बूकमार्क स्पर्धा - ऋन्मेऽऽष - अ गट - परी वय वर्षे सहा

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 August, 2020 - 18:54

बूकमार्क म्हणजे काय असते?
ज्या दिवशी हि स्पर्धा जाहीर झाली त्या दिवशीच मी हा प्रश्न फार निरागसपणे विचारला होता.
मला अ‍ॅक्चुअली बूकमार्क हा प्रकार माहीत नव्हता. किंवा कदाचित पाहिला होता, पण यालाच बूकमार्क ऐसे नाव हे माहीत नव्हते. एखाद्या ईटरनेटवरील साईटच्या लिंकला सेव्ह बूकमार्क करतात हे माहीत होते. पण ते बनवायची कशी काय स्पर्धा असू शकते याने आणखी गोंधळून गेलो होतो. मग कोणीतरी बूकमार्क काय असते हे मला समजावले. ते बघून मला ईतके साधे लक्षात आले नाही याचे स्वत:शीच हसायला आले. पण हा ऋन्मेष म्हणजे उगाच वेड पांघरूण पेडगावला जातो या ईमेजमुळे ईतर कोणी माझ्या या अज्ञानावर हसले नसावे.

असो, पाल्हाळ पुरे. माझ्याच लेकीचा धागा मी हायजॅक नाही करू शकत Happy

तर योगायोगाने दोनच दिवसांनी माझ्या मुलीने, परीने मला हा खालील बूकमार्क दाखवला. मी पुन्हा गोंधळात.
आता हा असा कसा बूकमार्क?
तर तिने त्याचा वापरही कसा करायचा हे मला समजावले. तिने ते यूट्यूबवर पाहिले होते. स्मार्ट जनरेशन. मी कौतुकाने त्याचा फोटो काढला. जे नेहमीच करतो. स्पर्धेचा विचारही डोक्यात नव्हता.

प्रचि क्रमांक १
Pari Bookmark 01.jpg

प्रचि क्रमांक २
Pari Bookmark 02.jpg

सस्मित यांनी माझ्या लेखावर प्रतिसाद देताना लेकीला बूकमार्क स्पर्धेत भाग घ्यायला लाव असे सुचवले आणि पुन्हा हे स्ट्राईक झाले.

काल शनिवारचा सुट्टीचा मुहुर्त बघत लेकीला स्पर्धेची कल्पना न देता छान छान बूकमार्क बनवायला सांगितले. तर तिने आम्हा चौघांसाठी चार बूकमार्क बनवले. म्हणजे ती, मी, मम्मा आणि आज्जी आम्हा चौघांसाठी. कारण कुमार ऋन्मेष अजून शाळेत जात नसल्याने त्याला बूकमार्कची गरज नाही - ईति परी Happy

प्रचि क्रमांक ३
Pari Bookmark 03.jpg

माझे ईतक्याने समाधान झाले नाही. तिने आणखी काहीतरी चांगले बनवावे म्हणून म्हटले, हे काय लॉलीपॉप बनवलेत. काहीतरी हटके बनव.

तसे तिने हे "वारली बूकमार्क" बनवले.
गोल वगैरे व्यवस्थित मार्क करून कापता आले असते, पण तिला डायरेक्ट कात्रीच चालवायला आवडते Happy

प्रचि क्रमांक ४
Pari Bookmark 04.jpg

आणि आमची फॅमिली कम्प्लीट झाली Happy
परी का सपना, सब के बूक मे बूकमार्क अपना..

प्रचि क्रमांक ५
Pari Bookmark 05.jpg

पण पप्पांचे समाधान ईतक्यानेही होणार नव्हते Happy
म्हणून मग मी तिला स्पर्धेबद्दल सांगितले आणि काहीतरी स्पेशल बनवायला सांगितले.

तर तिने खालील बूकमार्क बनवले. जे वापरानुसार पहिल्या बूकमार्कसारखेच होते.

प्रचि क्रमांक ६
Pari Bookmark 06.jpg

मी म्हटले, यात काय स्पेशल आहे?

