म्युनिसिपल कॉर्पो रेशन ओफ ग्रेटर मुंबई
सार्वजनिक आरोग्य खाते, श्वान पाळण्याकरता अनुज्ञापत्र
( मुंबई महानगर पालिका अधिनियम १८८८ ( अद्यावत सुधारीत) च्या कलम १९१ अ अंतर्गत.
टर्म्स अँड कंडिशन्स
This license is granted pursuant to the provisions of teh section 191A and 191 b of MMC ACT 1888 and is valid and subsisting subject to the faithful compliance and observance of the conditions stipulated here under.
१) श्वान मालकाने आपल्या श्वानास प्रत्येक सहा महिन्यांनी रोग प्रतिबंधक उपाय म्हणून रेबीज विष प्रतिबंधक लस टोचून घेतली पाहिजे. ह्यासाठी प्राणि रोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.
२) प्रत्येक श्वान मालकाने तो राहात असलेल्या परिसरात आप ल्या श्वानास त्या नियं त्रणाखाली ठेवले पाहिजे.
आणि त्यास बाहेर नेताना मुस्की अगर साखळी बांधून नेले पाहिजे.
३) प्रत्येक श्वान मालकाने जर आपले श्वान वेडाच्या झटक्याने अगर अन्य सांसर्गिक रोगाने आजारी असल्यास
त्याच्यावर प्राणी रुग्णालयातून अगर पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले पाहिजेत व तसा पुरावा
कार्यालयात सादर करावा.
४) श्वानाचा मालकी हक्क बदलल्यास अनुज्ञापत्र नवीन श्वानमालकाच्या नावे करून घ्यावे.
५) नूतनीकरणाच्यावेळी सर्व आवश्यक कागद पत्रे सादर करावीत.
६) श्वानाचा मृ त्यू झाल्यास किंवा ते हरवल्यास त्याबाबत अनुशासन कार्यालयात कळवावे व लायस न्स
रद्द करून घ्यावे.
७ ) अ. पत्राचे उरलेल्याकाळाचे कर परत केले जाणार नाहीत.
८) हे अप कोणत्याही परिस्थिती त दुसृयास देउ नये. अर्थात कुत्र्याची मालकी बदलली जाउ शकते.
९) पाळलेले श्वान हे कोन त्याही परिस्थितीत इतरांना उपद्रवी ठरता कामा नये याची योग्य ती दखल घेतली पाह्जे.
लायसेन्स वर म्युनिसिपल वार्ड, मालकाचे नाव पत्ता फोन नंबर कुत्र्याची माहिती, सर्व वॅ क्सिनेशन्स चा दाखला, व्हेट चे सर्टिफिकेट व नंबर, व्हेट ची जी फाइल असते त्याची कॉपी, द्यावी लाग ते, प्रति लायसेन्स
७५० रु. खर्च येतो व ते लगेच मिळते. ह्यावर असिस्टंट मेडिकल ऑफिसर, व सॅनिटरी इन्स्पेक्टर ची सही होते शिक्का होतो व मग ते हातात येते. दर वर्शी रिन्यू करावे लागते.
व्हॅक्सिनेशन शेड्यू ल व इत र माहिती पण आहे. सवडीने लिहीते.
काही उपयुक्त लिंका:
http://jaagruti.org/2013/07/09/pet-dogs-and-street-dogs-dos-and-donts/
http://www.pawnation.com/2014/05/08/10-dog-park-dos-and-donts/
http://www.cityofboston.gov/animals/regulations.asp
http://www.thedogplace.org/Family-Dog/Rules-for-dog-owners.asp
अमा, समजून घेतील लोक.
अमा, समजून घेतील लोक.
तुमच्या भावना टचिंग आहेत.
आमच्या इथे जवळच एक आहे
आमच्या इथे जवळच एक आहे
आयटी मधील कपल आहेत
त्यांनी जॉब सोडून पूर्णवेळ हे काम सुरू केलं।आहे
अजून जाऊन पाहिले नाही पण काही जणांनी सोडलं त्यांना चांगले अनुभव आहेत
अर्थात प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असणार म्हणा
तुमच्या भावना टचिंग आहेत.....
