चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राइमवर मल्याळी सिनेमा 'कुंबलांगी नाइट्स' पाहिला. ऑफ-बीट स्टोरी आहे, पण सगळ्यांची कामं मस्त आहेत. फोटोग्राफी उत्कृष्ट ! कोची बॅकवॉटर्स परिसर काय अप्रतिम दिसतो.

अ मुमेन्ट टु रिमेम्बर कुठे पहाता येइल? >>>>>> ऑनलाईन कोरिअन ड्रामा साईटस अस गुगलवर सर्च करुन पाहा. बर्याच वेबसाईटस मिळतील. Happy

प्राईमवर बुक क्लब नावाचा मुव्ही बघितला. 4 आज्यांचा बुक क्लब असतो. त्यात त्या 50 shades of gray trilogy वाचायला सुरू करतात. मग आपलं आयुष्य तर अगदीच dull आहे अशी त्यांना जाणीव होते. आज्यांना आयुष्य रंगीन करायला चार आजोबाही भेटतात. पूढे मग काय काय धमाल होते ते दाखवलं आहे. सेक्स मुख्य विषय असूनही चीप वाटत नाही. कॉमेडी आहे. Jane Fonda Diane Keaton वगैरे आहेत.

जर 'ब्रेकिंग अवे' पाहिला नसेल तर नक्की पहा. हॉटस्टार ला आहे. छान सिनेमा आहे.
जो जीता वोही सिकंदर याच्यावरून बर्‍यापैकी ढापला आहे. जो जीता च्या विकी पेज वर पण याचा उल्लेख आहे:
The plot has similarities to the 1979 American film Breaking Away. However, Mansoor Khan stated that he only became aware of Breaking Away after the likeness was brought to his attention, some time after the release of Jo Jeeta Wohi Sikander. Both films have several similarities, including friendship, class barriers, bicycle racing, and parental relationship, but otherwise have different narratives, characters, motivations, treatment and racing rules.

मन्सूर खान धडधडीत खोटं बोलला आहे.
काही काही सीन्सच नाही तर कॅमेरा अँगल्सही सही सही कॉपी केले आहेत.
मन्सूरच्या जोशमधला एक सीनही यातल्या एका सीनवरून घेतला आहे.

मी काल एक ट्रेलर बघितलं सोनी liv वर. welcome home नावाचा हॉरर मुवी रिलीज झालाय. त्यात एक स्वरदा थिगळे आहे, जिला मी माझे मन तुझे झाले मुळे ओळखते. ती लीड नसावी, कश्मिरा इराणी लीड आहे. एक मराठी शाळा दाखवली आहे गावातली, त्यातले शिक्षक शिक्षिका. एक घर बंगला कुठलेतरी त्यात काहीतरी विचित्र घडत असते. एवढाच अंदाज मला आला. पैसे भरून कोण घेणार सोनी liv, किती घ्यायचं आणि बघितलं जात नाही.

हा चित्रपट कोणी बघितला तर परीक्षण नक्की लिहा.

लक्ष्मी:
समाजाला एक चांगला संदेश द्यायच्या नावाखाली त्याची माती केली आहे.
हा पिक्चर फक्त आणि फक्त शेवटच्या १५ मिनिट साठी शरद केळकर च्या कामासाठी बघा
चांगले अभिनय करणारे कलाकार, कियारा सारखी चांगली दिसणारी आणि बर्‍यापैकी अभिनय करणारी नायिका घेऊनही पिक्चर हा अत्यंत गोंधळलेला आहे.
अक्षय कुमारही फार चांगले करत नाही.
प्रेक्षकांना घाबरवणारे भूत म्हणून नक्की काय वापरावे याबद्दलही घोळ आहे. कधीतरी डोळे वटारलेला ट्रान्सजेंडर, कधी लाल झाँबी , कधी इट मधला जोकर इत्यादी इत्यादी.
हा सिनेमा कॉमेडी म्हणून निराश करतो, हॉरर म्हणून निराश करतो, नुसता चांगला संदेश देणारा वाईट सिनेमा या लेव्हल ला पण उतरत नाही.
मी सर्वांना वर्किंग डे ला जागून बघायला लावून प्रचंड शाप घेतले.

