Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सन्नाटा....... है धागे पे।
सन्नाटा....... है धागे पे।
तो फिर तोड दो सन्नाटा
तो फिर तोड दो सन्नाटा
..
..
..
..
..
..
कुछ नया अनुभव लिखकर.
मी लिहिन्यासाठी काही आठवले कि
मी लिहिन्यासाठी काही आठवले कि त्यादिवशी नक्की भूतं येतात स्वप्नात.मी एकटी असेल तर horror सिनेमे बघत पण नाही. नवरा कामानिमित्त बाहेरगावी जाणार असेल तर आधी आठवडाभर मी अजिबात भूताचे सिनेमे बघत नाही,नाहीतर वाटत राहतं कुणीतरी आजुबाजुला वावरतय.
आजकाल बोकलत यांचे किस्से ऐकून जरा confidence येत होता कि 'भुतं किस खेत की मूली.' पण छे काय उपयोग.
मी तर रोज घरात बोलतो की
मी तर रोज घरात बोलतो की माझ्या घरात जर कुणी अतृप्त आत्मे रहात असतील तर आपलं स्वागत आहे. आपण माझ्या स्वप्नात येऊन मी आपणासाठी काय करावं हे सांगावे. आपलं भलं होवो. तसेच जेव्हा कधी विष्णुसहस्रनामस्तोत्र म्हणतो त्याचं पुण्य माझे पूर्वज आणि घरात कोणी अतृप्त आत्मे असतील त्यांना अर्पण करतो.
मृणाली सेम.. मी पण अशीच आहे .
मृणाली सेम.. मी पण अशीच आहे .. सुरवातीच्या दिवसात जी ए कुलकर्णी.. नारायण धारप.. वाचून मनात इतकी धडकी भरली आहे ना..हॉरर मूवी..हॉरर सिरीयल नाही बघत..मी भूत कधी बघितले नाही. किंवा भूत आहे हि कल्पना पण मला पचनी पडत नाही.. पण बऱ्याच वेळा गोष्टी आपल्या कल्पनेपलीकडेच्या असतात..
मी पण पुण्यात असताना जी.ए.
मी पण पुण्यात असताना जी.ए. आणि नारायण धारप यांची पुस्तके वाचायचे. अजून त्यातले भयानक,गूढ वर्णनं लक्षात आहेत.
भिती वाटणाऱ्या माणसानं
भिती वाटणाऱ्या माणसानं कुठल्या तरी एका इष्टदेवतेवर गाढ श्रद्धा ठेवावी. पक्की श्रद्धा असेल तर संकटातून सहीसलामत पार पडतो. मनाच्या नकारात्मक लहरी श्रध्देनं थांबतात. भूतांपेक्षा मनच वैऱ्याचं काम करते, त्याला वठणीवर आणण्यासाठी श्रद्धा महत्त्वाची आहे.
आपल्या प्रवचनासाठी धन्यवाद
आपल्या प्रवचनासाठी धन्यवाद पोपटलाल.

मेरा नाम पोपटलाड हैं जी. लाड
मेरा नाम पोपटलाड हैं जी.
लाड आज माय सरनेम!!
ओह सॉरी, ते तारक मेहता चा
ओह सॉरी, ते तारक मेहता चा पोपटलाल इतका लक्षात आहे की चुकुन तुम्हाला म्हटले.