तुमच्या भावना टचिंग आहेत.....+1.
अमा,किती प्रेमळ आहात हो.प्रेम करता येणे,जबाबदारी निभावणे खरंच मला तुमच्याबद्दल आदर वाटला.
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
ओडीन च्या वासावरून
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
आपल्याला खेळायला घेतात, सगळे
आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत Happy....
तेव्हढीच अपेक्षा असते ना त्यांची!!!
किती गोड ना.
किती गोड ना.
ओडिन ला नेहमी असंच प्रेम आणि अटेंशन मिळू दे
किती गोड आहे ओडीन!!
किती गोड आहे ओडीन!!
मुलाचं सिक्रेट बाहेर काढलं --
मुलाचं सिक्रेट बाहेर काढलं --
आणि आता मुलंच त्याच्याबरोबर खेळतात .. किती छान.
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत >> अगदी अगदी सो क्यूट! आवडत्या व्यक्तीकडून २ मिनिट अटेन्शन साठी तासंतास वाट बघायचीही तयारी असते माझ्या मुलीचे ऑनलाइन क्लासेस चालू असतात, मधे ५ मिनिट ब्रेक मिळाला की ती लाड करते , खेळते म्हणून पूर्ण क्लास चालू असेपर्यन्त शांतपणे वाट बघत बसलेला असतो माउई.
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत..... किती सुरेख लिहिलय! अगदी वात्सल्याने ओथंबलेले.
माउईची कमाल आहे.
किती गोड ओडीन.. मुलात मुल
किती गोड ओडीन.. मुलात मुल होऊन खेळणं किती गोंडस आहे.
तेव्हढीच अपेक्षा असते ना
तेव्हढीच अपेक्षा असते ना त्यांची>>>>
हो ना, मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
किती गोड आहे ओडीन!!
किती गोड आहे ओडीन!!
काय ब्रीड आहे
लॅब्राडॉर
लॅब्राडॉर
फार लाघवी असतात ना
फार लाघवी असतात ना
हो खूपच
हो खूपच
मांजर आणि भुभु चे काय वैर
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
यात बिच्चारे बाबा!
यात बिच्चारे बाबा!
हो ना त्यांना काही कळलंच नाही
हो ना त्यांना काही कळलंच नाही
दचकून उठले एकदम
इम्याजीन करुनच जाम हसायला आलं
इम्याजीन करुनच जाम हसायला आलं
भयंकर आहे.
भयंकर आहे.
इम्याजीन करुनच जाम हसायला आलं
इम्याजीन करुनच जाम हसायला आलं >>> +1
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
भारी किस्से आमच्या बाळाला
भारी किस्से आमच्या बाळाला खारी सतावतात इथे. इथे स्ट्रे कॅट्स हा प्रकार मोस्टली नसतोच. खारी खूप असतात बॅकयार्ड मधे. इथल्या खारी पण भल्या मोठ्या आणि क्रीपी स्मार्ट असतात. त्या याला वेडावतात अक्षरशः - मुद्दाम समोरून, जवळून धावून मग झाडावर नाहीतर कुंपणावर चढून गंमत पहातात, पळताना थोडे थांबून हा जवळ आला की स्पीड वाढवतात!
खरच एक्दम भारी किस्से आहेत.
खरच एक्दम भारी किस्से आहेत.
ओड्या>>> यावरुन रावसाहेब त्याच्या कुत्र्याला जिम्या म्हणायचे ते आठवल.
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला>>>>>>>>>>>>>>>>>> :हहपुवा: हे फार भारी आहे
धमाल आहे ओड्या
धमाल आहे ओड्या
ओडिनचं ओड्या आवडलं. गोड्या ओड्या !!
जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला... >>> 'काय पण घुसतात एकेक' त्याच्या भाषेत असेल.
मस्त कथा आहेत
मस्त कथा आहेत
आता फनी ऍनिमल व्हिडिओ चॅनल चालू करा ओडिन चा एखादा.आम्ही नक्की बघू.
म्हणलं की कुठली पद्धत लेका
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची Happy >>> माबो वाचतो का ओडीन
Pages