खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mrunali ,डांगर म्हणजे उडीद भाजुन रवाळ पीठ तयार करून त्यात बारीक चिरलेला कांदा ,मिरची कोथिंबीर ,मिठ घालून पाण्यात कालवायचे .....याचे थालीपीठ पण करतात....

डांगर म्हणजे उडीद पीठ किंवा बेसन थोडे ताका दह्यात कालवून कांदा, फोडणी वगैरे टाकतात

पीठ कच्चेच असते , न शिजवलेली रेसिपी आहे , नुसते मिसळणे

किट्टू कर्ली मस्त लागते. एकदम चविष्ट असते.. पण पट्टीचा खाणारा पाहिजे.. येरागबाळ्याचे काम नाही..तोंड फाटून जाईल..

होना अगं
नुसताच पांढरा भात दिसतोय

मला नुसताच भात दिसतोय.कढी आणि कर्ली शोधतेय..
परत कर्ली म्हणजे?>> असं कसं?
कर्ली माश्याचा एक प्रकार खूप काटे असतात पण तितकाच चविष्ट.
श्रवू ईथले मासेवाले कर्ली एकदम व्यवस्थित कापून देतात त्यामुळे no problem.

Egg pudding, exotic pasta, लच्छा पराठा, वडे, डांगर मस्त..

सुमित्रा रेसिपि साठी धन्यवाद.

Today's snacks special Beetroot Tomoto चकली

IMG20200927194736.jpg

कमी साईझचे फोटो कसे काढायचे किंवा फोटोंची साईझ कमी कशी करता येईल?

नवीन Submitted by Cuty on 27 September, 2020 - 17:05
>>>>>
तो फोटो WhatsApp ला कोणाला तरी पाठवा. नंतर तो पाठवलेला फोटो गॅलरीतून इकडे माबो वर डकवा.

कमी साईझचे फोटो कसे काढायचे किंवा फोटोंची साईझ कमी कशी करता येईल?
१. फोटो कसेही कितीही मोठे काढा.
२. काढलेला फोटो"ओपन विथ पेन्ट" करा.
३. "रिसाईझ" सिलेक्ट करा.
४. त्यातल्या "पर्सेन्टेज" मधल्या " हॉरिझॉन्टल" मधे २५ आकडा टाका (तोच २५ आकडा आपोआप व्हर्टिकल मधेही येईल).
५. सेव्ह करा ५ एम बीचा फोटो साधारण ३००-५०० केबी होईल.
६. प्रतिसाद देताना खाली "इमेज" वर क्लिक करुन तो फोटो "अपलोड" करुन सिलेक्ट करुन "इन्सर्ट" करा.
७. प्रतिसाद तपासा.......हुश्श झालं.

एवढं करुन नाहीच झालं तर जावुद्या, फोटो टाकुन माबोवर वाहवाही मिळवणं आपल्या नशीबात नाही हे समजुन जा.

सर्वात पहिले मृणालीने सांगितलेली आयडिया वापरून फोटो काढला. पहिल्याच प्रयत्नात साईझचा प्रश्न सुटला.

IMG_20200927_224230_596.jpg
Chips <3

मानवदादा Lol
खाल्ल्या समजा.
सगळेच भारी. मी आपली बघत असते दर शंभर पोस्टीला येऊन...

Pages