किती रुपये लागतात
50,100 मध्ये भागते
की वार्षिक फी भरून अजून दहा वीस सिनेमे बघावे लागतात

रूनमेश ओटीटी ला ओटीत घे आणि धागा काढ

हो आहेत
सिनेमे आहेत, काही चांगल्या डॉक्युमेंटरी आहेत
क्रिकेट आवडत असेल तर बरंच काही आहे
सिरीज आहेत, कार्टून आहेत
प्राईम किंवा नेटफलिक्स इतका स्ट्रॉंग कंटेंट नाहीये
आर्या म्हणून सुश्मिता सेन ची एक सिरीज आहे
ती भारी आहे पण त्यात हिंसाचार आहे

399 फक्त हॉट स्टार ला देण्यापेक्षा 499 मध्ये 74 दिवस दीड जीबी रोज, अनलिमिटेड कॉल आणि प्लस ही ऑफर जास्त उपयुक्त आहे

हो येतं
मोबाईल वर बघायला अँप घ्यावं लागेल
टीव्ही स्मार्ट असेल तर त्यावर पण येतं

मी पण काल हॉट्स्टारवर लक्ष्मी बाँब बघत होते. नक्की काय दाखवतात तेच कळ्लं नाही. ना धड हॉरर, ना धड कॉमेडी. सगळ्याचीच माती झालीये. अर्धाच बघू शकले. अ‍ॅक्चुअली शरद केळकर साठीच बघायचा होता.

माझ्या नवऱ्याने घेतलं दोन महिन्यांपूर्वी disney hotstar, तेव्हा 3९९ भरले वर्षाचे. रोज काही data फ्री आहे. किती आहे ते विसरले. त्यानंतर आर्याचे दोन भाग बघितले म्हणजे एकंदरीत तीन झाले बघून, नंतर राहिलीच आहे बघायची. दिवाळीनंतर बघेन, दिवाळीत टेन्शनचं नको काही बघायला.

शरद केळकरच्या कामाचे तुफान कौतुक करतायेत बरेच जण सो मि वर. त्याच्यासाठी पूर्ण पिक्चर सहन करायची ताकद नाहीये मात्र.

वेलकम होम पाहिला >>> थोडक्यात स्टोरी सांगाना प्लीज. आवडती actress आहे म्हणून इंटरेस्ट. नेहाची भूमिका केलीय तिने. परेश रावळ, स्वरूप संपत production ची निर्मिती आहेना.

मी काल एक ट्रेलर बघितलं सोनी liv वर. welcome home नावाचा हॉरर मुवी रिलीज झालाय. त्यात एक स्वरदा थिगळे आहे, जिला मी माझे मन तुझे झाले मुळे ओळखते. >>>>>>> मी सुद्दा. सध्या ती हिन्दित गेलीये. दोन तीन हिन्दि सिरियल्स केल्या आहेत. आता ती एकता कपूरच्या नागिन ५ मध्ये मयुरीच काम करतेय. व्हिलन झालिये त्यात.

अंजु - दोन शिक्षिका ज्यांना जनगणनेच काम दिले आहे त्या एका ओसाड ठिकाणी असलेल्या घरात चौकशी करायला जातात. तिथे एक नऊ महिने गरोदर बाई असते. तिला विचारतात घरात कोण आहे तर ती सांगते मी, तो, भोला आणि अम्मा.
जेंव्हा तिला विचारतात हे तुझे पहिले बाळंतपण आहे का तर ती नाही म्हणते. बाकी मुले कुठे आहेत विचारता तर म्हणते की मर गये. बच्चे पैदा होते है और एक दो दिन मे मर जाते है.
तेवढ्यात तिथे अम्मा येते आणि स्वरदा आणि कश्मिरा ला बाहेर हकालते.

