसीन असं काहीतरी नाव आहे ना?
रॉसीन असं काहीतरी नाव आहे ना?>>>>
ओडीन
Pages