शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहिर

पीतरं

तरट

गैरत
मातर
हिटगा

मातर

स्त्री. (व.) मात्रा. 'ऐक सोयर्‍याचे बोल । कडु- निंबाची मातर । पित्या जाईल तुलारे । रात वैर्‍याची कहर ।।' -वलो. [सं. मात्रा.]

हिटगा

वि. (व.) मनाचा हलका; क्षुद्र बुद्धीचा. हिटगेपणा-पु. हलकेपणा.

गैरत

स्त्री. लज्जा; भीड. 'हल्लीच शिकस्तेची गैरत आणि शरमंदगी नबाबास फार जाली आहे.' -रा ५.१९. [अर.घरत्]

छान, फक्त
पीतरं ? >> पितर
माहिर >>> की माहीर ?

गैरत
मातर
हिटगा >>> सर्व छान !

थोडी वाट पाहू अन्य लोकांची

हिटर चिटींग केलेय हो. शब्द सुचत नव्हते मग उगाच इंग्रजी शब्द दिसला तो स्वतःवरच वैतागून ॲड केला. तो उगाचच आहे ॲड झालेला. नोटपॅडमधून तसाच कॉपी पेस्ट झालाय

मला हे दोनच आले

मारपीट
गारपीट

( गैरतट म्हणजे चुकीचा किनारा असावा का असा एक उगाच तारा तोडून झाला पण असा शब्द नाही दिसला कुठे)

मलापण चार अक्षरी वरील दोनच आले.
व एक पाच अक्षरी आला.
मी आताच सोडवले त्यामुळे सगळी यादी तयार नाहीय.

माहिर
गारपीट
मारपीट
पीतरं
तरट
माहितगार
गैरत
मातर
हिटगा

हे माझे एकुण शब्द
तरट म्हणजे जाडाभरडा कपडा.

मला फक्त tarat आले. गामापीर हा दुसरा शब्द,तोही बरोबर असल्यास.
अस्मिता,त्या ओळींचा अर्थ सांग nà

माझी भर :

• मातट
• गारत ( = गारद)
• गारट (थंड)
• रमात (करणे = थट्टेवारी घालवणे)
• मागार ( पाकळ शिताक ठाण दिवो, मागार भाताक शिताक किते घराक उजो.). अर्थ सांगा कोणी ! Bw

गैरमाहितगार

मातीशी मिश्रित

मागार >> हे कोकणी प्रकरण कोण सांगेल ? देवकी ?

काही शब्दांच्या जवळपासच्या शब्दांचा अर्थ शब्दकोशात शोधून त्यानुसार अंदाजाने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.
थोड्याशाच ( पण शिजलेल्या ) भातासाठी ठाणवई , आणि कोठार भर असलेल्या (तूस न काढलेल्या) भातास काय उजेड?
कोणीतरी खरा अर्थ सांगावा.

Pages