Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23
भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभयवरदकर
अभयवरदकर
वा, छान होते.
वा, छान होते.
अभयवरदकर
अभयवरदकर
Submitted by मानव पृथ्वीकर >>>> बरोबर
बाकीचे चुटकीसरशी सोडवलेत सर.... तासाभरात फन्ना
र च राहिला.... मी कधीपासून सांगतेय 'भरून टाका'..... (कर)
१. 23 (२रे व ३ रे अक्षर मिळून) प्राणीमात्रांच्या आदिम वैशिष्ट्यांपैकी एक -- भय
२. 456 पूजेतल्या मूर्तीचे ठळक वैशिष्ट्य -- वरद ( आशीर्वाद देणारा हात असलेली)
३. 56 पचनसुलभ अन्नग्रहणासाठी आवश्यक --- रद (दात)
४. 76 पात्रता / लायकी --- कद ( उदा --कदान्न)
५. 34 एक तृणधान्य -- यव ( जव सातू)
६. 145 मालकी हक्क दाखवणारा विलायती शब्द (मराठी उच्चार) --- अवर
७. 24 स्थिती / साम्य / शुभेच्छा -- दर्शक वाक्यात हा असतो -- भव ( उदा- यशस्वी भव, आचार्य देवो भव)
८. 78 एखाद्या जागेशी / प्रदेशाशी संबंध दाखवणारा उपशब्द -- कर (पुणेकर, नांदेडकर)
९. 64 हे अनुभवायला / बघायला पहाट योग्य -- दव
१०. 84 कीर्ती, डंका, रिवाज / नियम --- रव
मूळ शब्द --- अभयवरदकर
अभयवरदकर कुठून घेतलाय हा ?
अभयवरदकर
कुठून घेतलाय हा ?
वरदहस्त चा समानार्थी ना ?
वरदहस्त चा समानार्थी ना ?
कोशात नाही?! नेहमीच्या
कोशात नाही?! नेहमीच्या वापरातला आहे... स्तोत्र / पोथ्यांमध्ये असतो.
अभयवरदकर --- कुठल्याही उपास्य दैवत / गुरू यांची प्रतीके अभयवरदकर असतात. उजव्या हाताचा तळवा भक्ताकडे केलेली. ( राम, गणपती, गुरूनानक यांची हस्तमुद्रा)
वर देणारा/री = वरद = अभयवरदकर.
अभय + वरद + कर = आशीर्वाद आणि संकटे/विपत्ती यापासून सुरक्षा / मुक्ती दर्शविणारी उजव्या हाताची हस्तमुद्रा.
मल्टिपल हातात शस्त्र / अस्त्र / अलंकार (पुस्तक, कमळ वगैरे) / नैवेद्य ( देता-घेता गणपती ज्याच्या डाव्या आडव्या तळहातात मोदक-लाडू ठेवतात) असला तरीही मूर्तीचा एक हात अभय - वरद - कर असतोच.
सुरेख !
सुरेख !
सुरेख गं , कवीश्रेष्ठ
सुरेख गं , कवीश्रेष्ठ मोरोपंतांना तर मनोमन दंडवतच !!
वरदहस्त चा समानार्थी ना ? >>
वरदहस्त चा समानार्थी ना ? >>>> हो बरोबर
@ कोडे ---- कुमार सरांनीच ट्राय केले. बाकीच्यांना गोंधळ वाटला का?
शोधसूत्रे रचायला चुकली होती का? योग्य दिशेने नेणारी नव्हती?
मी हे शब्द-उपशब्द पहिल्यांदाच केले, काही सुधारणा हवी तर नक्की सांगा.
खरच अस्मिता .... बारामतीला जाऊन ते ग्रंथालय, त्या रचना आणि तो ठेवा जपणारी माणसे पहावे वाटतेय. किती अमूल्य गोष्टी नीट न जपल्याने काळाच्या प्रवाहात नष्ट होत असतील.
बरोबर होते कोडे.
बरोबर होते कोडे.
अ व र आणि वरद हे शब्द आले होते, नंतर डोकावले तेव्हा डॉक्टरांनी सगळे सोडवले होते. मी मल्टीटास्किंग करत डोकावत होतो.