तसे तिने मला ते उलटे करायला लावले.
हे बूकमार्क "टू ईन वन" होते. याच्या मागे हेअरक्लिप जोडली असल्याने ते केसांतही माळता येणार होते Happy

प्रचि क्रमांक ७
Pari Bookmark 07.jpg

हेअर क्लिप अडचणीची तर होणार नाही ना हे चेक करायला मी त्याचा बूकमार्क म्हणून वापर करून पाहिला. आणि लक्षात आले की हेअरक्लिपमुळे ऊंचवटा तयार झाल्याने पान आणखी चटकन शोधता येतेय Happy

प्रचि क्रमांक ८
Pari Bookmark 08.jpg

प्रचि क्रमांक ९
Pari Bookmark 09.jpg

आणि हे शेवटचे प्रकाशचित्र.
स्वतःचा फोटो आलाच पाहिजे, जी आमची परंपराच आहे Happy

आर्ट अ‍ॅण्ड आर्टिस्ट Happy
प्रचि क्रमांक १०
Pari Bookmark 10.jpg

शेवटी चिमुकल्या जीवांसाठी प्रत्यक्ष स्पर्धेपेक्षा जास्त आनंददाय़क असतो तो त्यात भाग घेण्याचा प्रवास Happy
- ईति ऋन्मेऽऽष

तळटीप - हे सर्व बूकमार्क बनवायला तिने माझी वा आमची शून्य मदत घेतली आहे. किंबहुना ती काही करताना आम्ही बघितलेलेही तिला आवडत नाही, कारण तिला आम्हाला सरप्राईज द्यायचे असते. आणि आम्हीही ती काय करतेय हे बघायला आणि तिला काही सांगायला जात नाही. कारण ती कोणाच्या बापाचेही ऐकत नाही Happy

--------------------------------------
--------------------------------------

ही प्रवेशिका स्पर्धेतून मागे घेत आहे
आणि नवीन एंट्री देत आहे Happy

बूकमार्क स्पर्धा - ऋन्मेऽऽष - अ गट - परी वय वर्षे ६ - (न्यू एंट्री - विडिओसह)

https://www.maayboli.com/node/76508

धन्यवाद Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान!
सगळ्याच बच्चेकंपनीने सुंदर कलाकृती सादर केल्या आहेत त्यामुळे त्या सगळ्यांनाच बक्षीस मिळायला पाहिजे.

@ संशोधक, बालविवाह होता. म्हणून गर्लफ्रेंडच्या नावाखाली लपवावा लागत होता. दाढी मिसरूड फुटले तसे उघड केले >>>>>>> Biggrin Biggrin
काहीही झालं तरी " ऋन्मेष " हा आयडी माझ्यासाठी बॅचलरच राहील Biggrin

छान बुकमार्क अन परीसुद्धा☺️

<<<रच्याकने, या लहान पोरांची स्पर्धा नका रे ठेऊ. सगळ्यांनीच इतके सुंदर सुंदर प्रकार केले आहेत सगळ्यांना बक्षिस देऊन टाका.>>>+१११
कोणीही हिरमुसला जाऊ नये की नाराज होऊ नये असे वाटते. सगळ्यांनाच छान प्रशस्तीपत्र देऊन टाका, सगळीबच्चेकंपनी खुश होऊ दे

स्पर्धेसाठी यातील कोणते बुकमार्क घेण्यात यावे त्याचा उल्लेख करा.
नवीन Submitted by संयोजक on 1 September, 2020 - 13:00

>>>>
अरे देवा हे तर आपल्याच पोरीच्या बूकमार्कमध्ये स्पर्धा लावल्यासारखे झाले.
येनीवेज,
२ ईन १ घ्या.. शेवटचे क्लिपवाले Happy

गोड!

ही प्रवेशिका स्पर्धेतून मागे घेत आहे
आणि नवीन एंट्री देत आहे Happy

बूकमार्क स्पर्धा - ऋन्मेऽऽष - अ गट - परी वय वर्षे ६ - (न्यू एंट्री - विडिओसह)

https://www.maayboli.com/node/76508

धन्यवाद Happy

Pages