बूकमार्क म्हणजे काय असते?
ज्या दिवशी हि स्पर्धा जाहीर झाली त्या दिवशीच मी हा प्रश्न फार निरागसपणे विचारला होता.
मला अॅक्चुअली बूकमार्क हा प्रकार माहीत नव्हता. किंवा कदाचित पाहिला होता, पण यालाच बूकमार्क ऐसे नाव हे माहीत नव्हते. एखाद्या ईटरनेटवरील साईटच्या लिंकला सेव्ह बूकमार्क करतात हे माहीत होते. पण ते बनवायची कशी काय स्पर्धा असू शकते याने आणखी गोंधळून गेलो होतो. मग कोणीतरी बूकमार्क काय असते हे मला समजावले. ते बघून मला ईतके साधे लक्षात आले नाही याचे स्वत:शीच हसायला आले. पण हा ऋन्मेष म्हणजे उगाच वेड पांघरूण पेडगावला जातो या ईमेजमुळे ईतर कोणी माझ्या या अज्ञानावर हसले नसावे.
असो, पाल्हाळ पुरे. माझ्याच लेकीचा धागा मी हायजॅक नाही करू शकत
तर योगायोगाने दोनच दिवसांनी माझ्या मुलीने, परीने मला हा खालील बूकमार्क दाखवला. मी पुन्हा गोंधळात.
आता हा असा कसा बूकमार्क?
तर तिने त्याचा वापरही कसा करायचा हे मला समजावले. तिने ते यूट्यूबवर पाहिले होते. स्मार्ट जनरेशन. मी कौतुकाने त्याचा फोटो काढला. जे नेहमीच करतो. स्पर्धेचा विचारही डोक्यात नव्हता.
प्रचि क्रमांक १
प्रचि क्रमांक २
सस्मित यांनी माझ्या लेखावर प्रतिसाद देताना लेकीला बूकमार्क स्पर्धेत भाग घ्यायला लाव असे सुचवले आणि पुन्हा हे स्ट्राईक झाले.
काल शनिवारचा सुट्टीचा मुहुर्त बघत लेकीला स्पर्धेची कल्पना न देता छान छान बूकमार्क बनवायला सांगितले. तर तिने आम्हा चौघांसाठी चार बूकमार्क बनवले. म्हणजे ती, मी, मम्मा आणि आज्जी आम्हा चौघांसाठी. कारण कुमार ऋन्मेष अजून शाळेत जात नसल्याने त्याला बूकमार्कची गरज नाही - ईति परी
प्रचि क्रमांक ३
माझे ईतक्याने समाधान झाले नाही. तिने आणखी काहीतरी चांगले बनवावे म्हणून म्हटले, हे काय लॉलीपॉप बनवलेत. काहीतरी हटके बनव.
तसे तिने हे "वारली बूकमार्क" बनवले.
गोल वगैरे व्यवस्थित मार्क करून कापता आले असते, पण तिला डायरेक्ट कात्रीच चालवायला आवडते
प्रचि क्रमांक ४
आणि आमची फॅमिली कम्प्लीट झाली
परी का सपना, सब के बूक मे बूकमार्क अपना..
प्रचि क्रमांक ५
पण पप्पांचे समाधान ईतक्यानेही होणार नव्हते
म्हणून मग मी तिला स्पर्धेबद्दल सांगितले आणि काहीतरी स्पेशल बनवायला सांगितले.
तर तिने खालील बूकमार्क बनवले. जे वापरानुसार पहिल्या बूकमार्कसारखेच होते.
प्रचि क्रमांक ६
मी म्हटले, यात काय स्पेशल आहे?
तसे तिने मला ते उलटे करायला लावले.
हे बूकमार्क "टू ईन वन" होते. याच्या मागे हेअरक्लिप जोडली असल्याने ते केसांतही माळता येणार होते
प्रचि क्रमांक ७
हेअर क्लिप अडचणीची तर होणार नाही ना हे चेक करायला मी त्याचा बूकमार्क म्हणून वापर करून पाहिला. आणि लक्षात आले की हेअरक्लिपमुळे ऊंचवटा तयार झाल्याने पान आणखी चटकन शोधता येतेय
प्रचि क्रमांक ८
प्रचि क्रमांक ९
आणि हे शेवटचे प्रकाशचित्र.
