एकाच वेळी दोघींच्या प्रेमात .. ?? .. ?? ...

Submitted by अंड्या on 2 December, 2012 - 07:15

"प्रेम म्हणजे काय?" यावर धागा काढला तर हजारो पोस्ट पडूनही प्रश्न अनुत्तरीतच राहणार यात कोणालाही शंका नसावी.
प्रत्येकाची व्याख्या वेगळी आणि तरीही बरोबर असू शकते.

पण हे जे काही प्रेम आहे ते "एकाच वेळी" दोघींशी होऊ शकते का हो?
(मी मुलगा आहे म्हणून दोघींशी लिहिले, आपण यापुढच्या लेखात आपल्या सोयीनुसार "दोघींशी" किंवा "दोघांशी" असे काहीही वाचू शकता.)

इथे प्रेम म्हणजे मैत्री, ममता, वात्सल्य असे काही अपेक्षित नाही, तर स्त्री-पुरुष वयात आल्यानंतरचे होणारे प्रेम ज्याला प्रमाण मानून आपण आयुष्याचा जोडीदार निवडतो त्याला डोळ्यासमोर आणा.

काही जण म्हणतात, एकीवरच प्रेम कसे करणार...
कोणाचे डोळे सुंदर असतात, कोणाचे केस, तर कोणाचे गाल...
एखादीचे बोलणे आवडते, एखादीचे दिसणे, तर एखादीचे हसणे...
फिल्मी डायलॉग निव्वळ...
कारण माझ्यामते एखादीचे नुसते आपल्या आयुष्यात असणे जेव्हा आपल्याला आवडायला लागते तेच खरे प्रेम..

इतर गोष्टींना वासना म्हणा, आकर्षण म्हणा, आवड म्हणा...... पण प्रेम .... नाह...!
आजच्या पिढीच्या भाषेत सांगायचे तर ते "इश्कवाला लव" नक्कीच नाही..

असो, तर हे असे प्रेम एकाचवेळी दोघींशी कसे होऊ शकते??

एखादीत मन खरेच गुंतले तर ती आपले सारे आयुष्य व्यापून टाकते तर तिथे दुसरीसाठी जागा कुठून करणार.? त्यासाठी फोर्थ डायमेन्शनमध्येच जावे लागेल ना..

हृदय म्हणजे कप्प्याकप्प्यांचे कपाट आहे का? .. स्वताला हवे तेव्हा एक कप्पा उघडला अन दुसरा बंद केला..
हृदय म्हणजे ड्युअल सिम मोबाईल आहे का? .. कार्ड बदलले की नवीन नेटवर्क पकडले..
हृदय म्हणजे चॅनेल बदलणारा एफ एम रेडिओ आहे का? .. एक खटका दाबला आणि आपोआप ट्यूनिंग होऊन नवीन फ्रीक्वेन्सी सेट झाली..

एखादीवर तुम्ही प्रेम करत आहात आणि त्याचवेळी आणखी एखादी तुम्हाला आवडते याचा अर्थ एकतर त्या दुसरीबद्दलच्या भावना प्रेम नसून वर सांगितल्याप्रमाणे वासना, आकर्षण, आवड या सदरात मोडणार्‍या असाव्यात,
किंवा
तुमचे पहिलीवर आता प्रेम राहिले नाही वा कधी नव्हतेच मुळी..

पण तरीही तुम्हाला असे वाटत असेल तर आता हे तुम्ही स्वताच्या मनाचे समाधान म्हणा किंवा जोडीदाराची समजूत काढणे म्हणा...
वा आपल्या व्यभिचाराचे समर्थन..
पण मी याला व्यभिचारही म्हणू इच्छित नाही जर प्रामाणिकपणे दोघींपैकी कोणावर खरे प्रेम आहे हे स्वताच्या मनाशीच मान्य करून दुसरीजवळ त्याची कबूली दिली तर...

कुछ कुछ होता है या शाहरुखपटात एक संवाद होता - आपण एकदाच जगतो, एकदाच मरतो, वगैरे वगैरे एकदाच करतो, तर तसेच हे प्रेम पण एकदाच करायला हवे.
पण पुढे काय होते तो इतिहास आहे. (चित्रपटप्रेमींना माहीत असेलच.)

हे असे पुन्हा प्रेम होणे यात काही वावगे नाही किंवा हे घडतेच घडते. कारण प्रेम आपण करत नाही तर प्रेम हे होते.
माणूस गेला की संपले सारे. भले त्याने एकेकाळी आपले सारे आयुष्य का व्यापून टाकले असेना.. उलट तेवढीच मोठी पोकळी तो आपल्या आयुष्यात निर्माण करून जातो, जी भरल्याशिवाय आयुष्य पुढे सरकू शकत नाही. अश्यावेळी खरे तर जास्तच गरज असते एखाद्याची.. त्यामुळे प्रेमभंगानंतर पुन्हा प्रेम होणे, आणि या दुसरीशीही प्रेमभंग होऊन परत पहिलीच्याच प्रेमात पडणे असे काहीही होऊ शकते.....

पण एकाच वेळी..? दोघींच्या प्रेमात..? कोण कसे पडू शकते राव..?? हे या अंड्याला कोणीतरी समजवा इथे.

तळटीप - बेफिकीर यांच्या एका ललित-कथेवरून हा विषय निघाला. प्रतिक्रियेत माझे मत एका वाक्यात मांडले तर तिथे पुढच्या सार्‍या प्रतिक्रिया या विरोधातच आल्या. अगदीच राहवले नाही आणि मूळ कथेचा धागा भरकटू नये म्हणून त्यावर सविस्तर मत वेगळा धागा काढून मांडणे योग्य समजले.

