मराठी भाषा दिवस २०२० - स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा

Submitted by मभा दिन संयोजक on 17 February, 2020 - 13:17

स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचा केंद्रबिंदूच जणू! घरात प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या असल्या तरी सर्व कुटुंबाला एकत्र ठेवणारे हे स्वयंपाकघर, अनेक शास्त्रीय प्रयोग घडवणारी प्रयोगशाळा असते हे सांगितले तर कदाचित आश्चर्य वाटेल. पण इथे आपल्या सुगरणी आणि बल्लवाचार्य रोज वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग हसतखेळत सहजतेने करत असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर स्वयंपाक करताना ज्या प्रक्रिया घडतात त्या प्रत्येकामागे एक ठोस शास्त्रीय आधार असतो. हे नक्की कसे? त्याबद्दल आज आपण येथे तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांमधून जाणून घेऊ.

kitchen prayogshala.jpg

अगदी साधी उदाहरणे बघू ―

सफरचंद कापून उघड्यावर ठेवले की तांबूस होते आणि कांदा कापल्यावरच कसे डोळ्यात पाणी येते? हे नक्की का घडते? ते समजले की आपसूक आपल्याला ते टाळायचा उपायही सापड़तो. तसेच पॉपकॉर्न करताना नक्की असे काय घडते जेणेकरून इवलासा मक्याचा दाणा हा असा टम्म फुगतो ते रहस्य उलगडून पाहिले की आपले पॉपकॉर्न अधिक यम्मी बनणार हे नक्कीच !

अन्न शिजवण्याची क्रिया तर निव्वळ रसायनशास्त्रच आहे, ज्यात हीटिंग, फ्रिझिंग, मिक्सिंग आणि ब्लेंडिंग अश्या विविध क्रिया पार पाडल्या जातात. हे घडत असताना अनेक भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया एकाच वेळी घडत राहतात. अगदी साधे साखरेचे उदाहरण आपण पाहिले तर ह्या साखरेची प्रथिनांमधील अमिनो आम्लांबरोबर होणारी मायलार्ड रिएक्शन आपल्या पदार्थाना खरपूस तपकिरी रंग देण्यास कारणीभूत ठरते. थोडीसी उष्णता अजून वाढवली तर ह्याच साखरेचे कॅरेमल बनते आणि प्रमाणापेक्षा फार तापवली तर अर्थातच जळल्याने आपल्या रेसीपीची चव खराब होते.

आता प्रत्येकाला आणि प्रत्येकीला आपली रेसिपी उत्कृष्ट बनावी असं नेहमीच वाटतं ना! मग ह्यासाठी क्रियेमागील तत्व लक्षात आले की सर्व गणित सोप्पे होऊन जाते. अश्या सोप्या गणितांचा एकत्रित संग्रह असावा म्हणून आपल्या किचनमधील घटनांमागील शास्त्रीय कारणे शोधून लिहा बरं इथे पटापट!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावरून आठवलं.लहानपणी स्क्रू ड्राईव्हर ला खोचून काजूबी भाजायचा आगाऊपणा करायचो.अजिबात करू नये.काळ्या गरम तेलाचे फवारे सगळीकडे उडतात.
शार्पनर ने सारखं टोक तुटतं म्हणून कोऱ्या ब्लेड ने पेन्सिल चे टोकही करू नये.हमखास मोठी चिर पडून बोट आणि नख जखमी.
एक अगदी महत्वाची टीप.फूड प्रोसेसर ला हिरवं ऑन केलं की ऑन राहणारं आणि लाल दाबलं तोवरच ऑन, नंतर ऑफ होणारं टर्बो बटन असतं.मिक्सर चा प्लग ऑन करताना कायम हिरवं बटन बंद आहे याची खात्री करायला हवी.शिवाय मिक्सरवर छोटं चटणी भांडं बसवलं असेल तर त्याला झाकण लावल्या शिवाय प्लग ऑन करायला नको(थोबाडावर आलं लसूण वाटण उडवून घेतलं आहे.मागच्या वेळी मध्येच लाईट गेल्याने हिरवं बटन चालू आणि नंतर लाईट आल्यावर परत दुसरं काम करताना उघडं भांडं आलं लसूण घालून फिक्स करून प्लग ऑन केला आणि फर्र. नशीब खर्डा मिरची नव्हती.)

बाप्रे वडास्फोट डेंजर !
पनीर, अंड्याचे स्फोट नेहेमी होतात मावे मधे माझ्याकडून पण. एकदा छोले गरम करत असताना ते पण फुटलेत.

(आरतीचे ताट मी निरंजन स्वतःकडे येतील असे हात बाहेरच्या बाजूने लावून धरले आहे.)
ओवळणे सुरू:

बायको मावेला आधीपासूनच घाबरते. त्यामुळे मावेची सगळी कामे मीच करतो. मावे घेऊन १३ वर्षे झाली, अजून पर्यंत एक छोटासा स्फोट सुद्धा झाला नाही.

: ओवळणे बंद
(निरंजन विझवून आरतीचे ताट देवघरात नेऊन ठेवलेय.)

आरती सुरू:
जय मानवदादा अहो जय मानवदादा Lol
आरती समाप्ती:

मावेत चहा उतू घालतो नवरा... एक दिवसाआड
(आपापला करतो /उतू घालतो /साफ करतो )
मी स्थितप्रज्ञ झाले आहे. मावेच्या दरवाज्याचा खडखडाट सहन नाही होत पण जास्त प्रमाणात.
असं कुणी असेल तर त्याला एकटे वाटायचं कारण नाही.

पण तुम्ही लोक्स वाचत नाही का मॅन्युअल. अंडे उकडू नये मावे मध्ये, धातूचे पात्र फॉइल ठेवु नये असे लिहि लेले असते. मावे चे ओरिजिनल प्रिन्सिपल बघा अंड्यात ती हवा वाफ जायला जागा नाही ते फुटणार च. फॉलो द सायन्स. ही प्रयोग शाळा आहे.

हे एग कुकर मावे सेफ आहे. चार अंडे आठ मिनिटातhard boiled होतात. पुन्हा गरम करताना पण पुन्हा पाणी घालून एखाद्या मिनिटात होते. ते lock होते म्हणून पडण्याची भिती नाही. माझ्या सासऱ्यांना पण मी एक घेतले. झटपट होतात व लक्ष द्यावे लागत नाही त्यांचे हात थरथरतात त्यामुळे lock safe वाटले. शिवाय ते विसरतात उकडायला टाकून मगं पाणी वाफ होऊन अंडी तळाला लागतात. एकदा तर करपलं भांडं... Gas busy रहातो.
हे फार आवडलं त्यांना.
IMG-20201103-WA0005.jpgIMG-20201103-WA0004.jpg
Amazon वर मिळाले. Cute hen घेतली.

पण तुम्ही लोक्स वाचत नाही का मॅन्युअल. अंडे उकडू नये मावे मध्ये, धातूचे पात्र फॉइल ठेवु नये असे लिहि लेले असते. मावे चे ओरिजिनल प्रिन्सिपल बघा अंड्यात ती हवा वाफ जायला जागा नाही ते फुटणार च. फॉलो द सायन्स. ही प्रयोग शाळा आहे.>>>>> +1
मावे घेतला तेव्हाच दुकानदाराने व नंतर डेमो द्यायला आलेल्या पोराने सांगितले. काही न ठेवताही मावे सुरू करु नये. दूध गरम करून (मावेत) कॉफी घातली तर ती उतू जाते.

Pages