स्वतःचा फोटो आलाच पाहिजे, जी आमची परंपराच आहे
आर्ट अॅण्ड आर्टिस्ट
प्रचि क्रमांक १०
शेवटी चिमुकल्या जीवांसाठी प्रत्यक्ष स्पर्धेपेक्षा जास्त आनंददाय़क असतो तो त्यात भाग घेण्याचा प्रवास
- ईति ऋन्मेऽऽष
तळटीप - हे सर्व बूकमार्क बनवायला तिने माझी वा आमची शून्य मदत घेतली आहे. किंबहुना ती काही करताना आम्ही बघितलेलेही तिला आवडत नाही, कारण तिला आम्हाला सरप्राईज द्यायचे असते. आणि आम्हीही ती काय करतेय हे बघायला आणि तिला काही सांगायला जात नाही. कारण ती कोणाच्या बापाचेही ऐकत नाही
--------------------------------------
--------------------------------------
ही प्रवेशिका स्पर्धेतून मागे घेत आहे
आणि नवीन एंट्री देत आहे
बूकमार्क स्पर्धा - ऋन्मेऽऽष - अ गट - परी वय वर्षे ६ - (न्यू एंट्री - विडिओसह)
https://www.maayboli.com/node/76508
धन्यवाद
तुमची परी अगदी तिच्या नावाला
तुमची परी अगदी तिच्या नावाला शोभेल अशीच आहे. खूपच गोड परी आणि तिचे बुकमार्क!
खुपच छान!
खुपच छान!
सगळ्याच बच्चेकंपनीने सुंदर कलाकृती सादर केल्या आहेत त्यामुळे त्या सगळ्यांनाच बक्षीस मिळायला पाहिजे.
कॉर्नर बुकमार्क आवडला.
कॉर्नर बुकमार्क आवडला.
@ संशोधक, बालविवाह होता.
@ संशोधक, बालविवाह होता. म्हणून गर्लफ्रेंडच्या नावाखाली लपवावा लागत होता. दाढी मिसरूड फुटले तसे उघड केले >>>>>>>
काहीही झालं तरी " ऋन्मेष " हा आयडी माझ्यासाठी बॅचलरच राहील
छान बुकमार्क अन परीसुद्धा☺️
छान बुकमार्क अन परीसुद्धा☺️
<<<रच्याकने, या लहान पोरांची स्पर्धा नका रे ठेऊ. सगळ्यांनीच इतके सुंदर सुंदर प्रकार केले आहेत सगळ्यांना बक्षिस देऊन टाका.>>>+१११
कोणीही हिरमुसला जाऊ नये की नाराज होऊ नये असे वाटते. सगळ्यांनाच छान प्रशस्तीपत्र देऊन टाका, सगळीबच्चेकंपनी खुश होऊ दे
स्पर्धेसाठी यातील कोणते
स्पर्धेसाठी यातील कोणते बुकमार्क घेण्यात यावे त्याचा उल्लेख करा.
मस्त. इनोवटीव्ह.
मस्त. इनोवटीव्ह.
स्पर्धेसाठी यातील कोणते
स्पर्धेसाठी यातील कोणते बुकमार्क घेण्यात यावे त्याचा उल्लेख करा.
नवीन Submitted by संयोजक on 1 September, 2020 - 13:00
>>>>
अरे देवा हे तर आपल्याच पोरीच्या बूकमार्कमध्ये स्पर्धा लावल्यासारखे झाले.
येनीवेज,
२ ईन १ घ्या.. शेवटचे क्लिपवाले
गोड!
गोड!
खूप मस्त. कलाकार आहे परी.
खूप मस्त. कलाकार आहे परी.
चिन्न्नू आशिका धन्यवाद
चिन्न्नू, आशिका धन्यवाद
ही एंट्री स्पर्धेतून अमगे घेत
ही प्रवेशिका स्पर्धेतून मागे घेत आहे
आणि नवीन एंट्री देत आहे
बूकमार्क स्पर्धा - ऋन्मेऽऽष - अ गट - परी वय वर्षे ६ - (न्यू एंट्री - विडिओसह)
https://www.maayboli.com/node/76508
धन्यवाद
Pages