ही थरारक सत्य घटना मी लहान
ही थरारक सत्य घटना मी लहान असताना माझ्यासोबत घडली आहे. त्यावेळी मी पहिली दुसरीत असेन. गावापासून आमची शाळा दीड दोन किलोमीटर अंतरावर होती. मी पायीच शाळेत जायचो. शाळेच्या तीन इमारती U आकारात वसलेल्या होत्या आणि मधोमध मैदान होतं. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 शाळेचं टायमिंग होतं. शाळेत जायला मला साधारण अर्धा तास लागायचा. तर एके दिवशी मी गृहपाठ करायला विसरलो. त्या विषयाचा तास नेमका संध्याकाळी शेवटी होता. बाई माझ्यावर खूप चिडल्या आणि शिक्षा म्हणून शाळा सुटल्यावर मला गृहपाठ शाळेतच करून घरी जायला सांगितलं. संध्याकाळी पाच वाजले तशा बाई लगबगीने घरी जायला निघाल्या. त्यादिवशी सात वाजता माहेरची साडी पिक्चर लागणार होता त्यामुळे शाळेत मी एकटाच होतो. तर मी एकटाच गृहपाठ करत बसलो असताना सहा साडेसहा वाजले असतील. मला पॅसेजमध्ये कोणाच्यातरी चालण्याचा आवाज आला. काठी टेकत टेकत कोणीतरी चालत होतं. मी दुर्लक्ष केलं. काही वेळाने तो आवाज मी बसलेल्या वर्गाच्या बाहेरून यायला लागला. मी दरवाज्याकडे बघितलं तर बाहेर कोणीच दिसत न्हवतं. मी पुन्हा गृहपाठ लिहायला सुरू करणार इतक्यात माझ्या नावाने कोणीतरी हाक मारली बाळा काय करतोस? आवाज एका म्हाताऱ्या माणसाचा होता. बाहेर बघतोय तर तो म्हातारा दरवाजात उभा होता. हळूहळू काठी टेकत तो माझ्या जवळ आला आणि बाजूच्या बाकावर बसला. मी निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा गृहपाठ करायला लागलो. म्हाताऱ्याला भूक लागली होती. म्हाताऱ्याने विचारलं डब्यात काय आणलं आहेस बाळा? "सुकट भाकरी आणली होती खाल्ली दुपारीच" मी वर न बघता उत्तर दिलं. या उत्तराने म्हातारा जोरजोराने हसायला लागला आणि म्हणाला जाऊ दे सुकट संपली तर संपू दे तू तर आहेस ना, तुला खातो. म्हातारा अजून जोरजोराने हसू लागला आणि त्याच्या मूळ रुपात आला. मी पण कपाळावर हात मारला आणि हसू लागलो. मला हसताना बघून म्हातारा गोंधळून गेला. हसू थांबल्यावर मी बोललो म्हाताऱ्या खविसा तुला त्या दिवशीच चिंचेच्या झाडावर पाहिलं होतं तेव्हाच ठरवलं तुला एकदा भेटायचं आज मुद्दामच गृहपाठ केला नाही कारण मला माहित होतं इथे मी एकटा थांबलो तर तू नक्की येशील. असं बोलून माझा शाळेचा आयडी त्याच्याकडे भिरकवला, आयडी गोल गोल फिरत त्या खविसाच्या अंगावर जाऊन खाली पडला. आयडीवर असलेलं बोकलत नाव वाचून खविसाची दातखिळी बसली. कसाबसा उठून वर्गाच्या बाहेर जायला दरवाजापर्यंत गेला तोच मी नजरेनेच दरवाजाला इशारा केला. दरवाजे जोरात आदळून बंद झाले. खविस खुपच घाबरला. गडाबडा लोळून न मारण्याची विनंती करू लागला. पण मी लक्ष न देता सकाळी लवकर येऊन बेंचखाली लपवलेला मोठा मासा बाहेर काढला आणि
मन भरल्यावर मी उरलेला गृहपाठ त्याच्याकडूनच करून घेतला आणि रमत गमत घरचा रस्ता पकडला. नन्तर कित्येक वर्षे मी गृहापाठाची वही, इंजिनिअरिंग असाईनमेंट्स चिंचेच्या झाडाखाली ठेऊन जायचो.
झकास!! लहानपणी लोकं म्हणत
झकास!! लहानपणी लोकं म्हणत असतील बाळ घोस्ट हंटर होईल, पाळण्यातले तुमचे पाय पाहून.
तुमच्या सगळ्यांचे प्रतिसाद
तुमच्या सगळ्यांचे प्रतिसाद वाचून नैराश्याच्या गर्तेतून बाहेर आलो.
Welcome back!!
Welcome back!!
अहो इकडे प्रार्थना, गार्हाणं
अहो इकडे प्रार्थना, गार्हाणं झाले म्हणून तूम्ही टुणटुणीत झाला आहात.
चला गार्हाणं ऐकलं गेलं
चला गार्हाणं ऐकलं गेलं म्हणायचं, बाधा बिधा काय असेल ते दूर होऊन बोकलत भुतात आले, भूतांचीच क्रुपा।

