दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युट्यूबवर होते हे गाणे पण आता बघितले तर दिसत नाही. असो. हो अ‍ॅक्टींग सगळ्यांचेच खास आहे. पण किती साधी वाटतात आजच्या काळात अशी हॉटेल्स आणि ते डेकोरेशन वगैरे. त्या काळात सुपरस्टारना घेऊन अशा ठिकाणी शुटींग झाले होते. म्हणून मला वेगळे वाटते ते गाणे Happy शिवाय शशी कपूर फारच फन्नी अभिनय केला आहे एकदोन ठिकाणी त्यात. Funny not in negative sense, he was just so natural.

आता नक्की लक्षात नाही पण बहुधा या गाण्यापर्यंत तो राखीच्या प्रेमात वगैरे नसतो. फक्त संजीव कुमार विरूद्ध तिला वापरून घेत असतो.

बरोबर फारेण्ड. पण आता पर्यंत राखीला नोकरी वरून काढल्यावर त्याने तिला नोकरी दिली असते. राखीला सॉफ्ट कॉर्नर असतो, म्हणुन ती पण चीझ काम की च आहे हे ठासवत असते.

सुटलीच म्हणायची ती! कुठे सापडला तर बघते आता. सगळी गाणी आवडतात त्रिशूल मधली. जानेमन कमाल करती हो तर खासच...
तनिष्क बागचीची नजर पडून ह्या गाण्याचे रिमिक्स आले नाही हे ही आपले मोठेच नशीब म्हणायचे...

जानेमन कमाल करती हो चे रिमिक्स?
नको रे बाबा.
तसे मला कुठलेच रिमिक्स नको वाटतात, गाणं आवडतं नसलं त्याचं ही.

Screenshot_20201011-095415_Samsung Internet.jpg

खास शोधले हे ... शाळेच्या सहलीला हे गाऊन बाईंचे डोके उठवले होते Proud ओळखा पाहू !
सीमंतिनी ... प्रतिसाद धमाल .

नाही, त्रिशूलचे रिमिक्स नाही आले अजून. पण एकटी हेमामालिनी अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीत गोल्फ खेळणारी निघावी ही नाइंसाफी आहे. सारा अली खानला घेऊन करावं रिमिक्स आणि खेळू द्यावं तिला गोल्फ.

नाही mrunali... But close
चिनाय चिन चिन सारख्या भिकारोत्तम lyrics आहेत ... Happy

लावण्या
तुझी माझी जोडी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली

Pages