ओके, द्या पुढचे कोडे कोणीतरी
ओके, द्या पुढचे कोडे कोणीतरी जमेल तसे......
अस्मिता एक अमेरिका GK रचा?, ओळखीची ठिकाणे.... नावे मराठीत
बारामतीला जाऊन ते ग्रंथालय,
बारामतीला जाऊन ते ग्रंथालय, त्या रचना आणि तो ठेवा जपणारी माणसे पहावे वाटतेय. किती अमूल्य गोष्टी नीट न जपल्याने काळाच्या प्रवाहात नष्ट होत असतील...+1
आपली संस्कृती सगळ्याच बाबतीत किती समृद्ध आहे ह्याचे रिमायंडर अधूनमधून या धाग्यामुळे मिळते.
कोडे छान होते मीच गडबडीत होते
बरं रचते कधीतरी
बरं रचते कधीतरी
कोणी देणार असाल तर जरूर सांगा
कोणी देणार असाल तर जरूर सांगा.
अन्यथा मी काही वेळाने देईन
मतीगुंग खेळ
मतीगुंग खेळ
सहा शब्द ओळखायचे आहेत. प्रत्येकाचे शोधसूत्र व अपेक्षित अक्षरसंख्या त्याच्या कंसात दिली आहे.
पण.........
प्रत्येक शब्द शोधताना काही अटी पूर्ण झाल्या पाहिजेत. त्या सूत्रांच्या नंतर खाली दिल्या आहेत.
त्यामुळे पर्यायी समानार्थी उत्तर नाकारले जाईल.
कृपया अनुक्रमेच सोडवत जा.
पहिली दोन उत्तरे एकदम द्या.
....................
शब्द क्रमांक व सूत्र (अक्षर संख्या )
१. कच्चा ( 2)
२. खरंच (3)
३. तजेला (4)
४. प्रतिभा (5)
५. मोजण्याचे साधन (6)
६. पसंतीनुसार (7)
अटी :
अपेक्षित उत्तरांची खालील अक्षरे समान आहेत. (समान अक्षर याचा अर्थ अक्षराचे पूर्ण रूप जसेच्या तसे. दा = दा ).
उत्तर क्र १ चे दुसरे अक्षर = २ चे दुसरे अक्षर.
२ चे दुसरे = ३ चे पहिले
३ चे दुसरे = ४ चे पहिले
४ चे चौथे = ५ चे पहिले
५ चे दुसरे = ६ चे पहिले
१. नव २. टवटवी
.
शब्द १ चे सूत्र व उत्तर यांची
शब्द १ चे सूत्र व उत्तर यांची मुळाक्षरे तीच आहेत. थोडा फरक करा
१. कच २. *च* ३. चकचकी
१. कच
२. *च* (सचत्?)
३. चकचकी
४. कल्पनाशक्ती
. कच नाही
. कच नाही
काचा आहे
आता पुढचे सुधारुन घ्या
४. प्रतिभा (5) = कविकल्पना
४. प्रतिभा (5) = कविकल्पना
सतीश,
सतीश,
नाही. क्रमानेच चला म्हणजे गोंधळ होणार नाही
5. शकसंवत्सर
5. शकसंवत्सर
तेजो
तेजो
नाही
क्रमानेच चला म्हणजे गोंधळ होणार नाही
2 साचार. (कलियुगी अवतार सगुण
2 साचार. (कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार)
2 साचार.
2 साचार.
बरोबर
मस्तच
आता 3 च घ्या
उडी नको !
OK, सॉरी
OK, सॉरी
३ चाकचक्य
३ चाकचक्य
३ चाकचक्य बरोबर, छान
३ चाकचक्य
बरोबर, छान
४. चे उत्तर कल्पनाशक्ती
४. चे उत्तर कल्पनाशक्ती नाही
कल्पनाशक्ती = तर्कशक्ती
प्रतिभा व यात सूक्ष्मभेद आहे
* * * शक्ती असे पहा
कळज्ञशक्ती?
कळज्ञशक्ती?
Pages