कसला थरारक किस्सा आहे, लहानपणी भुतं इतके घाबरायचे तुम्हाला, आता तर तुमचं नाव ऐकूनच पळून जात असतील ना.
bokalat इथे तरी तुम्हीच
bokalat इथे तरी तुम्हीच लिहिता कि तो खविस लिहितोय.. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे लिहून घेऊच शकता...तुमचा गृहपाठ .. इंजिनीरिंग असिनमेन्टस करून तोही हुशार झालाच असेल ना..
माझ्या मुलाला मी वरची गोष्ट
माझ्या मुलाला मी वरची गोष्ट हिंदीत आणि रंगवून सांगितली, तो म्हणतोय मला ' कुछ भी, अरे बस ना अभी.

(आम्ही घरात हिंदी बोलतो)
खूप प्रतिसाद पाहून आधी वाटलं
खूप प्रतिसाद पाहून आधी वाटलं बोकलत यांच्यावर पडी झाली की काय.. इथे तर वेगळाच राग चालू होता
चला इडा पीडा टळली
>> अहो इकडे प्रार्थना,
>> अहो इकडे प्रार्थना, गार्हाणं झाले म्हणून तूम्ही टुणटुणीत झाला आहात.

बरोबर Welcome back बोकलत
>> बेंचखाली लपवलेला मोठा मासा
>> कुछ भी, अरे बस ना अभी
>> कुछ भी, अरे बस ना अभी
हे आम्ही जुन्या कथा वाचुन म्हणायचो. बोकलतांच्या खर्या असतात
हो मी पण समजावले मुलाला, असे
हो मी पण समजावले मुलाला, असे म्हणू नये. बोकलत काकांना राग आला तर ते आणखी किस्से सांगणारच नाहीत मग.
त्यादिवशी सात वाजता माहेरची साडी पिक्चर लागणार होता त्यामुळे शाळेत मी एकटाच होतो.....हे भारी, भुताच्या गोष्टीत माहेरची साडी पण.

हे पहा जुन्या मायबोली/
हे पहा जुन्या मायबोली/ हितगुज वरचे एक रत्न!
तेव्हा देखील बोकलत सारखे आय डी होते तर !
https://www.maayboli.com/hitguj/messages/119403/106143.html?1144616759
(No subject)
हा धागा थरारक न रहाता
हा धागा थरारक न रहाता हास्यास्पद झालाय. विनोदीही नाही.
सामो,हा धागा थरारक आणि विनोदी
सामो,हा धागा थरारक आणि विनोदी कधी होता?
तुम्ही आधीच्या दोन धाग्यांविषयी विचारत आहात बहुतेक
कधी कधी जास्त विचार न करता,
कधी कधी जास्त विचार न करता, मनात आलं ते लिहायला आणि हास्यास्पद वाचायला ही मजा येते. तेवढाच विरंगुळा.

हा धागा थरारक नाहीये - आत्ता
मी दर वेळेला प्रतिक्रिया आली की उत्सुकतेने उघडत होते की काहीतरी भयाण, हिडीस, थरारक वाचायला मिळेल
एक ऐकलेला किस्सा टाकावा
एक ऐकलेला किस्सा टाकावा म्हणतो.
येऊ द्या.
येऊ द्या.
Pages