अवांतर - मायबोलीकरांचा सरासरी वयोगट अंदाजे माझ्या वयाच्या दीडपट असावा .. त्यातही महिलांचे प्रमाण लक्षणीय .. पण .. पण .. प्रेम हे प्रेम असते, तुमचे आणि आमचे सेम असते .. त्यामुळे दरदिवशी दरडोई किमान एक प्रतिक्रिया तरी अपेक्षित आहे. Happy

- आनंद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ म्हाळसा
मीच आहे अंड्या.. किंवा होतो.
ऋन्मेष अयडीच्या आधीचा आहे हा अंड्या आयडी.
असो धागा वर काढलाच आहे तर धागा प्रतिसाद वाचून घेतो. विस्मरणात गेलेले असतील. मनोरंजन होईल.

@ च्रप्स
त्या म्हाळसा ओरिजिनल आहेत.
प्रोफाईलवर ओरिजिनल फोटो आहे त्यांचा
माझ्या फेसबूक मैत्रीण आहेत त्या

पण अंड्या म्हणजे मीच हे त्यांना माहीत नसावे.

असो धागा वर काढलाच आहे
माझ्या फेसबूक मैत्रीण आहेत त्या
पण अंड्या म्हणजे मीच हे त्यांना माहीत नसावे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 12 August, 2020 - 02:19

माहित नसताना त्यांनी नेमका तुमचाच धागा वर काढला हा सुद्धा एक योगायोगच म्हणायचा

100

माहित नसताना त्यांनी नेमका तुमचाच धागा वर काढला हा सुद्धा एक योगायोगच म्हणायचा
>>>>

हो मग माहीतही असावे
आई ॲम नॉट शुअर
कुठेतरी वाचले असावे मीच अंड्या. म्हणून. मला चिडवायला वर धागा काढला असावा.

अमेरिकेचे कट्टपा गेले आणि या म्हाळसादेवी आल्या हा पण एक योगायोगच म्हणायचा.
>

बँग ऑन
मला वाटले की मीच आता लोकांना हे दाखवून द्यायची वेळ येतेय की काय.. अजून कोणाच्या लक्षात आले नव्हते याचे आश्चर्य वाटले होते

नावंही बघा ना. कटप्पा, म्हाळसा, ऐतिहासिक पौराणिक वगैरे.. समान धागा ईथेही सापडेल
अर्थात धागे विणन्याची कला आणि वेग हा समान धागा आहेच.

पण अजून भन्नाट योगायोग दाखवतो हं

सध्याच्या परीस्थितीत घर घेणे किती योग्य आहे? - म्हाळसा
https://www.maayboli.com/node/75363

अमेरिकेत घर खरेदी - कटप्पा
https://www.maayboli.com/node/72197

दोघांना घरे अमेरीकेतच घ्यायची आहेत.
ग्रूप आहे अम्रेरीकेतले आयुष्य - आणि मी कधी अमरावतीच्या पुढे न गेलेलाही त्या ग्रूपचा सभासद आहे.

अजून मजा तर पुढे आहे
जे लोकं मला पर्सनली म्हणजे व्हॉटसप फेसबूकच्या माध्यमातून ओळखत असतील त्यांना कल्पना असेल की मी आठवड्याभरापूर्वीच नवीन घराची वास्तू शांती करून लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार आहे Happy

एकूणच डिटेक्टिव्ह जनतेचा गोंधळ फार वाढणार आहे कारण अमेरीकेतला ड्यू आयडी बनवणे माझ्यासारख्याला सोपे नाहीये त्यामुळे एण्ड ऑफ द डे बेनेफिट ऑफ द डाऊट मलाच जातो Happy

बँग ऑन
मला वाटले की मीच आता लोकांना हे दाखवून द्यायची वेळ येतेय की काय.. >>
फारच झटपट प्रतिसाद दिलात आपण. Happy
बाकीची चर्चा उद्या.
शुभ रात्री.

हाणी हे होघे हेकमेकांना हेसबुकवर होळखतात हे हाय हमी हाहे हां?
>>>

व्हॉटसपवर सुद्धा ओळखतो. कित्येक माबोकरांना ओळखतो. त्यात काही विशेष नाही.

@ आशूचॅम्प धन्यवाद. कोरोनाचा बाजार उठला की या घरी. सुकी मेहफिल रंगवूया. आमोरेसामोरे वाद घालूया

@ आशूचॅम्प धन्यवाद. कोरोनाचा बाजार उठला की या घरी. सुकी मेहफिल रंगवूया. आमोरेसामोरे वाद घालूया
>>> फेसबुक लाईव्ह करा भेटल्यावर... आम्हालापन बघू द्या...

तुम्हीच दवणीय अंडे का हो
>>
काही योगायोगांच्या आधारे लोकं संशय व्यक्त करतात. मी ते आरोप फेटाळतो.

@ च्रप्स झरूर Happy
जब मिल बैठेंगे तीन यार... ऋन्मेष आशुचॅम्प और शाहरूख
शाहरूखला बोलवायची जबाबदारी माझी

पत्ता दिलास तर Happy
>>>
वाशी ते कोपरखैरणे कुठल्याही स्टेशनला उतरा आणि रिक्षावाल्याला माझे नाव सांगा
पण स्वत:च्या गाडीने येणार असाल तर मेसेजवर टाकतो पत्ता.

अवांतर - मी तर विचारच करत होतो की माझ्या मुंबईतील तीन घरानंतर आता या नवी मुंबईतील चौथ्या घरावर एक धागा काढावा आणि त्यावर पत्ता देऊन या कोरोनाकाळात मायबोली वर्षाविहार उर्फ ववि आमच्या स्विमिंगपूलवर साजरा करावा...

Pages