कश्मिरा ला राहवत नाही आणि पुढच्या आठवड्यात ती परत तिकडे जाऊ म्हणते.. बाळ कसे आहे बघायला...स्वरदा नको नको म्हणत असते पण जातात त्या...

तिकडे जातात तर कळते की बाळ नाही वाचले...सगळा प्रकार विचित्र असतो.. त्या अम्मा चा मुलगा एक पन्नाशीचा माणूस असतो.. जो मौन व्रत असतो चार वर्षे...
दोघी हिरोईन ला लवकरात लवकर पळावे असे वाटत असतानाच मुसळधार पाऊस येतो आणि ती रात्र तिथेच काढायची वेळ येते...

जास्त लिहत नाही.. स्पोईलर शिवाय यापेक्षा जास्त सांगणे शक्य नाही...

एक क्रिपी थ्रिलर आहे.. सत्य घटने वर आहे.. भरपूर डायलॉग मराठीत आहेत...
लहान मुलांसमोर बघण्यासारखा नाही...
सर्वांची कामे चांगली आहेत...

लक्ष्मी चा ट्रेलर बघूनच काहीतरी गंडलेले वंगाळ आहे हे समजून येत होते.
आपला अंदाज बरोबर आहे केवळ यावर शिक्कामोर्तब करायला मी ईथे आलेलो.
भाई त्याचा ट्रेलर मी पुर्ण सहन करू शकलो नाही तो पिक्चर कोण बघणार आख्खा...

रूनमेश ओटीटी ला ओटीत घे आणि धागा काढ
Submitted by BLACKCAT on 11 November, 2020 - 21:06
>
काढायला काही हरकत नाही, मी काढतो पब्लिक डिमांडवर धागे.
पण मला तर हा शब्दच हल्ली हल्ली कळलाय आणि अजून पाठही नाही झालाय Happy

बाकी ईथे पिक्चर बघायचा एक फायदा तर होतो, लॉलीपॉपचे पैसे वाचतात

च्रप्स thank u.

Interesting वाटतेय. एक धागा काढा कोणीतरी मुवीजच्या पूर्ण स्टोरीजचा. जे बघणार असतील त्यांनी वाचायचा नाही.

सुलू हो, मला मैत्रिणीने सांगितलं की स्वरदा नागीन मधे व्हिलन आहे. मी insta वर नाही, तिथे ती फोटो टाकते जास्त , आता खूप ग्लॅमरस झाली आहे त्यामुळे अनोळखी वाटते असं म्हणाली ती. अर्थात obvious आहे म्हणा नाहीतर वेगळे रोल कसे मिळणार आणि अभिनयपण वेगळा कसा करायला मिळणार. ह्याचे प्रोमोज बघताना मात्र शुभ्रा आठवली, simple look.

वेल्कम होम पाहिला. हॉरर्/भूतपट आहे अस मला वाटत होतं पण मोअर लाइक अ क्राइम स्टोरी. अतिशय रक्तरंजित, किळसवाणी दृश्ये आहेत. एकामागोमाग नुसते अत्याचार. अ आणि अ सुद्धा वाटला. एकंदरीत जितकं कौतुक ऐकलं तितका खास अजिबात वाटला नाही. काही प्रश्न अनुत्तरीत राहतात. कुणी धागा काढला तर त्यात विचारेन. लहान मुलांसमवेत अजिबात बघू नये.

अठरा वर्षाखालील मुलांनी बघू नका असं सांगतात ना. ट्रेलर मधे सांगितलं.

हो स्वरदा मस्त आहे. माझे मन तुझे झाले मध्ये आधी हिरोची acting सुपर्ब वाटली, होतीच. ही आवडली तरी अभिनय सुरुवातीला so so वाटला पण नंतर तिचा अभिनयाचा ग्राफ इतका उंचावला की बास रे बास, छा गयी. आदिती सारंगधरपण फिकी पडली तिच्यासमोर.

रक्तरंजित आणि किळसवाणे नाही बघवणार मला.

एकच सांगा कोणीतरी त्या दोघी शेवटी सुखरूप बाहेर पडतात का.

Pages